Welcome to misalpav.com
लेखक: mohite jeevan | प्रसिद्ध:
'आरं ते रम्या आलंय नव्हं,' 'आणि आलं का?,' 'म्हणजे लग्नाला मुलगी बघतोय माहीत नाय काय?,' 'लाय गावडळं हाय बघ,कोण देणार त्याला मुलगी,' 'आरं मुलगा कसला का आसना काम करणार पाहिजे,आणि हा तर शहरात वाँचमनी करतोय की,' 'ते बरोबर हाय पण याचं नशिब कसं फळणार,याच्या बरोबरची लगीन होऊन दोन दोन पोरं झाल्याती, आणि हा बसलाय हात हालवत,' आसे शिरर्क्या म्हणताना सर्व जण हासु लागले, या महिन्यात रम्यानं कारण नसताना चांगली पंधरा दिवसाची रजा काढुन गावी आला होता,पहिल्या पाच दिवसात त्यानं दोन मुली शेजारच्या गावात पाहिल्या,पण काही जुळले नाही.नेहमीप्रमाणे तो बाबाला हातबार लावण्यासाठी पिठाच्या चक्कीवर काम करी,मग वसंतराव ही रम्या आला की घरात निवात बसत तेवढीच विश्रांन्ती त्याना मिळे,पण रम्याला ते आवडत नसे शहरात बी काम आणि इथं पण काम आसं त्याला वाटे,व ना ईलाजानं तो काम करी. सातव्या दिवशी त्यानं चक्की चालु केली,त्याच दिवशी त्याची रेखा नावाच्या बाईशी ओळख झाली,मग ती रोज येत होती,ती त्याला जाम आवडली, शेवटी तिची माहीती काढल्यावर त्याला कळलं की तिला तिच्या नवर्यानं सोडलं हाय,मग गडयानं धाडस करुन एकदा तिचा हात चक्कित धरला आणि बया लाजुन हात मागं घेतली, आणि रम्याकडं बघुन हासली की. शेवटी रम्यानं शहराकडे जायच्या दोन दिवस आगोदर तिला दाबली आणि शहराकडं तिला यायला तयार केली. शेवटी रम्यानं तिला घेऊन शहरात आला,तिच्या आगे पिछे कोणी नसल्यानं गावानं लक्ष दिलं नाही, पण रम्याचं नाव मात्र गावभर झालं,सगळी म्हणत,काय करणारं बिचारा लगीन नाही तर आसच डोकं फिरतं, शेवटी वसंतराव ही त्याच्याकडं लक्ष दिलं नाही. सहा महिने उलटुन गेले, रम्यानं रेखासाठी घरात तिजोरी,टीव्ही,इस्री इ. उपयुक्त वस्तु घेतल्या,बायको कोठे जाऊ नये,घरातच रमावी आसे त्याला वाटले.ती ही त्याच्याबरोबर रमली होती. तिकडे काम ही व्यवस्थित चालु होते,कामावरील इतर गार्डना ही त्याची करामत माहीत होती. पुढील महिन्यात त्याची बदली गारमेट युनिटवर झाली,तेथे दोन सिक्यरिटी गार्ड होते.एक पुरुषा साठी व दुसरा स्री साठी लेडीज सिक्युरिटी. शालु कामा बाबततशी कडक होती पण इतरवेळी मात्र ती मन मोकळे पणाने राहत.रम्यानं तिला चार दिवसात ओळखलं.दोघांच्यात भरपुर गप्पा होत आसे,पण हे कोणाला दाखवुन देत नसत. पण रम्याची दुसर्या आठवड्यातच दिवस पाळी व रात पाळी ही चालु झाली ,रातपाळीला एकटाच आसे.मालक म्हणाला,भरती होईपर्यंत कर, रात्री घरी झोपण्यापेक्षा इथचं झोपत जा.' घरी रेखाला काहीतरी कारण सागुन दिवस रात कामाला जात आसे,रेखा त्याला दोन टाईम डबा देत. तिकडे शालु व रम्यामध्ये जवळीकता चांगलीच वाढली होती. रम्यानं एकदा धाडस करुन तिच्याकडं फोटो मागीतला, 'का हो एवढ्या जवळ आसताना माझा आणि फोटो कशाल?,'शालु सिक्युरिटी म्हणाली, 'आता रातपाळी पण इथंच करतो की एकटा आसल्यानं लय आठवण येते बघं तुझी,म्हणुन म्हटलं जरा फोटो पाहुन तर समाधान होईल,' 'पण माझं एक काम करायचं?', ' एक का शंभर काम करतो की', 'आहो तसं नव्हं,' आसं म्हणत रम्यकडुन तिनं बाजरातुन दहा हाजारची खरेदी पंधरा दिवसात केली,त्यात साड्या,टीव्ही, सायकल त्यच्याकडुन घेतली व त्याच्या हातात एक जुनाट तरुणपणाचा फोटो दिला.आणि म्हणाली कोणाला सांगु नका हं. पण रम्याला आनंद गंगनात मावेना, त्याला वाटु लागलं, 'भगवान जब देता है छप्पर फाड के देता है, हाच मी रम्या ज्याला कोणी लग्नाला मुलगी देत नव्हती आज दोन बायका जवळ हाय ती,एक घरात आणि एक कामावर. तिकडे रेखा मात्र त्याच्या दिवस रातच्या कामानं खुप वैतागली होती. एक दिवस तो रात्री घरी जेवायला गेला आणि पाहतोय तर घराला कुलंुप ,घरमालकाडं चौकशी केली तर कळालं,सामान सर्व घेउन गेली तुमची बायको, हे ऐकुन रम्यानं डोक्याला हात लावला,घराचं कुलुप काढुन पाहतोय तर घरचं सर्व सामान गायब होत. त्या रात्री न झोपताच त्यानं रात जागुन काठली, झोप काय येत नव्हती.डोक्यात रेखाचाच विषय. शेवटी पहाटे त्याला वाटु लागले की रेखाच्या पायात घरदार व गाव सोडलं आता कोण आपलं? तेवढ्यात त्याच्या डोक्यात प्रकाश पडला त्यानं शालुचा फोटो खिशातून काढला व तो एकच आधार त्याला वाटु लागला, दुसर्या दिवशी सकाळी कामाची वेळ झाली, आवरा आवर करुन तो शालुची वाट पाहु लागला तेवढ्यात त्याच्या समोर एक वयस्क बाई थांबली व म्हणाली,'मी नविन लेडीज सिक्युरिटी गार्ड आहे,' रम्याला ते ऐकुन चक्कर आल्यागत झालं,चोकशी केली तर कळालं की शालु गेली गावाला,पण कोणत्या ते माहीत नाही. हेच रम्या जेव्हा इतर सिक्युरिटी गार्डना आपली कहानी सांगीतली तेव्हा मात्र सर्व जण रम्याकड पाहु लागले, त्यातलाच एकजण म्हणाला,'भगवान जब लेता है छप्पर फाड के लेता है,' आणि सर्व जण रम्यकडं पाहुन हासु लागले, व रम्याला ही याच्या व्यतिरिक्त मला कोणी नाही आसं वाटु लागलं व तो ही त्याच्याबरोबर हासु लागला.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

खरे सांगा, स्वतंत्र पुरुष विभाग असता तर कथा आणखी 'रंगवली' असती की नाही? बरीच वाक्ये कोट करायची होती... असो. =))

अरेरे! रम्यानी घरी आणि कामावर एक-एक सिक्युरिटी गार्ड नेमायला पाहिले होत. मग़ भग़वाननी त्याचे छप्पर असं फाडलं नसतं! असो. मला 'हातबार' हा नवीन शब्द़ कळला त्यानिमित्तानी. ;)

तुम्ही "चक्कीत जाळ" हा वाक्प्रचार ऐकला आहे काय ? तर त्याच्या चक्कीत जाळ झाला मग त्याने ""मग गडयानं धाडस करुन एकदा तिचा हात चक्कित धरला" ज़ीवन भौं ना मिपातुर लेखक म्हणावे काय ?

ही घडी अशीच राहूद दे| कथेचा सुगंध असाच राहू दे| भाउंचा धागा आणि प्रतिसाद म्हणजे ए बी पी माझा/आय बी एन लोकमत वर "फुटकळ" विषयावर होणारी (तडाखेबंद+ऊपयोग शून्य) चर्चा-गुर्‍हाळ आठवते.

, रम्यानं रेखासाठी घरात तिजोरी,टीव्ही,इस्री इ. उपयुक्त वस्तु घेतल्या,बायको कोठे जाऊ नये,घरातच रमावी आसे त्याला वाटले.ती ही त्याच्याबरोबर रमली होती. 'पण माझं एक काम करायचं?', ' एक का शंभर काम करतो की', 'आहो तसं नव्हं,' आसं म्हणत रम्यकडुन तिनं बाजरातुन दहा हाजारची खरेदी पंधरा दिवसात केली,त्यात साड्या,टीव्ही, सायकल त्यच्याकडुन घेतली

जीवनभौ, तुम्ही 'ग' च्या खाली नुक्ता काढायचा बंद केला त्यामुळे आम्ही रुसलो आहोत, आता प्रतिक्रिया नाही देणार! असा एकेक दागिना उतरवायला लागलात तर तुमचे लेखन आणि इतर सामान्य लेखक यांत फरक काय राहिला ?

असा एकेक दागिना उतरवायला लागलात तर तुमचे लेखन आणि इतर सामान्य लेखक यांत फरक काय राहिला ?
तुम्हाला त्यांचे लेखन स्ट्रीपटीज च्या मार्गावर चालले आहे असे म्हणायचे आहे काय ?

पण रम्याची दुसर्या आठवड्यातच दिवस पाळी व रात पाळी ही चालु झाली ,रातपाळीला एकटाच आसे.मालक म्हणाला,भरती होईपर्यंत कर, रात्री घरी झोपण्यापेक्षा इथचं झोपत जा.'
रातपाळीला झोपायला वॉचमनला सांगणारा मालक महानच वो! आजकाल अशी मान्स गावायची नाहीत.

रम्यानं एकदा धाडस करुन तिच्याकडं फोटो मागीतला,
रम्याकडं मुबाईल नवता का? नाय ती तिजोरी, इस्त्री घेत्ली त्यात एक मोबाईल घेतला असता तर स्वतःच फोटू काढला असता नाय का? उगाच १०००० चा चुना लागला.

रम्यानं एकदा धाडस करुन तिच्याकडं फोटो मागीतला,
रम्याकडं मुबाईल नवता का? नाय ती तिजोरी, इस्त्री घेत्ली त्यात एक मोबाईल घेतला असता तर स्वतःच फोटू काढला असता नाय का? उगाच १०००० चा चुना लागला. असो आता तुमचा दोन्ही पायांचा फोटो आमाला द्या.

लेखामधे भाषेने हीनतेची पातळी गाठली आहे .. लोकप्रिय होण्याचा हा प्रयत्न आहे का ? काही लोकांना ते आवडते.. काही विरोध करतात ..मग विरोधाला व्यक्तीस्वा वाले विरोध करतात .. तोवर पॉप्कॉर्न संपून गल्ला गोळा करून कलटी !! असा प्रकार दिसतोय

जीवनभाउंच्या कथांवर प्रतिक्रिया दिल्याशीवाय रहावत नाहि. असो. कथेतील काहि 'दबलेली' वाक्ये सोडली तर कथा छप्पर फाडके आहे! लगे रहो जीवनभौं!

ह्म्म !! प्रतिसादच चुकला म्हणायचा. तुमच्या प्रतिसाद लिहीलेल्या सगळ्याच गोष्टी हाताबाहेत गेलेल्या आहेत. आवरणं शक्यच नाही. शब्द मागे घेतो. ;)

एकवेळ "बुकर अन नोबेल " मिळेल पण साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळायला गत जन्मीचे भाग्य आणि ह्या जन्मीची पुण्याई लागते. आणि तसेही अमेरिकेचा अध्यक्ष होणे सोपे आहे पण साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होणे कठीण. असो, भाऊंच्या पुढील वाटचालीस आमच्या कडून भरपूर शुभेच्छा. (बिन-केशरी जिलबीचा द्वेष्टा आणि जीवनरंगी मिठाईचा फॅन) मुवि

"मिपाकरांचा पाठिंबा" हे सात शब्द म्हणजे सप्तस्वर्गा सारखेच आहेत. हे मिपाकर म्हणजे लई बेक्कार माणसे बघा. वेळप्रसंगी कुण्णा कुण्णाला सोडत नाहीत. ह्या मिपाकरांच्या भरवश्यावर जीवनभाऊ नक्कीच नसावेत.

हे बरे आहे राव तुमचे. आम्ही दरेक वेळी पहिल्यांदा हजेरी लावायचा प्रयत्न करतो आणि तुम्ही मात्र म्हणता की "मुविंचा" पाठिंबा नाही म्हणून.... अरेरे खर्‍याची दुनिया नाही राहिली..... आणि तसेही तुमच्या-आमच्या सारख्या "जीवनरंगी मिठायांच्या पंख्यांना" कोण विचारतो? आजकाल बिन-केशरी जिलबी पाडूंनाच पुढे आणणारे , मुद्दाम गहन विचार करणारे चायनीज समुद्री माणसे बरीच आहेत..... असो, एकूण काय तर, तुम्ही आणि आम्ही जीवन-भाऊंचे पंखे. वरील उप-प्रतिसाद हा श्री. बॅटमॅन यांनाच आहे. हे वेसांनल

आओ काका, तुमचा पाठिंबा हायेच की, तुमच्याशिवाय हायेच कोण????
अरेरे खर्‍याची दुनिया नाही राहिली.....
डॉ.सुबोध खरे आणिक इतर खरेकुलोत्पन्न येऊन वरील वाक्य खर्‍याचे खोटे करतील, तेव्हा सांभाळून ;)
आणि तसेही तुमच्या-आमच्या सारख्या "जीवनरंगी मिठायांच्या पंख्यांना" कोण विचारतो? आजकाल बिन-केशरी जिलबी पाडूंनाच पुढे आणणारे , मुद्दाम गहन विचार करणारे चायनीज समुद्री माणसे बरीच आहेत..... असो, एकूण काय तर, तुम्ही आणि आम्ही जीवन-भाऊंचे पंखे.
ते बाकी खरं. पण जीत आपलीच होणार, कारण हमारे पक्ष में जीवन है!!!!

मार्केट पेनिट्रेशनचे गट्स आहेत ज्याचा अगदी अरिंदम चौधरी सारख्या विपणन तज्ञाने सुधा अभ्यास करावा. महत्वाचे : या धागा लेखकाचे विशेष कौतुक करणारे माझे दोन प्रतिसाद विनाकारण अदृश्य केले आहेत माताय भौंच्या चमच्यान्नीच प्रतिसाद लिहावेत असा नियम तर रातोरात पास जाहला नाय ना ?