Welcome to misalpav.com
लेखक: ज्ञानव | प्रसिद्ध:
उर्फ पु.ल. वरील शिर्षकातले नाव त्यांनीच "अपूर्वाई" ह्या त्यांच्या प्रवासवर्णनामध्ये फ्रांसच्या भेटीवर असताना घेतले होते. पु.ल. म्हंटल्यावर काही लांबलचक लिहून त्यांची ओळख वगैरे मी करून द्यावी ह्याची गरज नाही. पण मराठीतल्या विनोदाची उंची....सॉरी शुद्ध,निर्मळ,निर्भेळ विनोदाची त्यांनी गाठलेली उंची आजचे काही लेखक (त्याच्या पायथ्यापर्यंतही पोहचू शकत नसताना)गाठण्याचा प्रयत्न करताना पहिले की मला रावसाहेब आठवतात ते म्हणतात "बदला की वो चाऽऽऽल, ते दिनानाथ नाही का बदलले पण त्यांचा अधिकार होता म्हणतोय मी...." थोडक्यात आजचे लेखक "कोटीच्या" नावाखाली जे करतात त्याने खूप त्रास होतो. पु.लनच्याच असामी असामी मध्ये एक वाक्य आहे "टॅकसी ड्रायव्हर सरदारजी असल्याने केव्हा फेट्यात राख घालून निघून जाईल हि भीती होती" किंवा मुबैकर पुणेकर की नागपूरकर मध्ये घरातली बोली आणि व्यासपीठावरील बोली हा फरक दाखवणारा उतारा. मी गडबडा लोळून हसलोय ह्या सर्वांवर...आपण सगळेच हसलोय मनमुराद...अशी अनेक वाक्ये जी वाचून किंवा पु.लंच्याच तोंडून प्रत्यक्ष ऐकून लक्षात राहिलेली आहेत. तुम्हालाही नक्कीच आठवत असतील. माझी एक विनंती आहे तुम्हाला पु.लची जी वाक्य आवडली आहेत ती प्रतिसादरूपाने इथे मांडा. कुणी कधीही केव्हाही हा धागा वाचला तर त्याला एक निर्भेळ, निर्मळ आनंद, समाधान मिळावे आणि धागा अजरामर सुरूच राहावा. धन्यवाद
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

छे छे ... छे हां छे .. बेन्सन जाॅन्सन कंपनीमधे सर्वीस करे छे.. - असामी असा मी.

गोविंदा डबल घोडा घे... "कस आहे हो अंग?" - "गोर"असे म्हणून हि एवढ्यांदा ओरडली कि मी ज्या गोऱ्या अंगाकडे पाहत होतो ते देखील दचकल. लुगड हे अंग झाकण्या साठी असते असे माझी समजूत. आता लुगड्यालाही अंग असते हे मला काय ठावूक?

गोविंदा नाय हो.
गजानन, डबल घोडा काढ...
त्यावरून आठवलं - आमच्या शाळेत "गजानन" नाव असलेल्या एका मास्तरांचं टोपणनाव "डबल घोडा" याचमुळे पडलं होतं...

'कॉफीत कॉफिन की काय नांवाचे विषारी द्रव्य असते.' मास्तर. एवढी चुकीची माहिती एवढया आत्मविश्वासाने आणखी कोण देणार? 'कॉफीन म्हणजे ख्रिस्ती लोकांची शवपेटीका' कथा कथन 'म्हैस'.

ओरिजिनल वाक्य असे आहे "चहात कॅफीन कि काय नांवाचे विषारी द्रव्य असते" हा विनोद कॅफीन/कॉफीन वर नसुन मास्तरांनी केलेल्या टॅनिन /कॉफीन च्या घोळावर आहे

ठिक आहे, अहो ठिक आहे काय? प्लान तर मोकळाच दिसतोय्?सोडता काय अर्ध्या तिकिटात? नाही जमणार, अहो चार आण्यात जमवा? चार आण्यात जमवायला तो काय डोंबार्याचा खेळ आहे? अहो तो बरा,तो आधी खेळ दाखवतो मग थाळी फिरवतो,तुम्ही तसे करा 'पुढच्या कशीया त्यजु पदाला',जमले फक्कड तर थाळीत चार आणे जास्त टाकीन. (पु लं कथाकथन-अंतु बर्वा.)

दातांचा बराचसा आण्णु गोगट्या झाला होता. आण्णु गोगट्या होणे म्हणजे पडणे. हा अंतूने मराठी भाषेला बहाल केलेला वाक्प्रचार आहे. रत्नागिरीचा अण्णु गोगटे वकील गेली कित्येक वर्ष ओळीने म्युन्सिपालटिच्या निवडणुकीत पडत आलेला आहे. तेव्हापासुन विहिरित पोहरा पडला तरी पोहर्याचा अण्णु झाला काय रे अस अंतू ओरडतो. - अंतू बरवा

चाळीस वर्षांपूर्वी आमची ही गेली, दारचा हापूस त्या घटकेपासून आजपर्यंत मोहरला नाही. शेकड्यान आंबा घेतलाय एकेकाळी त्या आंब्याचा...भाग्य कुठल्या वाटेने जाते ते बघा

तुकाराम आणि रामदास समकालीन. पण तुकारामांना त्रास झाला तसा रामदासांना झाला नाही. त्यांच्या तालमी होत्या..... [ मराठी वांग्मयाचा गाळीव इतिहास ]

"त्याकाळी आम्ही मॅट्रिकला बसत होतो" (एक पुस्तक परत परत वाचताना सापडलेला 'जेम') :)

ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो त्या भागात ज्याला आपण मराठी म्हणतो ती भाषा बोलतात. आता इथे मराठी बोलली जाण्याचे कारण म्हणजे इथल्या लोकांना एवढी एकच भाषा येते हे होय! मुसलमानांनी त्यांना उर्दू शिकवायचा प्रयत्न केला व तोबा तोबा म्हणत परत गेले. विशेषतः मिरज आणि सावंतवाडी येथील मुसलमानांचे उर्दू ऐकून औरंगजेबाने हाय खाल्ली आणि बर्‍हाणपुरी प्राण सोडला असे म्हणतात. शिवकालीन मराठ्यांनीही तत्कालीन उर्दू-मराठी अपशब्दकोशातील शिव्यांची उर्दू भाषांतरे जोरात उच्चारून यवनांस हैराण केले. पुढे पेशवाई आल्यावर वकीलसाहेब दरबारात तर वकिलीणबाई करोलबागेत उर्दू बोलावयास लागल्यावर "हल्ला चालेल, पण उर्दू आवरा" अशा मागण्या आल्या. पुढे इंग्रजाने आपली भाषा शिकवायचा एक निकराचा प्रयत्न केला. पण दीडशे वर्षांच्या अव्याहत परिश्रमानंतरदेखील ब्याट, ब्यांक, गूड ह्याबिट्स यांड ब्याड ह्याबिट्स वगैरे ऐकून स्वतःचे इंग्रजी सुधारावयाला तो मायदेशी परतला. तात्पर्य, महाराष्ट्रातील लोकांना मराठीखेरीज दुसरी भाषा येत नसल्याने इथली भाषा मराठी आहे.

आता हे समस्त कुलकर्णी कुटुंब आणि त्यांचे दासदासी आपापली पोटे कुठल्या सिस्टिमने साफ करतात याचे ज्ञान मला कशाला ? तरीही मी 'अरे वा, छान केलंस' वगैरे शिफारशी दिल्या

" एका हौदाला हनम्या सोलुन काढीन दोन तोट्या आहेत त्यातली अरे तुझ्या बापाने दीर्घ काढली होती का रे तिखटातील ती ति आँ ति र्‍हस्व शंभर वेळा लिही तिखट एका तोटीतुन जन्या पुढे ये हात कर पुढे तुम्ही पाट्या पाडा रे हा गोंद्या कान धर त्याचा पाणी सोडले तर कावळे परकारात लपवुन काय खाते आहेस आँ पस्तीस मिनिटे तो डुक्कर गाढवाशी बोलतोय बघतोय मी आँ हा वीस सेकंदात रिकामा होतो दुसरा नळ सोडला तर ऐ रेड्या उभा रहा उभा रहा बाकावर नाडी काय चोखताय आँ बाप उपाशी घालतो तुझा तर दोन तास पंचेचाळीस मिनीटे अरे अरे अरे हे शुध्दलेखन काढलयस की हगलायस पाटीवर आँ पुन्हा काढ आज वागळ्याण्च्या विन्या का नाही आला बसा खाली काही नको जायला त्याच्या घरी आणायला उठले सगळे मर्तिकाला निघाल्यासारखे बसा तर तो हौद दोन तास पंचेचाळीस मिनीटात भरतो " ;)

आप्पा भिंगार्ड्याच्या त्या भयकारी शिंकेने सर्व भक्त मंडळींचे डोळे खाडकन उघडले. आप्पा भिंगार्डे अत्यंत कंडम मनुष्य आहे.

ऑल टाईम फेव्हरिट डायवर कोन हाय! ए शिवराम गोविंद, नाव सांग. "गंपा नाना भोरीकर.. " "कोण कर?" "भोहो रीही कह र.." "मु.पो.किंकवडी" "किंही कह वह डी' "आणखी एक लिवा. -- आक्षरास हासू नये." एखाद्या गोष्टीचा कंटाळा येणे याला 'वीट' येणे का म्हणतात ते मला त्या दिवशी समजलं. आजोबा तुमचा आमचा संबंध नाही. उगाच देवळात उडी मारून घंटा वाजवताना धोतराचा काष्टा सुटल्यावर होतो तसा चेहरा करू नका. माझ्या ओरडण्याने फक्त गाढव तेवढं दचकलं. उगाच 'बाजरीवरील कीड' किंवा 'दुसरे बाजीराव यांचे शुद्धलेखन' असल्या व्याख्यानांना हजेरी लावावी. आणि व्याख्यानानंतर व्याख्यात्याला गंभीर आवाजात - "या विषयावर आपल्याशी एकदा चर्चा करायची आहे." असं म्हणावं.

बघू लायसन्स बघू हवालदाराने ते अडीच यार्ड लिहिलं होतं नाना फडणविस अशी सही करून आलो अर्जुनाला कसाला पाटवलं? कंडम मानुस हरचन पालवाची बिजागिरी गंजून खलास...हॅ हॅ (मास्टरपीस)

हल्ली कालेजात काऽऽऽय पट्टेवालेसुद्धा जातात ह्हो!! रक्त? तुमचा आर्डरली थुंकलाय पान खाऊन पचापच. म्यानरलेस माणूस!! माझ्या धोतरावरदेखील शिंतोडे उडालेत.

>>म्हशीस चालते का हो तुमची होमिपदी???? न चालायला काय झालंय? पथ्य पाळलंनीत म्हणजे झालं, काय हो डाक्टर? बाकी तुमच्या होमिपदीची पथ्य बाकीं कडक हो !! काफीचं नि तुमचं येवढं का हो वाकडं?

---पण तेवढं तुमचं ते तबलजी शिंचं कुचकुचत वाजिवतंय की हो -- त्याला एक थोडं चा पाज चा -- तबला एक थोडं छप्पर उडिवणारं वाजीव की रे म्हणा की त्या xxxxxला." इथे पाच शब्दांची एक शिवी छप्पर उडवून गेली. तसेच पुढे गेले, आणि त्या तबलजीला त्यांनी विचारलं, "कोणाचा रे तू ?" तबलजीने वंश सांगीतला. आणि माईकपुढे नरम वाजवावे लागते वगैरे सबबी सुरू केल्या. "मग रेकार्डिंगवाल्याला ह्यें ,माइकचं बोंडूक जरा वर उचल म्हणुन!, बळवंत रुकडीकराचे ऐकलं नाहीस काय रे तबला ? 'कशाला उद्याची बात'चं रेकार्ड ऐक की -- त्याच्या वाटेत तुझं हे शिंचं माइक कसं येत नव्हतं रे xx?" म्हणत आपणच माइक वगैरे वर उचलून "हाण बघू आता" म्हणत त्या रेकॉर्डिंगचा ताबा घेतला. स्टुडियोत त्यांचा जुना राबता होता. रेकॉर्डिस्टही परिचयातलेच. थोडा वेळ इरसाल कोल्हापुरीत त्यांचा आणि ह्यांचा एक लडिवाळ संवाद झाला. "मला सांगतोस काय रे रेकार्डिंग? पी.एल. --- अहो, हे तुमचं रेकार्डिष्ट खुंटाएवढं होतं --- माझ्या धोतरावर मुतत होतं. आता मिश्या वर घेऊन मला शिकवतंय बघा --- ह्या कोल्हापुरातल्या क्राऊन शिन्माचा नारळ फुटला तो माझ्यापुढे की रे -- तू जन्म झाला होतास काय तेव्हा -- हं, तुमच्या वाजिंत्रवाल्यांना लावा पुन्हा वाजवायला -- जोर नाही एकाच्या xxx! हें असलं नाटकासारखं गाणं आणि साथ कसलं रे असलं मिळमिळीत ? थूः ! हे काय तबला वाजिवतंय की मांडी खाजिवतंय रे आपलंच ?" एवढे बोलून रावसाहेब ठसका लागेपर्यंत हसले.

तुम्हाला कोण व्हायचय -अस्सल मुंबैकर भुताला भीत नाहि एव्हढा हिंदीला भितो. परोपकारी गंपू -हेड क्लर्क गुरासारखा ओरडत होता -व्हॉट एल्स कॅन दॅट मुर्ख फेलो से - द्वैभाषीक इंग्रजी बोलण्यात गंपूचा हात धरणं अशक्य आहे. -धीस इज बिकॉज ऑफ मालिश यु आर सीइंग लाइट ऑफ द डे - नेहेमीच्या गिर्‍हाइकाला बनवु नका मिस्टर - एक वेळ दत्ताच्या सभोवती कुत्री नसतील पण गंपूच्या सायकलवर स्वतःखेरीज इतरांच्या दोन चार असणार नाहि असं होणार नाहि. पाळीव प्राणि आणि पक्षी - हे एक अत्यंत निर्बुद्ध जनावर आहे...हे म्हणजे... मांजर...मॅड्ड्म नव्हे -माझी अशी संभावना केलीत तर विदर्भाची मनं दुखतील

माझा वाढदिवस ७ नोव्हे तर पुलंचा ८ नोव्हे. मी त्याना हटकून ७ तारखेलाच फोन करून आशिर्वाद मागायचो. ८ ला फोन लागणार नाही असे कारण सांगून ७ लाच शुभेच्छा द्यायचो. एका ७ ला असाच नमस्कार केला असता ते पटकन म्हणाले " नमस्कार कसला करता आशीर्वाद द्या तुम्ही माझ्यापेक्षा एका दिवसाने मोठे ना ?" असे लॉजिक त्यानाच सुचू शकते.

माझ्या खोलीतल्या फोटोतली तरुणी परवा मला म्हणाली, 'मला चांगलेसे स्थळ शोधून द्या ना- इथे माझा जीव टांगल्यासारखं वाटतंय' ------------------------------- एकदा तुम्ही मला छान दिसतेस म्हणालांत पण 'समोरच्या सरोजबाईसारखी' हे शब्द जोडून.. --------------------------- मी राहतो पुण्यात म्हणजे विद्वत्तेच्या 'ठाण्या'त. इथल्या मंडईचेदेखील विद्यापीठ आहे. आणि विद्यापीठाची मंडई झाली आहे. बोलणे हा इथला धर्म आहे आणि ऐकणे हा दानधर्म आहे. म्हणून वक्ते उपदेश करतात आणि श्रोते उपकार करतात उपचारांना मात्र जागा नाही. -------------------------------- अहो ज्ञानियांच्या राजा । कशाला फुकाच्या गमजा? एकेकाळी रचिली ओवी । व्हाल का हो नवकवी? मारे बोलविला रेडा । रेघ बी. ए. ची ओलांडा! तुम्ही लिहावी विराणी । लिहा पाहू फिल्मी गाणी म्हणे आळंदी गावात । तुम्ही चालवली भिंत चालवून दाखवा झणी । एक नाटक कंपनी बाप रखुमादेवीवरा । आमुचा च्यालेंज स्वीकारा ----------------------------------------------- www.puladeshpande.net वरून साभार

मुलगी अगर मुलगा सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे! कारण वळण म्हटल्यावर ते सरळ कसे असणार ? भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आड्वळणी व्याख्या आहे

" ओ गोब्राम्हणप्रतिपालक, उठा. सांगा सातव्या हेन्रीने काय केले? " भणगे मास्तर. आदल्या दिवसाच्या नाटकाच्या तारेत असल्याने "आठव्या हेन्रीला जन्म दिला" असे उत्तर रुबाबात दिले. "पाटला, उठ थोबाड रंगव महाराजांचे" - भणगे मास्तर

" गड देखील आला नव्हता सिंह मुर्दाडासारखा जिवंत होता. मधल्यामध्ये माझी विडी मात्र विझली होती." " म्हातारा गनीम खोखत होता..........."

मी मधूबरोबर हॅगिंग गार्डनला फिरायला गेली होती, येताना बस ने आलो, मधू पाकिट विसरला, तरी बरं माझ्याकडे दोन रूपये होते. येताना कोथिंबीर घेऊन आली. दोन रूपयांत इतकीशीच कोथिंबीर कशी आली म्हणून आई मला ओरडली. "प्रेमाच्या जगात वावरणा-यांना व्यवहाराची भाषा शिकवणारे जग दूष्ट आहे" :काही वास-या, व्यक्ती आणि वल्ली