" अरे .... विनू ?...... अजून घरी नाही गेलास ? ",
" हो. निघतोच आहे सर आता.",
" OK. पण लवकर घरी जा आणि सांभाळून जा.",
"असं .. का सर ?",
"अरे , बाहेर बघितलास का ? पाऊस सुरु होणार आहे म्हणून बोललो."
"पाऊस ?.... आता ?"
" कुठे हरवलेला असतोस कळत नाही. आज तारीख किती आहे माहित नाही वाटते ?",
" नाही सर . खरंच नाही माहित ",
"अरे माणसा, आज ७ तारीख, ७ जून . आज पावसाची सुरवात होते , एवढं तरी माहित आहे ना ? " त्यावर विनू काही बोललाच नाही. पुढे सर बोलले ," चल निघ लवकर . पाऊस बघ किती धरलाय, कधीही सुरवात होईल . छत्री आहे ना?. " पण विनू कुठेतरी दुसरीकडेच हरवला होता. सरांच्या ते लक्षात आले, ते मनात बोलले ," जाऊ दे . हा काय माझ्याकडे लक्ष देणार नाही,त्यापेक्षा मीच जातो,राहू दे त्याला एकट्याला. " आणि त्याचे सर निघून गेले. विनू मात्र तसाच उभा होता.
एका थंड हवेच्या झोताने त्याच्या office ची एक खिडकी उघडली आणि पूर्ण office मध्ये छानसा थंडावा आला. तो थंडावा A.C. पेक्षा ही सुखद होता. कारण त्यात ओलावा होता आणि ओल्या मातीचा सुगंध होता. उघडलेल्या खिडकी जवळ विनू आला. बाहेर बघितलं त्याने. छान पाऊस सुरु झाला होता. काहीजण छत्री नसल्याने आडोश्याला उभे होते, काही जण पहिल्या पावसाचा आनंद घेत होते, एकंदरीत छान वातावरण होते ते. पण विनू कसल्या तरी विचारात होता.
" आज ७ तारीख, ७ जून आणि उद्या ८ जून , हो. उद्याच तिचा वाढदिवस आहे ना. उद्या ती २७ वर्षाची होईल. काय ना,कशी वर्ष गेली पटापट." स्वतःशीच हसला तो. एव्हाना त्याचं सगळ office घरी गेलं होते. तो एका software company मध्ये job ला होता. software engineer होता तो. वय वर्षे २८. दिसायला देखणा, उंच ,गोरापान. एकूणच " Handsome" होता तो . office मध्ये सर्व त्याला ओळखायचे,कारण त्याचं काम सुद्धा चांगला होत त्याचं, "famous" होता office मध्ये तो. फक्त त्याची एक गोष्ट खटकायची आणि ती म्हणजे त्याचा " एकलकोंडेपणा ". गप्प गप्प राहायचा, कधी कोणाशी जास्त बोलायचा नाही, मिसळायचा नाही, कोणी काही विचारलं तरी तेवढ्यापुरताच बोलायचा, कधी कधी कुठे हरवून जायचा तेव्हा तर आपण office मध्ये आहोत, हेच तो विसरून जायचा. आणि पाऊस सुरु झाला कि खिडकीबाहेर कितीतरी वेळ कूठेतरी बघत राहायचा,अगदी पाऊस थांबेपर्यंत, उशिरापर्यंत office मध्ये थांबायचा, कधी कधी घरी सुद्धा जायचा नाही, अगदी विचित्र वागायचा. परंतु सगळ्यांना माहित होते कि तो वेडा नाही आहे. त्यामुळे त्याला कोणी काही बोलायचे नाही. पण विनू असा नव्हता पहिला.
संध्याकाळचे ७ वाजले होते. watchman office मध्ये कोणी आहे का ते बघायला फिरत होता आणि Light's बंद करत होता. चौथ्या मजल्यावर त्याला विनू दिसला," हे साहेब आज पन एकडच राहनार वाटतीया" अस बोलून तो खाली निघून आला. इकडे विनूच्या मनात वेगळंच चालू होतं काहीतरी. " पहिला पाऊस……तिला पण आवडायचा ना. ती पण कूठेतरी भिजत असेल आता.… कूठेतरी……. कूठे असेल ती, तिच्या इकडे सुद्धा पाऊस पडत असेल का ? आज इकडे असती तर छान पैकी पावसात भिजता आले असते तिला ना. ……… इकडे असती तर ना.. मग..... मग ती माझ्या जवळ पण असती आज. " ती म्हणजे विनू ची " Best Friend ", ती म्हणजे विनू ची " कुटूंब ", ती म्हणजे विनू चं सर्व काही होती. विनू कोल्हापूर वरून मुंबई मध्ये आला होता engineering करण्यासाठी, एकटाच. कोणी नातेवाईक नव्हते मुंबई मध्ये. आणि " ती " त्याची मुंबई मधली पहिली " Friend " होती. ती म्हणजे " सुची ".
" सुची " हे काही तिचा खर नाव नव्हते. पण college मध्ये तिला सगळे " सुची " असेच म्हणायचे आणि विनय चे " विनू " हे नामकरण करण्यामागे तिचाच हात होता. तर त्याची ओळख झाली ती college मध्ये, पहिल्या वर्षालाच. पहिल्यातला विनू म्हणजे डोक्यात सुसाट वारा भरलेला मुलगा. चंचल, बडबड्या, थोडासा मस्तीखोर. पण मनानी मात्र चांगला. सगळ्यांना मदत करायला सतत पुढे. धडपड्या होता अगदी. प्रत्येक नवीन गोष्ट आपल्याला आलीच पाहिजे, या वृत्तीचा. तो उत्तम " Dancer " होता, डोक्याने हुशार असल्याने "chess" त्याला कोणी हरवायचे नाही, असा होता विनू . त्याला अनेक गोष्टी आवडायच्या. पण २ गोष्टी तो मनापासून करायचा. पहिल म्हणजे पावसात भिजणं आणि दुसरं - पावसावर कविता करणे. पावसासाठी अगदी वेडा होता तो. पाऊस सुरु झाला कि नुसता धावत सुटायचा भिजायला. त्यामुळे आई वडिलांची अनेक वेळा त्याने बोलणी खाल्ली होती,पण ते तेवढ्या पुरताच. नंतर परत सुरुवात. तो कविता छान करायचा आणि उत्तम अशा कथा सुद्धा लिहायचा, फक्त " Love Story's ". " फक्त " Love Story's " का ? " असा कोणी विचारलं तर सांगायचा , " प्रेम असे काही नसते म्हणून मी त्यावर गोष्टी लिहितो." हे काय बोलायचा ते कोणालाच कळायचं नाही. पण त्याच्या " Love Story's " सगळ्यांना आवडायच्या.
college च्या पहिल्या वर्षी, एका दूपारी विनू घरी चालला असताना अचानक पाऊस सुरु झाला . त्याने पटकन छत्री काढली , कारण त्याचाकडे त्यावेळेस काही Book's होती. ते भिजले तर Problem. म्हणून त्याने छत्री उघडली पण त्याच मन त्याला भिजायला सांगत होता. मग तो काय करायचा, हळूच छ्त्री बाजूला करायचा, जरा भिजायचा परत छत्री सरळ करायचा. तो पण भिजायचा आणि book's पण भिजण्यापासून वाचायची. मज्जा ना, छान idea होती त्याची . त्याचा तो प्रताप बाजूला उभी असलेली एक मुलगी कधी पासून बघत होती आणि अचानक तिने त्याला हाक मारली, " ऐ वेडया.... तूला भिजायचे असेल ना तर ती छत्री मला दे. मला घरी जायचे आहे. " त्याने चमकून मागे बघितलं, बंद दुकानाच्या बाजूला एक मुलगी उभी होती , छत्री नव्हती तिच्याकडे. त्याच्या एवढीच उंची होती तिची जवळपास. गोलाकार चेहरा , जराशी सावळीच होती ती. प्रथम त्याला तिचा राग आला , " मला वेडा म्हणते " , पण नंतर त्याला तिची दया आली. तो तिच्या जवळ गेला आणि बोलला ," मी तुला ओळखत नाही, तर मी माझी छत्री कशी देऊ तुला ? " ," अरे , पण मी तुला ओळखते , तू माझ्याच वर्गात आहेस. बर ते जाऊ दे मला छत्री दे . मला उशीर होतो आहे. तू भिज पावसात. " असं म्हणून तिने छत्री ओढली आणि ती पटापट निघून गेली, त्याला काय घडलं तेच कळल नाही.
( पुढे वाचा.
http://vinitdhanawade.blogspot.in/2013/10/original-love-story-part-1.html
आवडली तर नक्की share करा. )
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
जाहिरात
काय राव! अर्धी गोष्ट
ओरिजनल झैरात?
प्रतिसाद
तुमचा हेतू चांगला आहे; पण मग
आम्हाला काही गरज पडलेली नाही.
हि कथा
ख्खिक्
नाहि हो,
प्रतिसाद
हे बघा
टायपो
प्रतिसाद
स्वतःची कलाकृती जर दुसरे
चोप्य पस्ते
Thank's !!
Thank's to all for helpful