हि शाळा अनुदानित आहे का ? पुस्तके , काही आर्थिक मदत करायला आवडेल.
पण महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या मुलांची शिक्षणात खरच प्रगती आहे का? असेल तरच त्यांची पुढे आयुष्यात प्रगती होऊ शकते . फक्त शाळेत यायला आवडतंय एवढंच पुरेसा नाहीये
ज्या वातावरणामध्ये लेकरं राहतात त्यांची एका वर्षात ताडफाड प्रगती होणं जरा कठीण. ते वास्तव स्वीकारुनच इथे काम करणारे करतात. गेल्यावार्षी सुरु केलेला कार्यक्रम ह्या वर्षीही सुरु असूदेत अश्या मुलांनीच व्यक्त केलेल्या इच्छेतच खूप मोठे काम झाले असे आम्हांला वाटते. होईल त्यांचीही प्रगती. फक्त त्याला असे काटेकोर मापन कदाचित करता यायचे नाही इतक्या लवकर.
आपण मदत देऊ करण्याची इच्छा व्यक्त केल्याबद्दल आपले आभार.
हेच म्हणायला आलो होतो. माझ्या अनुभवावरून तुम्हांला अगदी ग्रासरूटपासून सुरुवात करावी लागते. मी शिकवायला गेलो होतो पदवीचं, तिथे बालवाडीच्या गणितापासून सुरुवात करावी लागली होती. अजून एक म्हणजे तिथे भाषेची अडचण खूप जाणवते. टू प्लस टू हे मराठी-तेलुगु-कन्नड-नेपाळीत कसे म्हणतात हे आधी स्वतः शिकून मग त्यांना सांगायला लागे. त्यातच त्यांचे मनोधैर्य टिकवून ठेवणे, सतत प्रोत्साहन देणे, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. इतके सोपे वा सरळ नाही ते.
प्रतिक्रिया
हि शाळा अनुदानित आहे का ?
ज्या वातावरणामध्ये लेकरं
+१
OK . अभिनंदन आणी शुभेच्छा
Pagination