Welcome to misalpav.com
लेखक: मदनबाण | प्रसिद्ध:
(श्री शरद यांच्या http://www.misalpav.com/node/26963 या धाग्यावरील अवांतर प्रतिसाद इथे हलवून नवा धागा तयार केला आहे. एखाद-दुसरा संदर्भ त्या धाग्यातील चर्चेबद्दल असू शकतो. - संपादक मंडळ) _____________________________________ मंत्रादि गोष्टींवर लिटरली विश्वास ठेवणे अन कोणी चेष्टा केली की पोरकटपणे आरडाओरडा करणे, इ. मूर्खपणा टाळलाच पाहिजे वटवाघुळ मानवास संस्कॄताची उत्तम माहिती असताना, त्याने असे विधान करावे हे सर्वात धक्कादायक आहे. मननेन त्रायते इति मन्त्रः :- संदर्भ विकी महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम्। यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः।।25।। श्रीमद्भगवद्गीता अध्याय १० श्लोक २५ { जप हा मंत्रांचाच केला जातो} बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम्। मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः।।35।। श्रीमद्भगवद्गीता अध्याय १० श्लोक ३५ { गायत्री छन्दात्मक मंत्र आहे हे तर आता सर्वश्रुत आहे.} मंत्रांचा वापर करुन त्याचा अनुभव, फायदा / तोटा घेणारी मंडळी आजच्या घडीला आहेत, तसेच उध्या ही असतील. अनुभव घेण्यापेक्षा चेष्टा करणे हे अगदी सोपे आहे, हे वाचकांनी लक्षात ठेवावे. जालावर या संदर्भात वाचन / शोध घेत असताना काही माहिती समोर आली { ही माहिती मी अजुन संपूर्ण वाचली नाहीये.} वाचकांसाठी त्याचे दुवे खाली देतो :- An Introduction to the "MantraŚãstra" MANTRAS दोन्ही दुवे हे पिडीएफ चे आहेत. ज्या वाचकांना या विषयात रस आहे त्यांनीच हे दुवे अघडुन वाचण्याचे कष्ट घ्यावेत, टिंगल करण्यास विशेष बुद्धी लागत नाही असा माझा समज असल्याने जे हा विषय एक टिंगल / थट्टा म्हणुनच पाहतात त्यांनी याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे ! प्रयत्नाचा एक भाग तुम्ही किंवा अजून कोणी ज्यांनी अनुभव घेतले आहेत त्यांना विचारणे हाही असतो. वटवाघुळाने अनुभवा विषयी विचारणा केली आहे,म्हणुन जरा टंकन कष्ट घेतो. मंत्र :- कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते ! हा मंत्र मला माझ्या तिर्थरुपांकडुन कळाला, ज्या ठिकाणी मी सध्या राहतो आहे ती जागा विकत घेतानाची ही घटना आहे.{अनुभव क्रमांक १} या जागेचे {जागा विकत घेण्यासंबंधीच्या व्यव्हारांसकट इतर महत्वाची कागदपत्रे ओरिजिनल} सर्व कागदपत्र घेउन माझे वडिल प्रवास करत होते,{मला वाटत दादर स्टेशनहुन ते डोंबिवलीला येण्यासाठी ट्रेन मधे चढत होते.}प्रचंड गर्दी आणि त्यामुळे झालेल्या धक्का-बुक्कीत त्यांच्या हाताला झटका बसुन ती फाईल त्या गर्दीत पडली. वडिल डब्यात होते,डब्यातल्या गर्दीत ती फाईल शोधणेही त्या क्षणी शक्य नव्हते इतकी गर्दी डब्यात होती.जरा गर्दी कमी झाल्यावर वडिलांनी शोध घेण्याचा प्रतय्न केला पण काहीही सापडले नाही.फाईल फलाटावर पडली का ? ट्रॅकवर पडली का ? की डब्यातच कोणाच्या पायाला लागुन ती बाहेर फेकली गेली असेल ? वडिलांनी घरी आल्यावर हे सर्व आम्हाला सांगितले,ते खूप विचारात होते... जागेच्या सर्व व्यव्हारांचे कागद गहाळ झाल्याने ते अतिशय चिंताग्रस्त झाले होते.थोडावेळ शांत बसले आणि नंतर हातपाय धुवुन झाल्या नंतर त्यांना या वर दिलेल्या मंत्राचे स्मरण झाले ! त्यांनी सात्यत्याने या मंत्राचे उच्चरण अनेक दिवस चालु ठेवले होते आणि अचानक काही दिवसांनी त्यांच्या ऑफिसमधे एका माणसाचा फोन आला, त्याने वडिलांचे नाव विचारले आणि तुमची काही कागदपत्रांची फाईल गहाळ झाली आहे का ? अशी विचारणा केली.वडिलांनी त्या फाईलचे वर्णन केले आणि त्या फाईल चे एकंदर स्वरुप सांगितले,त्यावर त्या माणसाने तुमची फाईल माझ्याकडे आहे, ती घेउन जा असे सांगितले.ती फाइल महत्वाची आहे हे त्या व्यक्तीस त्यातील कागदपत्रांवरुन कळाले होते. शेवटी ती फाइल मिळाली आणि आजवर त्याच फ्लॅटमधे आम्ही राहतोय जिची कागदपत्रे त्या फाइल मधे होती. २)अनुभव २:- एकदा नरसोबाच्या वाडीला मी नदीत अंघोळ करत होतो, ३ -४ पायर्‍या खाली,ज्यांनी नरबाच्या वाडीला कॄष्णेत स्नान केले असेल त्यांना नदीच्या प्रवाहाचा अंदाज येइल.माझ्या गळ्यात साधे कसलेसे तांब्याचे लॉकेट होते, ते मैल्यवान नव्हते की कुठल्याही इतर गोष्टींसाठी उपयुक्त नव्हते,पण मी या मंत्राचा उपयोग सुरु करताच जवळपास १० मिनीटाच एका पोहणार्‍याला ते सापडले आणि तिथेच हे कोणाचे आहे अशी विचारणा सुरु केली,मी ते माझे आहे असे सांगताच ते त्यांनी मला दिले,पण नदीच्या प्रवाहात पोहताना गेलेले लॉकेट परत मिळाले यावर माझाच बराच वेळ विश्वास बसला नव्हता. ३}घरात अनेकदा मला न मिळणार्‍या,दॄष्टीस न पडणार्‍या ,भरपुर शोध घेउन न सापडणार्‍या वस्त्यु या मंत्राने आम्हाला मिळाल्या आहेत, हो आइच्या हातुन घराची किल्ली हरवली तेव्हा ती या मंत्रानेच परत मिळाली. ४)अगदी आत्ताची गोष्ट सांगतो... मी नविन पल्सर घेतली, त्याला मी पेट्रोल लॉक बसवुन घेतले,पण त्या लॉकची मुव्हमेंट घट्ट आहे,त्यामुळे व्हॉल्व ऑन्/ऑफ करताना किल्लीवर दाब येत होता, एका प्रयत्नात ती तुटली,पण त्याची अजुन एक चावी माझ्याकडे होती. मी जवळच्याच चावीवाल्याकडे जाउन तशीच अजुन एक चावी बनवुन घेतली.ती मी माझ्या बॅगेत ठेवली,व एक चावी कीचेनला अडकवली. ऑफिसात आलो...कामाला लागलो,चाव्या पॅटच्या डाव्या खिश्यात ठेवल्या होत्या,काही वेळाने त्या बाहेर काढुन बॅगेतच ठेवावा असा विचार आला,तेव्हा चाव्या खिशातुन बाहेर काढल्या,पण ल़़क्षात आले की पेट्रोल लॉकची चावी कीचेनला नाही ! ती पडली होती ! माझ्या बॅगेत आधीच चावी वाल्याकडुन तयार केलेली चावी होती,त्यामुळे घाबरायचे कारण नव्हते,पण कीचेन मधली चावी पडली होती ते शोधणे तर गरजेचेच होते.मी परत एकदा खिसा तपासला,त्याच्यातच तर राहिली नसेल ना ? मग ज्या ज्या ठिकाणी मी गेलो होते त्या त्या ठिकाणी मी परत गेलो, ज्या मार्गाने ऑफिसात गेलो होतो त्याच मार्गाने उलट फिरुन कंपनीच्या आवारात जिथे बाइक पार्क केली होती तिथे गेलो,पण चावी काही सापडली नाही ! मग नेहमीचाच वरील उपाय केला,ऑफिसात परत जाताना मी सिक्युरिटी गार्डला सांगुन ठेवले की माझी अश्या अश्या प्रकारची चावी हरवली आहे ती सापडली तर मला कळवा,तो पर्यंत मनात अनेकदा वरील मंत्राचा प्रयोग करुन झाला होता,आणि मला चावी मिळणार याची खात्री आधीच झाली,संध्याकाळी कामावरुन घरी निघताना परत सिक्युरिटी गार्डला प्रश्न केला मेरी चाबी मिली ना ! खर तर हा प्रश्न नव्हताच ते अध्यारुतच होते माझ्यासाठी, त्यावर तो म्हणाला साब एक चाबी मिला है, आप चेक करलो वोह आपकी है क्या. मी मेमगेटवर जाउन विचारणा केली.चावी त्यांच्याकडे जमा झालेली होती. ऑफिसच्या एव्हढ्या मोठ्या कँपस मधे हरवलेली चावी परत मिळण्याची ही माझी दुसरी घटना {या आधीही एकदा चावी गहाळ झाली होती},दोन्ही वेळेला चावी मला परत मिळाली. या सर्व घटनांमध्ये वस्तु परत मिळण्याची प्रोबॅबिलीटी किती यावर तुम्ही विचार करु शकता, याला कोणी योगायोग किंवा इतर काहीही म्हणा... माझ्यासाठी हे प्रमाणित अनुभवच आहेत. या मंत्राचा संदर्भ तुम्हाला :- बोध दत्तमाहात्याचा अध्याय ४ था मधे मिळेल. {लेखक :- डॉ. वासुदेव व्यंकटेश देशमुख} जाता जाता :- गुगलुन हा मंत्र जालावर सापडतोय का ते पाहण्याचे सुद्धा प्रतय्न केले तरी माझी हरकत नाही. जे अनुभव आजवर या मंत्रा संबंधी घेतले ते तसेच लिहले आहेत. हा अनुभव मी ठाण्याच्या कट्ट्याला देखील गप्पांच्या ओघात कथन केला होता.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

@ अध्यात्मिक मुलामा देण्याची तुमची हातोटी वाखाणण्याजोगी आहे.>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/animated-laughing-smiley-emoticon.gif माताय..येक लै भारी अभंग सुचलावता राव! पण वजन पेलायचं नाही त्याचं..म्हणून नै टाकत ! =))

त्या नामावर/ मंत्रावर विश्वास आहे/नाही असं असलं तरी नाम काम करतं.
भाषाशास्त्राचे नियम बनवून जमलेले शब्द आणि मंत्र अथवा नाम ह्यामध्ये फरक ह्यासाठीच आहे. त्या त्या शब्दामध्ये ताकद असते असा माझा विश्वास आहे, श्रद्धा आहे. ते सिद्ध करणं आम्ही म्ह टल्याप्रमाणं ११ माळा जप करा हा भाग तुम्हाला मान्य नाही.
कौंटर एग्झांपल दिले तरी मान्य करवत नाही, अन सगळे रामायण ऐकून राम कोण असा प्रश्न विचारून 'असेल कुणी लंकेचा राजा' असे स्वतःच उत्तर देताहात याची खात्री पटली खरी. प्रूफ बाय अ‍ॅसर्शन अर्थात खरेखोटेपणाचा विचार अज्जीच न करता नुस्ते मी बरोबर मी बरोबर असा जप करत बसायचे ही दिशाभूलच जेन्युइन म्हणून खपवू पाहताहात या दांभिकपणाला तोड नाही. इतके अज्ञानाभिनिविष्ट होणे येरागबाळाचे काम नोहे. या दांभिकपणाबद्दल कौतुक वाटतं तुमचं. :)

का???...मी आणि बॅट्या एकाच साईडने आहोत हे बघुन?!! नको.. नको..तुम्ही डायरेक्ट डोळेच मिटणार असाल तर मग नको...! (अवांतर :- तसंही आता हे "चर्चा"सत्र मंत्रशक्ती बद्दल राहीलेलंच नाहीये, नाही का?! ;) )

बस्स करा भौ , दुसर काय तर बगा . एक प्रतिक्रीया वाचुन पुना मेन बोर्डावर जातोय तोपर्यंत एक नवी प्रतिक्रीया येतेय . पुना येतोय पुना जातोय पुना येतोय .....

इंचाइंचाने धागा काश्मिरकडे वाटचाल करु लागला आहे हे निरीक्षण नोंदवतो.

या मंत्राची चर्चा इथच थांबावा नवीन धागा काढुन अनंतंम वासुकी शेषम या मंत्रावर चर्चा करा .ते झाल की नवग्रह घ्या .नंतर त्याचे मुल मंत्र घ्या . मटेरीयला काय कमी नाय आपल्याकड . मोबाइल गंडायला माझा आता

>>या मंत्राची चर्चा इथच थांबावा नवीन धागा काढुन अनंतंम वासुकी शेषम या मंत्रावर चर्चा करा नको नको, जे काय व्हायचं ते इथेच होऊ दे त्यापेक्षा!!

प्रतिसादसंख्येने पहाता हा मिपाच्या आयुष्यातल्या २७००० धाग्यांपैकी १७वा सुपरहिट धागा आहे. माझ्या प्रतिसादाने १६वा होईल. और इस धागे के प्रस्तुतकर्ता हय.... वर जेपी (मिपाचे बबनराव) म्हणतात त्याप्रमाणे नवीन मंत्र घ्या मंत्रचळ लागलेल्या या मंत्रमुग्ध धाग्याची घोडदौड अशीच चालू राहील. आमेन.

मंत्रात शक्ती असुच शकत नाही हे तावातावाने माडले आहे ते काही फारसे आवडले नाही ...."न बुध्दिभेदं जनयेदज्ञानां कर्मसंगिनाम | " असं काही तरी म्हणलय बुवा गीतेत ... (तेही प्रक्षिप्त असु शकतं बहुधा) ... ज्याची त्याची श्रध्दा ... मंत्रात शक्ती असतेच हे तावातावाने मांडले आहे ते ही काही फारसे आवडले नाही ....मंत्र आणि त्यांचा परिणाम ह्यात कॉज इफेक्ट रेलेशनशिप अजुन तरी कोणालाही दाखवता आली नाहीये... मंत्रांच्या गायनानाने मनाला आनंद होतो इतकेच... बाकी माझा वैयक्तिक मत : आजपर्यंत मला फक्त एकाच मंत्राचा खणखणीत अनुभव येतो हे पटले आहे ... तो मंत्र म्हणजे "अल्लाहु अकबर " !! बाकी मंत्रांविषयी आयेम स्टील स्केप्तीकल !

मुळात एखाद्या व्यक्तीचं मंत्र शक्तिला विरोध करणं ही त्या व्यक्तीमधील मानसिक विकृती किंवा मानसिक आजार असू शकेल हेच सहसा लक्षात येत नाही. अशा व्यक्तीच्या बाबतीत "ही व्यक्ती अशी का मुर्खासारखी/बावळटासारखी वागते? एव्हढा मोठा/मोठी होउनही एव्हढी साधी गोष्ट कशी कळत नाही?" असे प्रश्न पडू लागतात. समजा हा प्रकार मानसिक आजार किंवा मानसिक विकृतीच आहे असं लक्षात आलं तर ही माणसं नकारात्मक पवित्रा (डिनायल) घेतात त्यामुळे त्या व्यक्तीला प्रचिती घ्यायची हौस होणेच अवघड होऊन जाते...! शरीराला जसे छोटे मोठे आजार होतात तसेच मनालाही छोटे मोठे आजार होतात आणि त्यावर वेळीच उपचार होणे गरजेचे असते. मात्र ही गोष्ट आजही समाज सहजा सहजी स्विकारत नाही. एखादी व्यक्ती मानसोपचारतज्ञाकडे (सायकियाट्रीस्ट) किंवा मानसशास्त्रज्ञाकडे (सायकॉलॉजिस्ट) गेली तर त्या व्यक्तीला वेड लागले असावे असा सरधोपट अर्थ घेतला जातो. ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. त्याशिवाय मंत्रशक्ती तपासायची निपक्षपाती इच्छा होणे कठीण... असे या धाग्यावरील चर्चेतुन एकंदर अनुमान निघतय.

काहीसा असहमत आहे. टोकाचा विरोध असला तरी तो ज्या पद्धतीनं व्यक्त होतो त्या पद्धतीला विरोध करणं हे एवढंच अपेक्षित आहे. वयाचा परिणाम, उसळतं रक्त वगैरे बाबींचा विचार करता ह्या गोष्टी नैसर्गिक मानाव्या लागतील. त्यात मानसिक रोग वगैरे विचार 'लगेच' होऊ नये. हा, समोर विरोधी माणूस दिसला तर त्याला शिव्या घाल, हाणामारी कर वगैरे मानसिक संतुलन ढासळण्याची चिन्हं असतात असू शकतात. त्या अनुषंगानं बरेच लोक मानसिक रुग्ण ह्या लेबलखाली येतील. असो!

वयाचा परिणाम, उसळतं रक्त वगैरे बाबींचा विचार करता ह्या गोष्टी नैसर्गिक मानाव्या लागतील.
म्हणूनच फक्त आजार असू शकेल हेच ठामपणे म्हटलं आहे. आजार आहे असे निदान मी करणार नाही..!

बाबाजी लक्ष असू द्या बाबाजी. एवढ सगळ वाचलं तरी काही समजलं नाही. बाबाजी लक्ष असू द्या. कदाचित तांबडे बाबांचं चिंतन कमी पडतं आहे.

अतिशय सहमत. माझ्या मनातले बोललात. या धाग्यावर सदस्यांनी चर्चेच्या नावाखाली इतका अनावश्यक धुमाकुळ घातला आहे की त्याचा धुरळा सामान्य सदस्याला इथे काय चालु आहे याचा थांगपत्ताच लागु देत नाहीये. शक्य झाले तर संपादकांनी याची नोंद घ्यावी.

लोक सत्यनारायणाचा प्रसाद म्हणुन खात असतील तर तोच आपणास श्रद्धा नसेल तर शिरा म्हणुन खायला काय हरकत आहे ?

हरकत प्रसाद म्हणून खाण्याला नसून तो प्रसाद खाऊन बुडालेली नाव वर आली वगैरे अनुभव आले सांगण्याला आहे. असो.

पाणी गढूळ झालं म्हणून ओतून द्यायचं का पाण्यात तुरटी फिरवून, उकळून, गाळून घेऊन वापरायचं? परंपरांमध्ये स्वार्थ शिरला नि त्यांचा गैरफायदा घेतला गेला तर तो परंपरांचा दोष आहे का? चुकीच्या रुढी परंपर फेका की. अडचण नाहीच. सरसकट सगळंच बंद करण्यात काय पॉईंट? बहुसंख्य लोकांची तहान ज्या पाण्यानं भागणार आहे, ती समाजमनाची गरज आहे. शंभरातली २-३ टाळकी चार बुकं वाचून चर्चा करतात. पाणी फेकून देण्याचा उपाय आहेच पण त्याऐवजी दूध अथवा ताक अथवा दुसरा काही पर्याय देणार का घसा ओला करायला, तहान भागवायला? सत्यनारायण सांगितला म्हणून कुणाचं वाईट नाही होत ना? आपले बुवा जी कथा सांगतात की ती वापरा. (बुवा सत्यनारायण बंद करायचा का हो ;)?) सत्यनारायणाला आक्षेप असेल तर असो, तो प्रगट व्हावा. मात्र त्याजोडीनं शरीराचं आरोग्य बिघडवणार्‍या दारुच्या पार्ट्या कधीतरी बंद करायला सांगा! आचरट डान्स बन्द करा. सत्यनारायणाचा प्रसाद नको पण इतर सगळं आनंदानं चालतं...! असो.

आज पर्यंत मी माझी कोणती वस्तू हरवली की मी दारू पितो आणि मग ती मला सापडते असे सांगणारा मनुष्य पाहिलेला नाही. बरं दारू पिण्यामुळे नशा चढते ही सरळ कॉज ईफेक्ट रिलेशनशीप आहे. जी कसोट्यांवर सिद्ध करता येते जसे मंत्राच्या बाबतीत होत नाही. तुमची श्रद्धा असेल तर अनुभव येईल अशा कुबड्यांची गरज दारूला पडत नाही.

अगदी अगदी! श्रद्धा, झालंच तर पुण्य पाहिजे इ.इ. कुबड्या दारूला लागत नैत. अन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंत्रावर विश्वास नसतानाही तो मंत्र कसातरी जपला तरी परिणाम करतो असे म्हणणे म्हणजे असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असे म्हटल्यासारखेच आहे. असली दिशाभूल करण्याचे प्रायश्चित्त 'मोजून माराव्या पैजारा' असेच आहे.

अन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंत्रावर विश्वास नसतानाही तो मंत्र कसातरी जपला तरी परिणाम करतो असे म्हणणे म्हणजे असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असे म्हटल्यासारखेच आहे.
नाही हो. माणूस कितीही सभ्य असला आणि तो दारु प्यायला तर त्याला दारु चढतेच ती तसं असावं. म्हणजे मंत्र जपला की त्याचे फळ मिळणारच मग विश्वास असो वा नसो असं असावं.

दारु केव्हाही वाईटच.
हा हंत...हा हंत... - (मद्यमुनी) सोकाजी

तिनशे व्हायला हवेत. अजून फक्त पंचवीस तर हवेत. ;) म्हणा, "माला माले माला: प्रथमा".