मीटिंग संपली.
बाया लगबगीने घराकडे परतल्या.
“माज्या घरी चल,” रखमामावशीने हुकूम सोडला.
मला तिच्याबद्दल अधिक जाणून घ्यायची संधी हवीच होती.
गेले .
चहा झाल्यावर ती म्हणाली, “येक पत्तुर लिवायचंय. लिवशील?”
तेवढी मदत मी नक्कीच करू शकते.
तिने एक ‘कार्ड’ आणलं.
ती सांगत गेली तसंतसं मी लिहिलं.
नव-याला होतं पत्र.
त्या वीसेक ओळींत मला तिच्या जगण्याचं चित्र दिसलं.
“पत्ता?” मी विचारलं.
“नाय ठावं”, रखमामावशी म्हणाली.
मी चमकून तिच्याकडे पाहिलं.
“कुठलं गाव?” “त्याचं एखादं पत्र?”
मी विचारलं.
मावशी गप्पच.
“मावशे, पत्र पोचणार कसं?” मी म्हटलं.
तिने डोळे पुसले.
तिची लहानगी पोर बाजूला खेळत होती.
ती म्हणाली, “गावात कुणालाबी नाय ठावं आबाचा पत्त्या”.
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
पत्र टोचलं
हम्म्म्म....
कथा आवडली
++++++१११११११
+१
त्या विसेक ओळीत तिच्या
आवडली.
मावशीच्या मौनात बोलणारी कथा.
_/\_
आई गं!! :((
नेहमीप्रमाणेच छान!
मस्तच!
आवडली !!
ह्या छोट्या लेखातुन सुद्धा
:-/
आवडली
क्या बात है !
सुंदर मांडणी. अस्वस्थ करणारी.
अंतर्मूख करणारी अजून एक कथा...