Welcome to misalpav.com
लेखक: नानीचा नाना | प्रसिद्ध:
माया एक दिवस गेलारीत उभा राहून बाहेर होतो . तेवढ्यात एक फाटके कपडे घातलेला मनुष्य एका लहान मुलाला घेऊन पुढील रस्त्यावर बसला . त्यानंतर त्याने त्याच्या पोतडीतून एक तेलाची बाटली काढली व तो मुलाच्या हाता / पायांना लावू लगला .ते पाहून मला वाटले कि तो मनुष्य त्या लहानग्याची किती काळजी घेतो आहे क़दाचित त्या मुलाने व्यवस्थित मोठे होऊन आपल्या म्हातारपणी आपली काळजी घ्यावी असा रेखिला त्याचा हेतू असेल . तो मनुष्य बर्याच आपुलकीने त्याला तेल लावत होता व तो मुलगा देखील शहाण्यासारखा तेल लावून घेत होता . ऑफिसची वेळ झाल्यावर मी नेहमीप्रमाणे रेल्वे स्टेशन वर आलो आणि सकाळी पाहिलेल्या त्या माणसाला त्या ब्रीज वर बसलेला पाहून आश्चर्य वत्ले. त्याहून आश्चर्य सकाळी त्याने ज्या मुलाला तेल लावले होते तो मुलगा त्या तेलासकट त्याच्यासमोर निपचित झोपला होता व तो मुलाला औषध पाण्यासाठी भिक मागत होता .
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

सुरुवातीपासून नीट वाचायला हवा तर उलगडा होतो.
एक दिवस गेलारीत उभा राहून बाहेर होतो
म्हणजे लेखक स्वतःच्या गॅलरीत उभं राहून देखिल घराबाहेर झाल्यासारखा होता. कारण तेल किती महाग आहे हा प्रश्न त्याला सतावत होता. तेवढ्यात त्याला एक फाटका माणूस मुलाला तैलमर्दन करतांना दिसला. ते पाहून त्याला वाटलं की तेल ही `माया' आहे. आपण तेल खाण्याऐवजी लावायला वापरलं तर म्हातारपण सुखात जाईल. पण कुणी तरी शहाण्यासारखं तेल लावून द्यायला (किंवा घ्यायला) पाहिजे. या विचारात नेमकी ऑफिसची वेळ झाली. आता बॉस तेल लावणार अशा विचारनं तो स्टेशनवर आला. ब्रीज म्हणजे दोन समांतर विचारातला दुवा. तर आश्चर्य असे की म्हातारपणी औषधपाण्याची सोय झाली नाही तर निपचित पडायची वेळ येईल आणि सकाळी तेल आणले तर संध्याकाळी भीक मागावी लागेल. या गहन विचारानं लेखकानं हा कूट धागा काढला.

पहिल्या वाक्यात ' बघून ' हा शब्द अनवधानाने लिहायचा राहून गेला आहे . येथे माया याचा अर्थ पैसा नसून प्रेम अभिप्रेत आहे . काथ्याकूट वाचून एकंदरीत मजा वाटत आहे .