Welcome to misalpav.com
लेखक: साती | प्रसिद्ध:
सध्या एक एक टप्प्यात निवडणू़का आटपत आहेत. राजकारणावर आणि राजकारण्यांवर बोलताना न थकणारे आपण मतदान हक्क मात्र बजावतो का ? या धाग्यावर तुमच्या भागातील मतदानाची तारीख, तुम्ही मतदान केले का, नसल्यास का नाही, असल्यास किती वेळ लागला इ. माहिती लिहिणे अपेक्षित आहे. बघुया कोण किती जबाबदारीने वागतंय ते! आपले मत आपले भविष्य... ढॅण ट डॅण!
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

भल्या पहाटे रांग लावून केलं. रांगेत एक ओळखीचं जोडपं होतं. त्यांपैकी फक्त पत्नीच्या नावाची चिट्ठी घरी पोचली होती. पतिराज त्यांचे नाव यादीत शोधत असलेल्या अधिकारीबाईना आणि एकूण जनरल सर्वांनाच खास ठेवणीतले पण अत्यंत सभ्य टोमणे फेकून मारीत होते. 'आमची नावं नसणारच यादीत' पासून 'चोर लेकाचे' पर्यंत. बाईंची शोधाशोध चाललीच होती. पानांमागून पाने उलटली जात होती आणि या गृहस्थांचा पारा आणि टोमण्यांची धार वाढत होती. शेवटची दोन पाने उरली आणि या पतिराजांनी दोन्ही हातांचे पंजे नाट्यमयरीत्या बाहेरच्या बाजूला झटकून उतावीळ आनंदाने अधिकारीबाईंना सांगितलं, 'चला, आता एकदा डिक्लेअर करा कीं माझं नाव वगळून टाकलंत म्हणून. म्हणजे मग आम्हीं रिट पिटिशन फाइल करायला मोकळे (कसें?)' आणि तेव्हढ्यात त्यांचे बिचार्‍यांचे नाव सापडले एकदाचे. सगळ्या खुमखुमीची एकदम विरी गेली अगदी.

आत्ताच राष्ट्रीय कर्तव्य पार पाडुन आलो. स्प्लीप मिळालेलीच होती,त्यामुळे कुठलाही त्रास न-होताच १० मिनीटात मतदान करुन झाले. :) माझ्या मित्राच्या कुटुंबातील सगळ्या लोकांची नावे गायब झाली आहेत असे त्याने मला बाहेर भेटल्यावर कळवले. यावेळी मोठ्या प्रमाणात नावे डिलीट झाल्याचे आठळते आहे. निवडणुक आयोगाचा हा ठिसाळ कारभार पाहता लोकशाहीसाठी असलेला सर्वात मोठा धोका ठरला आहे.स्वतःच्याच देशात एखाद्या व्यक्तीला { इथे तर आता लाखो आहेत} मतदान करता येउ नये या सारखे दुर्दैव कोणते ? यासाठी मी पूर्णपणे निवडणुक आयोगाला जवाबदार ठरवतो.

अत्ता पर्यंत प्रत्तेक निवडणुकित मतदान करत आलोय पण पहिल्यांदाच 1 तास रांग लावायला लागली. फारच उत्साह दिसतोय या वेळी, तसेच यादितुन नाव वगळल्या मुळे मतदान न करु शकनारे निराशेने इकडे तिकडे फिरनारे लोक तर खुपच दिसतायत...

मतदान केलं! नाव शोधायला वेळ लागला. वरती सूर्य चिडलेला होता. फाजील आत्मविश्वासामुळे आधी इंटरनेटावर नाव बघून घेतलेले नव्हते. आमच्या बापुडवाण्या फोनमध्ये इंटरनेटची सुविधा नाही. बायकोचे नाव पटकन सापडले. बायको बर्‍यापैकी आजारी असूनदेखील दीड तास उन्हात माझ्यासोबत नाव शोधत फिरत होती. शेवटी तिला भोवळ यायला लागली आणि ती एका पायरीवर बसली. मी म्हटलं तुला पटकन घरी सोडून, इंटरनेटवर नाव शोधून मी पुन्हा येतो मतदान करायला. तेवढ्यात आमच्या इमारतीमध्ये राहणारे एक जण मतदानासाठी जातांना दिसले. त्यांनी मतदान झालं का विचारलं. माझी अडचण सांगीतल्यावर त्यांनी चटकन त्यांच्या मोबाईलवर नाव शोधून दिले. नंतर मी ५ मिनीटांमध्ये मतदान करून घरी पळालो. :-) आता बघायचे ये स्याही क्या रंग लाती हैं...

अगदी शेवटच्या घडीला मत नोंदवले, आमच्या मतदार केंद्रातून मी शेवटचा मतदार, माझे मत टाकले आणि मशीन बंद केली, पसारा आवरून घेतला. कदाचित दक्षिण मुंबईमधून किंवा मुंबईमधून किंवा सबंध भारतातून शेवटचे मत माझेच असण्याचीही शक्यता आहे. ;)

केलं केलं ! आमीबी मद्दान केलं ! बाकी आमी मत दिलेला उमेदवार नेहमीच पडतुया. त्यामुळे ह्यावेळेस काय होणार याची उत्सुकता !

मीबी शै लाउन आली. काही शिक्षकांकडून कळलं की यावेळेस 'ट्रेनिंग ' झालंच नाहिये, फक्त सह्या घेतल्या शिक्षकांकडून, त्याणीही 'अटेन्डन्स' म्हणून दिल्या. पण मतदान यंत्राचं काम कसे चालतं याचे ट्रेनिंग झालं नाही. अर्थात याबद्दल कुणीच तक्रार करु शकणार नाही. आपल्या नोकरीवर कोण गदा आणेल सरकारविरुद्ध जाउन? माझे मत नक्की कुठे गेलय मला माहित नाही! :(