Welcome to misalpav.com
लेखक: मदनबाण | प्रसिद्ध:
(श्री शरद यांच्या http://www.misalpav.com/node/26963 या धाग्यावरील अवांतर प्रतिसाद इथे हलवून नवा धागा तयार केला आहे. एखाद-दुसरा संदर्भ त्या धाग्यातील चर्चेबद्दल असू शकतो. - संपादक मंडळ) _____________________________________ मंत्रादि गोष्टींवर लिटरली विश्वास ठेवणे अन कोणी चेष्टा केली की पोरकटपणे आरडाओरडा करणे, इ. मूर्खपणा टाळलाच पाहिजे वटवाघुळ मानवास संस्कॄताची उत्तम माहिती असताना, त्याने असे विधान करावे हे सर्वात धक्कादायक आहे. मननेन त्रायते इति मन्त्रः :- संदर्भ विकी महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम्। यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः।।25।। श्रीमद्भगवद्गीता अध्याय १० श्लोक २५ { जप हा मंत्रांचाच केला जातो} बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम्। मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः।।35।। श्रीमद्भगवद्गीता अध्याय १० श्लोक ३५ { गायत्री छन्दात्मक मंत्र आहे हे तर आता सर्वश्रुत आहे.} मंत्रांचा वापर करुन त्याचा अनुभव, फायदा / तोटा घेणारी मंडळी आजच्या घडीला आहेत, तसेच उध्या ही असतील. अनुभव घेण्यापेक्षा चेष्टा करणे हे अगदी सोपे आहे, हे वाचकांनी लक्षात ठेवावे. जालावर या संदर्भात वाचन / शोध घेत असताना काही माहिती समोर आली { ही माहिती मी अजुन संपूर्ण वाचली नाहीये.} वाचकांसाठी त्याचे दुवे खाली देतो :- An Introduction to the "MantraŚãstra" MANTRAS दोन्ही दुवे हे पिडीएफ चे आहेत. ज्या वाचकांना या विषयात रस आहे त्यांनीच हे दुवे अघडुन वाचण्याचे कष्ट घ्यावेत, टिंगल करण्यास विशेष बुद्धी लागत नाही असा माझा समज असल्याने जे हा विषय एक टिंगल / थट्टा म्हणुनच पाहतात त्यांनी याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे ! प्रयत्नाचा एक भाग तुम्ही किंवा अजून कोणी ज्यांनी अनुभव घेतले आहेत त्यांना विचारणे हाही असतो. वटवाघुळाने अनुभवा विषयी विचारणा केली आहे,म्हणुन जरा टंकन कष्ट घेतो. मंत्र :- कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते ! हा मंत्र मला माझ्या तिर्थरुपांकडुन कळाला, ज्या ठिकाणी मी सध्या राहतो आहे ती जागा विकत घेतानाची ही घटना आहे.{अनुभव क्रमांक १} या जागेचे {जागा विकत घेण्यासंबंधीच्या व्यव्हारांसकट इतर महत्वाची कागदपत्रे ओरिजिनल} सर्व कागदपत्र घेउन माझे वडिल प्रवास करत होते,{मला वाटत दादर स्टेशनहुन ते डोंबिवलीला येण्यासाठी ट्रेन मधे चढत होते.}प्रचंड गर्दी आणि त्यामुळे झालेल्या धक्का-बुक्कीत त्यांच्या हाताला झटका बसुन ती फाईल त्या गर्दीत पडली. वडिल डब्यात होते,डब्यातल्या गर्दीत ती फाईल शोधणेही त्या क्षणी शक्य नव्हते इतकी गर्दी डब्यात होती.जरा गर्दी कमी झाल्यावर वडिलांनी शोध घेण्याचा प्रतय्न केला पण काहीही सापडले नाही.फाईल फलाटावर पडली का ? ट्रॅकवर पडली का ? की डब्यातच कोणाच्या पायाला लागुन ती बाहेर फेकली गेली असेल ? वडिलांनी घरी आल्यावर हे सर्व आम्हाला सांगितले,ते खूप विचारात होते... जागेच्या सर्व व्यव्हारांचे कागद गहाळ झाल्याने ते अतिशय चिंताग्रस्त झाले होते.थोडावेळ शांत बसले आणि नंतर हातपाय धुवुन झाल्या नंतर त्यांना या वर दिलेल्या मंत्राचे स्मरण झाले ! त्यांनी सात्यत्याने या मंत्राचे उच्चरण अनेक दिवस चालु ठेवले होते आणि अचानक काही दिवसांनी त्यांच्या ऑफिसमधे एका माणसाचा फोन आला, त्याने वडिलांचे नाव विचारले आणि तुमची काही कागदपत्रांची फाईल गहाळ झाली आहे का ? अशी विचारणा केली.वडिलांनी त्या फाईलचे वर्णन केले आणि त्या फाईल चे एकंदर स्वरुप सांगितले,त्यावर त्या माणसाने तुमची फाईल माझ्याकडे आहे, ती घेउन जा असे सांगितले.ती फाइल महत्वाची आहे हे त्या व्यक्तीस त्यातील कागदपत्रांवरुन कळाले होते. शेवटी ती फाइल मिळाली आणि आजवर त्याच फ्लॅटमधे आम्ही राहतोय जिची कागदपत्रे त्या फाइल मधे होती. २)अनुभव २:- एकदा नरसोबाच्या वाडीला मी नदीत अंघोळ करत होतो, ३ -४ पायर्‍या खाली,ज्यांनी नरबाच्या वाडीला कॄष्णेत स्नान केले असेल त्यांना नदीच्या प्रवाहाचा अंदाज येइल.माझ्या गळ्यात साधे कसलेसे तांब्याचे लॉकेट होते, ते मैल्यवान नव्हते की कुठल्याही इतर गोष्टींसाठी उपयुक्त नव्हते,पण मी या मंत्राचा उपयोग सुरु करताच जवळपास १० मिनीटाच एका पोहणार्‍याला ते सापडले आणि तिथेच हे कोणाचे आहे अशी विचारणा सुरु केली,मी ते माझे आहे असे सांगताच ते त्यांनी मला दिले,पण नदीच्या प्रवाहात पोहताना गेलेले लॉकेट परत मिळाले यावर माझाच बराच वेळ विश्वास बसला नव्हता. ३}घरात अनेकदा मला न मिळणार्‍या,दॄष्टीस न पडणार्‍या ,भरपुर शोध घेउन न सापडणार्‍या वस्त्यु या मंत्राने आम्हाला मिळाल्या आहेत, हो आइच्या हातुन घराची किल्ली हरवली तेव्हा ती या मंत्रानेच परत मिळाली. ४)अगदी आत्ताची गोष्ट सांगतो... मी नविन पल्सर घेतली, त्याला मी पेट्रोल लॉक बसवुन घेतले,पण त्या लॉकची मुव्हमेंट घट्ट आहे,त्यामुळे व्हॉल्व ऑन्/ऑफ करताना किल्लीवर दाब येत होता, एका प्रयत्नात ती तुटली,पण त्याची अजुन एक चावी माझ्याकडे होती. मी जवळच्याच चावीवाल्याकडे जाउन तशीच अजुन एक चावी बनवुन घेतली.ती मी माझ्या बॅगेत ठेवली,व एक चावी कीचेनला अडकवली. ऑफिसात आलो...कामाला लागलो,चाव्या पॅटच्या डाव्या खिश्यात ठेवल्या होत्या,काही वेळाने त्या बाहेर काढुन बॅगेतच ठेवावा असा विचार आला,तेव्हा चाव्या खिशातुन बाहेर काढल्या,पण ल़़क्षात आले की पेट्रोल लॉकची चावी कीचेनला नाही ! ती पडली होती ! माझ्या बॅगेत आधीच चावी वाल्याकडुन तयार केलेली चावी होती,त्यामुळे घाबरायचे कारण नव्हते,पण कीचेन मधली चावी पडली होती ते शोधणे तर गरजेचेच होते.मी परत एकदा खिसा तपासला,त्याच्यातच तर राहिली नसेल ना ? मग ज्या ज्या ठिकाणी मी गेलो होते त्या त्या ठिकाणी मी परत गेलो, ज्या मार्गाने ऑफिसात गेलो होतो त्याच मार्गाने उलट फिरुन कंपनीच्या आवारात जिथे बाइक पार्क केली होती तिथे गेलो,पण चावी काही सापडली नाही ! मग नेहमीचाच वरील उपाय केला,ऑफिसात परत जाताना मी सिक्युरिटी गार्डला सांगुन ठेवले की माझी अश्या अश्या प्रकारची चावी हरवली आहे ती सापडली तर मला कळवा,तो पर्यंत मनात अनेकदा वरील मंत्राचा प्रयोग करुन झाला होता,आणि मला चावी मिळणार याची खात्री आधीच झाली,संध्याकाळी कामावरुन घरी निघताना परत सिक्युरिटी गार्डला प्रश्न केला मेरी चाबी मिली ना ! खर तर हा प्रश्न नव्हताच ते अध्यारुतच होते माझ्यासाठी, त्यावर तो म्हणाला साब एक चाबी मिला है, आप चेक करलो वोह आपकी है क्या. मी मेमगेटवर जाउन विचारणा केली.चावी त्यांच्याकडे जमा झालेली होती. ऑफिसच्या एव्हढ्या मोठ्या कँपस मधे हरवलेली चावी परत मिळण्याची ही माझी दुसरी घटना {या आधीही एकदा चावी गहाळ झाली होती},दोन्ही वेळेला चावी मला परत मिळाली. या सर्व घटनांमध्ये वस्तु परत मिळण्याची प्रोबॅबिलीटी किती यावर तुम्ही विचार करु शकता, याला कोणी योगायोग किंवा इतर काहीही म्हणा... माझ्यासाठी हे प्रमाणित अनुभवच आहेत. या मंत्राचा संदर्भ तुम्हाला :- बोध दत्तमाहात्याचा अध्याय ४ था मधे मिळेल. {लेखक :- डॉ. वासुदेव व्यंकटेश देशमुख} जाता जाता :- गुगलुन हा मंत्र जालावर सापडतोय का ते पाहण्याचे सुद्धा प्रतय्न केले तरी माझी हरकत नाही. जे अनुभव आजवर या मंत्रा संबंधी घेतले ते तसेच लिहले आहेत. हा अनुभव मी ठाण्याच्या कट्ट्याला देखील गप्पांच्या ओघात कथन केला होता.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

मन्त्र शब्दाची व्याख्या परंपरेनुसार ठीकच आहे. पण परंपरेवर नक्की किती विश्वास ठेवावा त्याचा काहीएक विवेक करणे क्रमप्राप्त आहे. त्या विवेकालाच विरोध करून त्या विरोधाचे उदात्तीकरण कोणी करू पाहील तर माझा त्याला विरोध असेलच. बाकी दोन श्लोकांत अमुक एक क्याटेगरी घ्यावी अन मी त्यातला सर्वश्रेष्ठ आहे असे सांगावे असा कृष्णाचा फंडा आहे. ते ठीकच आहे, पण सो व्हॉट??? आंधळा भक्तिभाव का ठेवावा? परंपरेतल्या बर्‍याच गोष्टी मला पटतात, पण म्हणून सर्वच पटतात असे नाही. आणि
अनुभव घेण्यापेक्षा चेष्टा करणे हे अगदी सोपे आहे, हे वाचकांनी लक्षात ठेवावे.
याच्या नावाखाली काहीही नॉनसेन्स फैलावण्याचे लैसन्स मिळाल्यागत मुक्ताफळे लोक उधळतात तिकडे दुर्लक्ष करू नये.

बाकी दोन श्लोकांत अमुक एक क्याटेगरी घ्यावी अन मी त्यातला सर्वश्रेष्ठ आहे असे सांगावे असा कृष्णाचा फंडा आहे. आमच्यासाठी श्रीकॄष्ण हे भगवंतच आहेत, आपल्यासाठी ते फक्त फंडा सागणारे असेल तर तो दोष आमचा नाही. याच्या नावाखाली काहीही नॉनसेन्स फैलावण्याचे लैसन्स मिळाल्यागत मुक्ताफळे लोक उधळतात तिकडे दुर्लक्ष करू नये. आपण सेंस शोधला तर नॉनसेन्स अपोआप बाजुला होते, असा माझा अत्ता पर्यंतचा अनुभव आहे. मंत्र शास्त्राचा अनुभव घेणारे असंख्य आहेत, आणि त्यात मी सुद्धा आहे.

कृष्ण तुमच्यासाठी भगवंत असेल तर अवश्य असूदे. मला त्या मताची काहीच अडचण नाही, उलट आदर आहे. त्याच्याबद्दल माझ्याही मनात आदर आहे, सबब कुणाला तरी तो भगवंत वाटणे साहजिक आहे असं मला वाटतं. त्यामुळे आपल्या भूमिकांत बेशिक विरोध असायची शक्यता कमीच- अ‍ॅट लीस्ट या केसमध्ये. अन आपण सेन्स शोधावा याचा अर्थ नॉनसेन्स पॉइंट आउटही करू नये असा माझ्या मते अर्थ होत नाही.

कृष्ण तुमच्यासाठी भगवंत असेल तर अवश्य असूदे. मला त्या मताची काहीच अडचण नाही, उलट आदर आहे. त्याच्याबद्दल माझ्याही मनात आदर आहे, सबब कुणाला तरी तो भगवंत वाटणे साहजिक आहे असं मला वाटतं. त्यामुळे आपल्या भूमिकांत बेशिक विरोध असायची शक्यता कमीच- अ‍ॅट लीस्ट या केसमध्ये. दोन्ही श्लोकांच्या बाजुला जे कंसा मी लिहले आहे ते असत्य आहे का ? असेल तर का ? हे आपणच स्पष्ट करावे. ते कॄष्णाने सांगितले म्हणुनच म्हणुन सत्य आहे असा या उदाहरणांचा अर्थ नसुन, सत्यच कॄष्णाने सांगितले आहे. जप हा मंत्रांच केला जातो,हा माझा समज आहे, तसेच गायत्री सुद्धा मंत्रच आहे... हे दर्शवणे या उदाहरणांचा उद्धेश आहे. अन आपण सेन्स शोधावा याचा अर्थ नॉनसेन्स पॉइंट आउटही करू नये असा माझ्या मते अर्थ होत नाही. मान्य आहे, परंतु मंत्रशास्त्र हेच नॉनसेन्स आहे असा अर्थ मंत्रादि गोष्टींवर लिटरली विश्वास ठेवणे या आपल्याच विधानातुन प्रतित होतो आहे असे मला वाटते. जाता जाता :--- कोका कोला कोका कोला असा शब्द प्रयोग मंत्र समजुन लाखो माळा ओढल्या तरी त्यातुन काहीही निष्पन्न होणार नाही. परंतु अगदी श्री राम जय राम जय जय राम असा जप करण्यांना मात्र नक्कीच फायदा झालेला दिसेल. यात कोका कोला वाला नॉनसेंस झाला आणि रामनाम हे सेंस झाले.विवेक बुद्धीचा वापर केला की नॉनसेंसचा अडथळा येवु नये असे मला वाटते. तसही ज्ञान वापरुन गैर प्रकार होत नाही असे कोणी सांगितले आहे ? तुम्ही त्याचा वापर कसा करता त्यावर त्याचे परिणाम अवलंबुन असतात. नोनसेंस करणारे नसतातच असा कुठलाही दावा माझ्या विधानात नाही.

ठीक. पैला परिच्छेद टेक्निकल आहे आणि त्यावर असहमती नाही- निव्वळ शब्दार्थदृष्ट्या पाहिल्यास. अन मंत्रांवर लिटरली विश्वास ठेवणे मला पटत नाही. याचा अर्थ मंत्रशास्त्राच्या 'पॉवर' ला विरुद्ध जात असेल तर जाऊदे. अन कोकाकोला विरुद्ध श्री राम म्हणाल तर मग वाल्मिकीही सुरुवातीला मरा मरा असा जप करीत असे म्हणतात. ते एक असोच. पण मंत्रामुळे ज्या अक्षरसमुच्चयाचा बोध होतो त्यात बाय इटसेल्फ काही 'पॉवर' असते हे मला पटत नाही. तेव्हा या मुद्याशी असहमती तर असणारच आहे. हा दावा असेल तर सिद्ध करून दाखवा असे माझे साधे म्हणणे आहे. करता येत नसेल तर मग मी या दाव्याच्या सत्यतेबद्दल कायम शंका उपस्थित करणार. मग कुणी माझी समज काढो नैतर अजून काही.

पण मंत्रामुळे ज्या अक्षरसमुच्चयाचा बोध होतो त्यात बाय इटसेल्फ काही 'पॉवर' असते हे मला पटत नाही. आपल्याला पटत नाही या निष्कर्षाप्रत आपण कसे आलात ? ते जरा स्पष्ट करुन सांगा. किती मंत्रांचा आपण अभ्यास केलात ? आणि अभ्यास केला नसेल तर निष्कर्ष कसा काढलात ? पण मंत्रामुळे ज्या अक्षरसमुच्चयाचा बोध होतो त्यात बाय इटसेल्फ काही 'पॉवर' असते हे मला पटत नाही. वरती जे लिहले आहे ते परत एकदा वाचावे ! हा दावा असेल तर सिद्ध करून दाखवा असे माझे साधे म्हणणे आहे. करता येत नसेल तर मग मी या दाव्याच्या सत्यतेबद्दल कायम शंका उपस्थित करणार. मग कुणी माझी समज काढो नैतर अजून काही. अभ्यास आणि अनुभव न घेता शंका उपस्थीत करणे हे कुठल्याही वैज्ञानिक किंवा अभ्यासु वॄतीचे लक्षण आहे असे मला वाटत नसल्याने मी इथेच थांबतो. जाता जाता :- आगीला हात लावला तर भाजते या विधानाची सत्यता तेव्हाच येउ शकते जेव्हा आपण अग्नीस स्पर्श कराल किंवा अग्नीचा आपणास स्पर्श होइल. तो पर्यंत अग्नी थंड लागतो आणि त्याने भाजत नसेल ना ? या शंकेस उत्तर म्हणजे दुर्लक्ष करणे किंवा जालीय भाषेत सांगायचे तर फाट्यावर मारणे, जे आम्ही नेहमीच करतो. ;) * आपल्याशी या विषयावर फक्त वैचारिक विरोध राहिल याची कॄपया नोंद घ्यावी.

आपल्याला पटत नाही या निष्कर्षाप्रत आपण कसे आलात ? ते जरा स्पष्ट करुन सांगा. किती मंत्रांचा आपण अभ्यास केलात ? आणि अभ्यास केला नसेल तर निष्कर्ष कसा काढलात ?
सांगतो. मी किती मंत्र अभ्यासले हा प्रश्न इथे लागू नाही, कारण माझ्या शंकेला त्याची गरज नाही. पण मुळात शंका उपस्थित करणे हे चूक आहे असे तर आपले मत नाही ना? हां तर जेव्हा जेव्हा कोणी नामस्मरण करतो आणि त्याला जो काही फायदा होतो, तो सर्वस्वी नामस्मरण करणार्‍याचा निग्रह, त्याची भावना आणि तो व नामदीक्षा देणारा यांतील नात्यावर अवलंबून असतो. निव्वळ त्या अक्षरात काहीही नसते असे माझे मत आहे. बाकी पास. अन
आपल्याशी या विषयावर फक्त वैचारिक विरोध राहिल याची कॄपया नोंद घ्यावी.
हरकत नाही, सेमच.

सांगतो. मी किती मंत्र अभ्यासले हा प्रश्न इथे लागू नाही, कारण माझ्या शंकेला त्याची गरज नाही. ह्म्म... जो शंका घेतो त्यानी त्या शंकेच्या निरसनार्थ अभ्यास किंवा साधना करुन पहावी, त्याने उत्तर मिळते का ते शोधावे. शंका काय हव्या तितक्या काढता येतील. पण मग त्याला काहीही अर्थ उरत नाही. पण मुळात शंका उपस्थित करणे हे चूक आहे असे तर आपले मत नाही ना? शंका आली तर त्याचे उत्तर शोधण्याचे प्रयत्न केले जातात, पण म्हणुन प्रयत्न न-करता नुसत्याच शंका काढणे हे मूर्खपणाचे लक्षण ठरेल असे वाटते... समर्थांनी पढत मूर्खाची लक्षणे सांगितलेली आहेतच ! जेव्हा जेव्हा कोणी नामस्मरण करतो आणि त्याला जो काही फायदा होतो, तो सर्वस्वी नामस्मरण करणार्‍याचा निग्रह, त्याची भावना आणि तो व नामदीक्षा देणारा यांतील नात्यावर अवलंबून असतो. सहमत आहेत, यातही अनेक गोष्टी येउ शकतील परंतु जर अक्षरात सामर्थ्य नसेल तर नामस्मरण कसले ? राम नामातच सामर्थ्य आहे म्हणुन त्याचा जप केला जातो. वरती आपण म्हणालात :- अन कोकाकोला विरुद्ध श्री राम म्हणाल तर मग वाल्मिकीही सुरुवातीला मरा मरा असा जप करीत असे म्हणतात. मरा मरा असे आपण बराच काळ म्हणुन बघा,मुखात राम येते की नाही हे आपल्यालाच पडताळुन पाहता येइल. वाल्याचा वाल्मिकी झाला तो याच "नाम" सामर्थ्याने असे अत्ता पर्यंत मी समजत आलो आहे. जाता जाता :- तूर्तास इथे थांबावे म्हणतो.

शंका आली तर त्याचे उत्तर शोधण्याचे प्रयत्न केले जातात, पण म्हणुन प्रयत्न न-करता नुसत्याच शंका काढणे हे मूर्खपणाचे लक्षण ठरेल असे वाटते... समर्थांनी पढत मूर्खाची लक्षणे सांगितलेली आहेतच !
प्रयत्नाचा एक भाग तुम्ही किंवा अजून कोणी ज्यांनी अनुभव घेतले आहेत त्यांना विचारणे हाही असतो. शंका विचारणार्‍याला मूर्खात काढणे हा उपाय कैक लोक करतात, पण त्यातून काहीच साध्य होत नाही. असे प्रत्येक गोष्टीत केले तर त्याला काहीच अर्थ नाही.
परंतु जर अक्षरात सामर्थ्य नसेल तर नामस्मरण कसले ? राम नामातच सामर्थ्य आहे म्हणुन त्याचा जप केला जातो.
असहमत. पण यावर नंतर कधीतरी. गुरू मेहरबान तो रावण नाम भी पुण्यवान.
मरा मरा असे आपण बराच काळ म्हणुन बघा,मुखात राम येते की नाही हे आपल्यालाच पडताळुन पाहता येइल. वाल्याचा वाल्मिकी झाला तो याच "नाम" सामर्थ्याने असे अत्ता पर्यंत मी समजत आलो आहे.
मरा मरा असे लै वेळेस म्ह्टल्यावर राम राम होणे तर फक्त शाब्दिक परिणाम आहे. रामनामाच्या पावरचा इथे कैच संबंध नै. पण आता असो. असहमती राहणार हे कळून चुकले आहे सबब राहूदे.

वाल्याचा वाल्मिकी झाला तो याच "नाम" सामर्थ्याने असे अत्ता पर्यंत मी समजत आलो आहे.
माझ्या आठवणीप्रमाणे वाल्या कोळ्याची कथा वाल्मिकी रामायणात नाही. तरी नक्की आठवत नाही. असलीच तरी उत्तरकाण्डातच असावी आणि प्रक्षिप्त असावी.

माझ्या आठवणीप्रमाणे वाल्या कोळ्याची कथा वाल्मिकी रामायणात नाही. तरी नक्की आठवत नाही. असलीच तरी उत्तरकाण्डातच असावी आणि प्रक्षिप्त असावी. प्रक्षिप्त असो वा नसो त्याने नाम महात्याला आणि शब्द सामर्थ्याला काहीही फरक पडत नाही.

शंका विचारणार्‍याला मूर्खात काढणे हा उपाय कैक लोक करतात, पण त्यातून काहीच साध्य होत नाही. असे प्रत्येक गोष्टीत केले तर त्याला काहीच अर्थ नाही. जो प्रयत्न न करता,त्या विषयी वाचन न-करता फक्त शंकाच काढतो त्यांनाच मूर्ख समजावे.जो शंका विचारतो त्याने याचे उत्तर स्वतः शोधण्याचे कष्ट का घेउ नये ? असला हरी तर देइल खाटल्यावरी हा विचार चुकीचा असल्यानेच प्रयत्नांती परमेश्वर असा विचार ठेवावा.मी शंका विचारेन पण माझ्या बाजुने उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार नाही हा दॄष्टीकोन चुकीचा आहे. असहमत. पण यावर नंतर कधीतरी. गुरू मेहरबान तो रावण नाम भी पुण्यवान. अहं गुरु की करनी गुरु जायेगा चेले की करनी चेला :- उड जायेगा हंस अकेका हे कबिराचे निर्गुण भजन ऐकावे... झाल्यास बोध होइल. मरा मरा असे लै वेळेस म्ह्टल्यावर राम राम होणे तर फक्त शाब्दिक परिणाम आहे. रामनामाच्या पावरचा इथे कैच संबंध नै. शाब्दिक परिणामाने वॄत्तीत्,वर्तनात आणि चित्तात बदल होणे हा नामाचा परिणाम आहे,आणि त्याला योग्य त्या मंत्राच उपयुक्त ठरतो. वरती कोका-कोलाचे उदा. आधीच देउन झाल्याने त्याची पुनरावॄत्ती टाळतो. असहमती राहणार हे कळून चुकले आहे सबब राहूदे. होय असहमती तर राहणारच !

जो प्रयत्न न करता,त्या विषयी वाचन न-करता फक्त शंकाच काढतो त्यांनाच मूर्ख समजावे.जो शंका विचारतो त्याने याचे उत्तर स्वतः शोधण्याचे कष्ट का घेउ नये ?
तुम्हाला शंका विचारली याचा अर्थ मी बाकी वाचन करत नाही असा होत नाही. उत्तर द्यायचे नसेल किंवा देववत नसेल तर राहूदे पण हे आकांडतांडव आक्रस्ताळेपणाचे लक्षण आहे. असो, चालूद्या.

तुम्हाला शंका विचारली याचा अर्थ मी बाकी वाचन करत नाही असा होत नाही. असे असेल तर दिलेले दोन्ही पिडीएफचे दुवे वाचुन काढावे ही विनंती ! आशा आहे की तुला पडलेल्या शंकाचे उत्तर मिळेल. उत्तर द्यायचे नसेल किंवा देववत नसेल तर राहूदे पण हे आकांडतांडव आक्रस्ताळेपणाचे लक्षण आहे. असो, चालूद्या. मी माझे म्हणणे अगदी स्पष्टपणे मांडले आहे, ते जर आक्रस्ताळेपणाचे लक्षण आहे असे वाटत असेल तर तसेही हरकत नाही ! पण नुसती शंका विचारण्या पेक्षा वाचन करुन / संदर्भ देउन मग शंका विचारली की समोरच्यासही त्या बद्धल उत्तर देण्यास / विचार करण्यास प्रचॄत्त व्हावे असे वाटण्यास हरकत नसावी, परंतु मी किती मंत्र अभ्यासले हा प्रश्न इथे लागू नाही, कारण माझ्या शंकेला त्याची गरज नाही.असे विधान करणे नक्कीच सुज्ञपणाचे लक्षण वाटत नाही. ;) असो...

मी न वाचलेला एक जुना धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद. 🙏 मदनबाण यांचे अनुभव वाचले. आवडले. डोक्याला बरेच खाद्य मिळेल असं वाटतंय. आता प्रतिसाद वाचतो.

मृग्गा, तुझ्या प्रतिसादाने वाचनमात्र केला गेलेला धागा वर आला वाटतं ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सुंदरी... :- Sanju Rathod Ft. Yashika Jatav | G-Spark |

त्या अक्षरात बरच काहि असतं. ऐकायला गंमत वाटेल, पण सर्व सेन्सेस मेलेला (म्हणजे आंधळा, मुका, बहिरा, त्वचेची संवेदना गमावलेला) माणुस केवळ त्या अक्षराच्या/अक्षर समुहाच्या सहाय्याने योग्य ठिकाणि पोचतो. (ज्याला काहि दिसत नाहि, ऐकु येत नाहि, बोलता येत नाहि अशा माणसाला मूळात कुठलही अक्षर कळेलच कसं ही अगदी प्राथमीक आणि रास्त शंका आहे. आणि इथेच त्या अक्षरांचं महत्व आहे. कुठल्याही इंद्रीयाचा वापर न करता त्या अक्षरांचा वापर/वावर होतो. असो. तो वेगळा विषय आहे.) सध्या इत्यलम् !!

पण हि चर्चा त्याबद्द्ल नाहि. अगदी ओबडधोबड शब्दात सांगायचं झालं तर अक्षर व्यक्त आणि अव्यक्त दोन्ही स्टेट मधे आहे. त्यांचं हँडशेकींग मंत्रामुळे होतं. (तत्वतः अव्यक्त अ‍ॅज सच काहि नसतं. पण सामर्थ्याचं प्रकटन समजुन घ्यायला अव्यक्त शब्द वापरावा लागतो).

अक्षरे ही केवळ प्रतीके आहेत. त्यांना काहीएक अर्थ आहे तो फक्त आपण दिलेला आहे. +१ अक्षरं नसणार्‍या काही थीम ऐकल्या तरी BP बदलतं. बाईक चालवताना 'धूम्-धूम' ऐवजी 'कहीं दीप जले कही दिल' ऐकलं तर काय होइल? गीतरामारणातले "जोड झणिं कार्मुका सोड रे सायका मार ही त्राटिका, रामचंद्रा" ऐकल्यावर खुद्द रामाला स्फुरण चढेल. शब्दांपेक्षा सूर्,ताल,लय ही महत्वाचे आहेत. बाकी प्रत्येकाचे मनाचे खेळ. मी सकाळी गडबडीत आवरताना चाची ४२० मधील "दौडा दौडा भागा भागा सा" हे गाणं म्हणतो, (मला) फायदा होतो.:) पण याचा अर्थ असा नक्कीच नाही की ह्या मंत्रात काही 'पावर' आहे. बाकी इथे चाल्लेली मजा पाहून आज खात्री झाली, अजुन बर्‍याच निर्मल बाबांना स्कोप आहे. ;) दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिये!!! जाता-जाता: या काही व्यक्ती हरवल्या आहेत. कोणता मंत्र म्हणता येईल?? :))

@ मदनबाण, >>> आपले अनुभव व्यक्त स्वरुपातले नि निश्चितच फायदेशीर अशा स्वरुपाचे असले तरी वैयक्तिक आहेत नि त्याला कारणमीमांसा देता येण्यासारखी आहे. योगायोग अनेक प्रकारे झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तो योगायोग तुमच्याच बाबतीत अधिक वेळा झाला असल्याची शक्यता ही जास्त आहे. सापशिडीतला ठोकळा फेकताना ६ चाच आकडा सलग चार वेळा येऊ शकतो. चिकीत्सा करा चिकीत्सा करा...... माझ्या मते प्रामाणिकपणं सांगायचं तर मंत्राचं- (बीजमंत्राचं काम)- ह्याच्या वरच्या पातळीवर चालायला हवं. आराध्य देवते ची उपासना करत करत तिच्याशी एकरुप होण्याची क्षमता बीजमंत्रामध्ये असताना व्यावहारिक पातळीवर मंत्रांचा उपयोग न करावासा वाटणं/ तशी इच्छा न होणं हे जास्त श्रेयस्कर नि जास्त शरणागत झाल्याचं द्योतक मानलं जावं. व्यवहार व्यवहाराच्या जागी, साधना साधनेच्या जागी असावी. (असे वस्तु शोधून देणारे मंत्र सकाम मंत्र झाले. वापरु नयेत असं माझं मत. तुमचं वेगळं असेल कदाचित. ह्याबाबत मतभेद असण्याची शक्यता आहे. असायला हरकत नाही.) ब्रुस ऑलमाईटी मधला ब्रुस अत्यंत क्षुल्लक गोष्टींसाठी आपल्या ताकदीचा वापर करतो असं काहीसं.

सापशिडीतला ठोकळा फेकताना ६ चाच आकडा सलग चार वेळा येऊ शकतो. चिकीत्सा करा चिकीत्सा करा...... मी कोणाच्याही कोणत्याही मताचा या बाबतीत विरोध करत नाही,कारण आलेला अनुभव हा व्यक्तिगत आहे.या मंत्राचा वापर करुन इतरांनाही असेच अनुभव आल्याचे माझ्या माहितीत आहेत... तसेच ते असत्य कथन करतील / केले असे मला कुठल्याही प्रकारे वाटत नाही ! जसे खरडीत सांगितले तेच परत सांगतो, गाडी चालवणार्‍यालाच गाडीची जजमेंट कळते, आणि ती अनुभवातुनच येते.ती जजमेंट कोणालाही शिकवता येत नाही,अनुभावातुनच ती येते आणि त्यासाठी गाडी चालवणे हा अनुभव घेणे क्रमप्राप्त आहे. माझ्या मते प्रामाणिकपणं सांगायचं तर मंत्राचं- (बीजमंत्राचं काम)- ह्याच्या वरच्या पातळीवर चालायला हवं. आराध्य देवते ची उपासना करत करत तिच्याशी एकरुप होण्याची क्षमता बीजमंत्रामध्ये असताना व्यावहारिक पातळीवर मंत्रांचा उपयोग न करावासा वाटणं/ तशी इच्छा न होणं हे जास्त श्रेयस्कर नि जास्त शरणागत झाल्याचं द्योतक मानलं जावं. मत्रांचा उपयोग कसा करावा यावर बराच विचार / चर्चा / वाचन करता येइल्.पण त्याचा प्रभाव समजुन,जाणवुन घेण्यासाठी त्याचा वापर करुन पाहणेही तितकेच आवश्यक आहे.मी काही योगी-बाबा,साधु-सन्यासी नाही,इथल्या सर्वांसारखाच सामान्य गॄहस्थाश्रमी माणुस आहे.प्रपंचात पडले की त्यासंबंधी सर्व गरजा,कर्तव्य आणि इतर सर्व गोष्टींना मी बांधील आहे आणि त्यापासुन पळ काढता येत नाही.मंत्र हे मनुष्याच्या हितासाठी वापरले तर सांसारिक गोष्टींची पूर्तता करुन देखील इच्च्छित उद्धिष्ट साधण्याची इच्छा नक्कीच ठेवता येते आणि तिथे पोहचाताही येउ शकते ! बीज मंत्रांचा कसा उपयोग केला जावा हे त्याच्या उद्धेशावर अवलंबुन आहे ! उदा. क्लीं हा आकर्षण निर्माण करणारा आहे तर श्रीं हा अर्थशक्तीशी निगडीत आहे. याचे वेगवेगळे उपयोग आणि रचना करुन त्याने देखील वेगवेगळे परिणाम साध्य केले जाउ शकतात्.मंत्रांचा व्याव्हारिक पातळीवर उपयोग केला जाउ नये असा कुठलाही नियम माझ्या पाहण्यात नाही,किंवा पुढे जाउन हे सांगावेसे वाटेल की अनेक मंत्रांनी सर्व साधारण मनुष्यास त्याच्या आयुष्यात मदत व्हावी हा एकमेव उद्देश रचना करणार्‍यांचा असेल.शंकराचार्यांनी कनकधारा स्त्रोत्र रचले ते स्वतःसाठी नाहीच !अगदी रामरक्षेत सुद्धा आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम् । लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥३५॥ अशी रचना आहे,मंत्रात्मक श्लोक रचनेतला श्लोक हा मंत्र म्हणुन देखील वापरता येतोच की... तसाही वरती दिलेला हा मंत्र माझ्या माहिती प्रमाणे बीज मंत्र नाही.वटवाघुळ मानवाला अनुभव जाणुन घ्यायची इच्छा दिसली म्हणुनच माझा अनुभव इथे कथन केला इतकेच ! व्यवहार व्यवहाराच्या जागी, साधना साधनेच्या जागी असावी. सहमत ! पण व्यवहारात देखील सर्वसाधारण मंत्रांचा वापर करता येतो आणि ते निषिद्ध नाही,नाहीतर दिवाळीत लक्ष्मी पुजनात लोकांनी वेळ घालवला नसता ! ;)

>>>मंत्रांचा व्याव्हारिक पातळीवर उपयोग केला जाउ नये असा कुठलाही नियम माझ्या पाहण्यात नाही,किंवा पुढे जाउन हे सांगावेसे वाटेल की अनेक मंत्रांनी सर्व साधारण मनुष्यास त्याच्या आयुष्यात मदत व्हावी हा एकमेव उद्देश रचना करणार्‍यांचा असेल. बापाला पोरगा सगळ्यात जास्त कधी प्रिय होतो? 'बाबा, काळजी करु नका, मी माझ्या हिमतीवर भरपूर कमावलंय नि त्यामुळं मला कशाचीही कमी नाही. तरी मिळालं ते तुमच्याच आशीर्वादानं मिळालं ही भावना मुलामध्ये दिसते तेव्हा!' बापाची इस्टेट पोराचीच होणार आहे. तरीही लहानपणी आमिषापोटी बाबा, मी आज दोन तास अभ्यास केला, मला आता चॉकलेट द्या ही पहिली पायरी आहे तर मोठेपणी बाबालाच काही उलटसुलट म्हणून त्याला द्यायला भाग पाडणारे महाभाग असतात! नियम लिखित काहीही नाही तरी स्तोत्र म्हणताना कृतज्ञ पणाची भावना एवढाच विषय असावा. अथर्वशीर्षाची फलश्रुति अथवा श्रीसुक्ताची देखील फलश्रुति काही ठिकाणी म्हटली जात नाही. ती भाटगिरी झाली. 'मागणं कधीतरी थांबावं'. देणाराच 'माझा आहे' ही भावना आपल्याला अतिशय समाधान देते. ती निश्चिंती एकदा आली की सोनं नाणं असलं नसलं तरी काही फरक पडत नाही. निष्काळजी पणा नकोच मात्र एखादी गोष्ट गेली तर त्याबद्दल हळहळ नको करायला. तुमचं उदाहरण चांगलं आहेच. पण त्याची परिक्षा सारखी घेण्याची वेळ आपल्यामुळं नको यायला! बर्‍याचदा नाणं आपलं खोटं असतं नि बदनाम सगळं तत्त्वज्ञान होतं. एवढंच.

>>माझ्या मते प्रामाणिकपणं सांगायचं तर मंत्राचं- (बीजमंत्राचं काम)- ह्याच्या वरच्या पातळीवर चालायला हवं. आराध्य देवते ची उपासना करत करत तिच्याशी एकरुप होण्याची क्षमता बीजमंत्रामध्ये असताना व्यावहारिक पातळीवर मंत्रांचा उपयोग न करावासा वाटणं/ तशी इच्छा न होणं हे जास्त श्रेयस्कर नि जास्त शरणागत झाल्याचं द्योतक मानलं जावं. व्यवहार व्यवहाराच्या जागी, साधना साधनेच्या जागी असावी. (असे वस्तु शोधून देणारे मंत्र सकाम मंत्र झाले. वापरु नयेत असं माझं मत. तुमचं वेगळं असेल कदाचित. ह्याबाबत मतभेद असण्याची शक्यता आहे. असायला हरकत नाही.) ब्रुस ऑलमाईटी मधला ब्रुस अत्यंत क्षुल्लक गोष्टींसाठी आपल्या ताकदीचा वापर करतो असं काहीसं. कधी नव्हे ते प्यारेकाकांशी सहमत. पण प्यारेकाका बोलतायेत ते वायलं नि मदनबाण बोलतायेत ते वायलं असं वाटलं.

पण प्यारेकाका बोलतायेत ते वायलं नि मदनबाण बोलतायेत ते वायलं असं वाटलं.
एकदम बरोबर निष्कर्ष काढलाय. 🎯 दोघेही बरोबरच आहेत. त्या दोघांच्यमधेही काहीजण असतात. 😀

मदनबाणजी, आधीची चर्चा मी वाचली नाहीये, पण तुमचे अनुभव वाचले. असे अनुभव पूर्वीपण ऐकले आहेत. असे म्हणजे कॉज-इफेक्ट रिलेशनशिप नसलेले. (अडकलेले पैसे कुठलातरी अंगारा खाऊन मिळाले, मारुतीला तेल घालून हव्या त्या प्रोजेक्टवर बदली मिळाली, वगैरे.) त्या "अविश्वसनीय" घटनेला मंत्र/अंगारा/तेल हेच कारणीभूत असेल असा निष्कर्ष कसा काढला जातो? समजा "ती" घटना घडायच्या आधी काही दुसरा कार्यकारणभाव नसलेला बदल केला (उदा. डावा भांग उजवा केला, दोन पायांत दोन वेगळ्या रंगाचे मोजे घातले) तर तो त्याचा परिणाम नाही कशावरून? मी हे खवचटपणे विचारत नाहीये - श्रद्धा कशी तयार होते हे समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे.

सहमत. दिलेली उदाहरणेसुद्धा तशी आर्थिकदृष्ट्या (इतरांसाठी) तितक्या महत्वाच्या ठरू न शकणार्‍या वस्तूंची आहेत. हजाराच्या नोटा असलेले पाकिट खिशातून फलाटावर पडले आणि केवळ मंत्रोच्चाराच्या प्रभावाने सापडले वगैरे काही किस्सा असता तर (देणार्‍याचा प्रामाणिकपणा वगैरे मंत्रांमूळेच असे मानत) विश्वास ठेवायला थोडी जागा तरी निर्माण होते. >>>श्रद्धा कशी तयार होते हे समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे. अगदी हेच जाणून घेण्याची माझीसुद्धा इच्छा आहे. माझी अजून एक शंका आहे, जर हे सगळे मंत्रोच्चार वगैरे इतका विचार करून निर्माण झाले आहेत तर मग संस्कृत न जाणणारे इतर संपूर्ण जग यांच्या प्रभावापासून, फायद्यांपासून कायम वंचितच रहाणार आणि तोट्यांनाही सामोरे जात रहाणार असे म्हणायचे का? (इथे उगाच खवचटपणा करण्याचा प्रयत्न नाही. कृपया गैरसमज नकोत.)

माझ पाकिट ४/५ हजार रु. क्रेडिट व डेबिट कार्ड सकट २ वेळा ( हैद्राबाद व पुण्यात ) रसत्यावर पड्ले असताना घरपोच तसेच्या तसेच मिळाले आहे कोणत्याही मंत्राशिवाय. त्याशिवाय अख्खी २ व्हिलर घरा पासुन १ लांब दुकाना समोर विसरुन आलो असताना (२ दिवस मला पत्ता ही नव्हता कि ती पार्किग मध्ये नाहिए)मला ओळखणार्‍यांचा घरी फोन आला. हे ही कोणत्याही मंत्राशिवाय. मोबाइल तर किता वेळा परत मिळाला हे मोजणही मी सोडुन दिलय.

गुरू मेहरबान तो रावण नाम भी पुण्यवान.
सहमत. अनिरुध्द्बापु भक्तांना / शिष्यांना 'अनिरुद्धाय नमः' म्हणायला सांगतात म्हणे आणि शिष्यदेखिल हा जप करुन कसा फायदा झाला वगैरे सांगत असतात. तस्मात आमचा विचार यावर असा आहे की कोणताही मंत्र / शब्द्समुच्चय उच्चारुन अंतर्मनात सतत चांगले विचार झिरपणे महत्वाचे. राम-राम, श्रीराम जय्र राम जय जय राम, गण गण गणात बोते, सोSह्म्, ओम् नमः शिवाय ही केवळ समाजमान्य प्रातिनिधीक उदाहरणे आहेत. उद्या कोका-कोला, कोका-कोला, रावण/रावण जप करुन जर एखाद्याच्या मनात वरील शब्दांप्रमाणेच भाव जाग्रुत झाले तरी हरकत नसावी. मात्र मदनबाण यांनी म्हटल्याप्रमाणे माझे व्यक्तीगत अनुभव नाहीत (अर्थात मी मंत्रपठण करत नाही) पण प्रचंड इच्छाशक्ती असताना माझ्या आयुष्यात २ अशक्यप्राय गोष्टी शक्य झाल्या आहेत (ज्यात मला करण्यासारखे काही नव्हते फक्त जसे सतत व्हावे वाटत होते तसे घडले.)

अर्थातच. पण महाभारतात अस्त्रे सोडण्याआधी कुठले मंत्र म्हणायचे त्याचे एक मॅन्युअल मिळाले आहे अलीकडे. त्यातले मंत्र बघायला आवडतील. बाकी या मंत्रचळाला भुलणार्‍या अन स्वतःला सुशिक्षित वगैरे म्हणवणार्‍यांना पाहून मणोरंजण फार होते. आपल्या समाजात लोकांना येडे बनवणे किती सोपे आहे हे लगेच समजते.

:)
बाकी या मंत्रचळाला भुलणार्‍या अन स्वतःला सुशिक्षित वगैरे म्हणवणार्‍यांना पाहून मणोरंजण फार होते.
ह्या बाबतीत मात्र किञ्चित असहमत. जो जे वांछिल ते तो. अर्थात मानणे अथवा न मानणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे आणि तेव्हढे त्याला स्वातंत्र्य हवेच.

जो जे वांछिल ते तो. अर्थात मानणे अथवा न मानणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे आणि तेव्हढे त्याला स्वातंत्र्य हवेच.
पूर्ण मान्य! पण म्हणून हिरीरीने हवेत सिंहगड रायगड बांधत असतील तर पायाचा दगडच नाहीये हे सांगितले पाहिजे असे वाटते. असो.

>>> हिरीरीने हवेत सिंहगड रायगड बांधत असतील तर पायाचा दगडच नाहीये हे सांगितले पाहिजे असे वाटते. कुठल्या मुद्द्यावर नकार देताय ते तरी सांगा की! आम्ही होय म्हणून जसं काही होत नाही तसं तुम्ही बळंच नाहीच म्हणून काही होणारे का? 'माझं मत' एवढंच उत्तर आहे का? की आणखी काही विषय आहे?

कुठल्या मुद्द्यावर नकार देताय ते तरी सांगा की!
कितीवेळा तेच ते सांगू? मंत्राची बाय इटसेल्फ अशी काहीही पावर नसते. तो कार्तवीर्यार्जुनाचा मंत्रही हेच सिद्ध करतो. अशासाठी की पुराणांत त्याचे हात परशुरामाने तोडले असे नमूद आहे. अशा व्हिलनचा मंत्र जपून काही होत असेल तर मग कोका कोला किंवा फँटाचा जप केला तरी व्हायला पाहिजे. याला सहमती नसेल तर का नाही? अन मंत्राचा जप केल्यावर जे होते त्याची कारणमीमांसा करताना मंत्राचा इफेक्ट नक्की कसा गणायचा याबद्दलही अतिशय भोंगळ मीमांसा आलेली आहे. बाय इटसेल्फ त्या अक्षरांत काही पॉवर असते हे सिद्ध करायचे बर्डन ऑफ प्रूफ तुमच्यावर आहे. सिद्ध करता येत नसेल तर उचकायचं काम नाही.

सिद्ध करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? मंत्राचा अनुभव आला असं स्पष्टपणं मदनबाण, नि अडखळत (त्यांना काहीही बोलत नाहीये, गैरसमज नसावा) रेवतीतै, योगी ९०० ह्यांनी सांगितलं. अनेकजण सांगत आहेत की बाबा आम्हाला काहीतरी फरक पडला. ते अनुभव नाकारणार आहोत का आपण? म्हणजे कोंबडं झाकायचा प्रयत्न कोण करतंय? प्रत्येक प्रयोगासाठी लागणारी उपकरणं वेगवेगळी असतात हे मान्य नाही तर का बोलतोय आपण? पेढा खाताना एखाद्याला सुख मिळेल दुसर्‍या एखाद्या ताप आलेल्या माणसाला तोंडाला चव नाही म्हणून नाही मिळणार म्हणून पेढा वाईट असतो का? ताप जायला हवा आधी. ताप गेल्यावर कडूपणा निवळायला हवा तोंडाचा. नंतर लागेल पेढा गोड. त्या अक्षरात किंवा नामात पॉवर असते ह्यात शंकाच नाही. ते सिद्ध करायला आम्ही तयार आहोत. तुमच्याच मार्फत. रोज ११ माळा करा. कुठलाही जप करा. ॐ नमः शिवाय करा, श्रीराम जयराम जयजय राम करा अथवा गायत्री करा. महिन्यानंतर बोलू. इथंच!

नक्की दावा काय आहे हे समजून घेण्यात गफलत होते आहे.
सिद्ध करायचं म्हणजे नेमकं काय करायचं?
वेड पांघरून पेडगावचे तिकीट मागू पाहताहात, तरी सांगतो. शेवटी कुणीतरी एकाने डोकं वापरलं पाहिजे. मंत्रबिंत्र म्हणून जो फायदा होतो, तो त्या विशिष्ट अक्षरसमुच्चयामुळे न होता आपल्या मनोनिग्रहामुळे होतो असा आक्षेप आहे. निग्रह असेल तर नाम जपा अथवा नका जपू, नाम रामाचे घ्या अथवा तुमच्या लाडक्या व्हिलन रावणाचे, फायदा हा होणारच. तस्मात त्यात नामाचा रोल काय असा प्रश्न केला तर तीच तीच रेकॉर्ड वाजवताय.
त्या अक्षरात किंवा नामात पॉवर असते ह्यात शंकाच नाही.
इतकं सगळं करूनही पुन्हा तेच! राहुलबाबाची आठवण येऊ लागलीये आत्ता. काश्मीर ते कन्याकुमारी, गुजरात ते बंगाल कुठल्याही समस्येवर 'विमेन्स एम्पॉवरमेंट' हे उत्तर ठरलेलं आहे. शिवाय अडचणीत आणणारे प्रश्न विचारले की "व्हॉट इफ आय आस्क यू द सेम क्वेश्चन" हे ब्रह्मास्त्र! इथेही तेच दिसतंय. डोकं वापरायला आपल्या देशात बंदी असते की कसे, अशी शंका आता मूळ धरू लागली आहे.

कसलं चोरीचं? मुळात अशा मंत्राच्या जपाने काहीएक फलप्राप्ती होते असा दावा असणार्‍यांनी ते सिद्ध करायचे असते. बर्डन ऑफ प्रूफ त्यांच्यावर असते. हे डोक्शात शिरत नसेल तर वाद घालणे व्यर्थ आहे.