'आरं ते रम्या आलंय नव्हं,'
'आणि आलं का?,'
'म्हणजे लग्नाला मुलगी बघतोय माहीत नाय काय?,'
'लाय गावडळं हाय बघ,कोण देणार त्याला मुलगी,'
'आरं मुलगा कसला का आसना काम करणार पाहिजे,आणि हा तर शहरात वाँचमनी करतोय की,'
'ते बरोबर हाय पण याचं नशिब कसं फळणार,याच्या बरोबरची लगीन होऊन दोन दोन पोरं झाल्याती, आणि हा बसलाय हात हालवत,'
आसे शिरर्क्या म्हणताना सर्व जण हासु लागले,
या महिन्यात रम्यानं कारण नसताना चांगली पंधरा दिवसाची रजा काढुन गावी आला होता,पहिल्या पाच दिवसात त्यानं दोन मुली शेजारच्या गावात पाहिल्या,पण काही जुळले नाही.नेहमीप्रमाणे तो बाबाला हातबार लावण्यासाठी पिठाच्या चक्कीवर काम करी,मग वसंतराव ही रम्या आला की घरात निवात बसत तेवढीच विश्रांन्ती त्याना मिळे,पण रम्याला ते आवडत नसे शहरात बी काम आणि इथं पण काम आसं त्याला वाटे,व ना ईलाजानं तो काम करी.
सातव्या दिवशी त्यानं चक्की चालु केली,त्याच दिवशी त्याची रेखा नावाच्या बाईशी ओळख झाली,मग ती रोज येत होती,ती त्याला जाम आवडली, शेवटी तिची माहीती काढल्यावर त्याला कळलं की तिला तिच्या नवर्यानं सोडलं हाय,मग गडयानं धाडस करुन एकदा तिचा हात चक्कित धरला आणि बया लाजुन हात मागं घेतली, आणि रम्याकडं बघुन हासली की.
शेवटी रम्यानं शहराकडे जायच्या दोन दिवस आगोदर तिला दाबली आणि शहराकडं तिला यायला तयार केली.
शेवटी रम्यानं तिला घेऊन शहरात आला,तिच्या आगे पिछे कोणी नसल्यानं गावानं लक्ष दिलं नाही, पण रम्याचं नाव मात्र गावभर झालं,सगळी म्हणत,काय करणारं बिचारा लगीन नाही तर आसच डोकं फिरतं,
शेवटी वसंतराव ही त्याच्याकडं लक्ष दिलं नाही.
सहा महिने उलटुन गेले, रम्यानं रेखासाठी घरात तिजोरी,टीव्ही,इस्री इ. उपयुक्त वस्तु घेतल्या,बायको कोठे जाऊ नये,घरातच रमावी आसे त्याला वाटले.ती ही त्याच्याबरोबर रमली होती.
तिकडे काम ही व्यवस्थित चालु होते,कामावरील इतर गार्डना ही त्याची करामत माहीत होती.
पुढील महिन्यात त्याची बदली गारमेट युनिटवर झाली,तेथे दोन सिक्यरिटी गार्ड होते.एक पुरुषा साठी व दुसरा स्री साठी लेडीज सिक्युरिटी.
शालु कामा बाबततशी कडक होती पण इतरवेळी मात्र ती मन मोकळे पणाने राहत.रम्यानं तिला चार दिवसात ओळखलं.दोघांच्यात भरपुर गप्पा होत आसे,पण हे कोणाला दाखवुन देत नसत.
पण रम्याची दुसर्या आठवड्यातच दिवस पाळी व रात पाळी ही चालु झाली ,रातपाळीला एकटाच आसे.मालक म्हणाला,भरती होईपर्यंत कर, रात्री घरी झोपण्यापेक्षा इथचं झोपत जा.'
घरी रेखाला काहीतरी कारण सागुन दिवस रात कामाला जात आसे,रेखा त्याला दोन टाईम डबा देत.
तिकडे शालु व रम्यामध्ये जवळीकता चांगलीच वाढली होती.
रम्यानं एकदा धाडस करुन तिच्याकडं फोटो मागीतला,
'का हो एवढ्या जवळ आसताना माझा आणि फोटो कशाल?,'शालु सिक्युरिटी म्हणाली,
'आता रातपाळी पण इथंच करतो की एकटा आसल्यानं लय आठवण येते बघं तुझी,म्हणुन म्हटलं जरा फोटो पाहुन तर समाधान होईल,'
'पण माझं एक काम करायचं?',
' एक का शंभर काम करतो की',
'आहो तसं नव्हं,'
आसं म्हणत रम्यकडुन तिनं बाजरातुन दहा हाजारची खरेदी पंधरा दिवसात केली,त्यात साड्या,टीव्ही, सायकल त्यच्याकडुन घेतली व त्याच्या हातात एक जुनाट तरुणपणाचा फोटो दिला.आणि म्हणाली कोणाला सांगु नका हं.
पण रम्याला आनंद गंगनात मावेना, त्याला वाटु लागलं,
'भगवान जब देता है छप्पर फाड के देता है, हाच मी रम्या ज्याला कोणी लग्नाला मुलगी देत नव्हती आज दोन बायका जवळ हाय ती,एक घरात आणि एक कामावर.
तिकडे रेखा मात्र त्याच्या दिवस रातच्या कामानं खुप वैतागली होती.
एक दिवस तो रात्री घरी जेवायला गेला आणि पाहतोय तर घराला कुलंुप ,घरमालकाडं चौकशी केली तर कळालं,सामान सर्व घेउन गेली तुमची बायको,
हे ऐकुन रम्यानं डोक्याला हात लावला,घराचं कुलुप काढुन पाहतोय तर घरचं सर्व सामान गायब होत.
त्या रात्री न झोपताच त्यानं रात जागुन काठली, झोप काय येत नव्हती.डोक्यात रेखाचाच विषय.
शेवटी पहाटे त्याला वाटु लागले की रेखाच्या पायात घरदार व गाव सोडलं आता कोण आपलं? तेवढ्यात त्याच्या डोक्यात प्रकाश पडला त्यानं शालुचा फोटो खिशातून काढला व तो एकच आधार त्याला वाटु लागला,
दुसर्या दिवशी सकाळी कामाची वेळ झाली, आवरा आवर करुन तो शालुची वाट पाहु लागला तेवढ्यात त्याच्या समोर एक वयस्क बाई थांबली व म्हणाली,'मी नविन लेडीज सिक्युरिटी गार्ड आहे,'
रम्याला ते ऐकुन चक्कर आल्यागत झालं,चोकशी केली तर कळालं की शालु गेली गावाला,पण कोणत्या ते माहीत नाही.
हेच रम्या जेव्हा इतर सिक्युरिटी गार्डना आपली कहानी सांगीतली तेव्हा मात्र सर्व जण रम्याकड पाहु लागले,
त्यातलाच एकजण म्हणाला,'भगवान जब लेता है छप्पर फाड के लेता है,'
आणि सर्व जण रम्यकडं पाहुन हासु लागले, व रम्याला ही याच्या व्यतिरिक्त मला कोणी नाही आसं वाटु लागलं व तो ही त्याच्याबरोबर हासु लागला.
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
मी पहिला.....
जीवनभाऊ... मचाक का?
भा री ही! दुसरे शब्दच नाहीत..
अरेरे!
मस्तै जीवनभौ !!! अजून
लाजिरवाणे लेखन.
हांतेज्या xxx
एकसो एक वाक्यं आहेत
रामपुरी
******त
शेवटी पहाटे त्याला वाटु लागले
जीवनभौंच्या कथा नादखुळा!
मस्त हो जीवनशेठ, अजुन एकसे एक
जी१ भाव मिपावरचे फाक-डू-आयडी
, रम्यानं रेखासाठी घरात
रम्यानं रेखासाठी घरात तिजोरी,टीव्ही,इस्री इ. उपयुक्त वस्तु घेतल्या,बायको कोठे जाऊ नये,घरातच रमावी आसे त्याला वाटले.ती ही त्याच्याबरोबर रमली होती.'पण माझं एक काम करायचं?', 'एक का शंभर काम करतो की', 'आहो तसं नव्हं,' आसं म्हणत रम्यकडुन तिनं बाजरातुन दहा हाजारची खरेदी पंधरा दिवसात केली,त्यात साड्या,टीव्ही, सायकल त्यच्याकडुन घेतलीवरील विधाने दर्शवतात की रम्या
आम्ही नाई जा!
असेच म्हणतो. ग़ नाही काढला तर
तिमा
कशाला आठवण करून देताय?
>>>दुर्दैवा
हो तर!
=)) धन्य
पण रम्याची दुसर्या आठवड्यातच
रम्यानं एकदा धाडस करुन
रम्यानं एकदा धाडस करुन
जिवन भौ जब लिहता है तो....
भाषा
आपले कांही नियंत्रण नाही.
जीवन भाऊंना हीन म्हन्नार्या
नाहि म्हटलं तरी
छ्या.....
आवरा !!
आँ कोणाला??
ह्म्म !! प्रतिसादच चुकला
अश्लील वाक्यांना ???
जीवनभौं चं नाव साहित्य अकादमी
साफ चूक
गलत....
अहो होतील, तेही होतील.
मिपाकरांचा पाठिंबा.......इथेच खरी ग्यानबाची मेख आहे ना,,,,,
पण जीवनभौंना मिपाक्रांचा
अरे व्वा....
आओ काका, तुमचा पाठिंबा हायेच
"आजीवन" असा नवा पुरस्कार
ठ्ठो धन्य धन्य ते संताजी
पुन्हा एकदा छप्परतोड लेख आणी
पब्लिकचे इतके चेकाळवाणी प्रतिसाद बघुन
काही म्हणा जीवन भाऊकडे
काही ठराविक शब्द सोडले तर लय