Welcome to misalpav.com
लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

देवा मस्तच लिवताय. पुस्तक करा या सगळ्यांचं एक. अवांतर : एक शंका आहे. प्रत्येक भागाच्या नावात 'गुरुजिंचे' मधली पहिली वेलांटी आणि 'भावं विश्व' मधला 'व'वरचा अनुस्वार रसभंग करतोय. त्याला काही विशेष कारण आहे की जस्ट टायपो आहे ती?

@अवांतर : एक शंका आहे. प्रत्येक भागाच्या नावात 'गुरुजिंचे' मधली पहिली वेलांटी >> ती वेलांटि जाणिव पूर्वक पहिली ठेवली आहे. गुरूजी लोकांचे- याचा संक्षेप त्यात(अपेक्षित) आहे. ती दीर्घ ठेवली,तर तिचा अर्थ कोण्या तरी एकाच गुरुजिंचे असा घडेल. म्हणजे तो दीर्घोच्चार, आदरार्थी एकवचनि जाइल. ते नको आहे. :) @आणि 'भावं विश्व' मधला 'व'वरचा अनुस्वार रसभंग करतोय. त्याला काही विशेष कारण आहे की जस्ट टायपो आहे ती? >> "व" - पूर्ण होण्या साठि तसं केलय. 'भाव'असं लिहिलं तर ते (वडा)पाव मधल्या- "पाव" सारखं वाचलं जातं. म्हणून! :)

नवीन लेखन उघडल्यावर सर्वात पहिले गुरुजिंचं --चा भाग कितवा ते पाहतो इतका झपाटलेला झालो आहे. "गुरुजि ब्रम्हाची (ब्रम्+हाची) वर्णी घेऊन बसलेले. ब्रह्माची (ब्रहु+माची)?

@नवीन लेखन उघडल्यावर सर्वात पहिले गुरुजिंचं --चा भाग कितवा ते पाहतो इतका झपाटलेला झालो आहे.>> मन:पूर्वक धन्यवाद. @"गुरुजि ब्रम्हाची (ब्रम्+हाची) वर्णी घेऊन बसलेले. ब्रह्माची (ब्रहु+माची)? >> हवी ती शब्दफ़ोड घ्या. त्याचा अर्थ लागण्याशि काहीच संबंध येत नाही. ते चिकटवलं/चिटकवलं सारखं आहे. :)

यज्ञाच्या देवता म्हणजे इंद्र, वरुणादी वैदिक देवता का? बाकी हल्ली भटजी लोक विटांचे कुंड बांधण्याऐवजी पत्र्याचे रेडीमेड कुंड घेउन फिरताना दिसतात. बाकी तुमचा लेख आणि अग्नीमिळे.... वाचून पाटेश्वरच्या अग्नीमूर्तीची आठवण झाली.

@यज्ञाच्या देवता म्हणजे इंद्र, वरुणादी वैदिक देवता का?>>> होय.. या आणि अश्यासारख्या अनेक! @बाकी हल्ली भटजी लोक विटांचे कुंड बांधण्याऐवजी पत्र्याचे रेडीमेड कुंड घेउन फिरताना दिसतात.>>> ते त्या वेळेसचा खेळ--- जसा/जिथे/आणि जेव्हढा..., लहान/मोठा..., (धर्मशास्त्राप्रमाणे-तथाकथित)-पवित्र/अपवित्र..., - असेल..त्यावर ठरतं असतं. एकच एक..,अस कुठेच/काहिच/कधिच.. निश्चित नाही/नसतं/नसेल. @बाकी तुमचा लेख आणि अग्नीमिळे.... वाचून पाटेश्वरच्या अग्नीमूर्तीची आठवण झाली.>> हम्म्म..अनुषंगिक आहे. ================================= समांतरः- १) अग्नि काढण्याचा---अरणी व मंथा https://lh6.googleusercontent.com/-NLTXMymPk9o/VM0Xx79dhGI/AAAAAAAAG4A/0GvRREzDEW0/s320/1402546668418.jpg २)दोहन करून अग्नि-काढताना! https://lh5.googleusercontent.com/-nj4ok1snX5U/VM0diDKTEFI/AAAAAAAAG4Q/zdykJGWT7-g/s320/1402546656383.jpg ========================================== आमच्या(च) एका मोठ्या अनुष्ठानात घेतलेले फोटो.

@भारत एक खोज ची आठवण झाली .>>> अतिशय धन्यवाद! पण, मला काहि नीट आकलन होत नाहिये..म्हणजे,कशामुळे??? ग्रामिण जीवन लेखनात उतरलय म्हणून? की धर्मसंस्कृतीचा धागा त्यात आहे! म्हणून? :) तेव्हढें कळ्ळें तं बंरें होंइल!

मलाही त्या सीर्यलीचीच आठवण झाली. त्यात वैदिक काळासंबंधित एपिसोडमध्ये अशा विधींचे वर्णन आहे मस्त एकदम. तदुपरि हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. https://www.youtube.com/watch?v=UnbqnMhbB44 १९७५ साली केरळात अग्निचयन नामक यज्ञ अगदी साग्रसंगीतपणे कुठेही काटछाट न करता केला गेला त्याचे चित्रण एका गोर्‍या प्रोफेसरने केलेय. मला तो व्हिडिओ आठवला एकदम.

ह्या निमित्ताने नाणेघाटातील नागनिकेच्या प्रतिमालेखात उल्लेखलेल्या यज्ञांची आठवण झाली. यद्नांची यादीच बघा. दोनदा अश्वमेध एकदा राजसूय अग्नाधेय अन्वारंभणीय अंगारिक सप्तदशातिरात्र भगलदशरात्र गर्गत्रिरात्र गवामयन अंगिरसामयन शतातिरात्र अंगिरसातिरात्र छंंदोपवमानत्रिरात्र त्रय्प्दशत्रितात्र

मस्तच. सातवाहन राजे हिंदू धर्मप्रेमी होते, पण इतके यज्ञबाज असतील असं वाटलं नव्हतं!

येस .. सरव काहि मूळचेच आहे. पण ह्यात प्रामुख्यानी शुक्ल यजुर्वेदाच्या अगदी अल्प उरलेल्या..म्हणजे काण्व शाखेचे सर्व पठण आलेले आहे. सुरवातीलाच.. एका लहान मुलाला..नविन नविन संथा देऊन..मुख्यत्वे करून..त्याला स्वर-म्हणायला शिकविले जात आहेत. अगदी हातानी मान/डोके धरून.. (मेरकू पाठशाळा क्ये पहिले दिनों की यांद आ गई =)) ) नंतर पुढे एका विद्यार्थ्यांच्या समुहाला..संथा देतानाहि दाखविले आहे.. लैच मस्त! धन्यवाद रे ब्याटुचार्या! ;)

हाहा, वेल्कम वेल्कम! तदुपरि घनपाठादि प्रकार नक्की कसे असतात हे वर्णन करून सांगणारा हा अजूनेक छोटास्सा व्हिडो. तुम्हांला नवीन असे यात काही नाही, पण एक रोचक रिप्रेझेंटेषण म्हणून चांगलं आहे- विशेषतः नवीन लोकांना आयड्या चांगली येते. https://www.youtube.com/watch?v=qPcasmn0cRU

फारच वेगळी अन रोचक लेखमाला. =) बाकी यज्ञकुंड दहा फूट खोल हे वाचून डोळे अंमळ खोsल गेले ! उपवासाचे दडपे पोहे खायला उत्सुक आहे. =D

@बाकी यज्ञकुंड दहा फूट खोल हे वाचून डोळे अंमळ खोsल गेले !>>> हे पाहा... https://lh3.googleusercontent.com/-jPVztI-lHT8/VNCFjiwg0aI/AAAAAAAAG4k/xOkxt4ShCjQ/s320/1402546655640.jpg (ता. करमाळा,जि.अहमदनगर..येथिल) प्राचीन कुंड https://lh4.googleusercontent.com/-aderwMIqSi0/VNCFduo9WII/AAAAAAAAG4g/e282xCI7vqk/s320/1402546653426.jpg हे एव्हढे मोठ्ठे लागते..कारण कार्यक्रमापरत्वे- १ अठवडा ते महिनाभर दररोज, लाकुडगाठी,बंबफोड्,गोवर्‍या,तूप,समिधा..आणि इतर आहुतींचे नाना पदार्थ..असे सर्व मिळून ..रोज ३० ते ५० किलोचे जिन्नस आहुती म्हणून पडत असतात..म्हणून ते अश्या मोठ्या आकारांचे असावे लागते. =========================================== @उपवासाचे दडपे पोहे खायला उत्सुक आहे. >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing009.gif बरं..! घ्या मग.. पोहे..शेंगदाणे ,उपाशीमिठ, हिरव्या मिर्च्या, तेल..शहाळ्याचं कवळं खोबरं.. हे सर्व जिन्नस..परातीमधे एकामागून एक टाकत एकत्र चुरडा..भरडा..थोडक्यात..सुरि अगर विळीने..मिर्च्या/नारळ हे बारिक करू नका...हतानीच चुरडून करा.. म्हणजे त्यावर,(काहि धार्मिक उप'वास वाद्यांच्या मताप्रमाणे..) कोणताही संस्कार होणार नाही.. ते नैसर्गिक रहातील.. सगळे चु'रडले / भ'रडले गेले.. कि झाले उपासाचे दडपे पोहे तयार! घ्या आपल्या उपास्य -द्येवाचं नाव..आनी हाना मंग! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing010.gif

आवडल... एक प्रश्न - गणेश याग हे काय प्रकरण आहे. फारस ऐकुन नाही. (प्रश्न वैयक्तीक आहे)

यज्ञकुंड १० फूट खोल लागतं हे माहीत नव्हतं. आता कारण कळलं. अरणी-मंथाच्या मदतीने कमीत कमी (साधारण) किती वेळ लागतो अग्नि मिळवायला?

अश्मयुगीन मानवाबद्दलची एक कादंबरीमालिका वाचत होते. त्यात अगदी असेच लाकडावर लाकूड घासून अग्नी तयार करण्याचे वर्णन आहे. आता आपल्याला कळणारही नाही, किती त्रास होता ते!

उशीरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व . या मालिकेची आठवण होण्याचे आणि एक कारण म्हणजे त्याच्या टायटल ट्रॅकमध्ये यज्ञांत केली जाणारी , वेदांतील देवतांची स्तुती हिंदी भाषेत सुंदरपणे ऐकवली आहे. काही ओळी अशा - "स्रुष्टीसे पहले सत नही था , असतभी नही . अंतरीक्षभी नही , आकाशभी नही था ." आणि " ओ स्रुष्टी निर्माता , स्वर्ग रचेता सुरज रक्षा कर " .