Welcome to misalpav.com
लेखक: महायोग | प्रसिद्ध:
शिवाजि महाराजानि अतिशय चालाखिने स्वराज्याच्या शत्रुन्शी सामना केला. परन्तु मिर्झा राजे जयसिंगाने केलेल्या आक्रमणंनंतर महाराजांनी एकदम तहाची बोलणी सुरू केली व तेवीस किल्ले व सोळा लक्ष रुपये वसुलीचा मुलुख देवून तह केला. या प्रसंगी केवळ पुरंदर किल्ल्यावर मिर्झा राजे जयसिंगने आक्रमण केले होते. महाराज मिर्झा राजे जयसिंगसोबत एकदम तहास का तयार झाले यामागील महाराजांचे काय डावपेच होते हे मात्र कळत नाही. यापूर्वी अफजल खानने संपूर्ण ताकदिनिशी स्वराज्यावर आक्रमण केले, मुलुख बेचिराख केला परंतु महाराजांनी त्यास योग्य ठिकाणी आणून त्याचा वध केला. मिर्झा राजे जयसिंगच्या स्वारीच्या वेळेस पुरंदर वगळता इतर ठिकाणी खास लढाई झाली नाही तरीदेखील महाराजानी असा निर्णय का घेतला असावा? महाराजांच्या निर्णयामागे चर्चेदरम्यान युद्धाच्या तयारीसाठी वेळ मिळावा असे देखील असेल.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

काहीही लिहिण्या अगोदर तुम्ही पुरेसे वाचले आहे का? मी एक पुस्तक सुचवतो. यात या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. शककर्ते शिवराय असे अंदाज करण्या पेक्षा तुम्ही हे पुस्तक वाचून त्यावरचा सारांश लिहाल तर ते कारणी लागेल. बाकी हे पुस्तक वाचल्या पासून माझी तत्कालीन इतिहासाकडे बघण्याची दृष्टी थोडी बदलली. पुरंदरें नी लिहिलेला इतिहास हा भावने वर आधारीत आहे. घटना जशा घडल्या तशा त्या का घडल्या हे शिवाजी महाराजांचा एक भक्त म्हणून पहाण्यापेक्षा एक त्रयस्थ म्हणून अभ्यास करण्यात चूक कमी होण्याची शक्यता असते. मिर्झा राजे हे चलाख मुत्सद्दी होते (अफजल्खान ही तसाच होता, पण त्याचा स्वतःवर दांडगा विश्वास असल्यामुळे काम सोपं झालं). बाकी महाराजांची अगदी लहान पणापासून स्वराज्य स्थापनेची इच्छा होती असं काही नव्हतं. ती हळू हळू तयार झाली. अफझल खानाच्या वधा नंतर सुद्धा महाराजांकडे एक पुंड राजा म्हणूनच पाहिलं जात होतं. महाराजांना आपलं राज्य स्थिर करायचं होतं. अजून विजापूर चा धोका कायम होता. बहुधा त्यांची इच्छा सध्या मुघलांबरोबर भिडण्याची नसावी. या वेळी महाराज जे औरंगजेब्बाच्या भेटीला जे गेले, ते नाइलाजाने गेलेले नाहीत. एक मुघल मनसबदार म्हणून त्यांची नेमणूक झालिये. औरंगजेबा कडून त्यांचा जो तेजोभंग झाला ते त्यांना अजिबात expected नव्हतं. त्यांना आश्चर्य आणि राग आलाय. याचा अर्थ असा, की मुघलांच्या बरोबर संधी करण्याची त्यांची खरोखरच इच्छा होती. मुघलांकडून मान्यता मिळवल्यानंतर विजापूर बरोबर दोन हात करणं सोपं गेलं असतं. शिवाय मिर्झा राजे हे तयारी निशी आले होते. मुघलांच्या सैन्याची आणि विजापूरची तुलना होवूच शकत नव्हती.

मध्यंतरी कुठेतरी वाचलं होते.. रणांगणावरची माघार हा नेहमी पराभवच असतो असे नाही.. योग्य वेळी माघार घेणे हे देखील मुत्सद्दीपणाचे लक्षण आहे

मी हे पुस्तक वाचलेले नाही पण आजवरच्या क्रमिक पाठ्यपुस्तकावरून, त्यांचे वरील फिल्म्स/सीरीअल्स व इतर सामग्रीच्या अभ्यासावरून माझे काही अंदाज व तथ्य: १)जिजाबाई यांनी महाराजांचा स्वराज्याचा दृष्टीकोन तयार करतांना संकल्प,निग्रह, राजधर्म, कायदा व निवाडा, शस्त्रविद्या यांत तरबेज केले होते. यात रामकृष्णांच्या लढाई/शिष्ठाई/इतर राजांशी मैत्री करण्याच्या व रणांगण सोडून दूर द्वारकेला निघून येण्याच्या गोष्टी तर होत्याच. २)शहाजीराजे जे मैत्री, राजकारण, युद्धनीती व युद्धतंत्रात (जे पुढे गनिमीकावा म्हणून ओळखले गेले)या सर्वात एकदम तरबेज होते त्यांचे कडून शिवाजीमहाराजांना खूप काही(जरी त्यांची फार कमी वेळा प्रत्यक्ष भेट झाली तरीही) प्रत्यक्ष/ अप्रत्यक्षपणे(ऐकीव माहितीच्या आधारे)शिकायला,अनुभवायला व युद्धतंत्र वापरण्याची कला बाळकडू म्हणून मिळाली होते. 3)शिवाजीराजे लहान असतांना एकदा त्यांना शहाजीराजे स्वत:बरोबर विजापूरला आदिलशहाच्या दरबारी घेऊन गेले होते.हा त्यांच्यासाठी एक पाठच (lesson)होता. त्यावरून भावी शत्रू कसा आहे,त्याचा दरबार,त्याचा रुतबा,त्याचे सरदार व दरबारी,त्याची निर्णयक्षमता/त्याच्यातील एकी व दुही प्रत्यक्ष बघायला मिळाली होती.आणि याचा फायदा महाराजांनी भावी राजनीतीत बरोबर करून घेतला होता. ४)शहाजीराजांनी शहजादा खुर्रम(जो नंतर शाहजहान या नावाने प्रसिद्द झाला)याला भातवडीच्या युद्धात कैद केले होते पण तरीही त्याला सोडून त्याच्याशी चांगले संबंध ठेऊन मैत्री(हीच ती राजनीती) केली होती. (नंतर पुढे शहाजीराजांनी/जिजाबाई यांनी फार कल्पकतेने याचा वापर केला व ज्यामुळे शहाजीराजांना आदिलशहामुळे असलेला जीवाचा धोका टाळता आला.पण शहाजी राज्यांना स्वराज्य हि संकल्पना बासणात गुंडाळावी लागली, कारण त्यांना दक्षिणेत दूरवरच्या राज्यांशी लढाईवर पाठवण्यात आले.) ५)महाराजांची "स्वराज्य" ह्या संकल्पनेवरची श्रद्धा इतकी दृढ होती कि जर आपण ही संकल्पना लढवैय्या व स्वाभिमानी राजपूतराजांच्या गळी उतरवू शकलो तर पूर्ण(आसेतु हिमाचल)भारतातून इतर जुलमी राजवटी उखडून फेकू शकतो, असे वाटत असावे. पण त्यासाठी लागणारी संधी त्यांना मिळत नव्हती. ६)ज्यावेळेला त्यांना कळले कि मिर्झाराजे जयसिंग सारखे मातब्बर राजपूत सरदार स्वराज्यावर चालून येत आहेत तर या संधीचा अवश्य लाभ घेतला पाहिजे व मैत्री करून लढाई टाळली पाहिजे व आपले स्वराज्याचे विचार मांडता आले पाहिजेत. यात दोन फायदे होते एक तर त्यांचा मान राखल्यासारखे होईल व मैत्री करून स्वराज्याच्याबाजूने करता येईल का ते चाचपणे व दुसरे मोठी लढाई टाळून होऊ स्वराज्याचे होऊ शकणारे नुकसान रोखता येईल. जरा महाभारत आठवा: जरासंध जेव्हा मथुरेवर चालून येतो आहे हे पाहून कृष्णाने युद्ध टाळण्यासाठीचे तंत्र (हि पण एक एक युद्धनीती/strategy) वापरून द्वारकेला प्रयाण केले होते (ज्यामुळे रणछोडदास हे नाव पडले) ७)पण दुर्दैवाने असे घडू शकले नाही व प्रामाणिक मिर्झाराजे जयसिंग काही बधले नाहीत व तहाची बोलणी करावी लागली. त्यातही महाराजांनी संभाजीराजे यांच्या नावे वतनदारी आपल्याकडेच ठेवली. बरोबरच्या दिलेरखान यांनी त्यांना आग्र्याला बोलावण्याचा आग्रह धरला. महाराजांसाठी ही तर अजून एक मोठी संधी होती व आग्र्याला जाऊन इतर राजपूर सरदारांनाही भेटता येईल व ज्या शत्रू बरोवर उद्या दोन हात करायचे आहेत त्याचीही इत्यंभूत खबर काढता येईल. नाहीतर मैत्री झाली तर कदाचित शाहजहान व शहाजी यांचे जसे संबंध होते तसे औरंगजेबबरोबर महाराजांना ठेवता येणे शक्य होते. ७) Calculated risk घ्यायची महाराजांची सदैव तयारी असायची. पण त्यासाठी लागणारी खडा न खडा माहिती महाराज जमेल त्या पद्धतीने, क्षणाची उसंत न घेता काढायचेही. आपल्या ध्येयासाठी १% यशाचा chance असूनही महाराजांनी ९९% risk घेतली. पण विचार करा यात महाराज यशस्वी झाले असते तर? पुढचा इतिहासच पूर्ण वेगळा असता. ८) पुढे महाराजांचा तोही प्रयत्न फसला. पण अशा प्रसंगी कालवेळ याचे भान राखून सोबत नेलेल्या सर्व ४०० साथीदारांची सही सलामत सुटका (zero loss..... .. !!!! ???)करून घेऊन जे झाले त्याने औरंगजेबालाच मान शरमेने काही घालावी लागली. धन्य ते शिवाजी महाराज, धन्य ते शहाजीराजे व जिजाबाई. कळावे, लोभ असावा आपला लाडका : आयुर्हीत