Welcome to misalpav.com
लेखक: विनित राजाराम … | प्रसिद्ध:
" अरे .... विनू ?...... अजून घरी नाही गेलास ? ", " हो. निघतोच आहे सर आता.", " OK. पण लवकर घरी जा आणि सांभाळून जा.", "असं .. का सर ?", "अरे , बाहेर बघितलास का ? पाऊस सुरु होणार आहे म्हणून बोललो." "पाऊस ?.... आता ?" " कुठे हरवलेला असतोस कळत नाही. आज तारीख किती आहे माहित नाही वाटते ?", " नाही सर . खरंच नाही माहित ", "अरे माणसा, आज ७ तारीख, ७ जून . आज पावसाची सुरवात होते , एवढं तरी माहित आहे ना ? " त्यावर विनू काही बोललाच नाही. पुढे सर बोलले ," चल निघ लवकर . पाऊस बघ किती धरलाय, कधीही सुरवात होईल . छत्री आहे ना?. " पण विनू कुठेतरी दुसरीकडेच हरवला होता. सरांच्या ते लक्षात आले, ते मनात बोलले ," जाऊ दे . हा काय माझ्याकडे लक्ष देणार नाही,त्यापेक्षा मीच जातो,राहू दे त्याला एकट्याला. " आणि त्याचे सर निघून गेले. विनू मात्र तसाच उभा होता. एका थंड हवेच्या झोताने त्याच्या office ची एक खिडकी उघडली आणि पूर्ण office मध्ये छानसा थंडावा आला. तो थंडावा A.C. पेक्षा ही सुखद होता. कारण त्यात ओलावा होता आणि ओल्या मातीचा सुगंध होता. उघडलेल्या खिडकी जवळ विनू आला. बाहेर बघितलं त्याने. छान पाऊस सुरु झाला होता. काहीजण छत्री नसल्याने आडोश्याला उभे होते, काही जण पहिल्या पावसाचा आनंद घेत होते, एकंदरीत छान वातावरण होते ते. पण विनू कसल्या तरी विचारात होता. " आज ७ तारीख, ७ जून आणि उद्या ८ जून , हो. उद्याच तिचा वाढदिवस आहे ना. उद्या ती २७ वर्षाची होईल. काय ना,कशी वर्ष गेली पटापट." स्वतःशीच हसला तो. एव्हाना त्याचं सगळ office घरी गेलं होते. तो एका software company मध्ये job ला होता. software engineer होता तो. वय वर्षे २८. दिसायला देखणा, उंच ,गोरापान. एकूणच " Handsome" होता तो . office मध्ये सर्व त्याला ओळखायचे,कारण त्याचं काम सुद्धा चांगला होत त्याचं, "famous" होता office मध्ये तो. फक्त त्याची एक गोष्ट खटकायची आणि ती म्हणजे त्याचा " एकलकोंडेपणा ". गप्प गप्प राहायचा, कधी कोणाशी जास्त बोलायचा नाही, मिसळायचा नाही, कोणी काही विचारलं तरी तेवढ्यापुरताच बोलायचा, कधी कधी कुठे हरवून जायचा तेव्हा तर आपण office मध्ये आहोत, हेच तो विसरून जायचा. आणि पाऊस सुरु झाला कि खिडकीबाहेर कितीतरी वेळ कूठेतरी बघत राहायचा,अगदी पाऊस थांबेपर्यंत, उशिरापर्यंत office मध्ये थांबायचा, कधी कधी घरी सुद्धा जायचा नाही, अगदी विचित्र वागायचा. परंतु सगळ्यांना माहित होते कि तो वेडा नाही आहे. त्यामुळे त्याला कोणी काही बोलायचे नाही. पण विनू असा नव्हता पहिला. संध्याकाळचे ७ वाजले होते. watchman office मध्ये कोणी आहे का ते बघायला फिरत होता आणि Light's बंद करत होता. चौथ्या मजल्यावर त्याला विनू दिसला," हे साहेब आज पन एकडच राहनार वाटतीया" अस बोलून तो खाली निघून आला. इकडे विनूच्या मनात वेगळंच चालू होतं काहीतरी. " पहिला पाऊस……तिला पण आवडायचा ना. ती पण कूठेतरी भिजत असेल आता.… कूठेतरी……. कूठे असेल ती, तिच्या इकडे सुद्धा पाऊस पडत असेल का ? आज इकडे असती तर छान पैकी पावसात भिजता आले असते तिला ना. ……… इकडे असती तर ना.. मग..... मग ती माझ्या जवळ पण असती आज. " ती म्हणजे विनू ची " Best Friend ", ती म्हणजे विनू ची " कुटूंब ", ती म्हणजे विनू चं सर्व काही होती. विनू कोल्हापूर वरून मुंबई मध्ये आला होता engineering करण्यासाठी, एकटाच. कोणी नातेवाईक नव्हते मुंबई मध्ये. आणि " ती " त्याची मुंबई मधली पहिली " Friend " होती. ती म्हणजे " सुची ". " सुची " हे काही तिचा खर नाव नव्हते. पण college मध्ये तिला सगळे " सुची " असेच म्हणायचे आणि विनय चे " विनू " हे नामकरण करण्यामागे तिचाच हात होता. तर त्याची ओळख झाली ती college मध्ये, पहिल्या वर्षालाच. पहिल्यातला विनू म्हणजे डोक्यात सुसाट वारा भरलेला मुलगा. चंचल, बडबड्या, थोडासा मस्तीखोर. पण मनानी मात्र चांगला. सगळ्यांना मदत करायला सतत पुढे. धडपड्या होता अगदी. प्रत्येक नवीन गोष्ट आपल्याला आलीच पाहिजे, या वृत्तीचा. तो उत्तम " Dancer " होता, डोक्याने हुशार असल्याने "chess" त्याला कोणी हरवायचे नाही, असा होता विनू . त्याला अनेक गोष्टी आवडायच्या. पण २ गोष्टी तो मनापासून करायचा. पहिल म्हणजे पावसात भिजणं आणि दुसरं - पावसावर कविता करणे. पावसासाठी अगदी वेडा होता तो. पाऊस सुरु झाला कि नुसता धावत सुटायचा भिजायला. त्यामुळे आई वडिलांची अनेक वेळा त्याने बोलणी खाल्ली होती,पण ते तेवढ्या पुरताच. नंतर परत सुरुवात. तो कविता छान करायचा आणि उत्तम अशा कथा सुद्धा लिहायचा, फक्त " Love Story's ". " फक्त " Love Story's " का ? " असा कोणी विचारलं तर सांगायचा , " प्रेम असे काही नसते म्हणून मी त्यावर गोष्टी लिहितो." हे काय बोलायचा ते कोणालाच कळायचं नाही. पण त्याच्या " Love Story's " सगळ्यांना आवडायच्या. college च्या पहिल्या वर्षी, एका दूपारी विनू घरी चालला असताना अचानक पाऊस सुरु झाला . त्याने पटकन छत्री काढली , कारण त्याचाकडे त्यावेळेस काही Book's होती. ते भिजले तर Problem. म्हणून त्याने छत्री उघडली पण त्याच मन त्याला भिजायला सांगत होता. मग तो काय करायचा, हळूच छ्त्री बाजूला करायचा, जरा भिजायचा परत छत्री सरळ करायचा. तो पण भिजायचा आणि book's पण भिजण्यापासून वाचायची. मज्जा ना, छान idea होती त्याची . त्याचा तो प्रताप बाजूला उभी असलेली एक मुलगी कधी पासून बघत होती आणि अचानक तिने त्याला हाक मारली, " ऐ वेडया.... तूला भिजायचे असेल ना तर ती छत्री मला दे. मला घरी जायचे आहे. " त्याने चमकून मागे बघितलं, बंद दुकानाच्या बाजूला एक मुलगी उभी होती , छत्री नव्हती तिच्याकडे. त्याच्या एवढीच उंची होती तिची जवळपास. गोलाकार चेहरा , जराशी सावळीच होती ती. प्रथम त्याला तिचा राग आला , " मला वेडा म्हणते " , पण नंतर त्याला तिची दया आली. तो तिच्या जवळ गेला आणि बोलला ," मी तुला ओळखत नाही, तर मी माझी छत्री कशी देऊ तुला ? " ," अरे , पण मी तुला ओळखते , तू माझ्याच वर्गात आहेस. बर ते जाऊ दे मला छत्री दे . मला उशीर होतो आहे. तू भिज पावसात. " असं म्हणून तिने छत्री ओढली आणि ती पटापट निघून गेली, त्याला काय घडलं तेच कळल नाही. ( पुढे वाचा. http://vinitdhanawade.blogspot.in/2013/10/original-love-story-part-1.html आवडली तर नक्की share करा. )
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

अनेक वेळा माझ्या कविता आणि कथा चोरण्याचा प्रयन्त झाला आहे. त्यामुळे मला अर्धी गोष्ट इकडे पोस्ट करावी लागली…. Sorry For That. तुम्ही पूर्ण कथा ब्लॉगवर वाचू शकता.

तुमचा हेतू चांगला आहे; पण मग अर्धीतरी कशाला टाकायची? शिवाय चोरी करणारे कुठुनही चोरु शकतात. असो. पूर्ण न वाचल्यामुळे कथेवर मतप्रदर्शन करत नाही.

आम्हाला काही गरज पडलेली नाही.. तुम्हाला जर नियमित मिपाकर होऊन पूर्ण लिखाण इथे द्यायचं असेल तर सरळपणे द्या.... नाहीतर मारलं तुम्हाला फाट्यावर! च्यायला, नवोदितांचं कौतुक करावं तर जास्तच शाणपणा सांगायला लागलेत!!!!!! संचालक मंडळः माझ्या सांगण्यात जर काही अधिक उणं असेल तर खुशाल माझ्यावर कारवाई करा.... माफ करा, पण सहन करायला पण काही लिमिट असते....

चोरी करायला चोर तेवढ्याच ताकदीचा नको का? आहेत असे ताकदवान लेखक? सांगा सांगा . माझ्या निरागस आणि genuine प्रदिसादाला वेगळे रूप दिल्या बद्दल णिशेध

सगळ्यांच्या प्रतिक्रिये बद्दल आभारी आहे. तरी सुद्धा एक सांगावेसे वाटते कि माझ्या ब्लॉग वरच्या काही कथा , कविता…. whatsapp. Facebook वरून नाव बदलून पोस्ट केलेल्या आहेत खूप जणांनी, त्यामुळे मी ब्लॉगची लिंक दिली होती. For Example, माझी " वडिलांस पत्र " नावाची कविता…. whatsapp वरून मलाच कोणी तरी send केली होती. तरीसुद्धा प्रतिक्रिये बद्दल आभारी आहे. पुन्हा मी या ब्लॉग वर माझ्या कथा पोस्ट करणार नाही… माफी असावी.

तुम्ही तुमचं लिखाण पूर्णतः इथे देउन जर स्वाक्षरीमध्ये तुमच्या धाग्याची लिंक जर दिली असतीत तर काही हरकत नव्हती... पण तुम्ही थोडाच भाग इथे देऊन (टीझर दिल्याप्रमाणे) मग उरलेली कथा माझ्या ब्लॉगवर वाचा म्हंटलंत म्हणुन प्रॉब्लेम झाला. इथे लिखाण करणार्‍या बहुतेकांचे स्वतःचे ब्लॉग्ज आहेत आणि ते इथे लिखाण टाकतानाच स्वतःच्या ब्लॉग्जवरही टाकतात. त्यात काहीच गैर नाही. पण थोडा भाग इथे टाकून मग उरलेलं माझ्या ब्लॉगवर वाचा म्हणायचं याला आक्षेप आहे, इतकंच. तुम्ही आता यातून धडा घेऊन जर इथे तुमचं लिखाण पूर्णतः टाकलंत तर तुमचं स्वागतच आहे. पण...
पुन्हा मी या ब्लॉग वर माझ्या कथा पोस्ट करणार नाही… माफी असावी.
हा जर अ‍ॅटिट्यूड असेल तर तुमची इच्छा! दुसरं काय म्हणणार?

"हा जर अ‍ॅटिट्यूड असेल तर तुमची इच्छा! दुसरं काय म्हणणार? " या गोष्टीला " अ‍ॅटिट्यूड " अस नाही म्हणत. याला काळजी म्हणतात. स्वतःची कलाकृती जर दुसरे चोरणार असतील तर कोणालाही दुःख होणार. आणि मला प्रतिक्रियेबद्दल वाईट नाही वाटत. फक्त त्या कलाकृती पुन्हा कोणी चोरी करू नये हा माझा प्रयन्त होता.

स्वतःची कलाकृती जर दुसरे चोरणार असतील तर कोणालाही दुःख होणार.
समजू शकतो. पण तुम्ही या संस्थळावर नवीनच येताय. मला वाटतं ही तुमची पहिलीच पोस्ट असावी. जर तुम्हाला इथले सभासद तुमच्या शब्दात सांगायचं तर तुमची कलाकृती चोरण्याची शंका वाटत असेल, तर इथे पब्लिश करायचंच कशाला म्हणतो मी? इथे कोणीतरी सभासद असे आहेत की जे तुमची कलाकृती चोरणार असं तुम्ही ध्वनित करताय हा इथल्या सभासदांचा अपमान आहे असं तुम्हाला वाटत नाही का? असो. मला जे सांगायचं ते मी सांगितलं, बाकी तुम्ही जाणे आणि इथलं संचालक मंडळ जाणे!!!

          अशी त्यांची पहिली भेट होती. त्याची छत्री तर त्याला मिळालीच नाही,नवीन मैत्रीण मात्र भेटली. त्यांचे पहिले वर्गात कधी पटले नाही, सारखे भांडत असायचे ते. नंतर हळूहळू दोघांना एकमेकांची सवय होऊ लागली. तो एकटाच आला होता मुंबईला,तिच्यामुळे त्याचा केवढा मोठा group तयार झाला होता. विनू तर पहिल्यापासूनच famous होता college मध्ये. त्याचा लूक सगळ्यांना आवडायचा. त्याच्या कविता , " Love story's " college मध्ये खूप famous झाल्या होत्या. सगळ्या मुलींना तो आवडायचा. खूप जणींनी तर त्याला Propose सुद्धा केलं होतं, विनूचा " प्रेम " या गोष्टी वर विश्वास नव्हता,विश्वास होता तो " Friendship " वर आणि "सुची "वर . पण  तिच्या मनात काही वेगळच होत . सुरवातीला जरी त्यांचे पटत नसले तरीहि नंतर तिला विनू आवडायला लागला होता. त्याच्या वाचून तिचा काही करमायाचेच नाही. तिला सारखं विनू जवळ असावा अस वाटायच, विनू ला तिच्या मनातला काहीच माहित नव्हतं. तिनेही त्याला काही कळू दिले नाही.  असच एक वर्ष निघून गेलं. " सुची " विनूची " Friend " पासून " Best Friend " झाली होती,एकत्र college ला जायचे ,घरी एकत्र निघायचे ,एकाच डब्यात जेवायचे , एकमेकांसाठी जागा अडवून ठेवायची आणि एक गोष्ट दोघांमध्ये common होती ती म्हणजे पावसात भिजणे . एकत्रच भिजायचे . ८ जून ला तिचा वाढदिवस असायचा , त्या दिवशी तर किती मजा  केली होती सगळ्यांनी ,पण केक कापण्याच्या अगोदर " सुची '' एक वाक्य बोलली, " हा वाढदिवस मला जन्मभर लक्षात राहील,कारण आज मला कळल कि खर प्रेम काय असते ते, आणि आज मला ते भेटलं आहे" हे अस का बोलली ती ते कोणालाच कळल नाही , त्या वाक्याचा तो रात्र भर विचार करत होता ,आणि अचानक बाहेर पाऊस  सुरु झाला . मग काय , विनू बाहेर पडला पावसात भिजायला ."एका ठिकाणी उभा राहून काय भिजायचे ?" म्हणून तो चालू लागला . चालता चालता अचानक तो थांबला . विचार करता करता विनू , " सुची " च्या घरासमोर आला होता नकळतपणे . त्याला कळलंच नाही तो तिकडे कसा आला. आणि समोर " सुची " होती पावसात भिजत, तिलाही आश्चर्य वाटलं विनूच. दोघे कितीतरी वेळ एकमेकांना बघत उभे होते. पाऊस थांबला तरी ते तसेच होते. थोडयावेळाने दोघे ही भानावर आले, एकमेकांना काही बोलले नाहीत फक्त हातानेच " bye " केले आणि विनू घरी आला . पावसात त्याला नेहमीच आनंद देणाऱ्या गोष्टी मिळाल्या होत्या, या पावसात त्याला वेगळाच अनुभव आला होता , " याला मैत्री नाही म्हणत ना , मग हे काय प्रेम आहे. इतके सुंदर असते प्रेम ?" आज त्याला  झोप येत नव्हती, एका वेगळ्याच आनंदात होता तो , दुसऱ्या दिवशी college ला जायचे म्हणून त्याला बळजबरीने झोपावे लागले.     
फक्त त्या कलाकृती पुन्हा कोणी चोरी करू नये हा माझा प्रयन्त होता. असे पण कॉपी पेस्ट करता येते बरं का ! जालावर काहीच सुरक्षित नाही. बाकी तुमची कलाकृती चोरण्यात काहीही इंतरेस्त नाही