बढाया मारणे, समोरच्याला कमी लेखणे हा मानवी स्वभावाचा भाग आहे. पण हे करत असताना बऱ्याच वेळा लोकं भानंच ठेवत नाही. मला याविषयी आलेले काही अनुभव खाली मांडतो आहे.
वधु संशोधनाचे दिवस होते त्यावेळेची गोष्ट. नागपूरला 'पाहण्याचा' कार्यक्रम ठरला. त्यांच्या घरी गेल्यावर चहापाणी झाले. मोठ्यांच्या गप्पा सुरु होत्या. तेवढ्यात साधारण चाळीशीत असणारे मुलीचे काका आले. ते रेल्वे मध्ये कुठल्याश्या विभागात क्लरीकलला होते. ओळख झाल्यावर त्यांनी मला प्रश्न विचारायला सुरवात केली.
"तुमचं इंजिनीरिंग कुठल्या विषयात झालंय ?"
"मेकॅनिकल!”(मनात: बायोडाटा बघितला नाही का बे?)
"अरे वा! कुठल्या कंपनीत काम करता?”
"क्ष कंपनीत"
"कधी नाव ऐकलं नाही. नवीन आहे का?”
"नाही. ३५ वर्ष जुनी आहे."
"अच्छा! तसा मी १९८४ चा डिप्लोमा होल्डर आहे मेकॅनिकल! मला ही इंडस्ट्री चांगलीच माहिती आहे. हे नाव पहिल्यांदाच ऐकलं”
"तुम्ही कोणत्या कंपनीत होतात?”
"नाही नाही ! मी पहिलेपासून रेल्वेतच आहे."
च्यामारी! आम्ही सहा -सात वर्षापासून घासतोय तरी या इंडस्ट्रीचा आवाका अजून कळेना अन ह्याला डिप्लोमा घेऊन अख्खी इंडस्ट्री कळली!
एकदा कंपनीत चर्चा सुरु होती. आमचे एक अत्यंत अनुभवी वरिष्ठ (ईलेकट्रीकल इंजीनियर), साईटवरचे अनुभव सांगत होते. आम्ही सगळे भक्तीभावानी ऐकत होतो.
"अरे रात्रभर त्या ट्रान्सफॉर्मर चे ईरेकशन सुरु होतं. २५००० KVA चा होता तो......"
तेवढ्यात एक नुकताच साईट वरून आलेला मॅनेजर पचकला.
"काहीही नका सांगू हो. ट्रान्सफॉर्मर लावणं एवढं कठीण असतं होय? आम्ही तर असं हातांनी झेलत झेलत लावायचो ट्रान्सफॉर्मर !"
ते वरिष्ठ एकदम स्तब्ध झाले. आणि शांतपणे म्हणाले.
"ट्रान्सफॉर्मर डिझायनिंगचं पुस्तकसुद्धा असं हातात झेलता येत नाही. तू ट्रान्सफॉर्मर लावला की खोलीतला टेबलफॅन?”
एकदा घरी एक ओळखीतले गृहस्थ आले होते. त्यावेळी नुकतंच कपिल देव ला "विस्डेन इंडियन क्रिकेटर ऑफ द सेन्चुरी" हा पुरस्कार घोषित झाला होता. त्या गृहस्थांच आणि कपिल देवचं काय वाकडं होतं कोणास ठाऊक पण या घटनेवर झालेली चर्चा खालील प्रमाणे
" अत्यंत चुकीचा निर्णय आहे हा ?"
"का हो ? असं का म्हणताय ?"
"कपिल देव ची लायकीच नाहीये !"
(अरे बापरे...माझ्या एका श्रद्धास्थानाला धक्का पोहोचला होता!)
"असं तुम्हाला वाटतं!"
"मी सुद्धा क्रिकेट खेळलोय म्हटलं..महाराष्ट्राच्या रणजी टीम मध्ये होतो. कपिल देव आयुष्यभर खेळला ते फक्त एका मॅचच्या भरवश्यावर.. ती पण झिम्बाब्वे विरुद्ध ..१७५ काढले होते"
"म्हणजे त्याआधी आणि त्यानंतर, तो कधीच चांगला खेळला नाही???”
"नाही..!!"
"तुम्ही किती वर्ष खेळला महाराष्ट्राकडून?"
"एक सीझन खेळलोय. त्यातही एका मॅचमध्ये प्लेयिंग एलेव्हन मध्ये होतो"
देवां.....ज्या मॅचच्या भरवश्यावर कपिल देव आयुष्यभर खेळला असं म्हणतायेत त्यात तो कॅप्टन होता हो...आणि वर्ल्ड कप जिंकलो त्यावेळी आपण ! आणि हे एका सीझन च्या भरवश्यावर विस्डेन च्या ज्युरींना अक्कल शिकवतायेत !
माझ्या एका मित्राला तर बढाया मारण्याची सवयच जडली होती. कोणताही विषय काढला की तो सुरु व्हायचा. बोलण्याचा सूर साधारण असा असायचा ," माझे एक काका US ला आहेत ..वगैरे वगैरे..." त्याचे काका किंवा मामा जगातल्या सगळ्याचं देशांमध्ये होते. ते कमी पडलेच तर दादा आणि ताई तर अगणित होत्या. एकदा असंच कोणत्यातरी विषयावर चर्चा सुरु होती. तो घाईघाईने म्हणाला.
"चल मी निघतो."
"अरे कुठे चालला एव्हढ्यात."
"अरे मला दादाकडे जायचंय."
(एवढी चांगली संधी मी कशी सोडणार !)
"अरे थांब ...संध्याकाळी US साठी कोणतीच फ्लाईट नाहीये !!! "
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
शेवटच्या प्रसंगावरून एक विनोद
हा हा हा........
डोक्यात जातात अशी लोक
कंपनीतल्या एकाने तर कहर केला
ढिशक्याव...........
जबरी
गण्या :- अरे माझे बाबा फार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bhare Naina... :- { Ra One }माझे काही नातेवाईक असे आहेत,
खरंच मस्त !!
लेख आवडला
फेकू किस्को बोला रे! :-)
अर्रे तुम लोकल बस्तिके...चीप
माकी कीरकीरी !!
ये बैंगनजैसी बातां वो
चीटिंग आहे राव!!
आमच्यासारख्या बढाया मारणार्
तिथनं जरा पुढं गेलं तरी