देवा मस्तच लिवताय. पुस्तक करा या सगळ्यांचं एक.
अवांतर : एक शंका आहे. प्रत्येक भागाच्या नावात 'गुरुजिंचे' मधली पहिली वेलांटी आणि 'भावं विश्व' मधला 'व'वरचा अनुस्वार रसभंग करतोय. त्याला काही विशेष कारण आहे की जस्ट टायपो आहे ती?
@अवांतर : एक शंका आहे. प्रत्येक भागाच्या नावात 'गुरुजिंचे' मधली पहिली वेलांटी >> ती वेलांटि जाणिव पूर्वक पहिली ठेवली आहे. गुरूजी लोकांचे- याचा संक्षेप त्यात(अपेक्षित) आहे. ती दीर्घ ठेवली,तर तिचा अर्थ कोण्या तरी एकाच गुरुजिंचे असा घडेल. म्हणजे तो दीर्घोच्चार, आदरार्थी एकवचनि जाइल. ते नको आहे. :)
@आणि 'भावं विश्व' मधला 'व'वरचा अनुस्वार रसभंग करतोय. त्याला काही विशेष कारण आहे की जस्ट टायपो आहे ती? >> "व" - पूर्ण होण्या साठि तसं केलय. 'भाव'असं लिहिलं तर ते (वडा)पाव मधल्या- "पाव" सारखं वाचलं जातं. म्हणून! :)
नवीन लेखन उघडल्यावर सर्वात पहिले गुरुजिंचं --चा भाग कितवा ते पाहतो इतका झपाटलेला झालो आहे.
"गुरुजि ब्रम्हाची (ब्रम्+हाची) वर्णी घेऊन बसलेले. ब्रह्माची (ब्रहु+माची)?
@नवीन लेखन उघडल्यावर सर्वात पहिले गुरुजिंचं --चा भाग कितवा ते पाहतो इतका झपाटलेला झालो आहे.>> मन:पूर्वक धन्यवाद.
@"गुरुजि ब्रम्हाची (ब्रम्+हाची) वर्णी घेऊन बसलेले. ब्रह्माची (ब्रहु+माची)? >> हवी ती शब्दफ़ोड घ्या. त्याचा अर्थ लागण्याशि काहीच संबंध येत नाही. ते चिकटवलं/चिटकवलं सारखं आहे. :)
यज्ञाच्या देवता म्हणजे इंद्र, वरुणादी वैदिक देवता का?
बाकी हल्ली भटजी लोक विटांचे कुंड बांधण्याऐवजी पत्र्याचे रेडीमेड कुंड घेउन फिरताना दिसतात.
बाकी तुमचा लेख आणि अग्नीमिळे.... वाचून पाटेश्वरच्या अग्नीमूर्तीची आठवण झाली.
@यज्ञाच्या देवता म्हणजे इंद्र, वरुणादी वैदिक देवता का?>>> होय.. या आणि अश्यासारख्या अनेक!
@बाकी हल्ली भटजी लोक विटांचे कुंड बांधण्याऐवजी पत्र्याचे रेडीमेड कुंड घेउन फिरताना दिसतात.>>> ते त्या वेळेसचा खेळ--- जसा/जिथे/आणि जेव्हढा..., लहान/मोठा..., (धर्मशास्त्राप्रमाणे-तथाकथित)-पवित्र/अपवित्र..., - असेल..त्यावर ठरतं असतं. एकच एक..,अस कुठेच/काहिच/कधिच.. निश्चित नाही/नसतं/नसेल.
@बाकी तुमचा लेख आणि अग्नीमिळे.... वाचून पाटेश्वरच्या अग्नीमूर्तीची आठवण झाली.>> हम्म्म..अनुषंगिक आहे.
=================================
समांतरः-
१) अग्नि काढण्याचा---अरणी व मंथा
२)दोहन करून अग्नि-काढताना!
==========================================
आमच्या(च) एका मोठ्या अनुष्ठानात घेतलेले फोटो.
@भारत एक खोज ची आठवण झाली .>>> अतिशय धन्यवाद! पण, मला काहि नीट आकलन होत नाहिये..म्हणजे,कशामुळे??? ग्रामिण जीवन लेखनात उतरलय म्हणून? की धर्मसंस्कृतीचा धागा त्यात आहे! म्हणून? :)
तेव्हढें कळ्ळें तं बंरें होंइल!
मलाही त्या सीर्यलीचीच आठवण झाली. त्यात वैदिक काळासंबंधित एपिसोडमध्ये अशा विधींचे वर्णन आहे मस्त एकदम.
तदुपरि हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी.
https://www.youtube.com/watch?v=UnbqnMhbB44
१९७५ साली केरळात अग्निचयन नामक यज्ञ अगदी साग्रसंगीतपणे कुठेही काटछाट न करता केला गेला त्याचे चित्रण एका गोर्या प्रोफेसरने केलेय. मला तो व्हिडिओ आठवला एकदम.
येस .. सरव काहि मूळचेच आहे. पण ह्यात प्रामुख्यानी शुक्ल यजुर्वेदाच्या अगदी अल्प उरलेल्या..म्हणजे काण्व शाखेचे सर्व पठण आलेले आहे. सुरवातीलाच.. एका लहान मुलाला..नविन नविन संथा देऊन..मुख्यत्वे करून..त्याला स्वर-म्हणायला शिकविले जात आहेत. अगदी हातानी मान/डोके धरून.. (मेरकू पाठशाळा क्ये पहिले दिनों की यांद आ गई =)) ) नंतर पुढे एका विद्यार्थ्यांच्या समुहाला..संथा देतानाहि दाखविले आहे.. लैच मस्त!
धन्यवाद रे ब्याटुचार्या! ;)
हाहा, वेल्कम वेल्कम!
तदुपरि घनपाठादि प्रकार नक्की कसे असतात हे वर्णन करून सांगणारा हा अजूनेक छोटास्सा व्हिडो. तुम्हांला नवीन असे यात काही नाही, पण एक रोचक रिप्रेझेंटेषण म्हणून चांगलं आहे- विशेषतः नवीन लोकांना आयड्या चांगली येते.
https://www.youtube.com/watch?v=qPcasmn0cRU
@बाकी यज्ञकुंड दहा फूट खोल हे वाचून डोळे अंमळ खोsल गेले !>>>
हे पाहा...
(ता. करमाळा,जि.अहमदनगर..येथिल) प्राचीन कुंड
हे एव्हढे मोठ्ठे लागते..कारण कार्यक्रमापरत्वे- १ अठवडा ते महिनाभर दररोज, लाकुडगाठी,बंबफोड्,गोवर्या,तूप,समिधा..आणि इतर आहुतींचे नाना पदार्थ..असे सर्व मिळून ..रोज ३० ते ५० किलोचे जिन्नस आहुती म्हणून पडत असतात..म्हणून ते अश्या मोठ्या आकारांचे असावे लागते.
===========================================
@उपवासाचे दडपे पोहे खायला उत्सुक आहे. >> बरं..! घ्या मग.. पोहे..शेंगदाणे ,उपाशीमिठ, हिरव्या मिर्च्या, तेल..शहाळ्याचं कवळं खोबरं.. हे सर्व जिन्नस..परातीमधे एकामागून एक टाकत एकत्र चुरडा..भरडा..थोडक्यात..सुरि अगर विळीने..मिर्च्या/नारळ हे बारिक करू नका...हतानीच चुरडून करा.. म्हणजे त्यावर,(काहि धार्मिक उप'वास वाद्यांच्या मताप्रमाणे..) कोणताही संस्कार होणार नाही.. ते नैसर्गिक रहातील.. सगळे चु'रडले / भ'रडले गेले.. कि झाले उपासाचे दडपे पोहे तयार!
घ्या आपल्या उपास्य -द्येवाचं नाव..आनी हाना मंग!
अश्मयुगीन मानवाबद्दलची एक कादंबरीमालिका वाचत होते. त्यात अगदी असेच लाकडावर लाकूड घासून अग्नी तयार करण्याचे वर्णन आहे. आता आपल्याला कळणारही नाही, किती त्रास होता ते!
उशीरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व . या मालिकेची आठवण होण्याचे आणि एक कारण म्हणजे त्याच्या टायटल ट्रॅकमध्ये यज्ञांत केली जाणारी , वेदांतील देवतांची स्तुती हिंदी भाषेत सुंदरपणे ऐकवली आहे. काही ओळी अशा - "स्रुष्टीसे पहले सत नही था , असतभी नही . अंतरीक्षभी नही , आकाशभी नही था ." आणि " ओ स्रुष्टी निर्माता , स्वर्ग रचेता सुरज रक्षा कर " .
प्रतिक्रिया
क्या बात है आत्मूस,....!!!!!!
+१०००
तो अग्नी प्रज्वलित करायचा
(No subject)
मस्त लिहिलंय हो गुरुजी !!!
मजा येतेय वाचायला. सुरेख
देवा मस्तच लिवताय. पुस्तक करा
त्याला बुवा शैली असे म्हणतात.
@अवांतर : एक शंका आहे.
धमाल जोरात चाललीय लेखमाला !
नवीन लेखन उघडल्यावर सर्वात
@नवीन लेखन उघडल्यावर सर्वात
अतिउत्तम! साधु साधु!
यज्ञाच्या देवता म्हणजे इंद्र,
@यज्ञाच्या देवता म्हणजे इंद्र
हा पण भाग मस्त...
फारच रंगतदार होत चालली आहे ही
+१ तेच म्हणतो.
+२
भारत एक खोज
@भारत एक खोज ची आठवण झाली .>>
मलाही त्या सीर्यलीचीच आठवण
ह्या निमित्ताने नाणेघाटातील
मस्तच.
येस .. सरव काहि मूळचेच आहे.
हाहा, वेल्कम वेल्कम!
फारच वेगळी अन रोचक लेखमाला.
@बाकी यज्ञकुंड दहा फूट खोल हे
एकदम झकास.... लगे राहो बुवा
आवडल...
मस्तच!
@किती वेळ लागतो अग्नि
बापरे!
भारत एक खोज ची आठवण झाली