Welcome to misalpav.com
लेखक: कपिलमुनी | प्रसिद्ध:
मानसिक त्रास काल ७ एप्रिल रोजी माझ्या आईची पुणे येथील पासपोर्ट ऑफिसची ३:४५ ची अपाँटमेंट होती. १.व्यवस्थित भरलेला फॉर्म २.रीसीट ३.आधार कार्ड ४ पॅन कार्ड ५. शाळा सोडल्याचा दाखला ६.दहावीचे बोर्ड सर्टीफिकेट ७. अ‍ॅनेक्चर डी ( लग्नानंतरचे नाव बदलल्यासाठी) ८.अ‍ॅनेक्चर ए ( जन्मगाव ) ९. लाइट बिल १०. राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक (१ वर्षा हूनही जुने) वरील सर्व मूळ कागदपत्रे आणि त्याम्च्या सेल्फ अ‍ॅटेस्टेड झेरॉक्सचे २ सेट असे नेले होते. प्रचंड गर्दी आणि २.५ तास वाट पाहिल्यानंतर नंबर आला . पहिल्या ठिकाणी सर्व कागदपत्रे तपासून "ओके" चा शेरा मिळाला पुढे दुसर्‍या काउंटरवर फोटो हाताचे ठसे घेतले . एवढे होईतो ७ वाजत आले होते. पुढील माणसाने कोणतीही माहिती न देता "insuffiecient documents" असा शेरा मारला . त्याला कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करायची आहे हे विचारले असता. त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली आणि दुसर्‍या काउंटरवर पाठवले ( त्याला मराठी येत नव्हते आणि आइचे हिंदी- इंग्लिश कच्चे आहे). आणि त्याने पुढची तारीख २१ मे टाकली आणि निघून गेला. दुसर्‍या काउंटरवर तिथल्या महिलेने कागदपत्रे तपासली आणि योग्य असल्याचा निर्वाळा दिला. पण तोवर हा मनुष्य सीस्टम बंद करून निघुन गेला होता. त्या महिलेने सांगितले एकदा तुमचा अ‍ॅप्लीकेशन ऑन होल्ड स्टेटस वर गेले तर पुन्हा त्या तारखे शिवाय काहीच करू शकत नाही. या प्रकारात ८ वाजून गेले होते. प्रंचंड मनस्ताप झाला होता आणि पासपोर्ट ची पुढची तारीख २१ मे ( ४५ दिवसानंतरची) मिळाल्यामुळे बर्‍याच प्लॅनवर पाणी फिरले आणि यात कोणतीही चूक नसताना ! दुर्दैवाने या विरूद्ध कुठेही तक्रार करायची सोय नाही . फीडबॅक मधे लिहा किंवा कॉल सेंटरला कॉल करा ठराविक साच्याची उत्तरे मिळतात पण बेजबाबदार कर्मचार्यांची तक्रार करण्याची आणि कारवाईची सोय कुठेही नाही. अशा गोष्टी टाळण्यासाठी १. महाराष्ट्रात मराठी भाषिक कर्मचारी / अनुवादक असावेत. २. प्रत्येक कर्मचार्‍याने काम न होण्याचे कारण लिखित स्वरूपात द्यावे. ३. तक्रार नोंदणी आणि कारवाइ विभाग असावा (अशी दिवास्वप्ने आहेत). प्रत्येक सरकारी विभागात अशीच रड असते.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

प्रत्येक सरकारी विभागात अशीच रड असते. असली बेजबाबदार विधाने करायची असतील तर कृपया अधिक चांगला देश पहा आणि सुखाने रहा. सरकारी कर्मचारी काही दुसर्‍या देशातून येतात का ? तुमच्यासारख्या जनतेमधूनच येतात ना हा लेख अतिशय ढोंगी वाटतो आणि आपल्याला फटका बसला की इतरांना जबाबदार धरणार्‍या प्रवृत्तीचा वाटतो. या ऑफीसमधे अनेकांना आजवर उत्तमच अनुभव आलेला आहे. काही भाग टी सी एस आणि काही परराष्ट्र मंत्रालयाकडे आहे. सर्वजण अत्यंत सौजन्याने वागतात. रोज एवढ्या मोठ्या संख्येत येणार्‍या लोकांचे काम हाताळायचे आणि तरी चेहेरा हसतमुख ठेवायचा हे कौतुकास्पद आहे. यात काडीचीही अतिशयोक्ती नाही. अगदी बाहेर केवळ शंका विचारण्यासाठी एक माणूस बसलेला आहे. रोज लोक येऊन त्याला पिडतात तेच तेच प्रश्न विचारतात पण तो तितक्याच उत्साहाने उत्तरे देतो. दिलेल्या वेळेच्या स्लॉटमधे गेल्यास कामे व्यवस्थित होतात. अलिकडे तर पैसे भरणे आणि नंबर लावणे हे दोन्ही ऑनलाइन झाले आहे. त्यामुळे सुटसुटीतपणा आलेला आहे. कंप्युऊटर नव्हता तेव्हाही गडबड गोंधळ अजिबात नव्हता. कारण माणसे शिस्तीची आहेत. आता यातूनही कुणाला काही त्रास झाला असेल तर त्यांनी आपले काय चुकले हे आधी सांगावे मिसळीकडे दाद मागायला येऊ नये.

वा वा ! (अगदी हितसंबंधांचा सुवास यावा इतका गोग्गोड प्रतिसाद, असा विचार मनात आला. पण ते म्हणायचे टाळत आहे. ;) ) कंप्युऊटर नव्हता तेव्हाही गडबड गोंधळ अजिबात नव्हता. कारण माणसे शिस्तीची आहेत. कुठल्या ग्रहावर ही स्थिती होती हे सांगितले असते तर बरे झाले असते !? :) फार पूर्वीही अर्ज दाखल केला की ६ ते ८ आठवड्यात पासपोर्ट मिळायचा. आता पोर्टलवरून साधारण (ऑर्डिनरी) अपॉईंटमेंट सहा आठवड्यांच्या नंतरची मिळते आणि पासपोर्ट त्यांनतर सहा आठवड्यांनी... म्हणजे एकूण बारा आठवड्यांनी पासपोर्ट मिळतो ! काही कारण नसताना पासपोर्ट अर्ज केल्यानंतरही ३ महिने नविनिकरण करून दिला नाही तेव्हा पासपोर्ट अधिकार्‍याला भेटून जरा जोरात नक्की कारण विचारले तरी ते सांगता आले नाही. मात्र याचा फायदा नविन पासपोर्ट आठवड्यात मिळण्यात झाला ! का बरे ? आजही पोर्टलवर ज्या प्रती जोडव्या त्यांची यादी आहे ती खूप जुनी आहे. तिच्या योग्य ते बदल केले जात नाहीत. तरीही लोकांनी अंतर्ज्ञानाने ते ओळखावे नाहीतर कोणतीही तक्रार न करता पुढच्या (४-६ आठवड्यांनतरच्या) तारखेला परत यावे, यात काही गैर आहे असे तेथल्या शासनाला वाटत नाही. अर्थात, लोक कंटाळून अथवा वेळेच्या कमीमुळे एजंटतर्फे जादा फी भरून आले तर आनंदाचीच गोष्ट आहे, नाही का ? आजही तत्काळ पासपोर्टची अपॉईंटमेंट पोर्टलवर ऑनलाईन मिळत नाही, पण एजंटला हवी तेवढी फी दिली की दोन दिवसानंतरची मिळते ! भारतिय पासपोर्ट ऑफिस भारतातले असो परदेशातले, त्यांच्या कारवाईमध्ये खूप सुधारणा व्हायला हवी आहे हे नक्की.

तुमच्या मताशी एकंदरीत सहमत आहे. भारतातल्या बहुतेक सरकारी कार्यालयांमध्ये चांगलाच अनुभव आला आहे. एसबीआय वगळता इतर बँकांमध्येही खूपच चांगला अनुभव आहे. माझा सामान्य प्रक्रियेतून पासपोर्ट काढताना व बायकोचा तात्काळ प्रक्रियेतून पासपोर्ट काढताना भारतात कुठलाही त्रास झाला नाही. माझ्या ओळखीतल्या निदान २५ जणांनी पासपोर्ट काढलेत त्यांनाही काहीही त्रास झाला नाही. माझ्या आईवडिलांना पासपोर्ट काढताना कुठलाही त्रास झाला नाही. मला नंतर पासपोर्ट रिन्यू करतानाही कुठलाही त्रास झाला नाही. भारतात तीन वेळा लायसन/आरसी पत्र/गाडीविक्रीचे कागदपत्र इ. साठी जावे लागले. तिन्ही वेळा एजंट न वापरता वेळेवर लायसन व आवश्यक ती कागदपत्रे मिळाली. लायसन मिळाले तेसुद्धा २० वर्षाचे. रेशनकार्ड काढताना काडीचाही त्रास झाला नाही. गॅस कनेक्शन, फोन सेवा वगैरेमध्ये काहीही अडचण आली नाही. फोनसेवेच्या बाबतीत खाजगी कंपन्यांपेक्षा (रिलायन्स, आयडिया व एअरटेल) सरकारी कंपन्यांचा (बीएसएनएल) अनुभव चांगलाच आलाय. याउलट गाडी चालवायच्या लायसनसाठी मला अमेरिकेत प्रत्येक वेळी प्रचंड त्रास झाला आहे. भारतात मी एजंट वगैरे वापरला नाही पण त्रास झाला असता तर निदान तो पर्याय तरी होता. अमेरिकेत तीनचारवेळा लायसन रिन्यूअल करताना इथल्या कार्यालयांमधला प्रचंड वेळखाऊपणा आणि मंदबुद्धी कर्मचारी पाहून वैताग आला. भारतात मला दोन तासात लायसन मिळाले आहे. अमेरिकेत आता मागच्या वर्षी लायसन रिन्यू केले तेव्हा ९ वाजता ऑफिसात गेलो आणि १२.३० ला लायसन मिळाले. शिवाय व्हिश्याच्या मर्यादेनुसार लायसनही सहामहिने वगैरे मिळाले. अमेरिकेतल्या दोनतीन शहरातील पोष्ट ऑफिसात जाण्याचा प्रसंग आला तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या उर्मटपणाचा कहर म्हणजे काय हे प्रत्येकवेळेस अनुभवास आले. एकदोनवेळा पोष्टमन मंडळींनी चुकीच्या डब्यात महत्त्वाची पत्रे टाकली. सामान्यपणे भारतात एकंदर पैसे देतो त्या मानाने सरकारी सुविधा फारच चांगल्या मिळतात (व्हॅल्यू फॉर मनी) असे वाटत आहे. माझ्या अनुभवानुसार समोरचा कर्मचारी अगदी सॅडिस्ट नसेल आणि तुमची कागदपत्रे वगैरे व्यवस्थित असली तर भारतातल्या सरकारी कार्यालयात त्रास होण्याची शक्यता बरीच कमी आहे. नवरा आणि बायकोचे वेगळे नाव, मुलाच्या प्रमाणपत्रावरील आणि आईच्या पासपोर्टवरील वेगळे नाव ही उदाहरणे अजूनतरी सामान्य नाहीत. पासपोर्ट अधिकाऱ्यांनी निदान अशा केसेसमध्ये योग्य ती पडताळणी करणे आवश्यकच आहे. त्यासाठी एखादा हेलपाटा मारावा लागला तर त्याला भारताच्या सरकारी कर्मचाऱ्यांची अकार्यक्षमता मानणे चुकीचे वाटते.

पासपोर्ट ऑफिसचा अनुभव चांगलाच आहे, पण लायसन्सचाही चांगला आहे? नक्की? विथौट एजंटवाल्यांना ड्रायव्हिंग टेस्टमध्ये नापास केल्याची उदाहरणे पाहिलीत, कागदपत्रांतही अडवणूक केलेले पाहिलेय म्हणून विचारतो. माझा अनुभव पुण्यातला आहे.

माझा अनुभव पिंपरी चिंचवड आरटीओ (चिखली) इथला आहे. मुळात सरकारी काम असो किंवा खाजगी, खालील गोष्टी नेहमी जवळ ठेवाव्यात. बहुतेक वेळा काम होतेच. १. २-३ पासपोर्ट आकाराचे फोटो २. दोन वेगवेगळे आयडीप्रूफ (उदा. लायसन व पॅनकार्ड - ओरिजनल) व त्याच्या दोन साक्षांकित प्रती ३. दोन वेगवेगळे अॅड्रेसप्रूफ (उदा. लाईटबिल व आधारकार्ड) व त्याच्या दोन साक्षांकित प्रती ४. सुटे पैसे ५. २-३ रेवेन्यू स्टँप अनेकदा अडचणी खालीलप्रमाणे असतात १. फोटो नाही. (तरीही सरकारी अधिकाऱ्यांची अकार्यक्षमता) २. आयडी/अॅड्रेसप्रूफ फक्त ओरिजिनल आहे. झेरॉक्स/साक्षांकित प्रत नाही. ३. जवळचा झेरॉक्सवाला बंद आहे. ४. थोडा लांबचा झेरॉक्सवाला सुटे पैसे घेतल्याशिवाय प्रत काढून देत नाही. ५. नोटरीला कुठे शोधू ६. बँकेत/पोष्टात रेवेन्यू स्टँप मागितला. तो तिथे मिळत नाही. या सर्व गोष्टींमुळे एखाददोन हेलपाटे वाढतात. आता ही आवश्यक कागदपत्रे आहेत अशी सरकारची इच्छा आहे. बहुतेक वेळा सरकारी अधिकारी मनमानी करत नसतात. अापल्यालाच आपली चूक झाकण्यासाठी किंवा गैरसोय टाळण्यासाठी प्रीमियम सर्विसची अपेक्षा असते. त्याची फी म्हणजे लाच किंवा एजंट.

या ऑफीसमधे अनेकांना आजवर उत्तमच अनुभव आलेला आहे.
हेच बोल्तो. बाकीच्या सरकारी हपिसांना श्या घालणार्‍यांकडून देखील या पासपोर्ट ऑफिसमधल्या कार्यक्षमतेच कौतुकच ऐकलं आहे.

सुमारे बारा वर्षापूर्वी मार्केट यार्ड (गुलटेकडी) येथे पासपोर्ट काढतानाही कर्मचाऱ्यांचा अनुभव चांगला आला होता. मात्र दुर्दैवाने तिथे उभे राहण्यासाठी योग्य जागा नव्हती. विशेषतः कडाक्याच्या उन्हात वा पावसात त्रास होत असावा असा अंदाज आहे. मे महिन्यात अर्ज देताना चांगलाच घाम फुटला होता. मात्र तीनचार वर्षापूर्वी बायकोचा पासपोर्ट काढला तेव्हा ते ऑफिस बदलून सेनापती बापट रस्त्यावर आले होते. झाडांची छान सावली, हवेशीर परिसर आणि पटापट पुढे सरकणारी रांग पाहून फारच हायसे वाटले. ऑफिस उघडल्यावर तासाभरात आत जाऊन कागदपत्रे देऊन आम्ही न्याहारी करायला युनिवर्सिटीजवळही पोचलो होतो. नंतर एकदोनदिवसात फाईल नंबर वगैरे उपलब्ध झाल्यावर सर्व स्टेटस ऑनलाईन चेक करता आले. अर्थात सरकारी कार्यालयाच्या बाबतीत आपले ते कार्टे आणि दुसऱ्याचा तो बाब्या ही परिस्थिती असतेच. अमेरिकेच्या व्हिश्याच्या लायनीत उन्हातानात दंडुके खात उभी राहणारी पब्लिक भारताच्या पासपोर्टच्या लायनीला मात्र कायमच शिव्या देताना पाहिली आहे.

गरज पडली तर म्हणून.. १. कुणाला पुणे ऑफिसमध्ये पा.पो काढायला चांगला, भरवशाचा एजंट माहिती आहे का? २. मुलाचा पा.पो शक्य तितक्या लवकर काढायचा असेल तर काही ऐडियाज आहेत का??

एका परिचिताला गिरिराज ट्रॅवल्सचा खूप चांगला अनुभव आला आहे. वयस्कर असल्याने त्यांना एकदोनदा एजंटची आवश्यकता भासली आहे. +91-20-24436157 1 Mukta Apartments, Near Hotel Natraj Swargate, Pune-411009 पिंपरी चिंचवड परिसरातील एक थोरात म्हणून एजंटची सेवा मी वडिलांच्या पासपोर्टसाठी घेतली होती. त्यांचा नंबर मिळाला तर पाहतो. या एजंटने अपॉईंटमेंट वगैरे सर्व कामे हाताळली. अपॉईंटमेंटच्या दिवशी घरून वडिलांना पिक केले. अपॉईंटमेंटनंतर घरी ड्रॉप केले. माफक फी होती (दोन वर्षापूर्वी १००० रु.). चिंचवडवरुन सेनापती बापट रोड ला रिक्षाने जाणेयेणे यातच निम्मे पैसे गेले असते. शिवाय मी हजर नसल्याने कागदपत्रांची पडताळणी वगैरे करणे वडिलांना जमले असते असे वाटत नाही.

गिरिराज ट्रॅवल्सची सेवा आई वडिलांच्या अमेरिकन टुरिस्ट व्हिसासाठी घेतली होती. डि एस १६० मी आधीच भरला असल्याने त्यांनी केवळ कॉन्सुलेटची फी भरणे व अपॉइंटमेंट बुक करणे ही कामे केली. त्यांच्याकडे जाण्याचे एकमेव प्रयोजन होते की कॉन्सुलेटमधील मुलाखतीमध्ये विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची व्यवस्थित माहिती मिळणे. दुर्दैवाने त्याबाबतीत त्यांच्याकडून त्याबाबतीत काही विशेष मार्गदर्शन मिळाले नाही.

व्हिश्याबाबत कल्पना नाही. मात्र आमच्या परिचितांनी त्यांचा तात्काळ पासपोर्ट गिरीराजकडून करुन घेतला होता. गिरीराजवाल्यांनी झेरॉक्स, अटेस्टेशन, वगैरे सगळी कामे हाताळली.

त्यांच्या सर्वच कामांचा दर्जा वाईट असेल असे माझे म्हणणे नाही. याच प्रकरणात त्यांच्याकडून आलेला नकारात्मक अनुभव म्हणजे. मी डि एस १६० काही महिने अगोदर भरला होता पण सबमिट केला नव्हता. तेव्हा माझे अमेरिकेतील घर बदलत होते म्हणून त्यांना सांगितले की एक दिवस थांबा मी माझ्या नव्या घराचा पत्ता डी एस १६० मध्ये अपडेट करतो. त्या क्षणी नेमका पत्ता (युनिट क्रमांक) कळला नव्हता म्हणून. ही बाब त्यांना मी इमेलद्वारे व वडिलांनी प्रत्यक्षात भेटून सांगूनही त्यांनी तोच डि एस १६० सबमिट करून टाकला. नंतर त्यांना हे लक्षात आणून दिल्यावर त्यांनी सल्ला दिला की मुलाखतीच्या वेळी अमेरिकेतील पत्ता विचारला तर जुनाच सांगा. असे करणे (खोटे बोलणे) मला व वडिलांना पटत नसल्याने नवा पत्ता सांगायचे ठरवले होते. मुलाखतकर्त्याने विचारल्यास डि एस १६० सबमिट करते वेळी जुन्या पत्त्यावर वास्तव्य होते असे सांगावे अशी योजना होती. सुदैवाने पत्त्याबाबत प्रश्न विचारला गेला नाही.

मी गिरीराज ट्रॅवलचा मालक, भागीदार किंवा हितचिंतक नाही. :) त्यामुळे ही माहिती माझ्यासाठीही उपयुक्त आहे. धन्यवाद.

एजंटची गरजच नाही तुम्ही ऑनलाईन फ़ॉर्म भरुन १५०० रुपयात काम उरकु शकता,आणि एजंट वगैरे फ़सवाफ़सवी धंदे आहेत,ते लोक पण नेऊन लाईनतच उभे करतात.

मला निराळाच अनुभव आलाय,गर्दी होती हा काय पासपोर्टवाल्यांचा दोष नाही,आणि ही एवढी दहा कागदपत्र घेऊन तुम्ही कशाला गेला होतात? एवढी कागदपत्रं लागतच नाहित,पाहिल्या ठिकाणी जेवढी रांग असेल तेवढा वेळ लागतो पण तेथे काय भाराभर माणसे आत सोडत नाहित,प्रत्येकाच्या वेळेनुसार गटाने माणसे आत सोडतात,ठसे घेणे वगैरे प्रक्रिया सुलभ आहे,आत मस्त ए.सी. असुन खाण्यापिण्याची सोय आहे, टिव्ही वर आपला नंबर कुठल्या टेबलावर आला आहे याची सुचना मिळते,तेथिल लोक सहकार्यशिल आहेत,दिवसभर इतक्या लोकांचे वेगळे अनुभव घेऊन कदाचित कधितरी निराळा अनुभव येऊ शकतो पण अत्यंत सुलभपणे आता पासपोर्ट मिळतो,तुम्ही उल्लेख केलेली कित्येक कागदपत्र पोलिस स्टेशनमध्ये वकिलाचा शिक्का मारुन जमा करावे लागतात.स्टेशनमध्ये अर्थातच चहा पाणी करावाच लागतो नाहितर चेकिंग बरेच दिवस सुरुच रहाण्याची शक्यता असते.

@ आशु जोग दादा.. मी कधीही असं म्हणलय का की हा घोळ सरकारने घातलाय? बाळाच्या जन्माच्या वेळेस परिस्थिती गंभीर होती. तेव्हाच्या गडबडीत ह्या मुद्द्याचे गंभिर्य लक्षात आले नाही आणि तशीच सही करुन आम्ही माहिती पुढे दिली. चुक आमचीच आहे. पण १०० करोडच्या देशात अशा चुका होत नसतील का? मग त्यावर काहीच उपाय कसा नसेल..? असो.. तर पुढची कहाणी.. मी आज पासपोर्ट ऑफिस्मध्ये जाउन आले. (सोम-शुक्र (बुधवार सोडुन) , वेळ सकाळी १०-१२.३० ) तिथे भली मोठी लाईन होती. (लगेच शॉर्ट लॉव्हचा मेसेज बॉसला केला). १ तासाने माझा नंबर आला. त्या माणसाने प्रॉब्लेम ऐकुन एका चिठ्ठीवर काही तरी खरडले. ती दाखवुन आत ऑफिसात गेले तर अजुन एका मोठ्या लाईन मध्ये बसवले. DPO ना भेटावे लागेल म्हणे. ११.१५ ते १.३० वाट पासुन नंबर लागला. (मग हाफ डे चा मेसेज करुन ठेवला..) त्या बाई कुर्मगतीने समोरचे काम उपसत होत्या. एक एक माणुस आत १०-१५ मिनिटं थांबत होता.. का कोण जाणे? माझा नंबर आल्यावर मी त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. त्यांनी हात वर केले, म्हणे मी काहीच करु शकत नाही, बर्थ सर्टीफिकेट बदलुन आण. म्हणलं सरकारचा नियम आहे, बदलुन देत नाहीयेत. बाईंना अदगी पार गयावया करुन सांगुनही त्यांनी काहीही ऐकले नाही. मग म्हण्लं मी श्री.गोतसुर्वे ह्यांना भेटते (IFS Officer) म्हणे मीच तुझे कागद नेउन दाखवते. अजिबात मला त्यांना भेटु दिलं नाही. परत येऊन म्हणाल्या की "साहेब म्हणाले, सर्टीफिकेट बदलुन आणा, सगळे आणतात..".. पुन्हा पुन्हा मी सरकारी नियम दाखवुनही कुणीही काहिही ऐकुन घेतले नाही. मग मनाची तयारी केली फुल डे लीव्हची, म्हणलं आता कार्पोरेशनला जाउन येउ. पण त्याआधी सारथी हेल्पलाइनला कॉल केला. ते लोक म्हणे बदलता येत नाहीच, फारतर ज्या सरकारी दवाखान्यातुन दाखला घेतला तिथे वैद्यकीय विभागात उप-निबंधकाला भेटा. जे भेटतील अशी काही आशा नसल्याने मी २५ किमी ताबडत जाण्या ऐवजी हापिसात येणे पसंत केले. मला जन्मदाखला बदलुन मिळेल ह्याची काडिमात्र आशा नाही. आणि पा.पो मध्ये कागदपत्र तरतील ह्याची सुद्धा... आता माझ्याकडचे काही पर्याय :- १. आहे ते कागदपत्र घेउन पा.पो अप्लाय करणे. माझा पा.पो न दाखवता मुलाच्या पा.पोवर माझे सासरचे नाव पडु देणे. मग पुढे विसाला वगैरे नवा बखेडा उभा राहिला तर काय हा प्रश्न आ वासुन उभा आहेच.. २. पेपरमध्ये नाव बदलाची जाहिरात देणे, पण उलटी.. म्हणजे सासरचे नाव सोडून माहेरचे वापरत आहे अशी.. आणि मग अप्लाय करुन पहाणे. ३. स्वतःचे नाव बदलणे हा पर्याय मी समोर ठेवलाच नाहीये.. (जो अभी अभी ट्युन इन हुवे है उनके लिये!! माझा प्रॉब्लेम असाय की:- माझ्या मुलाच्या बर्थ सर्टिफिकेट वर माझे नाव सासरचे लागले आहे. मी कुठेही सासरचे नाव लावत नाही. आता मुलाचा पासपोर्ट काढताना माझा नि माझ्या नवर्‍याचा पासपोर्ट ह्यावरील माझे नाव आणि बर्थ सर्टिफिकेट वरचे माझे नाव ह्यात फरक आहे. म्हणुन मग अर्थातच प्रॉब्लेम येणार. तर ह्यासाठी काय करता येईल हे विचारणे चालु आहे.मला माझे नाव बदलायचे नाही. शक्यतो माझ्या मुलाच्या पा.पोवर माझे माहेरचेच नाव लागावे म्हणजे सर्व कागदपत्रांवर एकच नाव राहील असे वाटते. )

शहाणपणाचा अभाव असल्यास सर्वसामान्य नियम आपल्या अधिकारांद्वारे कसे जाचक केले जावे हे या प्रकारच्या सरकारी अधिकार्‍यांकडून शिकावे. हे सर्व प्रकरण निस्तारून झाल्यावर या प्रकाराविरुद्ध (केवळ विवाहीत आहे म्हणून एखाद्या स्त्रीचे (मध्यनाव (नवर्‍याचे प्रथमनाव) व आडनाव (नवर्‍याचे आडनाव)) बदलणे आहे असे गृहित धरणे, सरकारदरबारी पाठपुरावा करा. तुमचे स्वतःचे उदाहरण असल्याने पुरावे देणे सोपे जाईल म्हणून तुम्हाला म्हणतोय. कदाचित राष्ट्रिय महिला आयोग याबाबतीत मदत करू शकेल. या प्रकारचा लढा पूर्वी कुणी दिला आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो.

मी मान्य करते की चुक आमच्याकडुन झाली आहे. पण मला असं एखाद्या अधिकार्‍याने "आम्ही काहीच करु शकत नाही" असे म्हणुन हात वर करणे बरोबर नाही. सर्वांकडेच सर्व कागदे बरोबर असतीलच असे नाही. म्हणुनच तर हे अधिकारी तिथे बसले आहेत मदतीला. तर त्यांनी मदत करावी. अशाने मला नाव बदलायला नशिबाने भागु पाडु नये म्हणजे झालं..

महानगरपालिका बर्थ सर्टिफिकेट बदलून देत नाही हा कधीचा नियम आहे? मी कालच मित्राला विचारले. त्याने मागील वर्षी मुलीचे बर्थ सर्टिफिकेट हॉस्पिटलमधून (व नंतर महापालिकेतून) बदलून घेतले. त्याने त्यावेळी एका वकीलाला विचारले होते तेव्हा अॅफिडेविट वगैरे करावे लागेल असे त्याचे मत होते. मात्र तसे करावे लागले नाही.

जन्मदाखला घेण्याचा मला प्रत्यक्ष अनुभव नाही. त्यासाठी नवजात बाळाच्या आई वडिलांना किंवा त्यापैकी एकाला रितसर फॉर्म भरावा लागतो का? तो तुम्ही किंवा तुमच्या नवर्‍याने भरला असल्यास अन त्यात तुमचे सासरचे आडनाव लिहिले गेले असल्यास ती प्रत्यक्ष तुमची चूक आहे असे म्हणता येईल.

पिलीयन रायडर ताई जिथे चूक झाली असेल तिथे दुरुस्त करा. मला सांगा बाळाच्या जन्मदाखल्यावर कोणते नाव आहे आईचे(म्हणजे सासरचे की माहेरचे) आणि पासपोर्टवर तुमच्या आणि पतीच्या कोणते नाव आहे. ते कळले तर बरे होइल

जन्मदाखला - आईचे सासरचे नाव (वापरत नाही) बाकी माझा पासपोर्ट / नवर्‍याचा पासपोर्ट / इतर कोणतेही कागदपत्र - माहेरचे नाव. आइचे नाव असे वेगळे असल्याने पासपोर्ट मध्ये प्रश्न येतील. जन्मदाखला पि.चि.मनपा कडुन मिळालेला आहे. तो बदलता येत नाही असा रुल आहे. मी एकदा गुगल केलं होतं तर मिळाला होता. आता मात्र तो मला सापडत नाहीये. पण सारथीला संपर्क करुन मी ह्याची पडताळणी केली आहे. आता ज्या सरकारी रुग्णालयातुन हा दाखला दिला (तालेरा रुग्णालय) तिथे वैद्यकीय विभागात काही मदत मिळते का ते पहावे लागेल. जन्मदाखला मिळण्याची पद्धत :- बाळाच्या जन्मानंतर सर्व माहिती हॉस्पिटल घेते - त्यावर तुमची सही घेते (इथे आमची चुक आहे. ही माहिती धांदलीत नीट न वाचताच सही केल्या गेली) - हीच माहिती सरकारी रुग्णालयात पाठवली जाते. आणि मग जन्मदाखला दिला जातो. माझ्या सुपीक डोक्यातला प्लान A - अ‍ॅफिडेविट करुन पेपरला जाहिरात देणे की माझे जुने नाव (सासर) बदलुन नवे नाव (माहेरचे) आहे. / मी सासरचे नाव वापरत नसुन माहेरच वापरत आहे / सासर-माहेरच्या नावाची व्यक्ती एकच असुन मी माझ्या मुलाला ह्या ह्या दिवशी जन्म दिलाय. B - सगळं सोडुन हरी हरी करत बसणे

म्हणजे सगळीकडे माहेरचेच नाव आहे. बदललेले नाही. शैक्षणिक कागदपत्रांतही तेच नाव असणार. म्हणजे फक्त जन्मदाखल्यावर सासरचे नाव आहे... कारण तिथे नाव टाकताना कोणी कागदपत्र मागत नाही. आता फक्त जन्म दाखला बदलून घ्या म्हणजे त्यावरचे आईचे नाव(जे माहेरचे हवे आहे) जन्मदाखला पि.चि.मनपा कडुन मिळालेला आहे. तो बदलता येत नाही असा रुल आहे. पि.चि.मनपा भारतातच येते म्हणावं... सगळ्या भारतात नियम सारखेच आहेत. अर्थात तुमच्यासारखा प्रॉब्लेम तिथेही अनेकांना आला असेल त्यामुळे दाखल्यात बदल विषयीची माहिती देणारी पाटी बाहेरच लावलेली असायला हवी. नाही म्हणायचे कारणच नाही. आणखी एक- येवढ्यासाठी स्वतःचे नाव बदलून घेण्याच्या फंदात पडू नका आणि ते पॅन पासपोर्ट बॅक अकाऊंट सगळीकडे करणेही शक्यही नसते त्यामुळे गोंधळ वाढेल ... आपल्या देशात सरकारी नियम हे फारच काटेकोर आणि लाखो केसेसचा विचार करुन केलेले असतात हा विश्वास बाळगा

आपल्या देशात सरकारी नियम हे फारच काटेकोर आणि लाखो केसेसचा विचार करुन केलेले असतात
कृपया हा लेख वाचावा - विश्वास ठेवायला शिका - संदीप वासलेकर या लेखात मांडलेल्या मुद्द्यांविषयी आपले काय मत आहे हे जाणून घेण्यास उत्सुक आहे.

वासलेकर हे महान असतीलच पण म्हणून आम्हाला मिळालेले फर्स्ट हँड ज्ञान कसे नाकारायचे. आपल्याकडचे नियम विशेषतः बँक, इन्शुरन्स, प्रॉपर्टी, सिटी सर्व्हे हे अत्यंत काळजीपूर्वक बनवलेले असतात. आता एखादा अपराधी यातून सुटू नये यासाठी ते जाचक वाटत असतील तर त्याला इलाज नाही. सॉफ्ट वेयर इंजीनयर असाल तर हे नियम नीट पहावेत. लक्षात येइल किती इफ एल्सची काळजी घेतलेली आहे. (या लेखा निमित्ताने मनातल्या वासलेकरांच्या मूर्तीचे भंजन व्हायला सुरुवात झाली आहे)

नियम काटेकोरपणे बनवले गेले असतील यावर शंका व्यक्त करत नाही आहे. परंतु या सर्व नियमांच्या मुळाशी असलेल्या गृहीतकाचे काय.ते गृहीतक म्हणजे प्रत्येक सर्वसामान्य माणूस सरकारला फसवणारच आहे हे समजूनच नियम बनवले गेले असणे. या सर्व नियमांची सुरुवात इंग्रजांच्या काळात झाली. परक्या लोकांवर नियंत्रण ठेवायचे असल्याने तेव्हा असे नियम असणे काही आश्चर्याची गोष्ट नव्हती. पण स्वतंत्र भारताने त्यात फारसा धोरणात्मक बदल केला नाही हे सर्व समस्यांचे मूळ आहे. तुम्ही म्हणता तशी परिस्थिती असती तर लालफीतशाही, नोकरशहा, लायसन्स / परमिट राज, सरकारी काम चार महिने थांब अशी विशेषणे / वाक्प्रचार / म्हणी तयार झाल्या नसत्या. सरकारी विभागांच्या अडवणुकीमुळे होणार्‍या सामान्य जनांच्या शोषणावर कितीतरी कथा, कादंबऱ्या, नाटक, चित्रपट निघाले असतील. जी व्यक्ती (खास करून पहिल्या) नोकरीमुळे दुसऱ्या शहरात स्थिरावत असते तिला गॅस कनेक्शन, बँक खाते उघडणे, पासपोर्ट काढणे अशी कामे करताना किती नाकी नऊ येतात हे विचारून बघा. मी या सर्व गोष्टींमधून गेलो आहे. पहिल्या नोकरीच्या वेळी बहुतेकांची आर्थिक बाजू अगोदरच लंगडी असते अन अशा अनेक सरकारी नियमांचा जाच सहन करावा लागतो. सरकारी नियमन लागू असलेल्या खाजगी सेवांमध्येही सरकारी खात्यांची सावली पडलेली असते. भारतातून परदेशात गेल्यावर बहुतेकांना आश्चर्याचे सुखद धक्के बसतात ते तिथे सहजपणे होणारी सरकारी खात्यासंबंधीची कामे बघून. अमेरिकेत बरेचदा सरकारी कार्यालयात आपले ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इतर कुठले फोटो ओळखपत्र सोबत नेले अन अर्जावर स्वतःचा सोशल सिक्युरिटी नंबर टाकला की तुमच्या तर्फे फारसे अधिक काही करावे लागत नाही. ओळखपत्राची छायाप्रतही न्यायची गरज नसते. त्या कार्यालयातील कर्मचारी स्वतः छायाप्रत काढून ओळखपत्र लगेच परत करतात. छायाप्रतिंचे साक्षांकन नावाचा प्रकारच नाही. (सध्याच्या पंतप्रधानांनी छायाप्रतींच्या स्व-साक्षांकनाला सरकारी पातळीवर स्वीकारार्ह करून चांगला पायंडा पाडला आहे). मी भारतात अन अमेरिकेत गृहकर्ज घेऊन घर खरेदी केले आहे. दोन्हीकडल्या अनुभवांमध्ये जमीन असमानाचा फरक आहे. अमेरिकेत मी त्यांचा नागरिक नसतानाही इतक्या सहजपणे मला या प्रक्रियांमधून जाता आले तसे भारतात एका पिढी नंतरही होईल का याविषयी शंका वाटते.

या नियमांमुळे जो चोर आहे त्यालाच त्रास होइल आणि तो पकडला जाईल. पण चोरही पास व्हायला लागला तर तो आपल्यावर अन्याय नाही का... सरकारी काम चार महिने थांब मी स्वतः या सगळ्याचा अनुभव घेतला आहे अगदी मोठ्या शहरापासून तालुक्यापर्यंत आणि भारतात काही प्रांतात. पण बहुतेक ठिकाणी जिथे वेळ लागतो तिथे सरकारी कार्यालयाला कामही प्रचंड असते. ऑफिसच्या वेळेनंतर आणि सुटीच्या दिवशीही येऊन कित्येक ऑफिसात काम चालते. आणि प्रायवेटमधे फार उत्तम काम चालते असे वाटत असेल तर त्यांनी एयरटेल, आयडीया, रिलायन्स कम्युनिकेशनचा गोड अनुभव घ्यावा. जाता जाता तुम्ही एकटे प्रामाणिक असलात तरी बाकी सगळी जनता प्रामाणिक आहे अशी खात्री देता येइल का भारतात आणि अमेरिकेतही

https://arogya.maharashtra.gov.in/Site/Uploads/GR/FAQs-on-Registration-of-Births-and-Deaths.pdf पान ५ पहा. मला काहीच नीट कळाअले नाही त्यातुन की बाबा नाव बदलु शकतो की नाही... (बॉल्पेन वापरावा की शाईपेन ह्यावर पण एक प्रश्न आहे.. पण आईच्या नावाबद्दल काय लिहीलय ते कळायला मार्ग नाही..) हे ही पहा:- http://www.censusindia.gov.in/2011-FAQ/FAQ-CRS.html#M M.Whether a correction is allowed after registration? /strong> Corrections or Cancellations are allowed under the provision of Section 15 of the Act and the corresponding Rules made there under. However, corrections are allowed only if it is proved to the satisfaction of the Registrar that any entry of a birth or death in any register kept by him under this Act is erroneous in form or substance, or has been fraudulently or improperly made. हे ही पहा:- http://www.prsindia.org/uploads/media/Registration%20of%20births%20and%20deaths/REegistration%20of%20Births%20and%20Deaths%20%28Amendment%29%20bill,%202012.pdf f it is proved to the satisfaction of the Registrar that any entry of a birth or marriage or death in any register kept by him under this Act is erroneous in form or substance, or has been fraudulently or improperly made, he may, subject to such rules as may be made by the State Government with respect to the conditions on which and the circumstances in which such entries may be corrected or cancelled, correct the error or cancel the entry by suitable entry in the margin, without any alteration of the original entry, and shall sign the marginal entry and add thereto the date of the correction or cancellation. सगळीकडे करेक्शन होऊ शकते असंच लिहीलय पण १. तालेरा सरकारी रुग्णालय - दाखला देण्याची खिडकी २. सारथी - पिंचिमनपाची हेल्पलाईन / आरोग्य विभागाला केलेला फोन ह्या दोन्ही ठिकाणी मला असे करेक्शन होणार नाही हेच सांगण्यात आले. अगदी जन्म मृत्यु नोंदणी विभागाचे प्रमुख एकाच्या ओळखीचे होते, त्यांनी सुद्धा हेच सांगितले..

ह्या दोन्ही ठिकाणी मला असे करेक्शन होणार नाही हेच सांगण्यात आले म्हणून तुम्ही स्वतःचे नाव बदलायच्या फंदात पडू नका. पुढचे गोंधळ निस्तरता येणार नाहीत. करेक्शन करता येत नाही असे तोंडाने सांगत असतील तर त्यांना अर्ज द्या. त्यांचे लेखी उत्तर घ्या आणि मग त्यांच्या बापाकडे जा. आणि हेच बेसिक आधारभूत डॉक्यूमेंट असल्याने ते करेक्ट मिळाल्याशिवाय त्यावर आधारीत दुसर्‍या कामाला हात घालू नका. बर्थ सर्टिफिकेट बदलून मिळते बर्थ सर्टिफिकेट बदलून मिळते बर्थ सर्टिफिकेट बदलून मिळते भारतात सर्वत्र नियम सारखेच आहेत. हे मी अनुभवाने सांगत आहे.

एका महिलेने घटस्फोट घेतला होता. पण बरेच वर्षे संसार झाल्याने तिची कागदपत्र सासरच्या नावाने होती. ती पासपोर्ट रीन्यू करायला गेल्यावर तिला घटस्फोटानंतर सासरचे नाव लावता येणार नाही असे पासपोर्ट ऑफिसकडून सांगितले गेले . त्यावर तिला कोर्टात जाउन लढा द्यावा लागला. संबधित बातमी

तात्विकदॄष्ट्या केवळ लग्न झाले म्हणून एखाद्या स्त्रीने आपले नाव किंवा आडनावासकट नाव बदलणे पटत नसले तरी हा निर्णय मला पटतो. लग्न झाले म्हणून असतील तिथे नाव बदलण्याच्या प्रक्रीया पूर्ण करायच्या (बँक खाती, पासपोर्ट इत्यादी) अन घटस्फोट झाला की लगेच त्याच्या विरूद्ध काम करायचे. अन हे सर्व करणे कधीच सुटसुटीत नसते. वरून भविष्यात अधिक गोंधळ होण्याची शक्यता असतेच. कुणी सरकारी अधिकारी म्हणणार की ही व्यक्ती एकच आहे कशावरून? मला वाटते स्मिता ठाकरे यांचे अनुभवकथन वर्तमानपत्रांत आले होते काही वर्षांपूर्वी. स्त्रियांनी लग्न झाले म्हणून आपले नाव आपोआप बदलणे ही परंपरा थांबायलाच हवी असे माझे मत आहे. आपल्या समाजात या मुद्द्यावर जागॄती जवळजवळ नसल्याने फार वाइट वाटते.

तात्विकदॄष्ट्या केवळ लग्न झाले म्हणून एखाद्या स्त्रीने आपले नाव किंवा आडनावासकट नाव बदलणे पटत नसले
खरंय. मूल हे नवरा व बायको हे दोघांचे असते. मुलाने केवळ नवऱ्याचेच आडनाव घेणे हेही मला तात्त्विकदृष्ट्या पटत नाही. तिथे नवरा व बायको दोघांपैकी एकाचे नाव निवडण्याचा पर्यायही हवा.

माझ्या ओळखीतल्या एका दांपत्याने मुलांना मध्यनाव म्हणून वडिलांचे नाव अन शेवटचे नाव (लास्ट नेम) आडनाव नाही म्हणून आईचे नाव वापरली आहेत. भारतात मुलांच्या शाळेत वगैरे अनेकदा त्यांना विचित्र प्रश्नांना व किंचित हेटाळणीला सामोरे जावे लागले. ते सध्या अमेरिकेत राहतात. तिथे काय अनुभव आहे हे मात्र ठाऊक नाही. एक जुनी आठवण - मी पहिलीत असताना तिमाही परिक्षेत एका वर्गमित्राने प्रश्नपत्रिकेवर (नाव लिहिण्याच्या ठिकाणी) आपले संपूर्ण नाव लिहिल्यावर 'मालू' असे त्याच्या आईचे घरचे नाव पण लिहिले होते.

बहुतेक सरकारी नियम हे बहुतांश प्रजेला सोयीचे वाटतील अशा पद्धतीने बनवलेले असतात. कुणाला हट्ट धरून आईचेच नाव लावायचे असेल तर तिथली अडथळ्याची शर्यत पार करण्याची मानसिक तयारी हवी. तीच गोष्ट माहेरच्या/सासरच्या आडनावाची. वेगवेगळ्या कोर्टांचे निकाल हे त्या त्या वेळच्या केसीनुसार बदललेले पाहिले आहे. एखाद्याला हट्टाने अमुकतमुकच प्रकारचे नाव हवे असे वाटत असेल तर त्याची किंमत ही अशा स्वरुपाच्या मनस्तापातून द्यावी लागते. हे योग्य आहे की नाही हा वेगळा मुद्दा आहे. मात्र परिस्थिती ही अशी आहे.

पण काळानुसार परंपरा सोडून काही बदल घडायला हवेतच. आपण ज्या सुधारणांचा लाभ घेतोय त्या घडवून आणण्यासाठी पूर्वी कुणीतरी किंमत मोजली असतेच.

@ श्रीरंग जोशी आणि आजानुकर्ण असं नाही की सरकार माहेरचे नाव लावणार्‍यांना त्रास देतं. असा कुठे नियम नाही की नाव बदलावेच लागते / आपोआप बदलते. तुम्हाला पुर्ण मुभा आहे तुमचे नाव काय आहे हे ठरवण्याची. नवरा बायकोचे आडनाव वेगवेगळे आहे म्हणुन पासपोर्ट / व्हिजा / होमलोन / नोकरी ... कुठेही त्रास होत नाही. त्रास होतो तो काही कागदप्त्र माहेरच्या न काही सासरच्या नावावर असण्याचा. हा अनेक बायकांचा प्रॉब्लेम असतो. अशावर केवळ एका अ‍ॅफिडेविटने उत्तर काढता यायला हवे की ह्या दोन नावांच्या व्यक्ति एकच आहेत. माझ्या केस मध्ये किमान माझे नाव तरी तेच आहे, काही बायकांचे तर संपुर्ण नाव - आडनाव बदलते. त्याला कसे सिद्ध करणार की मीच ती व्यक्ति आहे. काही तरी तर उत्तर असेलच की..

सरकार ठरवून त्रास देत नसेल पण माझा मुद्दा आहे की एखादी स्त्री विवाहीत असल्यास तिचे मध्य नाव (नवर्‍याचे प्रथम नाव) व आडनाव (नवर्‍याचे आडनाव) असे असणे गृहीत धरणे. बाळाच्या जन्मदाखल्याचा फॉर्म हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांनी स्वतः भरला व त्यावर तुमची सही घेतली असे या प्रतिसादावरून दिसते. प्रसुतीच्या वेळी हॉस्पिटलमध्ये भरती होताना तुमचे जे नाव अन ओळखपत्राची छायांकीत प्रत जमा केली असेल त्यावरून ते नाव लिहिले असते तर ही चूक झाली नसती. त्यांनी स्वतःच तुमचे प्रथम नाव व बाकीचे तुमच्या नवर्‍याचे नाव वापरले असावे असा अंदाज आहे. बरेचदा प्रसुतीनंतर मातेची किंवा नवजात बाळाची प्रकृती बरी नसणे अशा कारणांमुळे बाळाचे पालक घाई गडबडीत अशा फॉर्म्सची पडताळणी न करता सही करण्याची शक्यता असते. जर विवाहित स्त्रीचे मध्यनाव + आडनाव बदलले आहे हे गृहीत धरण्याची पारंपारिक सवय बदलल्यास असे घडण्याची शक्यताच शिल्लक राहत नाही.

पिरा अॅफिडेविट करणे आणि गॅझेटमधे ते डिक्लेअर करणे एवढे पुरावे पुरेसे आहेत.पासपोर्टच्या वेबसाईटवरची अॅनेक्शर्स बघुन घे.आणि अॅप्लाय कर.ही कागदपत्र सोबत लाव .आणि फाॅर्मवर तुला हवे तसे नाव लिहुन दे.होईल काम. काही दिवसापूर्वीच माझ्या मैत्रीणीचे जिचे दुसरं लग्न झालंय आणि पहिल्या नवर्याचा एक मुलगा आहे,त्या मुलाचा पासपोर्ट ठाण्याला केला.काहीही कटकट न होता काम झालं.

मी संपूर्ण चर्चा डीटेल मधे वाचलेली नाही, पण असे दिसते आहे की तुमचे नाव चुकून पण चुकीचे लागलेले आहे. जर पाहीले नसेल तर खालील दुवा आणि प्रश्न-उत्तर अवश्य पहा: (प्रश्न संबंधीत नसेल पण उत्तर आहे असे वाटते...) . http://passportindia.gov.in/AppOnlineProject/online/faqServicesAvailable Q29: I recently got married/divorced. How do I change my name on my passport? A: To change the name in the passport, you have to apply for a "Re-issue" of passport and get the specified change done in the personal particulars. To check the complete list of documents to be submitted along with the application form, please click on "Documents Required" link on Home page.

पासपोर्ट वर नाव बदलता येतेच.. रिइश्यु करुन घेता येईल.. पण ते करायचं नाहीये. मला मुलाच्या जन्मदाखल्यावर माझं जे नाव लागलं आहे (सासरचं) ते बदलायचं आहे कारण मी ते वापरत नाही.

सरकारी रुग्णालय शनिवारी जाऊन इथे चौकशी केली. हातात एक कागद देण्यात आला ज्यावर काय काय करावे लागेल हे लिहीले होते:- १. मी १००/- च्या स्टॅम्प पेपरवर केलेले प्रति़ज्ञापत्र. २. मला ओळखणार्‍याने / शेजार्‍याने १००/- च्या स्टॅम्प पेपरवर केलेले प्रति़ज्ञापत्र. (दोन्ही प्रति़ज्ञापत्र "नागरी सुविधा केंद्रातुन"च करायचे) ३. दोघांचेही रेशनकार्ड - प्रभारी अधिकार्‍याला ओरिजिनल दाखवुन स्वाक्षर घेणे . ४. नावात बदलाचे पुरावे - रेशनकार्ड / लायसन्स / पॅन कार्ड / मतदानकार्ड / बँक पासबुक (ह्यात ६-७ कागदपत्रांची लिस्ट आहे पण पासपोर्ट लिहीलेला नाही..!!) ४. मा. उपनिबंधकांना विनंती अर्ज ५. मा. उपनिबंधकांसमोर जबाबी आज नागरी सुविधा केंद्रातील अनुभव - आकुर्डी येथील नासुकें मध्येच हे काम होते. तिथे गेलो तर म्हणे तुम्हाला तुमचा स्टॅम्प पेपर आणावा लागेल. मग जाउन तो घेऊन आलो. मग म्हणे खाली साहेब बसलेत त्यांना जाऊन आधी विचारा सही करतील का? विचारलं.. तर आम्ही... आमची काकुळतीला आलेली थोबाडं.. आमच्या हातातले कागद.. कशाकडेही पहायची तसदी न घेता साहेब वदले ... "स्कुल लिव्हिंग सर्टीफिकेट आणा..." " पण साहेब, पासपोर्ट आहे.." " स्कुल लिव्हिंगच पाहिजे.." आणि नायब तहसीलदार हुडुत करुन निघुन गेले.. पासपोर्ट हा पोलीस व्हेरीफाईड असल्याने त्याला सर्वोच्च महत्व असते असल्या भ्रमात मी ते घेऊन फिरत होते. पण घरात असलेल्या स्कुल लिव्हिंगने हातातल्या पासपोर्टच्या थुतरीत मारली.. आणि पडेल चेहरे घेऊन आम्ही परत आलो.. मी एकटीच हे करायचं असतं तर मी केलंही असतं.. पण ओळखीच्या कुणाला तरी सोबत न्यायचं म्हणजे त्याही माणसाला फिरवायचं.. त्यात तिथल्या बाईने विचारल्च की हा सोबतचा माणुस साक्षिदार आहे का म्हणे मुलाच्या जन्माचा? अरे???? तुम्हाला कशाची साक्ष हवीये? माझं नाव काय आहे ह्याची? की मुलाच्या जन्माची?? म्हण्जे नक्की काय चाललय काय? परवा मित्र आणि एक फॅमेली मेंबर आणि स्कुल लिव्हिंग ते परवा काढलेले पी.एम.टीचे तिकीट.. सगळं सोबत नेणारे..

धन्य तो स . कर्मचारी ! बाकी ४. नावात बदलाचे पुरावे - रेशनकार्ड / लायसन्स / पॅन कार्ड / मतदानकार्ड / बँक पासबुक (ह्यात ६-७ कागदपत्रांची लिस्ट आहे पण पासपोर्ट लिहीलेला नाही..!!) या मुद्द्यावर बोट ठेउन लोका तुम्हालाच वेड्यात काढणार ! पण पासपोर्ट का चालत नाही याचा उत्तर मिळणार नाही.