Welcome to misalpav.com
लेखक: दिव्यश्री | प्रसिद्ध:
सर्वसामान्य पणे मराठी लोक हिंदी भाषा व्यवस्थित बोलू शकत नाहीत अस निरिक्षण आहे,आणि त्याला फारच कमी अपवाद असतील. मी देखील फार सुंदर हिंदी बोलते असे नाही.मराठी लोक जर कधी हिंदी भाषेत बोलले तर फार गमतीदार प्रसंग घडतात.आणि जो बोलतो त्यालाही ते नंतरच समजते.असाच एक किस्सा आमच्या बाबतीत घडला. तो इथे मांडते आहे. :) आम्ही डिसेंबर मध्ये इटली मधील Milano नावाच्या शहरात फिरायला गेलो होतो.पोहोचे पर्यंत बराच उशीर झाला रात्रीचे १२.३० वाजले होते .प्रचंड थंडी आणि त्यामध्ये हॉटेल शोधायचे होते.बरेचसे लोक अर्धवट झोपेतच होते. Milano मध्ये जे हॉटेल बुक केले होते तेथे जवळपास बर्याच गल्ल्या /बोळी होत्या.फिरून फिरून आम्ही दोनदा एकाच ठिकाणी आलो.आमचे अहो तेवढ्यात बोलले कितनी बोळी हैं यहा,बोळीबोळी मे से आणे जाने मे तकलीफ होती हय, त्या परिस्थितीत २ मिनिटे सगळेच ब्लांक झाले आता काय करायचं आणि नंतर पूर्ण ट्रीप संपे पर्यंत बोळीबोळी वरून चिडवत राहिले . *blush* ;) :D *lol* तुम्हीही असे काही किस्से असले तर जरूर शेअर करा.आपण सगळे हसुया. :) इथे कोणाला दुखायचं नाही, कोणत्याही भाषेचा ,व्यक्तीचा अपमान करण्याचा हेतू नाही. एक मजा म्हणून लिहिले आहे आणि सगळ्यांना विनंती आहे कि या लिखाणाकडे मजा म्हणूनच पाहावे .अवांतर मला लिहिण्याचा अनुभव आजीबात नाही तेंव्हा काही चुकल्यास आपण सांभाळून घ्यालच(न घेऊन जाणार कुठे.) ;) :)
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

हम इथेच बठलेले हय ! असे हवे तसेच, एक एक को लक्षामें ठेवेंगा अवर बादमे उसका बदला घेयेंगे.>>> अरे बापरे... असं पण आहे का?

म्हणजे तुम्हाला, हमरान आयले नि नम्रान बैठले हे पण माहित नसणार. वर...... ताड्या आज मुर्ग्या(कोबड्या) नय लाया क्या गाव मे लगन हय ना !

माझं हिंदी ऐकून बर्‍याचदा हिंदीभाषिकच "आम्हाला मराठी व्यवस्थित समजतं" असं गुमान कबूल करतात आणि "मराठीतच बोल" वगैरे सांगतात!

मुंबईत आणि महाराष्ट्रात हिंदी भाषिकांनी मराठी भाषेला दुय्यम स्थान दिले आहे हे मला मान्य आहे. आणि ते साफ चूक आहे हेही. मराठी ही हिंदीच्याच तोडीची भाषा आहे. भाषावार प्रांतरचना झाल्यामुळे महाराष्ट्रात हिंदीपेक्षा मराठी जास्त महत्त्वाची आहे. (हा माझा डिसक्लेमर!) पण ह्या गंमतशीर वाटणार्‍या चुका का होतात? मला वाटते मराठी माणसाच्या कानावर हिंदी भाषा वारंवार पडत असते. सिनेमे, सिनेसंगीत, सिरियल, टीव्हीवरील अन्य बातम्या वगैरे कार्यक्रम ह्या माध्यमातून जी हिंदी कानावर पडते त्यामुळे आपल्याला हिंदी उत्तम येते असा बहुतेक लोकांचा गैरसमज व्हायला मदत होत असावी. कानावर पडलेले समजणे आणि उत्तम हिंदी बोलता येणे यात मोठा फरक आहे तो या दोन भाषेतील साधर्म्यामुळे पटकन लक्षात येत नाही. आणि त्यामुळे अशी गडबड होत असावी. आता एक संवाद. एक मराठी आजीबाई उत्तरेत कुठेतरी यात्रेबित्रेला जातात. उन्हाळ्याचे दिवस असतात. एक गाडीवाला ताक विकत असतो. ते विकत घेऊन, पिऊन झाल्यावर विचारतात "भय्या, तकियेमे अल्ला नही था क्या?" (अर्थात ताकात आले घातले नव्हते का?). भय्या अवाक!

हा तक्केमे अल्ला विनोद मीही ऐकला होता. ;) माझ्या भावाला हिंदी विषयाच्या बाईंनी 'हम दिवाली मनाते है' अशा विषयावरचा निबंध दिवाळी सुट्टीचा अभ्यास म्हणून लिहून आणायला सांगितला होता तर भावाच्या मित्राने (भावाने नव्हे!) 'हम सब दिवालीमें खुदकुशी मनाते है|' असे लिहून नेल्याने बाईंनी ती मोठी चूक दाखवली. ते याने घरी येऊन सांगितले (स्वत:च्या) त्यावर त्याच्या आजीने अर्थ विचारला व् "काय तरी मेलं अभद्र ल्ह्यायचं" म्हणून धपाटा घातला.

दिव्यश्रीजी, तुमने एकदम मस्त धागा काढ्या हय. हमको इसमें मराठीका किंवा मराठी माणूसका कोई अपमान या दुर्दैव वैग्रे वाटता नही. मराठी माणुसने यह धागेके बारेमें जरा थोडी विनोदबुद्धी (मराठीमें सेन्स ओफ ह्यूमर बोलते हय उस्को!!)दाखवणेका जरूरत हय. अपने स्वतः को थोडा हासनेमें कुछी वाईट नही. नही तो 'चिडका बिब्बा' बोलते हय. :) बाकी ये भाषा और उच्चारका घपला मराठी लोगाच करते है ऐसा नही. पब्लिकने थोडा रसेल पीटर्स् का कॉमेडी यू ट्युबपर है वो देखना मंगताय! हमारा तो हासहासके पोट दुखताय!!! लगे रहो, मराठीभाय!!! :)

हांगाश्शी! ऐश्याच बोलनेकु मंगताय. उगा फज्जर फज्जर को बटर डुबाके खानेका और मसत रैनेका. क्या म्हनताय?

@ आनन्दिता काय लिहीलय ग हे ? नुसती हसतीये हापिसात आल्यापासुन :) (गड्बडा लोळ्णारी स्माईली कशी घेतात ? ) आमच्याकडे आई अन आज्जी अशी करमणुक करत असतात वरचेवर . आजी : "आज हमारे इधर करंगळी के धार एवढा पाणी आया हमकोच भरनेको नही मिला " आई : " ए साडीवाले भैय्या ,तुम कल दोपर मे आव , दोपर मे हम निवांत रेहते हे " @ दिव्यश्री तै मस्त धागा काढलायेस ह.ह्.पु.वा. :)

एक मराठी भौसाएब लग्नातल्या पंगतीचं वर्णन हिंदीत करताना म्हणाला.. ह्मारे यहा पहिले नवरा नवरीको घास खिलाता है =)) आता हा विनोद आइनस्टाईन, विवेकानंद, वॉरन बफेट नावाने जसं काय वाटेल ते खपवल्या जातं त्यातला होता काय कल्पना नाहि.

दिव्यश्री, खरं पाहता मी कांही प्रतिसादच देणार नव्हतो. कारण मूळ धाग्यात म्हंटल्याप्रमाणे 'एक मजा म्हणून लिहिले आहे आणि सगळ्यांना विनंती आहे कि या लिखाणाकडे मजा म्हणूनच पाहावे .' ह्या विनंतीला मान देऊन मी कांही इतर गंभीर धाग्यांकडे वळणार होतो पण सर्वसाक्षींच्या प्रतिसादावरील आपली प्रतिक्रिया वाचली आणि कांही गोष्टी डोक्यात आल्या त्या इथे लिहील्या आहेत.
सर्वसामान्य पणे मराठी लोक हिंदी भाषा व्यवस्थित बोलू शकत नाहीत अस निरिक्षण आहे,आणि त्याला फारच कमी अपवाद असतील.
हे अनुमान कशाच्या बळावर काढले आहे? माझा अनुभव असा आहे की पूर्व, दक्षिण आणि इतर अनेक राज्यांपेक्षा महाराष्ट्रात हिन्दी चांगली बोलली जाते. त्याचे कारण मराठी माणसाची हुशारी नसून शाळेतच 'हिन्दी' हा एक विषय आपल्या शिक्षणात अनिवार्य आहे. हिन्दी चित्रपट क्षेत्रात अनेक मराठी तारे-तारका व्यवस्थित हिन्दी बोलतात. लता मंगेशकर, आशा भोसले वगैरे गायिका अनेक वर्षे राज्य करीत आहेत. हिन्दी नाटकांमध्ये आणि मालिकांमध्येही अनेक मराठी कलाकार हिन्दी भाषा व्यवस्थित बोलत असतात. बिजेपी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील अनेक मराठी नेते हिन्दी व्यवस्थित बोलत असतात. वरील प्रतिसादांमधील अनेक उदाहरणे ही मागिल पिढीच्या महिलांची आहेत. त्यांना बाहेरच्या जगात वावरायला, अन्य भाषिकांमध्ये मिसळायला संधीच कमी मिळाली त्यामुळे शाळेत शिकलेली हिन्दी भाषा वापरात राहीली नाही. पुरुषांचे सहसा तसे झालेले दिसत नाही. नोकरी धंद्यानिमित्त त्यांचे अन्य भाषिकांशी संबंध येतात आणि हिन्दी भाषा वापरात राहाते. कुठलीही भाषा वापरात असेल तर आणि तरच त्या भाषेवर आपलं प्रभुत्व राहतं. अगदी आपल्या मातृभाषेचेही तस्स्सेच आहे. मराठी वापरात नाही राहिली (इंग्रजी, हिन्दी मिसळले) की आपल्या मातृभाषेची शुद्धताही हळू हळू नष्ट होते. हिन्दी तर आपल्यासाठी परकी भाषा आहे.
मुळामध्ये मराठी लोक हिंदी बोलताना चुकतात
सर्व मराठी माणसं हिन्दी बोलताना चुकतात?
हिंदी हि आपली राष्ट्रभाषा आहे न?
हिन्दी ही राष्ट्रभाषा नाही हा मुद्दा वर येऊन गेला आहेच.
मग मातृभाषा आणि राष्ट्रभाषा या दोन्ही व्यवस्थित बोलत यायला पाहिजे ना?
आधी मातृभाषा व्यवस्थित (शक्य तितकी शुद्ध, 'बोलत' नाही 'बोलता' ) बोलता यायला पाहिजे. Milano, हॉटेल बुक, सगळेच ब्लांक झाले, पूर्ण ट्रीप संपे पर्यंत, जरूर शेअर करा, ह्या सर्व शब्दांना मातृभाषेत पर्यायी शब्द आहेत नं? Milano - मिलॅनो हॉटेल बुक - अगदी हॉटेलला 'विश्रांतीगृह' नाही म्हंटलं तरी 'आरक्षण' शब्द वापरता येईलच. सगळेच ब्लांक (ब्लँक) झाले - स्तिमित झालो, स्तब्ध झालो. पूर्ण ट्रिप संपे पर्यंत (संपेपर्यंत) - सहल जरूर शेअर करा - अवश्य आदानप्रदान करा मातृभाषा व्यवस्थित बोलता यायला पाहिजे हा तुमचा मुद्दा मला अगदी पटला. तुम्हालाही माझा मराठी भाषेचा आग्रह पटला असेल असे वाटते.
पण खरच नवीन सदस्यांना समजून घेण्यास जरा त्रास होतो असे मी बर्याच वेळा पहिले आहे.
इथला प्रत्येक जण कधी न कधी नविन असतोच असतो. आपल्या चुका कोणी दाखविल्या तर त्यात राग कसला? कोणी मुद्दामहून नविन सदस्याला 'छळत' नाही. भाषेबद्दल बोलताना, वरील धाग्यातील लिखित भाषेतील व्याकरणाच्या साध्या साध्या चुका जसे, स्वल्पविराम, पूर्णविरामा नंतरच्या शब्दात एक जागा सोडायला पाहिजे आणि कांही शब्दांची तोडफोड, ही अधोरेखित केली नाहीए नाहीतर हा एक स्वतंत्र लेखच होईल.
मी अगदी प्रामाणिकपणे लिहिले आहे
सर्वसाक्षींनीही अगदी प्रामाणिकपणे लिहीले आहे आणि माझा हा प्रतिसादही अगदी प्रामाणिक आहे. खात्री असावी आणि राग मानू नये. मला मराठी भाषेची आवड आणि अभिमान आहे. पण कधी कधी माझ्या तोंडूनही एखादा चुकीचा शब्द जातोच. मी मान्य करतो. पण कोणी चुक दाखवून दिली तर रागवत नाही, सुधारून घेतो. अशा बारीक बारीक सुधारणांमधून आपली मातृभाषा संमृद्ध होत जाते. वरील लेखनातही काही चुका आढळल्यास नि:संकोच सांगाव्यात.

तुमच्याशी वाद घालायचा अजिबात हेतू नाही. (बाकी काय बिशाद आहे आमची?) :) पण तुम्हीच
वरील लेखनातही काही चुका आढळल्यास नि:संकोच सांगाव्यात.
असं सांगितल्यामुळे खालील वाक्ये लिहायचा धीर करत आहे... सर्वप्रथम, Milano या शब्दाचं मराठीकरण मिलॅनो असं होत नाही. मुळात हा इंग्रजी शब्द नाही, इटालियन आहे. आणि माझ्या अनुभवानुसार स्थानिक इटालियन त्याचा उचार 'मिलानो' असा करतात. इंग्रजीतही त्या गावाला 'मिलान' असं म्हणतात, मिलॅन नाही. तेंव्हा विशेषनामे लिहितांना तरी त्यांचं मराठीलिपीकरण केलं नाही तरी चालावं... बाकी हॉटेल बुक, ट्रीप, शेअर करणे याबद्दल बोलायचं झालं तर गेल्या चाळीस वर्षांपासून मुंबईततरी हेच शब्द वापरले जातात. हॉटेलचं बुकिंग केलं, शाळेची ट्रीप गेली, डोसा शेअर केला असंच म्हणतात. महाराष्टात अन्यत्र कुठे तुम्ही म्हणता तसे पर्याय वापरले जात असतीलही, मी नाही म्हणत नाही. पण एखाद्याने ते वापरले नाहीत तर तो फार मोठा दोष म्हणता येणार नाही. बाकी तुम्ही 'जरूर' ला 'अवश्य' हा पर्याय का सुचवला ते माझ्या डोक्यावरून गेलंय!! तद्भाषीय शब्द वापरायला हवेत हे तर खरंच पण त्याचबरोबर कोणत्याही भाषेने सर्वसमावेशक असणं आवश्यक आहे, नाही का? चूभूद्या घ्या...

उगाच माझाही अवांतर आगावपणा: इटालियन लोक बोलताना बडबडगीत म्हटल्यासारखा आवाज लावतात. त्यामुळे "इतालियेन्न", "मिलान्नो", "दानियेल्ले", "सिमोनताक्की" असे उच्चार असतात. इतालियेन्न माणूस बोलायला लागला की त्याच्या लयबद्ध बोलण्याकडेच लक्ष लागून रहातं आणि आशय निसटून जातो - असा अनुभव कैकवेळा आला आहे. (जिज्ञासूंसाठी: इतालियेन्न तरुणी बोलत असताना तिच्या बोलण्याकडेही लक्ष जात नाही...)

उगाच माझाही अवांतर आगावपणा: फ्रेंच इंग्रजी- फ्रेंच- आई वॉन्टं पेप्परं दुकानदार- या शुअर. ब्लॅक पेप्पर ऑर व्हाईट पेप्पर? फ्रेंच- टॉईलेट्टं.. पेप्परं..

>>>>Milano या शब्दाचं मराठीकरण मिलॅनो असं होत नाही. मुळात हा इंग्रजी शब्द नाही, इटालियन आहे. आणि माझ्या अनुभवानुसार स्थानिक इटालियन त्याचा उचार 'मिलानो' असा करतात. इंग्रजीतही त्या गावाला 'मिलान' असं म्हणतात, मिलॅन नाही. मिलॅनो हा माझा ऐकीव उच्चार आहे. त्याचा इटालियन उच्चार 'मिलानो' होतो ही माहीती मला तुमच्या प्रतिसादातून मिळाली आहे. माझी चुक मी सुधारली आहे. माझा आक्षेप, संपूर्ण मराठी लेखात 'Milano' ह्या इंग्रजी लिपीतील शब्दाला आहे. इटाली हा शब्द मराठीत लिहीता येतो तर 'मिलानो' का नाही? इटाली सुद्धा विशेषनाम आहे. >>>>एखाद्याने ते वापरले नाहीत तर तो फार मोठा दोष म्हणता येणार नाही. फार मोठा दोष आहे असे माझेही म्हणणे नाही. पण मराठी लिहायचा प्रयत्न तर करून पाहा. मराठी भाषा लिहायला, बोलायला, वाचायला, गोड नाही वाटत का? की मराठीच्या वापराने नेमका अर्थ न कळता भलताच अर्थ ध्वनीत होतो? >>>>बाकी हॉटेल बुक, ट्रीप, शेअर करणे याबद्दल बोलायचं झालं तर गेल्या चाळीस वर्षांपासून मुंबईततरी हेच शब्द वापरले जातात. हॉटेलचं बुकिंग केलं, शाळेची ट्रीप गेली, डोसा शेअर केला असंच म्हणतात. होय गेल्या ४० वर्षात हेच झाले आहे. ते थांबावे हाच उद्देश आहे. 'हॉटेल' शब्द बर्‍यापैकी मराठीत स्थिरावला आहे. 'आरक्षण असलेल्या हॉटेलाचा पत्ता शोधताना' ऐवजी 'हॉटेल 'बुक' केलेले होते ते शोधताना...' असा शब्द प्रयोग करून आपण 'बुक करणे' हा निविन शब्द मराठीच्या मूळ शब्दाला बाजूला सारून प्रस्थापित करतो आहोत. ते टाळता आलं तर पाहावं. 'आरक्षित हॉटेलचा पत्ता शोधताना..' असे म्हंटले तर अर्थ कळत नाही का? मराठी भाषेचा आग्रह धरणारे मराठी बांधवांकडूनच हास्याचा विषय ठरतात ह्यापरतं मराठी भाषेचे दुर्दैवं ते काय? हे वैयक्तिकरित्या तुम्हाला उद्देशून नाही तर एकूणातच मराठी भाषेला मिळणार्‍या सापत्न वागणूकीला उद्देशून आहे. कांही मराठी शब्द कांही जणांना बोजड वाटतात. कानाला ऐकायला सहजसुलभ वाटत नाहीत. त्यामुळे त्यांचा मिश्र मराठीला पाठींबा असतो. पण संस्थळाच्या अस्तित्वात आल्यानंतर, 'LOL', 'बाडीस', 'गुगलून पाहा', OMG आणि स्मायल्यांचा वापर एवढ्या सगळ्या गोष्टी आपण विनातक्रार शिकलो आणि वापरतोही. मग मातृभाषेतील नविन नाही तर वर्षानुवर्षे चालत आलेले शब्द आपल्याला अनाकलनिय का वाटावेत? बोजड का वाटावेत? ते शिकण्याकडे, वापरण्याकडे आपला कल का नसावा? हे समजत नाही. अगदी अवजड-बोजड मराठीच बोला असा माझा (किंवा सर्वसाक्षींचाही) आग्रह नाही. पण जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे मराठी पर्यायी शब्द आवर्जून वापरले तर मराठी भाषा धेडगुजरी बनणार नाही.

माझा आक्षेप, संपूर्ण मराठी लेखात 'Milano' ह्या इंग्रजी लिपीतील शब्दाला आहे. इटाली हा शब्द मराठीत लिहीता येतो तर 'मिलानो' का नाही?
या तुमच्या पॉइंटाशी [क्षमस्व, 'मुद्द्याशी'; आता मराठी बोलले पाहिजे तुमच्याशी!! :) ] सहमत आहे.
पण मराठी लिहायचा प्रयत्न तर करून पाहा. मराठी भाषा लिहायला, बोलायला, वाचायला, गोड नाही वाटत का?
होय हो, वाटतं की. तुम्ही-आम्ही मिपावर खूप वर्षं लिहितोय. आपण जर 'मोकलाया दाही दिशा' स्टाईल लिहिलं तर एकमेकांना आक्षेप घेणं हे ठीक आहे!! पण त्यांनी अगोदरच सांगितलंय की त्या नवीन आहेत म्हणून! म्हणून कृपया तिला फोडा (सो प्लीज गिव्ह हर अ ब्रेक!!) :) नाहीतर नवोदित सभासदांना छळल्याबद्दल नीलकांताकडे तुमची चुगली करून एक चांदणी मिळवीन हां मी!!!
कांही मराठी शब्द कांही जणांना बोजड वाटतात. कानाला ऐकायला सहजसुलभ वाटत नाहीत. त्यामुळे त्यांचा मिश्र मराठीला पाठींबा असतो.
ते तर आहेच. पण त्याहीपेक्षा कधीकधी मुद्दाम अट्टहासाने अनैसर्गिक मराठी शब्द वापरण्याचा हट्ट हा जास्त जाचक वाटतो. उदा. जागा 'राखून' ठेवणं हे मला सरळ सोपं मराठी वाटतं. पण जागेचं 'आरक्षण' केलं असं म्हणणं म्हणजे आमच्या तोंडी सर्कारी तोबरा भरल्यागत वाटतं. मराठी भाषा धेडगुजरी बनू नये असं मलाही वाटतं पण त्यापेक्षा ती बदललेल्या स्वरूपात का होईना पण जास्तीतजास्त लोकांकडून वापरात रहावी असं जास्त प्रकर्षाने वाटतं. तिची पाली वा अर्धमागधी होऊ नये असं वाटतं... आणि मराठी भाषेला बदलाचं वावडं नाहिये. ज्ञानेश्वराच्या काळची मराठी तुकारामांच्या काळी बदलली होती, ती मग चिपळूणकरांच्या काळी आणखी बदलली, मग खांडेकर-फडक्यांच्या काळी अजून बदलली आणि आताही बदलतेय. जर तेराव्या शतकापासून एकविसाव्या शतकापर्यंत नवे शब्द येऊनही, बदलूनही जर मराठी अजून मराठीच असेल तर निव्वळ संस्कृतोद्भव शब्दांचा अट्टहास करण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं.... बहुत काय लिहावे? आपण सूज्ञ आहांतच... लेखनसीमा.

म्हणून कृपया तिला फोडा --- अशक्य हसतेय पिडाकाका!

पण हिंदीला परकी भाषा म्हणणं काहि पटलं नाहि बुवा... एकट्या हिदी सिनेमा आणि गाण्यांनी ४ मराठी पिढ्यांचं भावविश्व समृद्ध केलय. आयुष्यातली कुठलिही हळवी आठवण घ्या... ति एखाद्या हिंदी चित्रपट/प्रसंग/गाण्याशीच कनेक्ट होते. तसच जुन्या हिंदी टी.व्ही सिरेयल्स आणि बाकि कार्यक्रम... आज सुद्धा कोण मुलगा/मुलगी मराठी नट्यांची कॉपी करायचा प्रयत्न करते? मग ति भाषा आपल्याला परकी कशी?

>>>>हिंदीला परकी भाषा म्हणणं काहि पटलं नाहि बुवा.. अर्धवटराव, 'परकी' म्हणजे जी मातृभाषा नाही ती. 'परकी' म्हणजे लगेच परदेशी नाही.

मुळामध्ये मराठी लोक हिंदी बोलताना चुकतात
ह्याकडे लक्षच गेले नाही.. मुळात मराठी लोक मराठी लिहीतांना चुकतात तर. "मुळा-मुठे"च्या पाण्याला काय वाटेल अश्याने? ;-) प्रतिसादाशी सहमत, पेठकर काका..

खरं पाहता मी कांही प्रतिसादच देणार नव्हतो. पेठकर काका तुम्ही या धाग्यावर येउन प्रतिसाद दिलात त्याबद्दल आभारी आहे. हे अनुमान कशाच्या बळावर काढले आहे?>>>माझ्या अल्पमती नुसार.मला काही तुमच्या एवढा अनुभव नाही.मी महाराष्ट्रात पुणे ,नाशिक आणि काही ठराविक गावे /शहरे सोडली तर जास्त फिरले नाही. कुठलीही भाषा वापरात असेल तर आणि तरच त्या भाषेवर आपलं प्रभुत्व राहतं>>> प्रभुत्व सोडा हो मी फक्त भाषा व्यवस्थित बोलत यावी असं लिहील आहे. हिन्दी तर आपल्यासाठी परकी भाषा आहे. >>> हि माहिती माझ्यासाठी नवीन आहे. सर्व मराठी माणसं हिन्दी बोलताना चुकतात?>>> सर्व हा शब्द माझा नाही तरीही माझ्या निरिक्षणा नुसार बरेच वेळा हिंदी बोलताना चुकतात. Milano, हॉटेल बुक, सगळेच ब्लांक झाले, पूर्ण ट्रीप संपे पर्यंत, जरूर शेअर करा, ह्या सर्व शब्दांना मातृभाषेत पर्यायी शब्द आहेत नं?>>> हो आहेत. फक्त ते पटकन आठवले नाहीत मला तरी तुम्हालाही माझा मराठी भाषेचा आग्रह पटला असेल असे वाटते. >>>हो अगदी . इथला प्रत्येक जण कधी न कधी नविन असतोच असतो. आपल्या चुका कोणी दाखविल्या तर त्यात राग कसला? कोणी मुद्दामहून नविन सदस्याला 'छळत' नाही. >>>प्रत्येक जण नवीन असतो हे माहिती आहे मग जुन्या सदस्यांनी नवीन सदस्यांना समजून घ्यावे.त्यांच्या चुका जरूर दाखवाव्यात आणि नवीन सदस्यांनी त्या मान्य करून सुधाराव्या.नवीन सदस्याला छळतात असं मी लिहिले नाही आणि तो माझा उद्देशही नाही.मला कसलाही राग नाही. भाषेबद्दल बोलताना, वरील धाग्यातील लिखित भाषेतील व्याकरणाच्या साध्या साध्या चुका जसे, स्वल्पविराम, पूर्णविरामा नंतरच्या शब्दात एक जागा सोडायला पाहिजे आणि कांही शब्दांची तोडफोड, ही अधोरेखित केली नाहीए नाहीतर हा एक स्वतंत्र लेखच होईल. >>> लिहाच एक लेख किमान भविष्यातील चुका टाळंता येतील :)

>>>>माझ्या अल्पमती नुसार.मला काही तुमच्या एवढा अनुभव नाही.मी महाराष्ट्रात पुणे ,नाशिक आणि काही ठराविक गावे /शहरे सोडली तर जास्त फिरले नाही. प्रतिसादामध्ये 'मला कसलाही राग नाही' हे ठळक अक्षरात लिहायचं आणि उपप्रतिसाद मात्र उपहासाने ठासून भरलेले द्यायचा. वा! >>>>प्रभुत्व सोडा हो मी फक्त भाषा व्यवस्थित बोलत यावी असं लिहील आहे. माझंही तेच म्हणणं आहे. 'बोलत' नाही तर 'व्यवस्थित 'बोलता' यावी'. >>>>हि माहिती माझ्यासाठी नवीन आहे. परकेपणाची माझी व्याख्या मी अर्धवटरावांना दिलेल्या प्रतिसादात आहे. >>>सर्व हा शब्द माझा नाही 'सर्वसामान्य पणे मराठी लोक हिंदी भाषा व्यवस्थित बोलू शकत नाहीत अस निरिक्षण आहे' आणि 'कांही मराठी माणसं हिन्दी भाषा व्यवस्थित बोलू शकत नाहीत असं निरिक्षण आहे' ह्या दोन वाक्यातला फरक कळला तर माझ्या प्रतिसादातल्या माझ्या 'सर्व' ह्या शब्दाचा अर्थ कळेल. >>>>त्यांच्या चुका जरूर दाखवाव्यात आणि नवीन सदस्यांनी त्या मान्य करून सुधाराव्या. तेच तर केलं आहे. बाकी नविन सदस्यांना जुन्यांनी सांगितलेल्या कांही कांही गोष्टी पटत, रुचत नाहीत. समजून घ्यायच्या नसतात नुसताच त्रागा करायचा असतो त्याला कोण काय करणार? >>>>लिहाच एक लेख किमान भविष्यातील चुका टाळंता येतील माझ्या प्रतिसादातील ' स्वल्पविराम, पूर्णविरामानंतरच्या शब्दात एक जागा सोडायला पाहिजे आणि कांही शब्दांची तोडफोड' ह्या अप्रत्यक्ष सुचनेकडेही दुर्लक्ष करुन ह्या तुमच्या वरील प्रतिसादात पुन्हा त्याच चुका दिसतात ह्यावरून तुम्ही शुद्धलेखनाबद्दल किती गंभीर आहात हे दिसतंच आहे. त्यामुळे उगा लेख लिहून वेळ फुकट घालवायची इच्छा नाही.

चोकोलेट,बिस्किटे,ईस्त्री ,रेडिओ, गेस ,मिक्सर,टोवेल,पेन ,पेन्सिल, बेटरी,वायर पावडर(चेहर्याला लावतो ती ),सिग्नल,ग्लास(काचेचा ),हेअरडाय,नेलकटर ई.ई. रोजच्या वापरातील शब्दांना मातृभाषेत पर्यायी शब्द आहेत का ? आणि असतील तर आपण मराठीच शब्द वापरतो का ? अवांतर मला टो, बे,गे ही अक्षरे लिहिता आली नाहीत क्षमस्व .

चॉकलेटचं कसलं भाषांतर करायचंय? हे म्हणजे तुपाला "क्लॅरिफाईड बटर" आणि मोदकाला** "ग्रेटेड कोकोनट डंपलिंग" म्हटल्यासारखं आहे. पुलंच्या लेखनात कुठेतरी "उदजनध्वम" आणि "दंतधावनी" असे शब्द आल्याचं आठवलं :) **खायचा. बाईक चालवायचा नव्हे

जे परभाषिक शब्द मराठीत रुळले आहेत, तेही बदला आणि ओढूनताणून बोजड मराठीशब्द बनवा, असा आग्रह मी आजतागायत केला नाही. बोलायला, ऐकायला रुचणारे, अजून विस्मरणात न गेलेले मराठी शब्द वापरा एवढाच आग्रह आहे. जे शब्द दूसर्‍या भाषेतून मराठीत आले आहेत (असे शेकड्यांनी आहेत. फक्त इंग्रजीच नाही तर फारसी, अरबी, उर्दू अनेक भाषातून आलेले आहेत.) आणि आता आपण त्यांना स्विकारले आहे ते सोडून अजून इतर नविन शब्दांना आपले प्रचलित शब्द टाकून देऊन प्रस्थापित करू नका एवढेच सांगणे आहे.

मी स्वतः डोंबीवलीतल्या भाजीवाल्याला "भैया एक रुपया का नाना देदो" बाजुला देवान कायमचा क्रिटीक गळ्यात बांधलेला (हो नवराच म्हणतात या प्राण्याला) "हा हा भैया, उसके साथ दादा भी दे दो। अकेला नाना क्या करेगा।" अर्थात त्या दिवशी डीनर पकल नाही.

तुमचे कुणीतरी डोंबिवलीत आहे, ह्याची योग्य ती दखल घेतल्या गेली आहे. आता तुम्ही डोंबिवलीत आलात की, झक्कास कट्टा करु या (कट्टेकरी) मुवि

हे असे कट्टे व्हावेत असे आपल्या सगळ्यांना वाटतेच ना? आता खरे तर ठाणे हे मध्यवर्ती ठिकाण नसून, डोंबिवली आहे, हे एकूण तुमच्या लक्षांत आले असेलच. लवकरच मिपावर एक जाहीरात पण झळकेल. "ज्याचा डोंबिवलीत एक पण नातेवाईक नसेल, तोच खरा डू-आयडी" (एकूण आमच्या डोंबिवलीची जाहीरात करायचा हा क्षीण प्रयत्न वायाच गेला. असे म्हणावे लागत आहे. जाता जाता, धागाकर्त्याने ह्या उपप्रतिसादांकडे जास्त लक्ष देवू नये. हे "सूड" आमच्यावर नेहमीच "आसूड" ओढतात आणि मग आम्ही त्यांच्याबरोबर चहापान वगैरे करून परत मार्गी लागतो.)

आता खरे तर ठाणे हे मध्यवर्ती ठिकाण नसून
णीषेध !!! -------------------------------------------------- जल्मापासुन ठाण्यात राहणारा…. आता पम्याच्या जवळ कळव्यात गेलोय