Welcome to misalpav.com
लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

उगं रडवायचं नाही. आधिच खपल्या सुकल्यात, सातवीला गाव सोडून पुण्यात रहिल्यावर, आईने पाठवलेली पत्रांची पारायणे आसवांबरोबर ,अजून आत आहेत नका त्याला धक्का लावून बाहेर काढू !!

गुर्जी, तुम्ही जबरदस्त लिहिता हो. एकच नंबर. तुमचा काका आवडून गेला आहे. वेदपाठशाळेच्या जगाबद्दल एक भीतियुक्त कुतुहल आहेच. त्यामुळे पुभाप्र.

वेदपाठशाळेच्या जगाबद्दल एक भीतियुक्त कुतुहल आहेच.
होय मलाही. मला लहानपणी माझ्या मुंजीत भिती घातली होती बाबांनी आता अभ्यास केला नाहीस तर वेदशाळेत जायला लावीन पार्ट टाईम म्हणुन मग तिकडे शेंडीला दोरी बांधुन ती छताला अडकवतात. श्लोकम स्त्रोत्र वेळच्या वेळी पाठ झाली नाहीत तर धुरी देतात वगैरे वगैरे...!!!

हा हा हा हा! मला कुतुहल जरा वेगळ्या कारणामुळे आहे. लहानपणी भावेस्कूलच्या मैदानावर क्रिकेटची "मॅच घ्यायला" वेदपाठशाळेची मुलं यायची. मलमलच्या बंड्या आणि धोतराचे काचे मारून झक्क खेळायची. एका "भव्य रबरी बॉल टूर्नामेंट" टाईप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये आम्हाला बेकार कुबलला होता. आम्ही डिफेंडिंग चँपियन्स असूनही. त्यांच्याकडे मंत्रशक्ती असल्यामुळे आपलं काही चाललं नाही, अशी पुडी आमच्या वाड्यातल्या पिटूने सोडली होती. त्याकाळी ते पटलंही होतं. तेव्हापासून वेदपाठशाळा म्हटलं की काहीतरी गूढरम्य वाटतं. हॅरी पॉटरमध्ये हॉगवार्ट्स वाचलं तेव्हा वेदपाठशाळेचीच आठवण झाली होती. :)

वेदपाठशाळेमधील जग ही एक मनाची कठोर परीक्षाच असते का असे कधी कधी वाटते . म्हणजे तोंडाने पुजेचे मंत्र म्हणायचे आणी मन मात्र वयानूसार करीना , कतरीना यांच्यात असते .

@वेदपाठशाळेमधील जग ही एक मनाची कठोर परीक्षाच असते का असे कधी कधी वाटते . म्हणजे तोंडाने पुजेचे मंत्र म्हणायचे आणी मन मात्र वयानूसार करीना , कतरीना यांच्यात असते.>> अत्तीशय खरे बोल्लात. :)

अप्रतीम !! खरे तर या भागापासुन नवीन मालिका सुरू करायला हवी होती. कारण हे सगळं तुमच्याबद्दल आहे.

@खरे तर या भागापासुन नवीन मालिका सुरू करायला हवी होती.

कारण हे सगळं तुमच्याबद्दल आहे.

>>> कृपया गैरसमज नको. :) ह्यातले काहीही व्यक्तिश: माझे किंवा माझ्यावर बेतलेले नाही. हे आंम्हा भटजी लोकांचे प्रातिनिधिक आत्मकथन आहे. जे मी ललितलेखानाच्या आधारे मांडत आहे. :)

सुरेख लिहिताय गुरुजी!लवकर टाका पुढचा भाग. इतर चालू भिक्षुकगिरी करणार्या गुरुजींपेक्षा वेदपाठशाळेतले गुरुजी जी पूजा करतात ती पाहाण्यासारखी आणि ऐकण्यासारखी असते हे अनुभवलं आहे.आमच्या जवळ गुळसुंद्याला तिथे शिकलेले काही गुरुजी आहेत.त्यांनी केलेली पूजा पाहिल्यापासून दुसर्या कुडमुड्या गुर्जींना बोलवायचे बंदच केले!अशाच एका पुस्तक वाचुन पूजा सांगणार्या गुर्जींना मीच पूजा कशी करायची सांगीतली होती!!त्यानंतर ह्या गुळसुंद्याच्या गुरुजीलोकांचा शोध लावला होता!

दणक्यात लिहिताहात. मागे कालडीला गेलो होतो तेव्हा सकाळी पाठशाळेत मांडी घालून ओळीत बसून अंगाला झोके देत जोरजोरात मंत्रपठण करणारी मुले आठवली.

जबरदस्त लिहिले आहे. हासु + आसु दोन्ही एकदम. वेदपाठशाळेची सफर डीट्टेलवारी वाचायची आहे. चिंचवडगावात वाड्यातल्या गणपतीच्या देवळात स्मार्ट, निरागस बटुंना उच्चार चुकल्यावर छडीने रट्टे खाताना पाहिले आहे. सावंतवाडी वेदपाठ्शाळा बाहेरुन पाहिली आहे, हरिश्चंद्रगडावर (तोलारखिंडी मार्गे) जाताना पण एक वेदपाठशाळा बाहेरुनच बघितल्याचे आठवत आहे. आत कसे शिकवत असतील, व्यवस्थापन, जेवणखाण, उपासतापास, चतुर्थीला चंद्रोदयानंतर उपास सोडणे वगैरे असते का तिकडे? नियम मोडले तर शिक्षा काय होतात? वेदपाठशाळेत पण रॅगिंग होते का? हे सर्व वाचण्यास उत्सुक आहे.

खूपच छान आणि एका वेगळ्याच जगाची ओळख! कवळेमठाच्या वेदपाठशाळेतली अगदी ८/९ वर्षांची निरागस मुलं पंचे नेसलेली आणि शेंड्या ठेवलेली बँकेत २५ रुपये ठेवायला नाहीतर ५० रुपये काढायला यायची तेव्हा अगदी पोटात तुटायचं. यातली बरीचशी मुलं घरी अगदी खूप दारिद्र्य असल्याने पोटाची परस्पर सोय होते आणि शिकता शिकता थोडे पैसे मिळून जातात म्हणून बहुतांश कर्नाटकातून इकडे गोव्यात शिकायला आलेली असतात. ही लहानगी नुकती मुंज झालेली पोरं गावच्या अकांउंटला चिरीमिरी पैसे ट्रान्सफर करायची आणि वेळ मिळाला तर घरच्या गप्पा सांगायची ते सगळं आठवलं.

आदूबाळ @गुर्जी, तुम्ही जबरदस्त लिहिता हो. एकच नंबर. तुमचा काका आवडून गेला आहे.>> मनःपूर्वक धन्यवाद! @वेदपाठशाळेच्या जगाबद्दल एक भीतियुक्त कुतुहल आहेच. त्यामुळे पुभाप्र.>> प्रोत्साहनाबद्दल आभार. :) @लहानपणी भावेस्कूलच्या मैदानावर क्रिकेटची "मॅच घ्यायला" वेदपाठशाळेची मुलं यायची. मलमलच्या बंड्या आणि धोतराचे काचे मारून झक्क खेळायची. एका "भव्य रबरी बॉल टूर्नामेंट" टाईप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये आम्हाला बेकार कुबलला होता. आम्ही डिफेंडिंग चँपियन्स असूनही.>>> ह्हा ह्हा ह्हा...! नक्किच ती आमच्या पुणे वेदपाठशाळा आणि पटवर्धन पाठशाळेची मुलं होती. दोन्ही शाळांमधे संध्याकाळी पाठ संपल्यावर,शाळेच्या गच्चीत हा क्रीकेट खेळायचा परिपाठ कधिही चुकलेला नव्हता. आज ते सगळं आठवलं. :) @त्यांच्याकडे मंत्रशक्ती असल्यामुळे आपलं काही चाललं नाही, अशी पुडी आमच्या वाड्यातल्या पिटूने सोडली होती. >>> =)) @त्याकाळी ते पटलंही होतं. तेव्हापासून वेदपाठशाळा म्हटलं की काहीतरी गूढरम्य वाटतं. हॅरी पॉटरमध्ये हॉगवार्ट्स वाचलं तेव्हा वेदपाठशाळेचीच आठवण झाली होती. >>> ते माझ्या अहमदनगरच्या वेदपाठशाळे सारखं सगळ्या शाखा,त्यांचे विद्यार्थी ... ते शिक्षणातले वेगळेपण ..असं भरपूर साम्य आहेच. पण दोन्ही गोष्टी अगदी भिन्न पातळीवरच्या आहेत. :) ==================================== कॅप्टन जॅक स्पॅरो @माझ्या मुंजीत भिती घातली होती बाबांनी आता अभ्यास केला नाहीस तर वेदशाळेत जायला लावीन पार्ट टाईम म्हणुन मग तिकडे शेंडीला दोरी बांधुन ती छताला अडकवतात. >>> =)) पांढर्‍या कांद्याची लगड टांगतात्,ते दिसलं हो एकदम! =)) ही शिक्षा असते.. पण ती अशी नाही.. ती बसल्या बसल्या डुलक्या काढणार्‍या झोपबहाद्दर मुलांना देतात,भिंती जवळ बसवून मागच्या खिळ्याला ताणून शेंडी बांधतात्,म्हणजे मग झोपेनी मान जरा जरी खाली गेली..कि गचकन झटका बसतो! ( =)) ) आणि मग त्या भितिनी झोपेची सवय नंतर मोडते! @श्लोकम स्त्रोत्र वेळच्या वेळी पाठ झाली नाहीत तर धुरी देतात वगैरे वगैरे...!!! >> =)) बाप रे...बाप रे!! नै हो नै! =)) इतकं नस्तं काहि. पण बेताल आणि वांड मुलांना - उपाशी ठेवण्यापासून (शारीरिक इजा होणार नाही अश्या) इतर शिक्षा करतात. तरिही नाही ऐकले,तर घरी हाकलून देतात. :) ===================================== टवाळ कार्टा @बाकी मण्त्रसुध्धा पिच्चरच्या गाण्यांच्या चालीवर म्हटले होते का कधी>>> =)) कार्ट्या.., हे असलेच सुचायचे तुला कहितरी! ;) मंत्र गाण्यांच्या चालिवर म्हटले जात नाहित...मात्र गाणी मंत्रांच्या-चालिनी म्हटली तर अगदी मेंदू"पाठ होतात....... बरं का!!!! :p ======================================== निमिष ध @गुरूजी हे अनोळखी विश्व असेच आम्हाला सांगत रहा. खुप सुंदर झाला आहे हा भाग. >> अत्यंत धन्यवाद! नक्कि सांगत रहाणार आहे. :) ========================================= अजया @इतर चालू भिक्षुकगिरी करणार्या गुरुजींपेक्षा वेदपाठशाळेतले गुरुजी जी पूजा करतात ती पाहाण्यासारखी आणि ऐकण्यासारखी असते हे अनुभवलं आहे.आमच्या जवळ गुळसुंद्याला तिथे शिकलेले काही गुरुजी आहेत.त्यांनी केलेली पूजा पाहिल्यापासून दुसर्या कुडमुड्या गुर्जींना बोलवायचे बंदच केले!अशाच एका पुस्तक वाचुन पूजा सांगणार्या गुर्जींना मीच पूजा कशी करायची सांगीतली होती!!त्यानंतर ह्या गुळसुंद्याच्या गुरुजीलोकांचा शोध लावला होता! >>> ह्हा...ह्हा..ह्हा...! भारी अनुभव! ==================================== कंजूस @सकाळी पाठशाळेत मांडी घालून ओळीत बसून अंगाला झोके देत जोरजोरात मंत्रपठण करणारी मुले आठवली.>>> हम्म्म्म... ते (मंत्रांचे) स्वराघात म्हणताना होतं तसं..पण स्वर-बसे पर्यंतच! एकदा स्वर नीट बसले की अंगच काय? मान देखिल हलवायची गरज पडत नाही. तरिही पुढे इतरत्र मंत्र म्हणताना काहि कारणास्तव मुद्दाम ,हातानी स्वर-दाखवण्याची पद्धत आहे. ========================================== स्पा @अशाच काही लिखाणामुळे मिपावर यावेसे,रहावेसे वाटते. >> धन्यवाद रे पांडोबा. :) =============================================== सौंदाळा @चिंचवडगावात वाड्यातल्या गणपतीच्या देवळात स्मार्ट, निरागस बटुंना उच्चार चुकल्यावर छडीने रट्टे खाताना पाहिले आहे.>>> होय रे होय.. पहिले काहि महिने , प्रत्येकाच्या मातीला तो अपेक्षित मडक्याचा आकार येइपर्यंत या दिव्यातून जावेच लागते.(नगरची पाठशाळा,आणि त्यातले पहिले तीन/चार महिने-हात आणि पाठ लाल होइपर्यंत छड्या/रुळ खाल्लेले सगळे आठवले. :) ) @सावंतवाडी वेदपाठ्शाळा बाहेरुन पाहिली आहे,हरिश्चंद्रगडावर (तोलारखिंडी मार्गे) जाताना पण एक वेदपाठशाळा बाहेरुनच बघितल्याचे आठवत आहे. आत कसे शिकवत असतील, व्यवस्थापन, जेवणखाण, उपासतापास, चतुर्थीला चंद्रोदयानंतर उपास सोडणे वगैरे असते का तिकडे? नियम मोडले तर शिक्षा काय होतात? वेदपाठशाळेत पण रॅगिंग होते का? हे सर्व वाचण्यास उत्सुक आहे.>>> हम्म्म्म... येणार आहे हळूहळू. पण रॅगिंग नाहि होत ..याला कारण पाठशाळेची तंत्र आणि व्यवस्था! अर्थात ज्या सिनियर विद्यार्थ्याला नेमलेला असतो. त्या पात्रांकडून काहि कड्वट म्हणावे असे दादागिरीचे प्रसंग घडतात. पण यापेक्षा आधिक नाही. बाकि मुलांच्या आपापसातल्या मारामार्‍या,एकमेकाचे कपडे पळवणं..दुसर्‍याच्या कपडे भिजवलेल्या बादलीत ,धोतरांना घालायची नीळ गुपचूप टाकणं..असे होस्टेल लाइफ प्रमाणे अनेक गमतीचे प्रसंग होतात... पण यापेक्षा आधिक नाही. :) ========================================== पैसा @खूपच छान आणि एका वेगळ्याच जगाची ओळख! कवळेमठाच्या वेदपाठशाळेतली अगदी ८/९ वर्षांची निरागस मुलं पंचे नेसलेली आणि शेंड्या ठेवलेली बँकेत २५ रुपये ठेवायला नाहीतर ५० रुपये काढायला यायची तेव्हा अगदी पोटात तुटायचं. >> :( @यातली बरीचशी मुलं घरी अगदी खूप दारिद्र्य असल्याने पोटाची परस्पर सोय होते आणि शिकता शिकता थोडे पैसे मिळून जातात म्हणून बहुतांश कर्नाटकातून इकडे गोव्यात शिकायला आलेली असतात. >> अगदी अगदी बरोब्बर आहे हे! सगळ्या पाठशाळां मधे हे प्रमाण असेच आहे. माझ्या वेळी मी आणि आमचा सोलापूरचा पुष्कर व्यास असे दोघे वजा जाता..बाकिची मराठवाड्यातून आलेली ५ जण अश्याच हलाखिच्या परिस्थितीतली होती. @ही लहानगी नुकती मुंज झालेली पोरं गावच्या अकांउंटला चिरीमिरी पैसे ट्रान्सफर करायची आणि वेळ मिळाला तर घरच्या गप्पा सांगायची ते सगळं आठवलं.>> (घरच्या कृपेनी) मला पैसे पाठविण्याइतकी वेळ नव्हती..पण माझ्या दोन्ही पाठशाळांमधल्या अनेकांच्या बाबतीत हे पाहिलं आहे.. आज त्या सगळ्यांची आठवण झाली. :( =================================================

गुरुजी __/\__. आम्ही पण अभ्यास केला पण इतके कष्ट फक्त एम बी बी एस ला काढल्याचे आठवते म्हणजे तेंव्हा वय १८ + असताना. इतक्या कोवळ्या वयात तर नाहीच नाही. एम बी बी एसच्या पहिल्या वर्षाला असताना शेवटच्या महिन्यात इतका अभ्यास बाकी होता कि शेवटच्या सहा ओव्हर्स मध्ये शंभर धावा काढण्यासारखे वाटले. मी दोन दोन तासाच्या हप्त्यात चार वेळेला मिळून आठ तास झोपत असे. म्हणजे रात्री १० ते १२ मग पाहते ४ ते ६ मग सकाळी १० ते १२ आणि परत दुपारी ४ ते ६. ज्यावेळेस होस्टेलमध्ये सर्वात जास्त गडबड असेल तेन्व्हा मी झोपून घेत असे म्हणजे वेळ फुकट जायला नको. मधल्या काळात इतर आन्हिके इ उरकून घेत असे. आमचे वडीलही आम्हाला अभ्यास करताना वेद्पाठ्शाळेचे उदाहरण देत कि त्यांची शेंडी खुंटीला बांधून ठेवत म्हणजे जर डुलकी लागली कि शेंडीला झटका बसत असे. त्याची आठवण झाली.