Welcome to misalpav.com
लेखक: मुक्त विहारि | प्रसिद्ध:
लेखाची प्रेरणा....http://misalpav.com/node/26546 १. मोठे झालो की, नौकरी लागते आणि मग आपल्याला काय हवे ते खाता येते. २. लग्न झाले, की बायको पाय चेपते,डोक्याचे मॉलीश करते. ३. ताजा पेपर वाचायला मिळतो. आणि सगळ्यात महत्वाचे... ४. रविवारी सकाळी ११ पर्यंत झोपायला मिळते. (अतिसामान्य माणूस असल्याने, ह्यापेक्षा जास्त काही मागणे न्हवते हो..पण....जावू दे...घरोघर तीच कहाणी आणि तेच रडगाणे)
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

मोठे झालो की, नौकरी लागते आणि मग आपल्याला काय हवे ते खाता येते.
मागच्या काळातल्या समाजव्यवस्थेत जॉबगॅरंटी होती. आज तुम्ही चार वर्षांनी काय करत असाल तेच सांगता येत नाही, मुल काय करेल आणि कुठे असेल ते तर नाहीच नाही. तरीही आजची व्यवस्था 'याही निकषावर' श्रेष्ठ!

अजुन एक अंधश्रद्धा! नोकरी लागली की ऑफिसला सकाळी ९ ला जायचे आणि संध्याकाळी ६ ला घरी यायचे. एवढे केले तरी पगार मिळतो.

सौ. मुवि बरेच दिवसांत मिपावर आलेल्या दिसल्या नाहीत! आणू का बोलावून?

१. मोठे झालो की, नौकरी लागते आणि मग आपल्याला काय हवे ते खाता येते. हे चुकून १. मोठे झालो की, सरकारी नौकरी लागते आणि मग आपल्याला काय हवे ते खाता येते. असे वाचले :)

कशी कोणास ठाऊक पण मिपावरील मंडळी माझे लिखाण वाचतात अशी एक अंधश्रद्धा माझ्या मनात उत्पन्न झाली होती. तिचे निर्मूलन व्हायला फारसा वेळ लागला नाही.

मोठा झालो सरकारी नोकरी पण लागली पण हवे तेंव्हा खायला मिळाले नाही( भर समुद्रात कसले हो काय? मेस मध्ये खाल्लेले पोटात टिकले तर नशीब ). लग्न झाले पण बायको पाय चेपते , डोक्याचे मॉलीश करते हे घडू शकतं ? यावर मुळात विश्वास नव्हताच

वर स्पा आणि विमेंनी विचारलेच आहे... मुवि वेळ जात नाहीये का... जा बघू आणि सौ. मुविंचे पाय चेपून द्या, डोके चेपून द्या, केस विंचरुन द्या.... तुमच्या अंधश्रद्धा असतिल हो, त्यांच्या कुठायेत? :)