Welcome to misalpav.com
लेखक: अनिल तापकीर | प्रसिद्ध:
मंत्रयोग - जपयोग शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे. कुठल्याही शब्दाचे किंवा मंत्राचे वारंवार उच्चारण करणे किंवा मनातल्या मनात वारंवार घोकणे याला जपयोग म्हणतात. याला मंत्रयोग देखील म्हटले जाते. मंत्राचा अर्थ आहे मनाला एका तंत्रात बांधणे. आणि ज्यावेळी मन एका तंत्रात एका नियमात बांधले जाते तेव्हा ती व्यक्ती मनाने खूप सामर्थ्यशाली बनते. कारण नेमाला खूप महत्व आहे माऊलींनी एका ठिकाणी म्हटले आहे कि, ।। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ ।। जपयोग हि साधना खूप पुरातन आहे. म्हणूनच सर्व धर्मामध्ये या योगाचे अनुसरण करतात. हा एक चमत्कारी योग आहे. याचा प्रभाव व्यक्तीच्या मनावर व मस्तकावर जबरदस्त पडतो. जप योगामुळे सर्व प्रकारचे रोग आणि दु:ख यातना संपतात. जपयोगाचे चार प्रकार आहेत १ - वैखरी - आपल्या वाणीने स्पष्ट व मोठ्याने करतात तो वैखरी जप होय. २- मध्यमा - या मध्ये ओठातल्या ओठात जप केला जातो. ३- पश्यंती - या मध्ये मनातल्या मनात केला जातो यामध्ये ओठ हलत नाही. ४- परा - यामध्ये जप करायचा नसतो तो आपोआप होतो. पहिल्या तीन प्रकारामध्ये जप प्रयन्त पूर्वक करायचा असतो. चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते. दु:ख- शोक दूर कसे होतात - ज्यावेळी व्यक्ती खूप काळजीत तणावात चिंतेत असते . त्यावेळी ती नकारात्मक विचारांनी घेरली जाते. आणि पहिल्यापेक्षा जास्त संकटात आणि दु:खात पडते. विचार करून करून हैराण होते. सर्वप्रथम या सर्व विचारातून सुटण्यासाठी मन एकाग्र झाले पाहिजे कुठल्याही देवतेच्या सततच्या मंत्र जपाने मन एकाग्र व्हायला लागते आणि मनामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण व्हायला लागते. आणि तुमच्या सर्व दुःखाचा हळू हळू विनाश व्हायला सुरुवात होते. काही दिवसातच तुम्ही एक आनंदी आणि सामर्थ्यशाली होता. आपल्या आराध्य देवतेच्या निरंतर जपाने मनुष्य त्या दैवी शक्तीशी जोडला जातो आणि त्या दैवी शक्तीकडून त्याला सर्व प्रकारचे सहाय्य प्राप्त होते. जप योगामुळे दिव्य दृष्टी प्राप्त होते. आणि तो सामर्थ्यशाली तर होतोच पण अंतर्ज्ञानी देखील बनतो. जपयोगाच्या चमत्काराविषयी सर्व धर्म ग्रंथामध्ये उल्लेख आलेले आहेत. वेदांमध्ये विविध प्रकारच्या मंत्रांचा उल्लेख केलेला आहे. देवतेच्या नाम मंत्रामध्ये खूप शक्ती असते. त्याचा जप केला कि साधारण मनुष्य देखील दैवी शक्ती प्राप्त होऊन सामर्थ्यशाली होतो मंत्रजपाने जे ध्वनी तरंग उठतात त्याने त्या व्यक्तीचे स्थूल व सूक्ष्म अशी दोन्ही शरीरे कंपित होतात. यालाच मंत्रयोग - जपयोग म्हणतात.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

ह्या मंत्रजपाचे काही विधीनिषेध असतील तर तेही सांगा.
हा मंत्र ऑफीसात त्यातही बेन्चवर असतानाच मिपावर ज्ञानपुर्ण प्रतिसाद टाकणार्‍यांसाठीच आहे ... इतरांनी हा मंत्र वापर नये अशी सक्त ताकीद आहे *biggrin*

नाम घेण्यावरुन चर्चा चालू आहे. मात्र तेहतीस कोटी देवांपैकी कुठल्या देवाचं नांव घ्यायचं ते कुणीच नाही लिहिलं राव. याबाबतचा माझा काही अनुभवः १. श्रावण महिन्यात आमच्या घरी ग्रंथवाचन व्हायचे. हरीविजय, रामविजय, पांडवप्रताप, काशीखंड, भक्तविजय, शीवलिलामृत, एकनाथी भागवत या अशा अनेक ग्रंथांचे वाचन व्हायचे. या ग्रंथांमध्ये जे दैवत ग्रंथाचा विषय असेल त्या देवाचा उदो उदो केलेला असतो. बाकीचे देव या देवाला आपली संकटे दूर करण्यासाठी कसे शरण येतात याची पाल्हाळीक वर्णने असतात. २. तोच प्रकार पौराणिक दुरदर्शन मालिकांच्या बाबतीत. ज्या देवतेबद्दल मालिका ती देवता श्रेष्ठ दाखवली जाते. उदा. देवोंके देव महादेव ही मालिका. सारे देव हात जोडून "भोलेनाथ अब आपही हमको बचा सकते हैं" म्हणत काकुळतीला आलेले असतात. तर प्रश्न असा आहे की समजा नामस्मरणाने काही लाभ होतो असं गृहीत धरलं तर कोणत्या देवतेचे नामस्मरण करणे अधिक चांगले?

तेहतीस कोटी देवांचे एक्सेलशिट बनवलं असेल तर आम्हाला पण द्या हो. ह्या वरच्या नंबरांवरून कळत नाही कि कुठला देव कुठल्या नंबरावर आहे ते.

११,६८,३९,५२३ व्या (sorted on name asc)
६८ ? ३९ ? ५२३ ? काय राव हे अज्ञान .... ३३ कोटी देव कोणक? ह्याचा किमान अभ्यास करुन तरी कमेन्ट करा

>>तेहतीस कोटी देवांपैकी कुठल्या देवाचं नांव घ्यायचं ते कुणीच नाही लिहिलं राव त्याचं असं आहे बघा प्रत्येक देवतेकडे एक एक डिपार्ट्मेंट सोपवले आहे. तुम्हाला जे साध्य करायचे आहे ते साध्य ज्या डिपार्ट्मेंटच्या अंडर येते त्या रिसपेक्टिव देवतेचा जप करायचा असतो.

सगळे पुर्वग्रह बाजुला ठेवले.. तर (फक्त ह्या धाग्यावर) मला संक्षीचा मुद्दा पटला आहे. (त्यांचं सगळंच लिहीलेलं मी वाचलेलं नाही.. तेवढी माझी कुवत नाही..) पण त्यांचा मुद्दा मला पटलाय.. मागे मंत्राच्याच धाग्यावर जे लॉजिक लोक लावत होते की मंत्र हा फक्त शब्द समुह आहे.. त्याला काही विशिष्ट सामर्थ्य नाही.. तसंच काहीसं.. लहानपणी जर आपल्याला "मिसळपाव" हा एक देव आहे.. असं सांगितलं असतं.. तर "श्रीराम" हा जप करुन जे साध्य होतं तेच "श्री मिसळपाव" ह्या नामस्मरणाने सुद्धा होईल. एकंदरीत नामस्मरण म्हणजे बाकी गोंधळातुन लक्ष काढुन घेऊन एकाच शब्दावर ते केंद्रित करणे असा प्रकार असावा.. लाखो वेळा तेच घोकल्यावर मेंदुला फटिग येऊन भास होणं शक्य नाही का? आर्ट ऑफ लिव्हिंगच्या बेसिक कोर्स मध्ये पहिल्यांदा सुदर्शन क्रिया करताना एकाच लयीत जोर जोरात श्वास घेतल्याने मी ती क्रिया करता करता नियंत्रण सुटुन जमिनीवर पडले होते.. जनरली लोक ह्यांना "चमत्कार" किंवा "अनुभुती" म्हणत असावेत.. एकंदरीत हे सगळे मनाचे खेळ आहेत असं माझंही मत आहे.. ह्यानी भगवंत भेटतील (म्हणजे नक्की काय होईल? आनी देव भेटलाच तर पुढे काय? देव नक्की आहे का? हे आणखी त्रिशतकी विषय आहेत..) असं मला वाटत नाही.. (तळटीपः- मला नामस्मरण... त्याच्या पायर्‍या.. वैखरी/अजपा ह्या शब्दांचा अर्थ.. आणि कशाचाच एकंदरीत अनुभव नाही.. अत्यंत जनरल निरीक्षणं आहेत..)

सगळे पुर्वग्रह बाजुला ठेवले.. तर (फक्त ह्या धाग्यावर) मला संक्षीचा मुद्दा पटला आहे. (त्यांचं सगळंच लिहीलेलं मी वाचलेलं नाही.. तेवढी माझी कुवत नाही..) पण त्यांचा मुद्दा मला पटलाय..
या मताशी मीही सहमत आहे. पण मला प्रवचनकार, किर्तनकार यांचं शब्दांना रुपकं आणि प्रतिकं यांची जोड देत गोल गोल घुमवणं आवडतं. आणि ते या धाग्यावर छान चालू आहे. :)
मागे मंत्राच्याच धाग्यावर जे लॉजिक लोक लावत होते की मंत्र हा फक्त शब्द समुह आहे.. त्याला काही विशिष्ट सामर्थ्य नाही.. तसंच काहीसं..
हे पण अगदी खरं आहे. वाल्या कोळ्याची गोष्ट जर खरी मानली तर तो तरी कुठे विधीवत आणि अजून काय काय "राम" म्हणाला होता? तो तर "मरा मरा" असंच म्हणाला होता.
एकंदरीत नामस्मरण म्हणजे बाकी गोंधळातुन लक्ष काढुन घेऊन एकाच शब्दावर ते केंद्रित करणे असा प्रकार असावा..
अगदी अगदी. माझ्या दृष्टीने नामस्मरण हे "वडाच्या झाडाकडे एकटक पाहिल्याने त्रास होतोय तर आंब्याच्या झाडाकडे बघ" असं सांगण्यासारखे आहे. जगातील इतर वाईट गोष्टींवरील चित्त हटवून "देव" या चांगल्या गोष्टीवर चित्त केंद्रीत करा, असं काहीसं.
(तळटीपः- मला नामस्मरण... त्याच्या पायर्‍या.. वैखरी/अजपा ह्या शब्दांचा अर्थ.. आणि कशाचाच एकंदरीत अनुभव नाही.. अत्यंत जनरल निरीक्षणं आहेत..)
मला थोडाफार अनुभव आहे नामस्मरणाचा. लहानपणापासून आपल्या मनाचं कंडीशनिंग झालेलं असतं, देवाच्या नामस्मरणानं मनःशांती मिळते. (शांतता नाही, शांती. ;) ) त्यामुळे भाविक मनोवृत्तीच्या माणसाला थोडा वेळ देवाच्या नावाची आवर्तने केली की तात्कालिक आणि आभासी शांती मिळते. कारण मनावर लहाणपणापासून तसं बिंबवलेलंच असतं. अर्थात ही शांती चिरस्थायी नसते. नामस्मरण बंद, शांती गायब असा मामला असतो. वर संक्षींनी म्हटल्याप्रमाणे शांती येत नसते आणि जात नसते. ती आपल्याच अंतर्मनात खोलवर दडून बसली आहे, अनेक भ्रमांच्या आवरणाखाली. आपण स्वतःच शांतीस्वरुप आहोत. त्यासाठी कुठल्याच बाह्यप्रक्रियेची जरुरी नाही.

संक्षींनी म्हटल्याप्रमाणे शांती येत नसते आणि जात नसते. ती आपल्याच अंतर्मनात खोलवर दडून बसली आहे, अनेक भ्रमांच्या आवरणाखाली. आपण स्वतःच शांतीस्वरुप आहोत. त्यासाठी कुठल्याच बाह्यप्रक्रियेची जरुरी नाही.
म्या पामराला नीटसे हे समजले नाही, हि शांती खोलवरून दडून बसली म्हणजे काय ? शांती स्वरूप आहोत म्हणजे काय? थोडे उलगडून सांगा णा सर

या गोष्टी इतक्या सहजासहजी कळत नाहीत. आणि तुम्हाला समजावण्याईतकी माझी कुवतही नाही. मला स्वतःला समजलेलंच अजूनही "इंटलेक्च्युअल" पातळीवर आहे. ते ज्या दिवशी "इंटर्नलाईज्ड" होऊन मी स्वतःच जेव्हा शांतीस्वरुप होईन तेव्हा कदाचित समजावू शकेनही. अर्थात तुम्हालाही हे सारं माझ्यासारखंच इंटलेक्च्युअल पातळीवर समजून घ्यायचं असेल तर मी मागच्या दोन वर्षांत वाचलेल्या दिड-दोनशे मानसशास्त्रावरच्या पुस्तकांची यादी देतो. वाचा.

तुम्हालाही अनुभव नाही म्हणता ब्वोर्र मग वर पलीकडील अनुभव नसलेल्या मंडळींवर का चढताय त्यांनीही दीड दोनशे ग्रंथ वाचलेलेच आहेत कि

मग वर पलीकडील अनुभव नसलेल्या मंडळींवर का चढताय त्यांनीही दीड दोनशे ग्रंथ वाचलेलेच आहेत कि
हा तुमच्या मनाचा भ्रम आहे. इथे कुणी चढत नाही. चर्चा चालू आहे इथे. सार्वजनिक मंचावर भाषा जरा जपून वापरावी. :)

अगदी अनुभव नसला तरी अनुभवाची पूर्वतयारी नक्कीच झाली आहे. माणूस एका रात्रीत आपल्या सार्‍या निरर्थक गोष्टी सोडू शकत नाही. ती प्रक्रिया असते.

धन्या , काय काय झालं पाहिजे ह्याची लिस्ट वाढतच चालील्ये राव ... आधी फक्त समष्टी होती आता सत्यान्वेषण पण नवीन अ‍ॅड झालय ... *pleasantry*

कसली प्रक्रीया आम्हाला पण सांगा की, आम्ही पण सोडु निरर्थक गोष्टी. हो त्या गोष्टींची लिस्ट पण द्या

मला जे म्हणायचं आहे ते मी वरच्या तीन चार प्रतिसादांत म्हटलं आहे. यापेक्षा अधिक फोड करुन सांगण्यास मी असमर्थ आहे. मी म्हटल्याप्रमाणे पुस्तकांची यादी मात्र नक्की व्यनी करु शकेन.

हाहा लईच मजेदार वाक्य सोडता हो तुम्ही
तुम्हाला माझं वाक्य मजेदार वाटू शकतं. एखाद्या घटनेकडे, व्यक्तीकडे, वाक्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यक्तीगणिक बदलू शकतो.

अगदी अनुभव नसला तरी अनुभवाची पूर्वतयारी नक्कीच झाली आहे.>> ऑल द बेस्ट धन्या! . . . . (अवांतरः धन्या कायम नास्तिक रहावा अशी जगन्नियन्त्याकडे कळकळीची प्रार्थना)

ज्याप्रमाणे तुम्ही दुसर्यांच्या मोठ्ठ्या मोठ्ठ्या शब्द वापरण्यावरुन टर उडवताय, अनुभव नाही सांगताय, तुमची स्थिती काही वेगळी नाही, दिडशे पुस्तकांच्या भांडवलावर तुम्ही चर्चेचे गुर्हाळ मांडुन बसला आहात, अनुभव काहीच नाही, नुसतेच फुकाचे शब्द. :-D

मला वाटतं शांती ही बोडणात ठेवलेल्या अन्नपूर्णेप्रमाणे असते. आपणच ती परातीत ठेवतो, आपणच तिच्यावर आपल्या आशा, आकांक्षा, आनंद, दु:ख, चिंतांची पंचामृतं ओततो. ही पंचामृतं आणि भौतिक सुखाचे नैवेद्य आणि अलंकारासकट बोडण कालवून/कळवून झालं ही पुन्हा तीच अन्नपूर्णा त्यातून मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. असते डोळ्यासमोरच आपणच दडवतो आणि आपणच पुन्हा ती मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. (चू भू दे घे.) इति लेखनसीमा॥

मार्ग कुठलाही अवलंबला तरी हरकत नाही. बाकी कुणाचंही नाव घेऊन नामस्मरणाचे फायदे मिळणं अशक्य आहे. नाम हे ईश्वराचं, अवतारांचंच घ्यावं नि शक्यतो गुरुमुखातून आलेलं असावं असं शास्त्र आहे. (शास्त्र म्हणजे सायन्स नव्हे.) कुणा अवतारावर आपली श्रद्धा नाही ही गडबड आहे, असते. असावी की नसावी हा वेगळा विषय आहे. असो!

कुणा अवतारावर आपली श्रद्धा नाही ही गडबड आहे, असते. असावी की नसावी हा वेगळा विषय आहे.
एकदा अवतारावर श्रद्धा नसणे हीच गडबड म्हटल्यास असावी की नसावी हा वेगळा विषय जरी मानला तरी काय फायदा? अवतारावर श्रद्धा न ठेवणे ही गडबड कशी काय ते आम्हां पामरांना समजावून सांगा बघू हभप.

बाकी कुणाचंही नाव घेऊन नामस्मरणाचे फायदे मिळणं अशक्य आहे.
वाल्या कोळ्याला मिळाले होते की. राम हे जरी देवाचे नांव असले तरी "मरा" हे देवाचं नांव नाही. तरीही त्याचा उद्धार झालाच की. आणि गंमतीचा भाग म्हणजे तेव्हा राम जन्मलाही नव्हता.

गंमतीचा भाग म्हणजे तेव्हा राम जन्मलाही नव्हता
एक शंका: राम जन्मा अगोदर पासूनच राम नामाला एवढे महत्व कसं काय? काही कळलं नाही. *unknw*

त्याला अर्थवाद म्हणतात. ह्याच्या बरोबरच अजामेळाचं उदाहरण देखील सांगितलं जातं. देवाचिये द्वारी उभा 'क्षण' भरी हे देखील अर्थवादाचंच उदाहरण.

हिंदू धर्मातील एका अतिमहत्त्वाच्या अवतारावर शंका घेता शिदराव? भाकडकथा सॉरी सॉरी पुराणं नै वाचत का ओ कंदी ;)

पुराणं नै वाचत का ओ कंदी
नाय ओ. पण मिपावरील अश्या चर्चा समजण्यासाठी आता बहूतेक सुरूवात करावी लागेल असं दिसतंय. :)

अगदी अगदी. मीही सुरुवात करू म्हणतोय. सुदैवानं त्यात दोन्ही बाजूनं लोकं बोलतात त्यामुळे प्रवचनकारांप्रमाणे पाहिजे ते तुकडे उचलून लोकांच्या तोंडावर फेकावेत हे उत्तम ;)

होय, पण आमची लायकी किती अन आम्ही बोलावे किती याचा ताळमेळ पाहता शेवटी तेच बोललो झालं. :) लहान तोंडी (कल्पनेनेच, कारण नैतर तोंड फाटून जाईल) मोठा घास घेऊन सांगतो, प्रस्थानत्रयी, त्यातही गीता आणि उपनिषदे मुळातून वाचली तर अतिउत्तम. आय आय टी वाल्यांना हे समजणे अवघड नसावेसे मानण्याचे धार्ष्ट्य करतो आहे.