Welcome to misalpav.com
लेखक: दिव्यश्री | प्रसिद्ध:
तारीख १३ आणि १४ मार्च २०१४ हे दिवस अविस्मरणीय राहतील माझ्या आयुष्यात कारण साधुसंत येती घरा...चा अनुभव मला परदेशात घेता आला . श्री.निनाद , श्री.पेठकर काका , सौ . पेठकर काकू आणि आम्ही दोघे असा कट्टा झाला . खरं तर कट्टे झाले २ दिवस सलग . निनाद यांनी मला आधी सांगितले होते कि काका आणि काकू म्युनिक दौर्यावर येत आहेत . मी तयार होतेच , कट्ट्याला हजेरी लावायला . :D १३ तारखेला सक्काळ सक्काळीच फोणाफोणी करुण आम्ही मरियन प्लात्झ (म्युनिक मधील प्रसिद्ध ठिकाण ) ला भेटायचं ठरवलं . त्यानुसार आम्ही भेटलो . पहिली ओळखपरेड झाली तीही गुथ्थि इष्टयील...काका - निनाद ,निनाद - काका , निनाद - काकू ,काकू - निनाद , दिव्यश्री - काका काकू , दिव्यश्री - निनाद .रेल्वे ठेसनातून बाहेर आल्यावर उंच टॉवर वर गेलो .लैच ड्यांजर होता चढायला *beee* . एका वेळेस एकाच माणूस एकतर वर जाऊ शकतो नाही तर खाली येऊ शकतो . हाश हुश्श करत करत पोहोचलो वरती ... टॉवर वरती ...काय नजारा होता .आहाहा एवढे जिणे चढल्याचे सार्थक झाले अगदी . म्युनिक शहराचा सुंदर नजारा दिसत होता *BRAVO* . गेल्या ३ वर्षात पहिल्यांदाच त्या ठिकाणी गेले होते . निनाद सुंदर ठिकाण माहिती करून दिल्याबद्दल Tahnk You. :) त्या दिवशी हवामानाची ही कृपादृष्टी होती . इथे ती असेल तरच तुमच्या फिरण्याला मजा आहे . मग म्युनिक बान (रेल्वे, ड्योयीच बान) ने बरेच ठेषण पालथे घातले ...दुपारच्या जेवणासाठी ...गप्पांच्या नादात चुकुण चुकत होतो ...जाणा था जपाण *SCRATCH* असंच काहीस झाल . शेवटी एकदाच हॉटेल नट्राज (नटराज) आल . निनाद म्हणत होते बुफे / बफे घेऊ म्हणून त्यावर बराच खल झाला . शेवटी नटराज फायनल झालं . तिथे मी आणि काकू प्युअर व्हेज म्हणून मिक्स व्हेज आणि दाल माखनी , tandoori रोटी आणि णोण व्हेज वाल्यांनी पण कायतरी मागवला...इसरले ...स्वारी :( ....मस्त जेवणे झाली , फोटू काढले मग आम्ही पुणहा ठेष्णकडे कूच केली . आम्हाला डखाऊ कोन्संत्रेषण कॅम्पला जायचे होते . त्याप्रमाणे आम्ही डखाऊला पोहोचलो . ठेषण वर उतरलो , बाहेर येउण बशीत बसलो मग त्या कॅम्पच्या इस्टोपला उतरलो . तिथून चालत चालत गेलो , गेटमधून आत शिरलो ...सगळा कॅम्प पाहिला .कामाचा दिवस ( working day ) असल्यामुळे गर्दी नव्हती .खूप हाल हाल करून कैद्यांना मारलंय हे तेथील फोटोज वरून दिसत होत . :( संध्याकाळचे पाच वाजले होते . मुख्य गेस चेंबर बंद झाल होत . निनाद यांनी जर्मन भाषेतून बोलून सांगितलं कि काका काकूंना जाऊ द्या ते १० मिनिटात बघून येतील , ते भारताहून आले आहेत पण त्याने नाही सोडलं . मग आम्ही परत बशीत ... ठेषण ...तिथून बाणीत मग आमच्या घरी . मुरलेल्या मिपाकराप्रमाणे श्री . निनाद यांनी पेठकर काका आणि माझ्यात कडी सारली आणि भडका कधी उडतो याची वाट बघितली . :) फोटोज टाकायला अजूनही जमत नसल्यामुळे फोटो टाकले नाहीत . क्षमस्व . :( बाकीचा वृत्तांत ब्रेक के बाद ... अवांतर पण महत्वाचे : शुद्धीत राहून प्रतिक्रिया , प्रतिसाद , आपले अमुल्य मत प्रदर्शन करावे . प्रतिसाद /प्रतिक्रिया देताना वैयक्तिक शेरेबाजी टाळावी . कुठल्या प्रतिसादा /प्रतिक्रिये ला फाट्यावर मारायचे , पुणेरी शब्दात उत्तर द्यायचे याचा अधिकार राखून ठेवण्यात आला आहे . दुसरा भाग लिहायचा कि नाही हे ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार लेखिकेचा राहील . बाकी नेहमीप्रमाणेच सूचनांचे अर्थातच स्वागत राहील . :) क्रमशः . काही फोटो....  संग्रहालय  कैद्यांच्या बराकीचा नकाशा  कुप्रसिद्ध गेस चेंबर कडे जाणारा भयाण रस्ता  कुप्रसिद्ध गेस चेंबर माहिती नकाशा  जगातील एका मोठ्या , प्रसिद्ध मुधुशालेतील वाद्यवृंद   डखाऊ कॅम्प परिसर
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

आणखी असेच कट्टे होवोत, पेठकर काका युरोपच्या दौ-यावर दिसतात, तुमची आता मस्कतची गडबड झाली की ऊत्तर अमेरीकेतही दौरा आखा असं आधीच आमंत्रण देऊन ठेवते. मितान तुमच्या कटट्याचेही वर्णन वाचले, मस्तच झालेला दिसतोय तो. पुष्करणीपण सध्या अजिबात दिसत नाही. स्वातीने मिसळ कट्टा आणि रॉकलेट कट्ट्याबरोबरच भ्रमणमंडळाची स्थापना करुन भ्रमणगाथा आणि पुन्हा भ्रमणगाथा अशा लेखमाला लिहलेल्या सापडल्या.

येसवायाजी मूळ लेखात उल्लेख केला आहे त्या टोवेर वरून त्या प्रसिद्ध फिरत्या बाहुल्यांच्या घडाळ्याच्या दृष्यासोबत मेरियान प्लाट चे विहंगम दृश्य पाहण्यास मिळते. फक्त तो टोवेर १३ मजल्यांचा आहे व त्याला चिंचोळा वर्तुळाकार जिना आहे , विजेचा पाळण्याची सोय केलेली नाही. पेठकर काका व काकूंना मी ह्याची कल्पना दिली तेव्हा सह्याद्रीच्या ह्या मावळ्याने हे आव्हान स्वीकारले , व काही मिनिटात आम्ही सर्व छतावर पोहोचलो. पेठकर दांपत्यांचा हा उत्साह , व फिटनेस पुढे दिवसभर पाहण्यास मिळाला. दोघांच्या चेहऱ्यावर थकल्याची खुण नव्हती.दिव्यश्री , काका व मी मिपा व म्युन्शन चा इतिहास ह्यावर दिवसभर अखंड बोलत होतो. काकांनी येथे सांगितल्या प्रमाणे त्यांना सवड मिळेल तेव्हा ते सचित्र भटकंती मिपावर लिहिणार आहेत. तेव्हा मी अजून काही लिहित नाही. दिव्यश्री व पेठकर दांपत्यांना मी दुसर्या दिवशी भेटलो तेव्हा मुख्य रेल्वे स्टेशन जवळील भारतीय उपहारगृह रसोई येथे जाण्याचा माझा बेत होता. पण दिव्यश्री ने तेथे जाण्यास साफ नकार दिला. ते हॉटेल पाकिस्तानी माणसाचे असल्याने म्युन्शन मध्ये एवढे भारतीय लोकांची उपहारगृहे असतांना आपण पाकिस्तांनी माणसांना का पैसे द्यायचे असा तिचा सवाल होता. जातिवंत मिपाकर ह्या नात्याने ह्यावर प्रतिवाद करण्याची आलेली उबळ महतप्रयासाने दाबून मी त्या सूचनेस रुकार दिला. १५ मिनिटाच्या अंतरावर एका पुणेकराचे भारतीय उपहारगृह होते. त्याचे मालक माझ्या परिचयाचे आहेत. मग तेथे खादाडी उरकून आम्ही केंप कडे मार्गस्थ झालो. दुसर्या दिवशी दिव्यश्री कडे म्युनिक चा पहिला वाहिला खादाडी कट्टा पार पडला. मग आम्ही सर्व काकांना स्टेशन पर्यंत सोडायला आलो. काकांसोबत पुढे काही स्टेशन मी जाणार होतो. गाडी सुटतांना दिव्यश्री ला पेठकर दांपत्यांनी हात हलवून टाटा केले , तिच्या डोळ्यात पाणी तरळले होते. मस्कत वरून हून लिहिणारा एक मिपाकर त्याच्याशी शुद्ध लेखनावरून वाद घालणारी आमची म्युन्शन ची मिपाकर भगिनी आणि तीन वर्षात म्युन्शन मध्ये राहून एरवी तिला मिपावर भेटणारा मी ह्यावेळी प्रत्यक्ष भेटलो. काका , दिव्यश्री वमाझी ह्या दोन दिवसात मिपावरील अनेक विषयांवर चर्चा झाली. आमच्यात अनेक विषयांवर मतांतरे झाली. पण त्याच सोबत आपण मिपाकर आहोत ह्या एक भावनेने एका अनामिक नात्याची वीण पक्की झाली. पेठकर काकांशी मुंबईत २ तारखेला कट्टा आयोजित झाला तर प्रत्यक्ष भेटण्याची खूप इच्छा आहे. त्यांच्या उर्वरीत युरोपियन भटकंती चे वर्णन ऐकायचे आहे. पेठेकर दांपत्यांचा स्टेशन वर निरोप घेत असतांना मनात अशी पाखरे येती ,आणिक स्मृती ठेवुनी जाती ह्या ओळी आल्या. आता ऋषिकेश म्युन्शन दौरा करणार आहेत असे त्यांनी मला खव मध्ये कळवले होते. वि र ऑन अजून एक म्युनशन कट्टा करायला.

"ते हॉटेल पाकिस्तानी माणसाचे असल्याने म्युन्शन मध्ये एवढे भारतीय लोकांची उपहारगृहे असतांना आपण पाकिस्तांनी माणसांना का पैसे द्यायचे असा तिचा सवाल होता." एकदम योग्य.प्रचंड सहमत.

जातिवंत मिपाकर ह्या नात्याने ह्यावर प्रतिवाद करण्याची आलेली उबळ महतप्रयासाने दाबून मी त्या सूचनेस रुकार दिला.>>> चूक , एकदम चूक , साफ चूक . तुमची उबळ दाबून ठेवली नाहीत तुम्ही . हा त्यावर अगदी वादविवाद झाला नाही . म्युनिक मध्ये दुपारी हॉटेल्स मध्ये बफे /बुफे असते तेही अगदी स्वतात म्हणजे जर सेपरेट मेन्यु सांगितला तर जितका खर्च होयील त्यापेक्षा अतिशय स्वतात दुपारी जेवण मिळते . यावर आपला संवाद झाला आहे . तुम्ही विसरला असला तरी माझ्या लक्षात आहे . मी कधीही चीनी वस्तू , चायनीज जेवण या वाट्याला जात नाही . देशाच्या सीमेवर आपले सैनिक प्राणपणाला लावून लढतात . त्यांची मुलेबाळे आणि बाकी कुटुंब कोणत्या दडपणाखाली वावरत असतील याची आपण सामान्य माणसे कल्पनाही करू शकत नाही . :( सैनिक हो तुमच्यासाठी ....हे अतिशय सुंदर मराठी गाणं आहे . आवड आणि सवड असल्यास सगळ्यांनी ऐकावे . हे गाणं ऐकताना शहारे येतात आणि डोळे कधी पाणावतात हे आपल्यालाही कळत नाही . स्वतःचे थोडेफार पैसे वाचवण्यासाठी मी अशी तडजोड आयुष्यात कधी केली नाही आणि करणारही नाही . हेच पैसे शेवटी त्या त्या लष्करावर खर्च होऊन आपलीच माणसे मारली जाणार या पापामध्ये मी तरी सहभागी होणार नाही . पेठकर काकांनी पूर्ण बिलाचा खर्च करून मला लाजवले आहेच . असो पुढच्या कट्ट्याला मी काकांना काहीही खर्च करू देणार नाही याच बोलीवर मी कट्ट्याला येणार आहे. :)

@यावर आपला संवाद झाला आहे . तुम्ही विसरला असला तरी माझ्या लक्षात आहे . माझ्या लक्षात आहे , पण संवादातून पुढे विसंवाद होऊ नये म्हणून आपली उबळ ..... तसे पाहता ह्या विषयावर एक स्वतंत्र धागा काढून काथ्याकुट करता येईल मिपावर माझ्यामते अनिवासी भारतीय आहेत व अनेक भारतीय अनेक कारणास्तव परदेशी जातात. तेव्हा त्यातील अनेक जण देशी उपहारगृहात जातांना पाकिस्तानी , भारतीय एवढा विचार करत नसतील. तसे न करण्यामागे काही कारणे आहेत , ती तुम्हास सांगितली नाही कारण ती कदाचित तुम्हाला पटली नसती. ह्या विषयावर वेळ मिळाल्यास एक वेगळा धागा काढून माझा मुद्दा मांडेल

फार फार वर्षांपूर्वी मीही तसा विचार नाही करायचो. पण नंतर करु लागलो. पाकिस्तानी उपहारगृह, पाकिस्तानी मनी एक्स्चेंज इत्यादी टाळतो. अर्थात कुठे भारतिय उपहारगृह मिळाले नाही तर उपाशी राहणार नाही.

+१०० मात्र याला एक अपवाद आहे तो एअर इंडियाचा. पहिल्या काही वर्षांत वारंवार देशभक्तीची उबळ येउन एअर इंडियाने प्रवास केला आणि त्यांनी दर वेळी न चुकता पश्चाताप करायला भाग पाडले. आता कानाला खडा लावला आहे. शक्यता कमी पण जर दुसरा उपायच नसला तर प्रवास रद्द करणार नाही... अजून एकदा बाचाबाचीची फैर झडेल एवढेच ;) . अर्थात त्याने एअर इंडीयाच्या गेंड्याच्या कातडीवर ओरखडाही उमटणार नाही याचीही खात्री आहेच :)

सहमत एअर इंडिया चा महाराजा चा पुतळा विनम्रतेने नाही तर त्याच्यावरील कर्जाच्या बोज्याने कायम वाकला असतो. जनता असते ते कर्ज फेडायला रेल्वे व एअर इंडिया चे खाजगीकरण झाले पाहिजे. असे मनापासून वाटते.

खाजगीकरण अन भारतीय रेलचे ? बापरे हे फार मोठे पाप होईल. पुणे ते दिल्ली टाटा, अम्बानी, रेल्वेने मग रूपय पाच हजार होणार. हिवाल्यातही ऐअर कंडीशन कोचेस. अनलिमिटेड हादडाई. असे काही नजरे समोर यायला लागलेय.

मात्र याला एक अपवाद आहे तो एअर इंडियाचा. पहिल्या काही वर्षांत वारंवार देशभक्तीची उबळ येउन एअर इंडियाने प्रवास केला आणि त्यांनी दर वेळी न चुकता पश्चाताप करायला भाग पाडले. आता कानाला खडा लावला आहे.
+१००००००० शब्द अन शब्द अस्स्साच अनुभव.

हे तुम्ही परदेशी असताना करता पण मी हे इथं ठाण्यात राहुनही पाळतो. सहसा यवनांच्या कोण्त्याही दुकानात / बेकरीत जात नाही (हॉटेलात जायचा तर प्रश्नच येत नाही). दिव्यश्रीताई म्हणते ते खरे आहे अगदी चिन्यांबबत नाही तर या मुसलमानांच्या बाबातही. काय माहीत यांचा पैसा मुंबईत अतिरेकी कारवायांसाठी सुध्दा वापरला जावु शकतो

बाकी जगभरात जे काही मि.पा. सदस्य पसरले आहेत ते एका अतुट, अनामिक नात्याने (मग कितीही वाद संवाद असो) एकमेकांशी घट्ट बांधले गेलेले आहेत हे अगदि खरं. ही वीण अशीच उत्तरोउत्तर अधिक घट्ट होवो हिच प्रार्थना.

स्वगतः- का बा कुणास ठाऊक मला इतर (मायबोली, ऐसी अक्षरे..., उपक्रम) स्थळांपेक्षा मिसळपावच जास्त आवडते.

का बरे खटपट्या , भयै लोक गुजराती, पारसी लोक आहेतचकी या लाईन मध्ये. शिवाय सध्या या गेल्या ५ वर्शात वर्षात संपुर्ण ठाण्यामध्ये धडाधड २५ / ३० तरी बँगलोर अय्यंगार बेकरीज ओपन झाल्यात. आमच्या कळव्यातच एकाच रस्त्यावर ३ दुकाने आहेत. शिवाय ते कोणत्याही बेकरीच्या पदार्थात अंड सुध्दा वापरत नाहीत.

साफ चुक. तुमचा पाव आता दुर्गम भागात सुध्दा पोहचलाय. सध्या कोकणी माणुस शहरात धावत आहे. पण भयै लोक डोक्यावर पेटारा घेवुन कोकणातील डोंगर दर्‍यातुन फिरत बेकरीचे पदार्थ विकत आपली उपजिवीका करत आहेत. आमच्या गावत दर २ दिवसाआड ते येतात. तसेच चालत पुढच्या गावात जातात. गाडीची वाट नाही बघत बसत.

सहमत आहे, आपली राष्ट्रभक्ती जाहीर करायचा हा अंमळ केविलवाणा मार्ग वाटतो. पाकडे पॉलिटिशियन हरामखोर आहेत म्हणून सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकही हरामीच असतो असे कै नै. माझ्या एका जवळच्या मित्राचे कॉलेज रूममेट्स दोघेही पाकडे आहेत अन त्यांचं छान चाललं आहे. (ता.क. मित्र हिंदू आहे, इन केस समवन इज वंडरिंग.)

+१ निनादने दुसरा धागा काढतो म्हटल्यावर जरा वाट पहावी म्हणत होतो.

मी कुठे म्हणाले कि हे मी देशप्रेम,राष्ट्रभक्ती ई. दाखवण्यासाठी करते ??? *SCRATCH* माझा प्रतिसाद नीट वाचला तर समजेल मला काय म्हणायचं आहे ते . :( बाकी कुणी कुठे जावं , खावं, प्यावं याच्याशी मला काहीही देण-घेण नाही . मी फक्त माझ मत व्यक्त केल . त्यादिवशीही मी निनाद यांना सांगितलं होत तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता , मी घरून व्यवस्थित खाउन आले आहे . मी तिथे येणार नाही म्हणून मी त्यांच्या जाण्यावर कुठलंही बंधन केल नाही , आडकाठी केली नाही . धाग्याच काश्मीर करायचं नसेल तर हा विषय इथेच थांबवा . तसेही हा विषय मी काढलेला नाही . शतकी ,द्विशतकी धाग्यांची मला हौस नाही . ज्यांना त्याच्यात रुची असेल त्यांनी जरूर वेगळा धागा काढावा .

>>>>आपली राष्ट्रभक्ती जाहीर करायचा हा अंमळ केविलवाणा मार्ग वाटतो. केविलवाणा का बरं? मुळात राष्ट्रभक्ती वगैरे मनांत आहे. ती जाहीर करण्याची अजिबात गरज नसते. पण मित्रमंडळींमध्ये सहज संवादात आपले खरे मत मांडले तर ते केविलवाणे ठरते? बरं! ठरू दे. आहे ते आहे.

सहमत प्रत्येक माणसांची अनेक मुद्यांवर आपली ठाम मते , गृहीतके असतात. प्रत्येकवेळी आपल्या मतांशी ती सामाईक असणे अनिवार्य नसते , व्यक्ती तितक्या प्रक्रुती असतात. दिव्यश्री ह्यांचा पाकिस्तानी उपहारगृहात न खाणे किंवा सुधीर काळे ह्यांचा चीनी वस्तूंवर बहिष्कार असे अनेक मुद्दे मला जरी पटले नसले तरी ह्या हेतू मागील त्यांच्या भूमिकेवर मला कधीच संशय नव्हता, ह्या भूमिकेवरून आमच्यात मतांतरे असतील तर प्रत्येकाला आपापली मते असण्याचा अधिकार आहे. मिपा मला एका कुटुंबासारखे आहे , मतांतरे असून माझा येथील सर्व सद्स्यानावर लोभ आहे. पण जेव्हा माझी एखाद्याशी मतांतरे होतात तेव्हा तो आयडी कोणाचा आहे ह्यापेक्ष्या मुद्यांना माझा विरोध मी व्यक्त करतो. हा विरोध वैचारिक असतो , वयक्तिक नसतो , नसावा लवकरच भेटूया. एका नवीन शतकी धाग्यासह.

वृत्तांत, त्याबद्दलची चर्चा, सगळं मस्तच आहे! दिव्यश्री 'नयी हुं मय...पर अकेलीही सब पे भारी हुं मय' अगदी मस्त खरं करून दाखवलंस! आता आम्हाला अजून एक खमकी आणि खमंग मिपाकर मिळाल्याचा प्रचंड आनंद झाला आहे!

एक खमकी आणि खमंग >>>अश ना म्हणाच...आपण किती सध्या , सालस, गरीब ,बिचार्या ईई. णा . ;) :P