Welcome to misalpav.com
लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

@तुम्हाला इतके उत्तम गुरु मिळालेभाग्यवान आहात. >> ही माझ्या गुरुजींचीमाझ्या पाठशाळेचि कहाणि किंवा आत्मकथन नाही. :) ही सर्व लेखमाला म्हणजे -(सामान्यत:) आम्हा पुरोहितांचे सामुहिक आत्मकथन आहे. :)

गुरुजी उत्तम लिखाण हाच फरक आहे 'गुरुजी' आणि "शिक्षक". गुरुजी म्हणजे विद्यार्थी घडवणारा आणि शिक्षक म्हणजे पाट्या टाकणारा( कोचिंग क्लासात असणारा) किंवा (संगीत विशारद सारखी) परीक्षा पास करून देणारा.गाणे येते कि नाही याच्याशी घेणे देणे नाही.

आत्मुदा तुमचे गुरुजींनी साक्षर आणि "सु"शिक्षीत यातला नेमका फरक सोप्या आणि सुंदर रित्या सांगीतला आहे. विना विलंब पुढचा भाग टाका ही विनंती.

जरा ते १)ब्रम्हदेवाचा बाप २)ब्राह्मणाचे घरी ३)ताम्हणी घाट ४)पळी पंचपात्र ताह्मण ५)फलम्पुष्पम फलम्त्यक्त्वा / फलन्त्यक्त्वा ६)अब्रम्हण्यम् अब्रह्मण्यम यांचे शुद्ध सांगाल का ?

चला त्यानिमित्ताने कट्टे होतील अणि मिसळपाव माझ्या डेबिटला टाकून ठेवा वल्लीसह भाजेलेणीला भेटूच.कशेळीला वेळ मिळेल की नाही शंकाच आहे.

ये बात आत्मूदा. याचे लवकरात लवकर पुस्तक होवो, आणि त्या पुस्तकाच्या संपादकाला आत्मू-पेशल शैली "दुरुस्त" करायची बुद्धी न होवो ही सदिच्छा.

शैली दुरुस्ती -प्रथमच लेखन प्रकाशित करू इच्छिणारे लेखक प्रकाशकास एकरकमी लेखनहक्क विकतात त्यावेळेस हे मुरलेले प्रकाशक काही सनसनाटी घटना घुसडण्याची लेखकांस विनंती करतात(=गळ घालतात).

हल्ली गुरुर्ब्रम्हा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वरः! गुरु: साक्षात्परब्रम्ह तस्मै श्री गुरुवेनमः!! असे म्हणायच्या योग्यतेचे गुरु फार कमी वेळा लाभतात. तसे तुम्हाला लाभले. नशिबवान आहात. _/\_

इतरही लेख चांगले आहेत. पण गुरुकुलाचे वर्णन केलेले लेख सर्वांत जास्ती आवडले. गुरुकुलात शिकलेल्या एकाशी मध्ये बोलणे झाले. त्याचीही त्या वातावरणाबद्दलची एकूण प्रतिक्रिया तुमच्यासारखीच होती.