. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी ह्यांचा सध्या दणक्यात प्रचार चालू आहे. मोदीँना विकासपुरुष या टॅगखाली प्रोजेक्ट केले जात आहे. ज्या प्रमाणे त्यांनी गुजरातचा विकास केला त्याप्रमाणे ते भारताचा विकास करणार आहेत अशी आश्वासनांची खैरात टीव्ही ,सोशल मिडीया, रेडीओवर सतत करण्यात येत आहे .परंतु या विकासपुरुषाच्या प्रचारामागे भाजपची जातीय गणिते चालू आहेत, ज्याचा लेखाजोखा माध्यमं जनतेपर्यंत पोचवत नाही आहेत.
आज पर्यंत भाजपाचे जे राजकारण राहीले आहे ते शेटजी भटजी या संज्ञेने ओळखले जाते. भाजपचा पिता 'जनसंघाला सुरवातीला याचा फायदा झाला .आणिबाणी नंतरही जनसंघ सत्तेत आला याला कारण त्याचे सुखवस्तु लोकांचे राजकारण .. परंतु जसे जसे जातीय अस्मितेचे राजकारण सुरु झाले तसा जनसंघ/जनता पार्टी निप्रभ होत गेले व काँग्रेस आणखी प्रबळ झाली.
भाजपचा जन्म झाल्यानंतर मात्र हा शेटजी भटजीचा शिक्का पुसण्यासाठी ओबिसींचे ध्रुवीकरण करण्याची सुरवात झालि. भाजपात असलेला ओबिसी नेत्यांचा भरणा याचेच द्योतक आहे. परंतु भाजपने कधिही ओबिसी नेत्यांना अतिमहत्वाची पदे दिलेली नाहीत. एनडीएच्या काळात वाजपेयी ,अडवाणी, प्रमोद महाजन ,मुरली मनोहर जोशी ,यशवंत सिन्हा ,जसवंत सिंग या गैर ओबिसींच्या हातात सुत्रे दिली गेली. ज्याचा परिणाम म्हणजे शायनिंग इंडीयाचा फुटलेला फुगा ..ओबिसींनी डावलले गेल्याच्या भावनेतुन काँग्रेसला व तत्सम पक्षांना मतदान केले .भाजपचा बेस असलेला ओबिसी समाज त्यांच्यापासुन दूर गेल्यानेच त्यांनी आता नरेंद्र मोदींच्या रुपाने ओबिसी कार्ड खेळले आहे.
मोदी हे घंची /तेली या ओबिसी जातीचे आहेत. त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार करुन भाजपने दोन प्रकारे त्यांचा प्रचार चालू ठेवला आहे.. भारतभर तरुण वर्गात सोशल मिडीयाचा वापर करुन त्यांना विकास पुरुष म्हणुन पुढे करायचे... त्याच वेळी जिथे जातीय समिकरणे महत्वाची आहेत व दिडशे लोकसभा मतदार संघ आहेत अश्या युपी बिहार व हिंदी बेल्टमध्ये मोदींना ओबिसी म्हणुन प्रोजेक्ट केले जात आहे. याचे कारण ओबिसींची सर्वाधिक संख्या या पट्ट्यात आहे. नुकतेच नरेंद्र मोदींनी बिहारात "माझ्यासारख्या मागासवर्गीयाला भाजपने पंतप्रधानापदाचे उमेदवार केले आहे" त्यामुळे भाजपवरचा ब्राह्मणांचा पक्ष असल्याचा दावा खोटा असल्याचे म्हण्टले आहे. भाजपचे राजकारण नेहमीच संभ्रमाचे राहीले आहे, ऐकीकडे हिंदुत्वाच्या व्याख्येचा दाखला देऊन जातीय आरक्षणाला विरोध करायचा त्याचवेळी अनेक तुकड्यात विखुरलेल्या ओबिसी समाजाचा वापर करुण घ्यायचा ,परंतु वरवर असे करुन चालणार नाही याची चुणुक त्यांना २००४च्या निवडणुंकांमध्ये आली आहे. नरेंद्र मोदींनी भाजप खाऊन टाकला आहे वा त्यांना तसे करताना अंतर्गत विरोध झाला नाही याचे कारण त्यांच्या ओबिसी असण्यात आहे.
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
मस्त आयड्या!
ह्म्म
अशी तक्रार नाही करता येणार.
अरेरे
अॅट्रॉसिटीच्या खाली या नेफळेसाहेबांना आत टाका ...
उलट सांगताय... राज्यात २५
भाजपाचे राजकारण ?
राजकीय लेख लिहताना सनदशीर
धन्यवाद नेफळे उर्फ
सारख्या ह्याच्या-त्याच्या
कंटाळा तुम्हाला
चैतन्य ईन्या साहेब,
तुम्हाला अजून पण कळलेच नाही छ्या
जौद्या हो..
काही माहिती...
कोणी निड फॉर स्पीड बघितला आहे काय ?
काय पण आवड तुझी!
+१
कॉण्सण्ट्रेट कॉण्सण्ट्रेट...
मला वाटले
काश्मिर कुठे?
झाले बहू होतील बहू.....
आहो एज ऑफ़ एम्पायरही आवडतो (तेच कोंकरर्स)
अबब!
आयला..
Pagination