Welcome to misalpav.com
लेखक: जॅक डनियल्स | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

हा साप कोणता? कृपया सांगता का जरा? Snake http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5614326492656169412&SectionId=10&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87&NewsDate=20140205&Provider=-%20%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9C%20%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%82%20%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%82!%20%28%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B%20%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%B0%29

हा दिवड जातीचा साप आहे. याला देंडू, विरोळा किंवा इंग्लिश मध्ये चेकर्ड किलब्याक म्हणतात. विहारी, नदी मध्ये आढळणारा बिनविषारी साप आहे. पण बिनविषारी असला तरी उचलला तर कचकच चावतो.

येतो आहे काही दिवसात, आत्ता सुट्टीवरून परत आलो त्यामुळे प्रोफेसर डोक्यावर बसला आहे सध्या. तो जरा खाली उतरला की लिहितो.

साप वा अन्य प्राण्याकरता वापरले जाणारे मराठी भाषेतले शब्द हे फार काटेकोर नसतात असे दिसते. दिवड जातीत आणखी कोणते साप असतात? विरोळ्याच्या चावण्याबद्दल बर्‍याच ठिकाणी वाचायला मिळाले आहे. जोरदार रक्त वगैरे काढतो असेही ऐकून आहे. हा कायम पाण्यात असतो का उभयचर?

दिवड हीच त्याची जात आहे, म्हणजे तेच त्याचे विशेष नाव आहे. कुटुंबाचे नाव piscator आहे, त्यात इतर किलब्याक पण येतात. म्हणजे ग्रीन किलब्याक इ. पण आपल्या एकडे सरसकट सगळया पाण सापाला दिवड म्हणण्याची पद्धत आहे. हा साप पाण्याच्या जवळ आढळतो (सगळे साप उत्कृष्ट पोहू शकतात.) आणि मासे आणि बेडूक खातो. सहकारनगर मध्ये लोकांच्या बाथरूम मधून पण मी त्याला पकडला आहे. चावण्याचे म्हणाल, तर हातावर गुप्ती चालवल्या सारखा चावतो, अगदी हात फोडून काढतो आणि रक्तबंबाळ करून टाकतो.