Welcome to misalpav.com
लेखक: अनिल तापकीर | प्रसिद्ध:
मंत्रयोग - जपयोग शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे. कुठल्याही शब्दाचे किंवा मंत्राचे वारंवार उच्चारण करणे किंवा मनातल्या मनात वारंवार घोकणे याला जपयोग म्हणतात. याला मंत्रयोग देखील म्हटले जाते. मंत्राचा अर्थ आहे मनाला एका तंत्रात बांधणे. आणि ज्यावेळी मन एका तंत्रात एका नियमात बांधले जाते तेव्हा ती व्यक्ती मनाने खूप सामर्थ्यशाली बनते. कारण नेमाला खूप महत्व आहे माऊलींनी एका ठिकाणी म्हटले आहे कि, ।। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ ।। जपयोग हि साधना खूप पुरातन आहे. म्हणूनच सर्व धर्मामध्ये या योगाचे अनुसरण करतात. हा एक चमत्कारी योग आहे. याचा प्रभाव व्यक्तीच्या मनावर व मस्तकावर जबरदस्त पडतो. जप योगामुळे सर्व प्रकारचे रोग आणि दु:ख यातना संपतात. जपयोगाचे चार प्रकार आहेत १ - वैखरी - आपल्या वाणीने स्पष्ट व मोठ्याने करतात तो वैखरी जप होय. २- मध्यमा - या मध्ये ओठातल्या ओठात जप केला जातो. ३- पश्यंती - या मध्ये मनातल्या मनात केला जातो यामध्ये ओठ हलत नाही. ४- परा - यामध्ये जप करायचा नसतो तो आपोआप होतो. पहिल्या तीन प्रकारामध्ये जप प्रयन्त पूर्वक करायचा असतो. चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते. दु:ख- शोक दूर कसे होतात - ज्यावेळी व्यक्ती खूप काळजीत तणावात चिंतेत असते . त्यावेळी ती नकारात्मक विचारांनी घेरली जाते. आणि पहिल्यापेक्षा जास्त संकटात आणि दु:खात पडते. विचार करून करून हैराण होते. सर्वप्रथम या सर्व विचारातून सुटण्यासाठी मन एकाग्र झाले पाहिजे कुठल्याही देवतेच्या सततच्या मंत्र जपाने मन एकाग्र व्हायला लागते आणि मनामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण व्हायला लागते. आणि तुमच्या सर्व दुःखाचा हळू हळू विनाश व्हायला सुरुवात होते. काही दिवसातच तुम्ही एक आनंदी आणि सामर्थ्यशाली होता. आपल्या आराध्य देवतेच्या निरंतर जपाने मनुष्य त्या दैवी शक्तीशी जोडला जातो आणि त्या दैवी शक्तीकडून त्याला सर्व प्रकारचे सहाय्य प्राप्त होते. जप योगामुळे दिव्य दृष्टी प्राप्त होते. आणि तो सामर्थ्यशाली तर होतोच पण अंतर्ज्ञानी देखील बनतो. जपयोगाच्या चमत्काराविषयी सर्व धर्म ग्रंथामध्ये उल्लेख आलेले आहेत. वेदांमध्ये विविध प्रकारच्या मंत्रांचा उल्लेख केलेला आहे. देवतेच्या नाम मंत्रामध्ये खूप शक्ती असते. त्याचा जप केला कि साधारण मनुष्य देखील दैवी शक्ती प्राप्त होऊन सामर्थ्यशाली होतो मंत्रजपाने जे ध्वनी तरंग उठतात त्याने त्या व्यक्तीचे स्थूल व सूक्ष्म अशी दोन्ही शरीरे कंपित होतात. यालाच मंत्रयोग - जपयोग म्हणतात.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

>>> न तुम्हाला काही अनुभव, न लिहीण्याचं साहस जाउं द्या. वर प्रतिसाद दिला आहे. तुमचं म्हणणं अर्धसत्य आहे. मला अनुभव आहे व त्यामुळे "न तुम्हाला काही अनुभव" हे तुमचे अर्धे वाक्य असत्य आहे. परंतु तुमच्या वाक्याचा उर्वरीत भाग - "न लिहिण्याचे साहस", हा मात्र सत्य आहे. कारण तुमच्या सध्याच्या भ्रमिष्ट अवस्थेत माझे अनुभव तुम्हाला सांगण्याचे साहस माझ्यात नाही. आधी तुम्ही भ्रमिष्टपणातून दूर होऊन मन ताळ्यावर आणा आणि नंतर एक काय अनेक अनुभव सांगतो.

साधारणतः दोन प्रकारच्या व्यक्ती नामजपाची भलामण करतातः
यात एक कॅटॅगरी आणखी अ‍ॅड करता येईल... नाम(काया-वाचा-मनसा सच्चिदानंदाचा निर्देष) स्मरणाने(कृती-विचार-जाणिव सच्चिदानंदाशी समेवर येणे) जीवन कृतार्थ झालेले देखील नामजपाची भलावण करतात. (आनंदाचे डोही आनंद तरंग, विश्वाचे आर्त वगैरे मोठ्यांचे अनुभव बाजुला ठेवुन अगदी वैयक्तीक अनुभवाचे शब्द आहेत) असो. प्रस्तुत चर्चा त्याविषयी नाहि हे ठाऊक आहे. त्रिशतकीय काथ्याकुटात आपली एक पोचपावती असावी एव्हढ्या क्षुद्र उद्देशाने हा प्रतिसाद प्रपंच केला :)

जशी दृष्टी तशी सृष्टी या न्यायाने माझ्या निरिश्वरवादी विचारांमधून ही विचारधारा निसटली असली तरी अशा विचारसरणीचे लोक दुर्मिळ असले तरीही आहेत. या विचारसरणीचे लोक केवळ आपल्या अस्तित्वापोटी ईश्वराशी*/विराट शक्तीशी कृतज्ञ असतात. त्यांची त्या शक्तीकडे काही मागणं नसतं; काही अपेक्षा नसते. आयुष्य जे जे अंगावर फेकेल ते ते त्या शक्तीची ईच्छा म्हणून स्विकारलं जातं.
राधा** गौळण करीते मंथन | अविरत हरीचे मनात चिंतन ||
असा एकंदरीत मामला असतो. मात्र असे लोक विरळा. *(माझ्या दृष्टीने) ईश्वर ही संकल्पना. ** कवी जयदेव यांच्या गीतगोविंद या काव्यातील एक काल्पनिक पात्र.

राधा तेरा जलवा,जीलेबीबाई,फेविकॉलसे हि असली गाणी एकदा प्रवासात जाताना आणि येताना ऐकली, भाड्याची गाडी असल्याने गाडीचालक त्याच्या आवडीची गाणी लावत असल्याने काही बोलता आले नाही.पण आल्यावर मी तीच गाणी नकळत गुणगुणू लागले. माझी सून माझ्याकडे ज्या नजरेने पाहत होती ती नजर मी विसरूच शकणार नाही.

देवगिरीला जाताना पण असंच एक गाणं आमच्या तोंडात बसलं होतं. ते सारखंच आम्ही बडबडत असल्याने आमचा एक सभ्य मित्र लै रागावला होता त्याची आठौण येऊन ड्वाळे पाणावले.

*biggrin* ह्याधाग्यावर बरेच दिवसांनी बर्‍याच खेळाडुंना मनसोक्त बॅटींग करण्याची संधी मिळाली हे पाहुन एक मिपाकर म्हणुन आनंद वाटला *i-m_so_happy*

मिसळ पाव हे संस्थळ फक्त अशाच धाग्यांसाठी उरलेले आहे चांगले साहित्य लिहिण्यास कोणाला सवड नाही.. हेच विषय सारखे सारखे चघळले जातात, कुठेतरी थांबायला हवं

कुणी?????
तेच तर, अध्यात्म, आस्तिक, नास्तिक राहुन्द्या बाजूला.. स्वताचे इगो सांभाळता येत नाहीत साधे, तेवढ जमलं तरी खूप :)

मिसळपाव वर सदर विशाय्न्साठी एक वेगळा विभाग सुरु करायला हवा, मायबोलीच्या धर्तीवर , ज्याला इच्छा असेल तो त्या ग्रुप वर सामील होईल, आणि काय मळमळ ओकायची, काय तुंबलेले बोळे मोकळे करायचे ते करेल, निदान इतरांना तरी त्रास होणार नाही.. चायला दर चार दिवसांनी हेच हेच विषय, तेच तेच प्रतिसाद, तेच यशस्वी (न)कलाकार :)

@ ज्याला इच्छा असेल तो त्या ग्रुप वर सामील होईल, आणि काय मळमळ ओकायची, काय तुंबलेले बोळे मोकळे करायचे ते करेल>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif ++++++++१११११११११११ आता मी पां डुब्बा च्या गटात http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/smileys-shaking-hands-smiley-emoticon.jpg =))

अत्रुप्त आत्मा यांचा हा अति जबरदस्त प्रतिसाद, फार तिरका होऊ लागल्याने इथे पेष्टवत आहे. मूळ लिंकः http://misalpav.com/comment/597948#comment-597948 प्रतिसाद खालीलप्रमाणे. प्र.गो.-हे वाचा आणि थोडा विचार करा. प्र.गो. आपणे जे म्हणतायत,ते येणे प्रमाणे- जर वेदोक्त शिकायचे असेल,तर मुंजिचा संस्कार करुन शिकावे..आणि ते ज्यांना(द्विजांना) धर्मानी अधिकार दिला आहे त्यांनीच. बाकिच्यांना पुराणोक्ताचा अधिकार आहे.आणि या दोन्हीत श्रेष्ठ/कनिष्ठ असे काहिही नाही. तेंव्हा कमी-जास्त पणाचा आरोप करु नका. प्र.गो:- हे सगळं तुंम्ही तुमच्या सद्बुद्धीचा कौल लाऊन म्हणताय.(जे शास्त्राला अजिब्बात मान्य नाही.)प्रत्यक्ष वैदिक(ज्याला सामान्यतः हिंदू संबोधतात.)त्या परंपरेत आणि ती परंपरा चालविणार्‍या आमच्या वैदिक आचार्यांमधे वेद मंत्रांची किंमत आणि स्थान हे पुराणोक्ताच्या वरचं आहे. पुराणोक्त कर्म(कांड) करणे..हे दुय्य्यम आणि हलक्या स्वरुपाचं मानलेलं..आचरलेलं आहे. म्हणजे वेदोक्त श्रीखंडासारखं,तर पुराणोक्त मंजे निव्वळ दही साखर...! दोन्हीतले घटक/कृती तीच पण घटीत आणि दर्जा वेगळा! मंत्रातला अर्थ/आशय तोच पण मान आणि दर्जा वेगळा..असा हा मामला आहे. मला या गोष्टी कळल्यावर मी आमच्यातल्या अनेकांना हा प्रश्न विचारला,पण उत्तरं देताना कोणिही पोथीप्रामाण्या बाहेर गेले नाहीत.(एका अर्थी स्वतःच्या अंगावर येणार,ते पोथीच्या अंगावर ढकललं..इतकच) आता यातही काहि आचार्य/प्रवचनकार/पुरोहित हे वेदमंत्र ऐकण्याचा अधिकार सर्वांना आहे.(शिकण्याचा नव्हे!) अशी भुमिका (अर्थातच शास्त्रा धार-काढून) घेत असतातच.यातल्या काहिंना असं प्रामाणिकपणे वाटत असतं,की आपण म्हणतो तेच शास्त्रातलं मत बरोब्बर..बाकिची लफंगेगिरी/अप्रामाणिकता.उरलेल्यांना ही उघड विषमता आहे हे कळत असतं,पण लोकांनी ऐकावं म्हणून आणि त्यांनाही परंपरेत राहुन हे साध्य करायचं असल्यानी ते शास्त्राधार घेतात. ..असो! माझ्या सारख्यांना सावरकरांची वेदामृत सर्वांना पाजा ही माणुसकीपूर्ण भुमिका पटते...त्यामुळे मी ज्याला वेदमंत्र शिकण्याची पात्रता आहे त्या (हिंदुसमाजातल्या) प्रत्येक स्त्री/पुरुषाला..पौरोहित्य किंवा व्यक्तिगत उपासनेसाठी वेद शिकवले पाहिजेत. या मताचा आहे. आता तुमचा रहाता राहिला मुद्दा विधिनिषेध पाळण्याचा... तर तुंम्हाला हे नम्रपणे सांगतो की धर्मशास्त्रातले विधिनिषेध हे ऐहिक दृष्ट्या निरर्थक आहेत. निरर्थक म्हणजे - तुलनाच न करता येण्याच्या स्वरुपाचे. वेदाध्ययना साठी मुंजीचा संस्कार हा विधि करावा लागतो.. हा विधी न करता वेद शिकणे हा निषेध. आता हे निरर्थक कसं होतं ते पहा... मुंजीचा संस्कार हा वेदाध्ययनाच्या दालनात शिरायचा गेटपास आहे. पण आपल्या धर्मपरंपरेत हा पास लायकीवर नाही,तर जातिवर मिळतो..ही पहिली विषमता. (आपल्याला CAR शिकायची असेल,तर ज्याला येते त्याला शिकायचा गेटपास म्हणजे लर्निंग लायसनची मुंज करवून मिळते आणि त्यात उत्तीर्ण झाल्यास परमनंट लायसन मिळतं..आणि स्वतःची गाडी चालवायचं उपासना स्वातंत्र्य मिळतं..किंवा चालक या पदावर पौरोहित्याची संधी मिळते....म्हणजे जात पाहिली जात नाही..सरळ लायकता पाहिली जाते.. ही ऐहिक समता[आपल्याच लोकसमुहाकरीता] धर्मात का नाही? याचा विचार करा.) ही विषमता आजही जिवंत आहे. वेदपाठशाळांमधे स्त्रीया वा ब्राम्हणेतरांना प्रवेश नाही.याबद्दल तुंम्हाला काय वाटतं? आता थोडा ग्रंथाधारः- मनु:स्मृती - अध्याय- २ :- श्लोक ३१ ते ४९ हा भाग मुद्दाम वाचा हा खास उपनयनाचे द्विंजांसाठी/त्रैवर्णिकांसाठीचे नियम सांगतो.. हे ही जाती आधारीत आहेत.अध्ययनाकरिता ब्राम्हणापासून पुढे प्रत्येक वर्णाची मुंज ही ४ वर्षांची गॅप ठेऊन सांगणे. कमरे भेवतीच्या मेखला वेगवेगळ्या धाग्यांच्या सांगणे,धरणाचे दंड वेगवेगळ्या वृक्षांचे आणि उंचीचे सांगणे... असा या आमच्या वैदिककॉलेज मधे,,विद्यार्थीसमुहात पाहाता क्षणीच ओळखायला सोप्पा जावा ,असा जन्माधारीत विषमतेचा कडेकोट बंदोबस्त,मनुस्मृतीनी सांगितलेला आहे..विधीनिषेधाच्या नावाखाली हा पाळण्या योग्य मानायचा का? आपल्याला काय वाटतं? शिवाय शूद्रा*ला मुंज करून शिकायला परवानगीच नाही..हे का बरं? पाण्यात उडी मारायला संधीच द्यायची नाही,आणि तू पोहोण्यायोग्य नाहीस असा आधिच निर्वाळा द्यायचा..हे कशाचं लक्षण मानायचं? शिवाय दुसर्‍या धर्मांमधेही असच आहे..ते बघा..!--- असा सल्ला मधुन मधुन तुंम्ही देता. तर तुंम्हाला ते ही समर्थनीय वाटतं काय? आणि मी किंवा माझ्यासारख्या कुणी ही विषमता माझ्याधर्मापुरती दुर/हद्दपार करायची,आणि धर्मात समता आणायची म्हटली तर त्यात काहि चूक आहे...असं तुम्हाला दुसर्‍या धर्मांचा दाखला देऊन सांगावसं का वाटतं? त्यांचं घर राहू दे ना घाणेरडं आपण आपलं स्वच्छ करू..काय हरकत आहे? असं का वाटत नाही? Smile *@द्विज/त्रैवर्णिक इत्यादी कलीयुगात नाहीत. कलियुगात दोनच वर्ण अस्तित्वात आहेत. ब्राम्हण व *इतर(शूद्र) हे धर्मशास्त्र्यांचं मत आहे. आणि त्यावरूनच शाहू/वेदोक्त प्रकरण झालं होतं. मग तुंम्ही वादापुरतं सुद्धा द्विज म्हणजे त्रैवर्णिकांच्या कथित अधिकाराचं बाहुलं नाचविण्यात काय अर्थ उरतो??? याचाही विचार करा. ==================== प्र.गो:--- मी वर मांडलेले विचार..मुद्दे हे तुंम्हाला हरवण्यासाठी नाहीत. हे जाता जाता नमूद करु इच्छितो.

@प्रगो, तुम्ही ब्राम्हण-शुद्र असा भेदभाव (कोणत्याही स्वरुपात का होईना) इतक्या ठामपणे मांडताना पाहून आश्च्रर्य अन विषाद वाटला. @अ.आ. आणि बॅटमॅन - अतिशय उत्तम प्रतिसाद, आदर दुणावला.. *good* प्रगोंसारखे विचार मांडणारेच खरेतर ब्राम्ह्ण-ब्राम्हणेतर मांडणीला खतपाणी घालत असतात, या ना त्या मार्गाने.. हे थांबायला हवं. *stop*

आत्मुबुवा आणि बॅटमॅन यांचे प्रतिसाद आवडले. अगदी नेफळ्यांचेही या लेखातील काही प्रतिसाद विचार करायला लावण्यासारखे. मी http://www.misalpav.com/comment/597855#comment-597855 इथेही आणि यापूर्वीही खफवर जात्याधारित भेदभाव अथवा उच्चनीचसंकल्पना अजिबात समर्थनीय नाहीत असे म्हटले होते. प्रगोंची या धाग्यावरील मांडणी प्रतिगामी वाटली. कदाचित त्यात विडंबनाचा सूर असेल, पण तसे खरेच असेल तर जाणवले नाही. अजूनही प्रतिगामित्वाचा असाच अभिनिवेश दाखवला जाणार असेल तर हवाय कशाला तो धर्म आणि त्या परंपरा! मानवताधिष्ठित समानतेच्या वाटा आपण स्वतंत्रपणे धुंडाळू. त्यासाठी कुठल्या निरर्थक मंत्रांची वा कर्मकांडांची अजिबात गरज नाही. आमचे गायत्री मंत्र आम्हीच लिहू. आमचा देव असलाच तर आम्हीच शोधू. हाकानाका. :-)

हवाय कशाला तो धर्म आणि त्या परंपरा! मानवताधिष्ठित समानतेच्या वाटा आपण स्वतंत्रपणे धुंडाळू. त्यासाठी कुठल्या निरर्थक मंत्रांची वा कर्मकांडांची अजिबात गरज नाही. आमचे गायत्री मंत्र आम्हीच लिहू. आमचा देव असलाच तर आम्हीच
पर्फेक्ट ! स्पॉट ऑन ! बुल्स आय ! मी हेच सांगायचा प्रयत्न करत होतो ... आपल्याला जे पटत्ट नाही ते करायचा अट्टहास हट्टाग्रह कशासाठी ... ते ज्याला जसे करायचे तसे ते करु दे ... आपण आपला वेगळा मार्ग निवडु ... "पण पटत नाही तेच करणार तेही आम्हाला वाट्टेल तसेच" हा असा अ‍ॅटीट्युड का आहे हे माहीत नाही :)

अजूनही प्रतिगामित्वाचा असाच अभिनिवेश दाखवला जाणार असेल तर हवाय कशाला तो धर्म आणि त्या परंपरा!
जर चार लोकांनी चार ओळीचा एक मंत्र म्हटल्याने यांचा धर्म बुडणार असेल तर असा धर्म बुडलेलाच बरा!

धर्म बुडणार असेल तर असा धर्म बुडलेलाच बरा!
देअर यु आर ! मी हेच म्हणत होतो की ब्यॅटा ! बुदणारा धर्म बुडु दे की निवांतपणे त्याच्या ष्टाईल ने ... पण आम्हाला तोच हवा आहे आणि आम्ही तोच सुधारणा करुन तरंगवायचा प्रयत्न करणार हा अट्टहास का ? हेच तर विचारत होतो मी *pardon*

मुळात अमुक अमुक गोष्ट करण्याच्या इच्छेला अट्टाहास म्हणण्यामागचे लॉजिकच गंडलेले आहे तिथे बाकी बोलण्यात अर्थ काय? तुमची ती डिफॉल्ट पोझिशन, बाकीच्यांचा तो अट्टाहास हे समीकरण कुठवर ताणणार?

गायत्री मंत्रावर द्विजांची मक्तेदारी नाही. धर्मशास्त्रे जे सांगतात त्यातले सगळेच घ्यायचे नसते, तारतम्य ठेवावे लागते. पण तारतम्याला अट्टाहास आणि सिलेक्टिव्ह रीडिंग अशी लेबले लावली जात असतील तर इलाज नाही. पण सुदैवाने आज अशा पोझिशनवाल्यांची किरकिर एखाद्या कोपर्‍याबाहेर येत नाही ते बरेय.

जर धर्माचे असे मक्तेदार धर्मातील त्याज्य भाग वगळायला/बदलायला तयार नसतील तर परिघाबाहेरचे आणि परिघ मंजूर नसलेलेही आपल्या स्वतंत्र वाटा चोखाळतीलही. पण त्यामुळे प्रतिगाम्यांवरील संकुचिततेच्या आरोपाची धार अथवा त्यांचे सुधारणेप्रतीचे उत्तरदायित्व किंचितही कमी होत नाही.

पण त्यामुळे प्रतिगाम्यांवरील संकुचिततेच्या आरोपाची धार अथवा त्यांचे सुधारणेप्रतीचे उत्तरदायित्व किंचितही कमी होत नाही.
सहस्रशः सहमत!

बुडणारा धर्म बुडू दे त्याच्या स्टाईलने
प्रगो, आता एक डीस्क्लोजर टाकाच तुम्ही, की वैदीक धर्म आणि हिंदू धर्म हे दोन वेगवेगळे धर्म आहेत ते.

@चर्चेअंती बोलु >>> +++१११ प्रत्यक्ष भेटीतच बोलू . *i-m_so_happy* कारण हा विषय वन टू वनचाच आहे. अत्यंत समांतरः- त्या आगोबाhttp://www.sherv.net/cm/emoticons/war/shooting-ak47-gun.gif आगलावेंकडे :-/ अज्जिब्बात लक्ष देऊ नका! त्यांना सवयच आहे ही http://www.sherv.net/cm/emoticons/war/dynamite.gif जुनी! *ROFL*

माघार नाय घेणार अशा गिर्जाकाकू तिरक्या प्रतिसादातला शेवटचा प्रतिसाद असा आहे त्यांचा..
प्रगो - Tue, 22/07/2014 - 16:06 आय थिंक आय कॅन स्टिल डिफेन्ड माय पॉईट !
आता आत्मूबुवांच्या एकेका लायनीला १० लायनी असा मोठा प्रतिसाद येइल बघा.. :-)

हो ही विषमता मला काही बाबतीत समर्थनीय वाटते. याबतीतले अधिक चिंतन वाचायचे असेल तर वरदानंद भारतींच्या मनुस्मृतीच्या भाषांतराची त्यांनी लिहीलेली अनुक्रमणिका वाचा.