एक होती सगुणा. तिच्या नवर्याचे नाव ईश्वर. तिच्या नवर्याला आणखी एक बायको होती. तिचे नाव निगुणा. दोघींचंही आपल्या नवर्यावर खुप प्रेम होते. पण दोघींच्या प्रेमाची तर्हा मात्र पुर्णपणे वेगळी. सगुणेचा सारा भर असण्यावर आणि दिसण्यावर. ती आपले नवर्यावरील प्रेम आपल्या कृतीतून, आपल्या बोलण्यातून व्यक्त करायची. त्याला चांगलं चुंगलं करुन खाऊ घालायची. त्याच्याशी प्रेमाच्या गोष्टी करायची. तो समोर दिसला नाही की बैचैन व्हायची. निगुणेचं सारंच उलट. तिचं प्रेम करणं कुणाला दिसायचं नाही. कारण ती ते शब्दांमधून व्यक्त करायची नाही. नवरा सतत आपल्या समोर असायला हवा असा तिचा मुळीच अट्टाहास नसायचा. किंबहूना "तो आपला नवरा आहे" या भावनेनंच ती आनंदी असायची. नवर्यावरील प्रेम व्यक्त करायला तिला कृती करण्याची किंवा शब्दांचा आधार घ्यायची गरजच भासायची नाही. सगुणा आणि निगुणा या एकमेकींच्या सवती असून कधी त्यांच्यात भांडण झालेलं कुणी पाहिलेल नव्हतं. मात्र त्या दोघी एकमेकींच्या अध्यात मध्यात नसायच्या हे मात्र खरं.
ईश्वर तसा गावातील मोठा माणूस होता. सारा गाव त्याला ईश्वरशेठ म्हणून ओळखायचा. गावाला लागून असलेल्या उंच टेकडीवर त्याचं घर होतं. म्हणजे प्रत्यक्षात त्याला कुणी पाहिलेलं नव्हतं. परंतू वरुन सार्या गावावर त्याचं लक्ष असतं असं सारेच म्हणायचे. अडल्या नडल्याने त्याच्यापर्यंत निरोप पाठवून त्याच्याकडे मदत मागितली की तो काही ना काही मदत पाठवून देतो असं लोक ठामपणाने म्हणायचे. अर्थात हा निरोप सगुणा किंवा निगुणेच्या मार्फतच त्याच्यापर्यंत पोहचायचा. बहुतांश सारे लोक आपलं गार्हाणे सगुणेच्याच कानावर जाईल याची व्यवस्था करायचे. कारण बघावं तेव्हा सगुणाच नवर्याचे गुणगाण गात असायची. निगुणा नवर्याबद्दल क्वचितच बोलायची. त्यामुळे निगुणेमार्फत आपलं गार्हाणं ईश्वरपर्यंत पोहचवलं तर ते त्याच्यापर्यंत पोहचू शकेल याची गावकर्यांना खात्री नसायची. खुपच कमी लोक असं मानायचे की ईश्वरशेठ आपल्या दोन्ही बायकांवर सारखंच प्रेम करतात.
गावात एक हिशोबनीस राहत होता. तो मात्र या सार्यांपासून वेगळा होता. म्हणजे तो स्वतःला वेगळं समजायचा. त्याचा टेकडीवरच्या घरात कुणी ईश्वर नावाची श्रीमंत व्यक्ती राहते याच गोष्टीवर विश्वास नव्हता. सगुणा आणि निगुणा या लोकांनीच आश्रय दिलेल्या स्त्रीया आहेत असं तो मानायचा. लोक ईश्वरशेठ नावाची कुणी व्यक्ती टेकडीवरच्या घरात राहते असं मानतात म्हणून त्यांना मूर्खात काढायचा. त्यानं म्हणे एक "असा मी, कसा मी, जसा मी, तसा मी" नावाचं महाकाव्य लिहिलं होतं. त्याला कुठेतरी नाचणीच्या सत्वाची पुरचूंडी सापडली होती. त्या पुरचूंडीचा त्याला खुप अभिमान होता. गावच्या चावडीवर लोक जमले की तो गावकर्यांना त्या नाचणीच्या सत्वाच्या पुरचूंडीबद्दल आवर्जून सांगायचा. गावकर्यांनी ते सत्व आम्हालाही दाखवा असे म्हटले की तो हजार बहाणे शोधायचा.
या हिशोबनीसाचे अनेक गावकर्यांशी खटके उडायचे. चावडी अगदी दणाणून जायची. गावकरी हतबलतेने डोक्याला हात मारून घ्यायचे. गावच्या पंचांकडे हिशोबनीसाला वाळीत टाकावे अशी मागणी करायचे. गावचे पंच मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करायचे. ज्या गावकर्यांशी हिशोबनीसाशी वारंवार खटके उडायचे त्यातल्याच एका गावकर्याने शेजारच्या गावातील मठात जाऊन हरदासाची संथा घेतली. हा नव्याने हरदास झालेला गावकरी टेकडीवरच्या ईश्वरशेठच्या कथा गावकर्यांना रंगवून सांगू लागला. उठता बसता जून्या पीढीतील लोकांचे दाखले देऊन ईश्वरशेठच्या गोष्टी सांगू लागला. ईश्वरशेठची पत्नी सगुणा आपल्याच नात्यातील आहे असं दाखवत लोकांकडून वाहवा मिळवू लागला.
जूना हिशोब चुकता करायचा म्हणून म्हणा किंवा टेकडीवरच्या ईश्वरशेठची पत्नी सगुणा ही आपल्या नात्यातील आहे असं गावकर्यांना सांगून ईश्वरशेठच्या खोटयानाट्या गोष्टी सांगून गावकर्यांची वाहवा मिळवतो हे सहन होईना म्हणा, हिशोबनीस गावातल्या बोळा-बोळात, चावडीवर हरदासाशी भांडू लागला. हरदासही तसा मुळचा सामान्य गावकरीच होता. परंतू हरदासाचं उपरणं खांद्यावर घेतल्यानंतर त्याला हजार हत्तींचं बळ आलं. आधी हरदासधर्माला जागून शांतपणे वागण्याचा त्याने आव आणून पाहीला. परंतू हिशोबनीस शांत वागून शांत राहणार्यातला नाही हे लक्षात येताच हरदासबुवांनी आपलं उपरणं खुंटीला लटकवलं आणि हिशोबनीसाशी टक्कर दयायला तयार झाले.
चावडीवर गावकी जमली. खडाजंगी झाली. कुणीच हार घ्यायला तयार नाही. हिशोबनीस एका बाजूला, हरदास आणि काही गावकरी दुसर्या बाजूला. गावात अजूनही काही लोक होते ज्यांना टेकडीवरच्या घरात ईश्वरशेठ नावाची कुणी व्यक्ती राहते की नाही याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. त्यांना टेकडीवरच्या घरातून कसलीच मदत नको असायची. त्यामुळे त्यांनी सगुणा किंवा निगुणा यापैकी कुणाशीच कधी काही बोलणं केलं नव्हतं. हे तिसर्या गटातील लोकही चावडीवर हजर होते.
ईतर गावकरी जरी अधून मधून आपले मत मांडत होते तरी मुख्य वाद हिशोबनीस आणि हरदास यांच्यातच होता. कुणीच माघार घ्यायला तयार होत नाही हे लक्षात येताच पंचांनी गावकीत बोल टाकण्यास बंदी करुन विषय तिथेच थांबवला. सारे गावकरी आपापल्या घरी गेले.
एक नुकतंच मिसरुड फुटलेला तरुण मात्र तिथेच होता. तो पुरता गोंधळला होता. त्याने या गुंत्याची उकल करण्याचे ठरवले. तो गेला गावातल्या एका ऐंशी वर्षाच्या वृद्धाकडे.
जाऊन प्रश्न केला, "आजोबा, ईश्वरशेठ नावाची कुणी व्यक्ती टेकडीवरच्या घरात राहते यावर तुमचा विश्वास आहे का?"
आजोबा म्हणाले, "त्या टेकडीवरच्या घरात कुणी ईश्वरशेठ राहतात की नाही याचा विचार करायची मला कधी गरजच भासली नाही. जेव्हा जेव्हा मी संकटात सापडलो तेव्हा तेव्हा माझा मार्ग मीच शोधला. ईश्वरशेठच्या मदतीवर अवलंबून राहीलो नाही."
"तुम्ही सगुणा आणि निगुणा यांना तरी पाहीले आहे का?" तरुणाचा पुन्हा प्रश्न.
"सगुणेला खुप वेळा भेटलो आहे. निगुणा मात्र क्वचितच नजरेला पडते." आजोबांनी उत्तर दिले.
"सारेच लोक तुमच्याप्रमाणे आपला मार्ग आपणच का शोधत नाहीत?" संभ्रमीत तरुणाने पुढचा प्रश्न केला.
"व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रवृत्ती. कुठल्याही व्यक्तीची जडणघडण ही त्या व्यक्तीचा पिंड, त्या व्यक्तीवर झालेले संस्कार आणि आजूबाजूची परिस्थिती यावर अवलंबून असते. काहींच्या मनावर लहानपणापासून बिंबवले आहे की आपण संकटात सापडलो तर ईश्वरशेठ आपल्यासाठी नक्की काहीतरी मदत पाठवतात. या श्रद्धेपोटी माणसे धडपड करतात. आणि मार्गही सापडतो. मग त्यांना वाटते की ईश्वरशेठनीच आपल्याला मदत केली. लोक काहीही समजोत, मार्ग सापडणे महत्वाचे."
"हरदास आणि हिशोबनीस यांच्या मतांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?"
"जगामध्ये मतमतांचा गलबला असणारच. कुठलीही गोष्ट पुर्णतः टाकावू कधीच नसते.समोरच्याने एखादी गोष्ट देऊ केली तर ते गोष्ट आपल्याला मानवेल की नाही याची चाचपणी करुन ती गोष्ट घ्यायची की टाकून दयायची हे आपण ठरवायचं असतं. हरदास आणि हिशोबनीस ही दोन्ही माणसं आहेत. माणसांमध्ये असणारे गुणावगुण त्यांच्यात असणारच. ते चार गोष्टी योग्य सांगतील चार गोष्टी चुकीच्या. आपण योग्य गोष्टी घ्यायच्या आणि चूकीच्या गोष्टी सोडून द्यायच्या."
वृद्धाच्या या उत्तरांनी तरुणाचे समाधान झाले आणि तो आपल्या घराच्या दिशेने चालू लागला.
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
जब्ब्ब्बरदस्त....
+१११११११११११११११११...रुपक
लै भारी..
जमलेय!
मस्तच!
आवडलं!
इश्र्वरशेठ, सगुणा, निगुणा
(हरदास, हिशेबनीस यांनी आपापली
(हरदास, हिशेबनीस यांनी आपापली कथा सांगतच रहावी. गावकर्यांनी, पंचांनी त्यात पडु नये असे वाटणारा.)+१ आवडली कथा.काय उतारा काढलाय पण...! _/\_
रोचक रेचक! रुपककथा +११११
अजून एक समर्पक चित्र
चान चान.
माझी शब्दांची निवड चुकली
"अपनी अकल लगाओ"
किती किती ते फ्रस्ट्रेशन
तरीच म्हटलं धृतराष्ट्रपुत्र कसे उगवले नाहीत अजून!
स्वतः धृतराष्ट्राला त्याचे
श्शी बाबा.
+१
+१
_/\_
ईश्वरशेठ टेकडीवरच्या घरात
लै भारी !
मस्त
अरारारारारा!
>>>एक होती सगुणा.
@ओढचादर सर* , ह्र-स्व कसा
हाही प्रतिसाद (उपरोधिक असेल
पडदेफाड
धन्या प्रणाम स्वीकार कर. _/\_
धन्या एक सॅल्यूट!!!!!
18 वर्षांची झायली सगुणा
ईश्वरशेठ टेकडीवरच्या घरात राहतो की नाही
>>लेखापाल अहंमन्य आहे, तो
त्याचं कसंय
>>पण उघडपणे म्हणायचं `बघा
विषय इतका सोपा असता तर
चला, आता बहुतेक तिसरा (का चवथा) आयडी घेऊन
त्याच असं आहे मित्रा की
वत्सा, स्वतःची नाडी पाहून उपयोग नाही.
रूपक आवडले ..पण
कोणाला समजावयचा प्रयत्न
बघ ना धन्या.
एक डाव मापी धन्याशेठ !!
टेक अ चिल पील...
आवडलं. बाकी हरदासाचा
तहे दिलसे सहमत. लेखापालाचा
आवडलं!!!
कथा 'सगुणा' ची आहे.
एक नुकतंच मिसरुड फुटलेला तरुण
Pagination