माझं कोकणातलं गांव :- भाग - १
नाहीतर थोडासा डोंगर चढून बागेला समांतर रस्ता जातो त्याने जायच. त्या रस्त्याने गेलो कि पडलेले आंबे, काजू, गोळा करता येतात. शिवाय विविध रंगाचे, विविध आवाज काढणारे पक्षी किलबिलाट करत आमच्या सोबतीला असायचेच.
इथे काकांना अर्जुनारिष्टाची वेल दिसली ती आम्हांला दाखवताना.
हेच जर पाटातून चालत गेलं की एका बाजूने बागेतील सुपारीची झाडे तर एका बाजूने डोंगरावरिल दाट झाडं झुडपं यातून रस्ता काढता जावं लागतं. काही ठिकाणी तर खुप काळोख असतो, जिथे कधीच सुर्यप्रकाश पोहचत नाही अशी जागा असते.
खरं तर काकांबरोबर मी याचा वाटेने जायचा आग्रह करतो कारण असतो, जिथे कधीच सुर्यप्रकाश पोहचत नाही तिथं एक वेगळं विश्व साकारलेलं असतं. विविध जमातीतले कोळी, किडे, कीटक, बारीक बारीक असंख्य जीव, रंगीबेरगी माश्या, आणि डास यांच सम्राज्य असे. पण खरी धास्ती असायची ती ही की कधी विंचु, इंगळी तर पाया खाली येणार नाही ना याची.
पायवाटेनं धरणात पोहचलो की जे पाणी वस्तीवर जायचे त्याचं दारणं मोडून(पाटाचे पाणी मातीचा बांध घालून हवे तिकडे वळविणे) ते पाणी आपल्या बागेला वळवायचे . या बागेत डोंगर उतारावर खाली खाली जात पोफळीच्या (पोफळी=सुपारीचे झाड)दोन रांगा व प्रत्येक रांगेत १०/१५ समांतर झाडे असे वाफे असायचे. मध्यल्या मोकळ्या जागेत काका अननस, चिक, केळी असे काहितरी लावायचे. त्याचा फडशा पाडायला माकडे नाहीतर वांदर, साळिंदर, मोठया घुशी, खारी इत्यादिंची ये जा चालायची. माकडांच्या उड्या मारण्याने सुपारीचे रोठे खाली पडायचे, पोफळीच्या फांद्या ज्याला "विरी" असे म्हणतात त्या संपूर्ण बागेत पडलेल्या असायच्या तर नव्या पोफळी मुरगळून जायच्या. खालील फोटोत पहा सगळ्या बागेची नासधुस केलेली दिसत आहे तर एक केळीचा खांब उखडुन पडलाय.
त्या सगळ्या विरी(या जेवायला, झाडांना पाणी उपसुन घालायाला उपयोगी)आणि छोट्या मोठ्या काटक्या (सरापानाला उपयोगी म्हणून)यांची एक मोळी बांधायची, मग वरच्या रांगेतून खालच्या रांगेला असे एक एक करत दारणं मोडंत सर्व बागेला पाणी देत खाली खाली उतरत जायचं. बागेत पडलेल्या सुपार्या गोळा करून आणायच्या.
धराणाच्या बागेभोवतालची काही छायाचित्र.
आता पर्यंत सकाळचे ९ वाजलेले असायचे की घरातून कोणी तरी आमच्यासाठी नाश्ता घेवून यायचं. मग या विरीचा उपयोग ताटली सारखा करायचा. नाश्या मध्ये दडपे पोहे, फोडणीचे पोहे , चिवडा लाडू, दशम्या , घावण असे काही तरी असायचं.
पार नदीच्या पात्रापर्यंत उतरत पाणी देवून झाले की, परत घराकडे निघायचे.पण त्या आधी धरणावर जावुन पाण्याची टाकी, बंधारा सर्व बघुन एकदा नजरे खालुन घालायची.
या पाणवठ्यावर हमखास जंगलातील सर्व प्राणी अगदि वाघ सुध्दा हजेरी लावतात असे काका म्हणतात. मला एकदा तिथल्या एका झाडावर मचाण बांधुन राहयला हवे असते, एक दोन रात्र तिथे वस्तीच करायची, पण काका तयार होत नाहित. नुसतं हसतात. खालील फोटो धरणाच्या परिसरातील आहेत.
पाणी जिथुन बाहेर झिरपते ती जागा.
वरुन आलेला पर्या व त्याचे उन्हाळ्यातील कोरडं पात्र.
आता गावातील इतर कुळवाडी यांना पाणी मिळावं म्हणुन सरकारंनं धरणाच्या टाकीतुन पाईप काढुन मधल्या बांवे पर्यंत पाण्याचा पुरवठा केला आहे.
पाटातलं थंड पाणी
काकांचा धाकटा मुलगा पाट चोखाळतांना.
पाटाच्याकडेने वर जंगलाकडे, सडयाकडे व पुढिल गांवाकडे(आमच्या पुढचा ए.स्टी चा शेवटचा गाव) जाणारा रस्ता
काका डोक्यावर मोळी घेवून पुढे, तर आम्ही त्याच्या मागे. पुन्हा डोंगरावरिल त्याच वाटेने परतताना गावातले गुराखी पोरे आपापली गुरें ढोरें घेवुन वर सड्याकडे(डोंगराचा माथ्यावरील सपाट भाग) जाताना निघालेली असत.
या ठिकाणी एकदा काका शिपणं आटोपुन घराकडे येत असताना बिबट्या वाघ पाटाच्या पाण्याला ओलांडुन वर जंगलात निघुन गेला. माकडांच ची ची असं ओरडणं, पक्षांचा चिवचिवाट पाहुन काका जागच्या जागी थांबले
त्यांना जाणवलं की काहीतरी गडबड आहे. थोड्याच वेळात त्या रुबाबदार राजाचं काकांना अगदि थोडावेळच दर्शन झालं.
मध्यंतरी २०१० ला कोकणात वाड दळ झाले त्यावेळी पाटाच्या वाटेतच उन्मळुन पडलेला एक वृक्ष.
घरात आल्यावर पुन्हा म्हशींना , चारा घालणे त्यांना हौदावर पाणी प्यायला सोडणे, मांडावावर चढून आत्या, आई यांनी काही पापड, फेण्या, सांदण ( फणसाचा रसाचा पदार्थ), फणस पोळी , आंब्याचा रस अथवा पोळी असे काहीना काही वाळत घातलेलं असायचं तिथं लुडबुड करायची म्हणजे मदतीला जायचं म्हणजे मग तेवढेच ते पदार्थ चाखायला मिळत. अगदीच काही नाही जमलं तर पुन्हा सर्व मुलांना गोळा करून पती खेळायचे किंवा सरळ शेतात जावून गावातल्या समवयस्क मुलांशी क्रिकेट खेळणे असं काही बाही करायचं तेव्हा वेळ कुठल्या कुठे निघुन जायचा.
मग दुपारचे बारा वाजले की आंघोळी उरकुन लगेच आमच्या स्वःताहाच्या गणपतीच्या देवळात जावुन पुजा आटोपायची असते. हे देऊळ परत घरापासुन लांब बागेच्या विरुद्ध बाजुला पुन्हा दुसर्या पर्याला ओलांडुन जावे लागते. ही पुजा कितीही अडचणी आल्या, कितीही पाऊस असो, ऊन असो वर्षाचे ३६५ दिवस कारावीच लागते. या गणपतीला नैवेद्य दाखवल्या शिवाय घरी कोणीही जेवत नाही. पण त्या विषयी पुढिल लेखात ..
टीपः- वर्णन जरी माझ्या लहानपणीचे असले तरी सर्व छायाचित्र मी मे-२०१३ साली गावी गेलो होतो तेव्हा माझ्या मायक्रोमॅक्स एच. डी. ११६ मोबाईलने काढलेली आहेत. तेव्हा आताच्या जंगलापेक्षा तेव्हाचं जंगल अधिक घनदाट होतं, आता बेसुमार वृक्षतोड झालेली आहे.
मागील भागात>>मग सगळी मुलं पळत अंथरुणात झोपायला जायाची. धरणावरच्या बागेत जाताना काय काय पहायला मिळणार या धुंदित केव्हा तरी गाढ झोप लागायाची.
तिथुन पुढे ....>>> सकाळी लवकर उठलो की, काकांच्या मागोमाग गोठयात पेला घेवुन जायचं, तिथंच आपण स्वःताहाच्या हाताने काढलेलं निरसं दुध प्यायचं. मग घरातील इतर मंडळींचा चहा झाला की सगळे बागेत जायला तयार. आमच्या घरासमोर एका उभा डोंगर आहे. बागेच्या निवडूंगाच्या कुंपणाला अगदि चिटकून. या निवडूंगाच्या कुपणांच्या आणि डोंगराच्या मधून एक चिंचोळी पायवाट जाते. जेमतेम दोन तीन माणसे चालत जात येईल एवढी. या पायावाटे ने पुढे पुढे गेलं की आमची बाग संपल्यावर आमच्या चुलत चुलत्यांची (वडिलांचे चुलत बंधु)यांची बाग आहे. आता बागेविषयी थोडसं आमच्या सुपारीच्या तीन बागा आहेत. एक घराला लागुन, दुसरी चुलत्यांची आणि गावातल्या इतर खोतांची बाग आहे त्या पलिकडे मधली बाग आणि मग शेवटची तिसरी धराणाला लागुन असलेली बाग. घरा पासून थोडी दूर असलेल्या मधली बागेच्या बाजूला रस्त्याच्या दोन्ही बाजूला गावातले इतर लोकांची वस्तीं म्हणजे कुणबी,कुळवाडी, महार, मांग, तलाठी, लिंगायत, वाणी, यांची वस्ती आणि त्यांच्यासाठी पाणवठा म्हणुन पाटाच्या पाण्याने भरलेली बांव लागते. हा पाणवठा म्हणजे जी आमची तिसरी बाग आहे तिच्या जवळ असलेल्या पर्यातील धरणापासून निघालेला एका पाट जो या वस्ती पर्यंत येवून मग पुढे आमच्या घराजवळील पहिल्या बागेला जातो. गावांत प्रत्येक खोतांची बाग असते त्याला या धरणाचं पाणी आलटून पालटून वापरायला मिळत असते. त्याला पालट म्हणतात. आमचे पालट असले की आम्ही धरणावरची किवा मधली बाग शिंपून घ्यायची. या मधल्या बागेतून पुढे गेलो की खरं जंगल सुरु होतं. आता पाटातून चालत जावं लागतं.खालील फोटोत झुडुपांच्या खाली जो काळोख दिसतोय तो पाण्याचा पाट वाहतोय. हा पाट चोखळंत जायचे असते, म्हणजे त्यात पडलेला पालापाचोळा, म्हशीचे शेण, बाजुला काढत पायाने साफ करत त्याच्या उगम स्थानापर्यन्त जायचे असते.-- क्रमांश --
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
मस्त,
सांदण वाळत घालतात?
+११११११११११
+१
मस्त लेख....
सुंदर लेख !
आवडला..
झकास लेख! पुभाप्र!
सर्व वर्णन अगदी माझ्या
लेखन आवडले.
आवडला लेख.
सर्वांना धन्स
पम्या भाऊ
माझे दोन शब्द...
@ स्वॅप्स साहेबः- तुम्ही मी
जातीच्या उल्लेखाशिवाय कोकणच
आवडले...!
मस्तच वर्णन
हा भागही छान जमलाय .
अगदि लाख बोललात कंजुसभावु
वाचतेय
हा भाग पण जमलाय फक्त फोटो
हा ही भाग आवडला , जातीयता
बरोबर
छान!
+१११११११११११ पैसातै,llपुण्याचे पेशवेl