Welcome to misalpav.com
लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

काय छान लिहिलंय! एकाच गोष्टीचं पुनःपुन्हा आवर्तन करुन येणाऱ्या sensory deprivation च्या अवस्थेचा त्रास पुरोहितांना कसा होत नाही, या प्रश्नाचं उत्तर आज मिळालं!

व्वा......!!!!!!!! हा भाग पण एकदम सहीच झालाय. भावविश्वाच्या प्रत्येक भागाची आम्ही अगदी चातकाप्रमाणे वाट बघत असतो. पुस्तक प्रकाशित करण्याचे अवश्य मनावर घ्याच.

@भावविश्वाच्या प्रत्येक भागाची आम्ही अगदी चातकाप्रमाणे वाट बघत असतो.>> काय सांगता काय!!!? व्वाह्व्वा! व्वाह्व्वा! व्वाह्व्वा! धन्य तो चातक ! __/\__

हा मंत्रजागर म्हणजे खरोखर एक आनंद सोहळाच असतो. आमचे जठार गुरुजी दर वर्षी नवे नवे काहीतरी शोधुन काढत असतात या कार्यक्रमा साठी. शेवटचा परिच्छेद विषेश आवडला. पैजारबुवा,

+२२२२ हेच म्हणतो की शेवटचा परिच्छेद विषेश आवडला. आणि वाचताना अंगावर काटा आला जणु काही आपण स्वत: अनुभवतोय..

पण मी आणि सुर्‍या मात्र..त्या आंगणातल्या यज्ञकुंडाभोवती समयांच्या मंद प्रकाशामधे त्या शांतपणे लाली सोडत तेवत असलेल्या कुंडातल्या अग्निच्या निखार्‍यांकडे एकटक पहात बसलेलो असायचो! मनाला एकप्रकारची अद्भूत आणि शां....त समाधि अवस्था त्यामुळे प्राप्त व्हायची! "ओम...शांति:शांति:शांति:" हा सांगतेचा शब्द समुह याच अवस्थेचा द्योतक आहे..असे आंम्हाला त्यावेळी वाटायचं. आता इतक्या वर्षांनंतर.."श्रद्धा म्हणजे काय?"- या हज्जारो उत्तरं असलेल्या प्रश्नाचं मूळ.., मला माझ्या त्या अवेस्थेकडे लक्ष गेल्यावर दिसायला लागलेलं आहे. नाहि म्हणायला गुरुजिंनी आंम्हाला तेंव्हाच एकदा इकडे-पहायला लावलेलं होतं.. एकदा मंत्रजागरानंतर सगळी मुलं माणसं जेवली,आणि आंम्ही दोघे मात्र अजुनही नाही.. हे का? असं गुरुजिंनी काकूला विचारताच ..काकू तिच्या थट्टेखोर स्वभाव नुसार गुरुजिंना म्हणाली.." आज भुका नै हो लागायच्या त्यांना ..हाका सुद्धा ऐकू जात नाहियेत..एव्हढे त्या ब्रम्हा"त विलिन झालेत...तिकडे यज्ञमंडपात..बघा तिकडे जाऊन.." मग गुरुजिही काकूला "अगो विलिन काय म्हणत्येस???-एकरूप म्हण!...वेडी ती कुणिकडची!" असा प्रतिटोला देऊन आमच्याकडे आले.. आंम्ही अजुनंही ध्यानस्थच होतो.. मागून गुरुजिंनी आंम्हाला अगदी खांद्याला हात लाऊन उठवलं आणि आंगणातून.. बाहेर गावातल्या रस्त्यानी लांब वडाच्या झाडापर्यंत घेऊन गेले..जाताना आंम्हा दोघांच्या खांद्यावर अगदी समवयस्काप्रमाणे हात ठेवलेले होते. जसे आंम्ही त्या वडाच्या झाडाजवळ आलो..तसे गुरुजिंनी आंम्हाला.. "अरे मुलांनो.. तो अग्निरूपी देव असो..अथवा, हा चांदण्यामधे काहिसा भयप्रद दिसणारा वटवृक्ष! शेवटी हे निसर्गाचे चमत्कार आहेत. त्यामधे इंद्रिंयांपेक्षा ज्ञानानी आपण अडकण.. अधिक अपेक्षित आहे..कारण ज्ञानानी अडकलो,तर त्याची कोडी उलगडत जातात..आणि पंचेंद्रीयांनी अडकत गेलो,तर आणखि कोड्यात पडत जातो. ध्यान धारणा... ही माणूस भानावर रहाण्यासाठी हवी,भान-उडण्यासाठी नको..क्का....य??? तुंम्ही दोघेही ज्या अवस्थेमधे रमत आहात..ती भान उडविण्याकडे नेणारी प्रथमावस्था आहे. आज मी तुम्हाला जागं केलंय,आता उद्यापासून तुमचं तुम्हाला जागं-व्हायचं आहे..हे मंत्रजागरानंतर ध्यानात-जाण्यापूर्विच ध्यानात-घ्या...!!! , क्का....य???" असा आंम्हाला कडक्क-डोस देऊन..बोलता बोलता परत आंगणाकडे घेऊन आलेही..! काकू हे सर्व लांबुनच पहात होती. आणि जसे आंम्ही तिला दिसलो..तशी ती आंम्हाला..."चाला रे पोरांनो...जेवताय ना.??? कि आज मलाहि उपाशीच ठेवणार आहात?" असं म्हणाली. आणि रात्रीच्या त्या अंधारात आंम्हाला आमच्या खर्‍या-मायेचं पुन्हा एकदा दर्शन झालं..!
एकदम खल्लास .... णो वर्डस __/\__

+१ हो.. पण बुवा, खरं सांगु का ? का कोण जाणे, यकुची आठवण आली.. :( (आमी तेव्हा वाचनमात्र होतो पण तरीही बसलेला धक्का जबरदस्त होता)

@का कोण जाणे, यकुची आठवण आली.. Sad>>> आहो.. स्वाभाविक आहे.. मी हि त्याच्यासारखाच मनस्वि..पण त्याच्या इतका सर्वस्वि नव्हे..! हाच काय तो मह्त्वाचा फरक. तन्मयतेच्या बाबतीत तर, यक्कू कितितरी पट पुढे हो आमच्या...! आंम्ही त्याला कुठले शिवायला जाऊ शकणार...? आणि नाहिच जाऊ शकलो शेवटी! :(

पुस्तकलिहा- *ok* पुस्तकलिहा- *ok* पुस्तकलिहा- *ok* पुस्तकलिहा- *ok* पुस्तकलिहा- *ok* पुस्तकलिहा- *ok*

@तीनदा वाचूनही शेवटचं डोक्यावरून गेलं हो बुवा.>>> अरे बाप रे!!! :( तरी मी जमेल तितका हात हलका ठेवतो..असो..१५ ला संमेलनाला रंगवू चर्चासत्र..हा.का.ना.का. ?