Welcome to misalpav.com
लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

अगदी अगदी. झालीचे दिवे पार मालवेपर्यंत लोकांची रांग संपतच नाही. यातले किती नंतर खरोखरच वधूचं योगक्षेम पहातात हां संशोधनाचा विषय आहे.

@यातले किती नंतर खरोखरच वधूचं योगक्षेम पहातात हां संशोधनाचा विषय आहे.>>> क्या बोल्या रे.....! वाह!!! दिल की बात छीन ली! समांतरः- पण हे सगळं तुम्ही ऑनस्टेज बोल्लात की मेलात! ;)

कारण देशस्थेतरात ही मंडळी किती असावी? हा प्रश्न निखालसपणे स्वाभिमानाचा आणि देशस्थात मात्र तोच प्रश्न अभिमानाचा!!! हा हा हा. अगदी! लेखन आवडले.

आवडला हाही भाग बुवा!! हल्ली झाल धरतात तसलं लग्न पाहाण्यातच नाही आलं.वैदिक पध्दतीत नसतो वाटतं हा भाग. आमच्या देशस्थांचे निरिक्षण भारीच!!

@वैदिक पध्दतीत नसतो वाटतं हा भाग.>>> हम्म्म.. बरोबर. वैदिक पद्धतीत झाल/सुनमुख नसतं. नामलक्ष्मीपुजन असतं पण ते ही आधी न होता बर्‍याचदा नंतरच होतं. @आमच्या देशस्थांचे निरिक्षण भारीच!!>>> धन्यवाद. :)

मस्त वर्णन.देशस्थांचे वर्णन नेमके.आमच्या नातातल्या बाईंनी लेकाच्या लग्नात झालीला फक्त सासरचेच का? माझ्या माहेरचेहि हवेत अस म्हणून भरपुर वर्‍हाड बोलावले मग सासरची मंडळी;ती ही सख्खी,चुलत सगळी जमा.स्टेज वर कशीबशी मावली सगळी.पूढे अर्धा तास झालीचा कार्यक्रम संपेना. तो प्रसंग डोळ्यापुढे आला आणि हसु आवरेना वाचताना.

@तो प्रसंग डोळ्यापुढे आला आणि हसु आवरेना वाचताना.>>> =)) (काल्पनिक..हां :D ) नातातल्या बाईं :- ए आक्के...येऊ दे की तुज्याकडची सगळी..या रे या वरती..नाय त थांबा..ओ नोकर(स्टेजचे..) लावा की अजुन धा खुर्च्या..बसले आपले बगत! .. ओ गुर्जी तुमी का थांबले? .. सुरु-रहा.. शांतीपा .. सपला का म्हणून.. रामरक्षा म्हना..चलतय..! .. ओ नोकर त्ये झालीच्या दिव्यांना त्येल आना.. गंगे...,तू का प्येंगुळली??? .. हां,बस अशी ता .. झाल आली डोक्याला,की हसायच फोटुत-आलं पायजे-सगळं..! =)) आंम्ही मंत्र फेकुन फेकुन ख....लास! आणि वधुचे माता/पितु: झाल---धरुन..धरुन! =))

कोणत्या गावचे देशस्थ आहेत त्यावर अवलंबून आहे हो गुर्जी! आमच्या लग्नात तर माझ्याकडचे पुणेरी देशस्थ आणि नवर्‍याकडचे कोकणस्थ यांच्यात पाहुण्यांच्या संख्येपासून मदतीच्या ओघापर्यंत, आहेरापासून देण्याघेण्यापर्यंत काहीही एकसारखे नव्हते. नंतर कितीतरी दिवस आम्ही हसत होतो. अजूनही आठवले तर हसू येते.

नंतर एकदा कोल्लापूरला ;) लग्नाला गेलो होतो आणि त्यांची भाषा ऐकून आम्ही खुसुखुसू हसत होतो. त्या लग्नाच्या आदल्या दिवशी दुपारी पोहे मात्र मस्त केले होते. आज अकुंचे पोहेगान वाचून मला तीच आठवण आलीवती.