Welcome to misalpav.com
लेखक: वेल्लाभट | प्रसिद्ध:
एक सहज सुचलेली/केलेली तुलना. FM फिट व्हायचंय, व्यायाम करायचाय... असं म्हणताना/ऐकताना लोकांच्या चेह-यावर एखादं मोठं संकट पुढे उभं राहिल्यासारखे भाव असतात. समजा, की हे संकट आहे. प्रचंड मोठा डोंगर आहे. तुमचं उद्दिष्ट त्याच्या शिखरावर पोहोचणं हे आहे. तुम्ही म्हणजे एक फोर व्हील ड्राइव्ह एसयुव्ही आहात. तर; तुमच्या मागील चाकांना मिळणारी ताकद म्हणजे व्यायाम. सर्वात महत्वाचा. ख-या अर्थाने तुम्हाला प्रॉपेल करतो तो व्यायाम. पुढच्या चाकांना मिळणारी ताकद म्हणजे डायट. रेअर व्हील ड्राइव्ह इज नॉट इनफ. डाएट्ची म्हणजेच सकस आहाराची, पोषणाची जोड नसेल तर तुम्ही हा डोंगर चढू शकणार नाही. व्हायसे व्हर्सा. आहार, व्यायाम दोनही गरजेचं. इंजिन म्हणजे तुमचं मन. Its your mind that drives your exercise. शरीराला ताकद मनातून मिळते. बाहेरचं मोटिव्हेशन म्हणजे टोविंग व्हॅन सारखं आहे. ते तुम्हाला चालतं करू शकेल, पण अखेरपर्यंत नेऊ शकणार नाही. ड्रायव्हर म्हणजे तुमचा मेंदू. इच्छा नसेल तर उर्मी असूनही काहीही होत नाही. सो तुमचं डोकं ठरवेल तिथे तुम्ही जाणार. हेडलाईट्स म्हणजे ट्रेनर, मार्गदर्शक. तो नसेल तर दिशाहीन वाटचाल होते. म्हणजे चार दिवस जिम मग कुणी म्हणतं अरे डाएटने माझं कमी झालं, की डाएट, मग कुणी योगासनांची महती सांगतो, की योगा, कुणी म्हणतो फक्त चाल रे... की चालायला सुरूवात. असं होत रहातं. सो यु नीड अ गुड ट्रेनर. चाकं म्हणजे शिस्त. ती नीट नसतील तर ग्रिप जाते. गियर्स म्हणजे रेजिम किंवा वर्काउट शेड्युल. योग्य वेळी योग्य गियरमधे गाडी असली म्हणजे प्रोग्रेस होते. फ्युएल अर्थातच तुमची प्रेरणा. वर म्हटल्याप्रमाणे ती बहुतांशी मनातून येते. बाकी, तुमचे आदर्श तुम्हाला प्रेरित करतच असतात. हे सगळं साधलं की तुम्ही फिटनेसरुपी मेरूच्या शिखरावर पोहोचता. आणि जसं एखाद्या डोंगरमाथ्यावर जाऊन वाटतं, की एवढा सगळा उपद्व्याप, एवढे कष्ट केले त्याचं चीज झालं, तसंच तुम्हाला एखाद्या अनपेक्षित क्षणी स्वतःचाच फिटनेस बघून जाणवतं, that awesome feeling of being FIT. एक महत्वाचा नामोल्लेख: धाग्यातील चित्रात मागे दिसणारी हर्क्युलियन पोज़मधील व्यक्ती म्हणजे माझा ट्रेकस्नेही परेश पेणकर होय
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

जरा डिट्टेल लिवा! म्हणजे कल्पना छान आहे, पण आम्ही शेवट मिपाकर. नुसतं एक चित्र दिसलं की धावले पुढच्या धाग्यावर!

फिट व्हायचंय, व्यायाम करायचाय... असं म्हणताना/ऐकताना लोकांच्या चेह-यावर एखादं मोठं संकट पुढे उभं राहिल्यासारखे भाव असतात. समजा, की हे संकट आहे. प्रचंड मोठा डोंगर आहे. तुमचं उद्दिष्ट त्याच्या शिखरावर पोहोचणं हे आहे. तुम्ही म्हणजे एक फोर व्हील ड्राइव्ह एसयुव्ही आहात. तर; तुमच्या मागील चाकांना मिळणारी ताकद म्हणजे व्यायाम. सर्वात महत्वाचा. ख-या अर्थाने तुम्हाला प्रॉपेल करतो तो व्यायाम. पुढच्या चाकांना मिळणारी ताकद म्हणजे डायट. रेअर व्हील ड्राइव्ह इज नॉट इनफ. डाएट्ची म्हणजेच सकस आहाराची, पोषणाची जोड नसेल तर तुम्ही हा डोंगर चढू शकणार नाही. व्हायसे व्हर्सा. आहार, व्यायाम दोनही गरजेचं. इंजिन म्हणजे तुमचं मन. Its your mind that drives your exercise. शरीराला ताकद मनातून मिळते. बाहेरचं मोटिव्हेशन म्हणजे टोविंग व्हॅन सारखं आहे. ते तुम्हाला चालतं करू शकेल, पण अखेरपर्यंत नेऊ शकणार नाही. ड्रायव्हर म्हणजे तुमचा मेंदू. इच्छा नसेल तर उर्मी असूनही काहीही होत नाही. सो तुमचं डोकं ठरवेल तिथे तुम्ही जाणार. हेडलाईट्स म्हणजे ट्रेनर, मार्गदर्शक. तो नसेल तर दिशाहीन वाटचाल होते. म्हणजे चार दिवस जिम मग कुणी म्हणतं अरे डाएटने माझं कमी झालं, की डाएट, मग कुणी योगासनांची महती सांगतो, की योगा, कुणी म्हणतो फक्त चाल रे... की चालायला सुरूवात. असं होत रहातं. सो यु नीड अ गुड ट्रेनर. चाकं म्हणजे शिस्त. ती नीट नसतील तर ग्रिप जाते. गियर्स म्हणजे रेजिम किंवा वर्काउट शेड्युल. योग्य वेळी योग्य गियरमधे गाडी असली म्हणजे प्रोग्रेस होते. फ्युएल अर्थातच तुमची प्रेरणा. वर म्हटल्याप्रमाणे ती बहुतांशी मनातून येते. बाकी, तुमचे आदर्श तुम्हाला प्रेरित करतच असतात. हे सगळं साधलं की तुम्ही फिटनेसरुपी मेरूच्या शिखरावर पोहोचता. आणि जसं एखाद्या डोंगरमाथ्यावर जाऊन वाटतं, की एवढा सगळा उपद्व्याप, एवढे कष्ट केले त्याचं चीज झालं, तसंच तुम्हाला एखाद्या अनपेक्षित क्षणी स्वतःचाच फिटनेस बघून जाणवतं, that awesome feeling of being FIT. ]

छान. व्यायामाचा नेमका परिणाम कसा आणि काय होत असतो ? आपल्यासाठी योग्य व्यायाम प्रकार कसा निवडावा ? तसेच वेगवेगळ्या वयाच्या, वजनाच्या, जीवनशैलीच्या लोकांसाठी उचित असलेला व्यायाम आणी आहार याविषयी विस्तृतपणे लिहावे, असे सुचवतो. . .

अाजकाल सर्वजण व्यायाम, अाहार या बाबतीत जागरूक झाले अाहेत. खरंतर तुंम्ही अाम्ही व्यायाम करावा, असे अनेकांना मनापासून वाटते. पण त्याचे एक महत्वाचे कारण असे की त्या लोकांचा व्यवसाय तुंम्ही व्यायाम केला तर चालणार असतो. मी धागाकर्त्याबद्दल वा इथल्या कुणाबद्दल बोलत नाही, याची नोंद घेणे. खासकरून जीमवाले, रेडीओवर प्रायोजित कार्यक्रम करणारे असे काही बोलतात, की अापण जर व्यायाम केला नाही, तर जणू फार म्हणजे फारच मोठा धोका पत्करत अाहोत. पण याकडे जरा वेगळ्या दृष्टीकोनातूनही पाहता येइल. जर घरातली कामे स्वत: केली, बारीक सारीक कामासाठी वाहन नाही वापरले, छोट्या मोठ्या चढ-उतरणीसाठी लिप्टचा मोह टाळला, तर खरंच अापल्याला व्यायामाची गरज अाहे का? लोक जेंव्हा अापली भली मोठी कार घेऊन ‘जीम’ला जातात, अाणि अात जाऊन ट्रेडमीलवर पळत राहतात, तेंव्हा अाश्चर्य वाटते. एका मित्राने अतिशय उत्साहाने ट्रेडमील घेतली व महिन्याभराने त्याला गुढग्याचा त्रास सुरू झाल्याचा अनुभव अाहे. नंतर कळले की ट्रेडमीलवर चालणे नैसर्गिक नाही अन त्यामुळे गुढग्यांना हिसके बसत होते. तसेच काही घरात स्वयंपाक, धुणे (मशिनमध्ये हं), साधे घर झाडायलाही बाई लावतात, तेंव्हाही असेच अाश्चर्य वाटते. अापण घर झाडायला कमरेत वाकायचे नाही, पण योगा क्लास मात्र चुकवायचा नाही, हे काय अाहे?

व्यायाम फॅड झालाय, जिम्स स्टेटस सिंबॉल झाली आहेत, जिमवाल्यांचे धंदे चालावेत म्हणून खुळं काढली जातात इथपर्यंत ठीक आहे. मान्य. पण व्यायाम या संकल्पनेला पूर्वापार मानलं गेलेलं आहे आणि त्याचं महत्व खूप आहे. जर अमूक अमूक गोष्टी करताना जो होतो तोच व्यायाम असता तर या संकल्पनेचा कुठलाही इतिहास किंवा वैज्ञानिक पुरावे आपल्याला आढळले नसते. काही करता करता होतो तो व्यायाम नसून जो स्वतंत्रपणे विशिष्ट प्रकारे केला जातो तो व्यायाम. परिक्षा देता देताच अभ्यास होऊ शकतो का? तसं आहे हे. आता आधुनिक व्यायामप्रकार, जुने व्यायामप्रकार, नैसर्गिक - कृत्रिम हे वाद आमची पिढी तुमची पिढी सारखे व्यापक व न संपणारे आहेत. त्यात न पडलेलं बरं. तुम्हाला जो आवडतो तो 'व्यायाम' मात्र दिवसातला वेगळा वेळ काढून करणं ही प्रत्येकाची (मानलेली किंवा न मानलेली) गरज आहे. ट्रेडमिल चांगलं की नाही यावर परस्परविरोधी अनेक सिद्धांत, रिसर्च वाचायला मिळतील. हार्ड सरफेस वर धावू नये असं बहुतांश तज्ञ म्हणतात. चांगल्या ट्रेडमिल ला खाली शॉक अ‍ॅब्सोर्बर असतात ज्याने आघात कमी होतो. प्रतिसादातील व्यक्तीने कुठलं ट्रेडमिल घेतलं होतं ते ठाऊक नाही. शिवाय बूटही चांगले असायला हवेत. हे दोनही असेल तर पुढे धावण्याचं तंत्र, फॉर्म, वॉर्मप इत्यादी मुद्दे आहेत. बिना वॉर्मप कुठलाही व्यायाम केला तर तो बेक्कार अंगाशी येऊ शकतो. तेंव्हा ट्रेडमिल ला दोष देणं चूक आहे. बाकी मुद्दा राहिला सोयीस्कर वागण्याचा. घर झाडायचं नाही पण योगा क्लास मात्र नियमितपणे करायचा.... हे व्यक्तिदोष आहेत. त्याला कुठलाही व्यायाम काहीही करू शकत नाही.

वाद घालणे हा उद्देशच नव्हता. केवळ वेगळा दृष्टीकोन मांडणे असा होता. मी धागाकर्त्याबद्दल वा इथल्या कुणाबद्दल बोलत नाही, याची नोंद घेणे, असेही म्हटले अाहे. असो. अाजूबाजूला अगदी नेमस्त वागणार्या लोकांना रोग/ अारोग्याचे त्रास झाल्याचे पण त्याचवेळी काही व्यायाम न करणाराही मजेत असल्याचे दिसते, त्यामुळे व्यायाम केलाच पाहिजे, हे कधी कधी सरधोपट तत्व वाटते, इतकेच म्हणायचे अाहे.

माझ्या अख्ख्या प्रतिसादात वाद हा शब्द एकदा आलाय फक्त. तोही वेगळ्या संदर्भात; की व्यायामप्रकार कुठला असावा इत्यादी. माझा मुळीच हेतू नाही हो वादाचा. काय तुम्ही पण ! तुमचा दृष्टीकोन तुमचा आहे; माझा मी स्पष्ट केला. बास!

व्यायाम करायला जीम लावावे लागते हे गृहीतकच चुकीचे वाटतेय. घराच्या घरी करता येणाऱ्या सुर्य नमस्कारापासून ते धावणे, सायकलिंग असे वेगवेगळे व्यायाम आहेत, ज्या साठी जीम लावावी लागत नाही.
जर घरातली कामे स्वत: केली, बारीक सारीक कामासाठी वाहन नाही वापरले, छोट्या मोठ्या चढ-उतरणीसाठी लिप्टचा मोह टाळला, तर खरंच अापल्याला व्यायामाची गरज अाहे का?
होय, आहेच. बारीक सारीक कामे (!) आणि जिने चढून उतरून कोणी फीट होईल का? तुम्ही व्यायाम कशासाठी करता यावर हे डिपेंड करेल. कोणी जर वजन कमी करणार असेल तर त्याला चालावे अथवा पळावे लागेलच. घरातल्या घरातच सगळी कामे करणारे किती लोक फिट बघितलीय आपण? (जेनेटिकली बारीक लोक सोडा)
नंतर कळले की ट्रेडमीलवर चालणे नैसर्गिक नाही अन त्यामुळे गुढग्यांना हिसके बसत होते
ह्यासाठीच मशीन हाताळण्याची सवय नसेल तर सुरुवातीला कोणीतरी सांगणार माणूस लागत. नंतर ती आपण वापरतो. ट्रेडमिल वापरायचे काही नियम आहेत, ते नाही पाळले गेले की दुखापत होणारच. जीममध्ये ट्रेनर सांगतो व्यवस्थित कशी वापरायची.

व्यायाम करायला एक माणुस ठेवावा म्हणतोय. आहे का कोणाच्या माहितीत चांगला एखादा गरजू आणि मेहनती माणुस पैजारबुवा,

व्यायाम करायला एक माणुस ठेवावा म्हणतोय.
खरे आहे. पूजा-अर्चा करायला जर पैसे देऊन नेमलेला माणूस चालतो, आणि त्याचे पुण्य यजमानाला मिळते, मंदिर, चर्च इत्यादिला दिलेल्या दानातून पुण्यलाभ होतो, तर व्यायामाला काय हरकत आहे ? कामाच्या बाबतीत बाया जास्त सिन्सियर असतात म्हणे. त्यामुळे व्यायाम करायला माणूस ठेवण्याऐवजी बाई ठेवली तर ? यावर तज्ञांनी प्रकाश टाकावा.

पण एकदा व्यायाम न करणार्या, जाग्रणं करणार्या, बिनधास्त लोकांकडे पण बघा. कित्येक जरा काय झालं तर गळपटणारे ‘नाजूक’ पैलवान बघितलेला, - स्वधर्म

व्यक्ती तितक्या प्रकृती! ज्याचा त्याचा आनंद वेगळ्या गोष्टीत असतो असं म्हणू. पण तो केवळ 'आनंद' असतो त्याने भलंच होतं हे खात्रीने सांगता येईल का? परवाची एक गोष्ट आठवली. सहसा मी कुणाला मागितल्याशिवाय व्यक्तिगत सल्ले देत नाही. परंतु परवा ऑफिसमधल्या एका चैनफुक्याला न राहवून म्हटलं (चूक केली त्याबद्दल चारदा स्वत:ला ओरडलोय नंतर) की बाबा वाट लावशील एक दिवस स्वतःची. तर म्हणे कसा, "कुछ नही होता. और मेरेको कौनसा नब्बे सौ साल जीना है. पचास तक जियूं चलेगा बट फुल मजा करनेका. इसलिये शराब, सिगरेट, एव्हरिथिंग गोज!' दोनच शब्द उच्चारले मी त्यापुढे. ज्याचा त्याचा निर्णय.

स्वधर्मभाऊ/तै/काका/काकू....वर्कआऊटच्या/ फिटनेसच्या बाबतीत आतापर्यंतचं निरीक्षण सांगतो. यागोष्टीची ओढ, खुमखुमी...आताच्या भाषेत सांगायचं तर किडा असावा लागतो. सगळ्यांचंच काम नव्हे हे.

More so; the 'purpose' of exercise or fitness is largely misunderstood and misinterpreted in our society I believe. I can't comment on people abroad since I do not know much about. उदा: व्यायाम? मला कुठे बॉडीबिल्डिंग करायचंय व्यायाम? माझं वय आहे का? व्यायामाचं? यू नीड टू बी स्स्ट्राँग..... का? वीक असेनाका... मी काय मेवेदर आहे? अशा असंख्य काउंटर आर्ग्युमेंट्स ऐकायला मिळतात. पुढे बोलणंच खुंटतं.

हे आपापल्या प्रकृतीनुसार बदलतं असं मला वाटतं. मी गेली कित्येक वर्षे व्यायाम करतीये. कोणत्याही नटीसारखे दिसायचे म्हणून नव्हे तर नुसती तब्येत चाम्गली रहावी म्हणून. पण योगासने, सूर्यनमस्कार, किंवा जीममध्ये केलेले नाचप्रकार मला मानवतात. उगीच डोंगर चढायला जाणे, मैदानाला सत्रा फेर्‍या मारणे, किकबॉक्सिंग, सायकल दामटवणे वगैरे मानवत नाहीत. पण हेच माझ्या नवर्‍याला फार मानवतं. पण म्हणून सायकल दामटताना मला दम लागल्यावर नाजूक पैलवान म्हटले तर कसे चालेल? एका वयात जागरणं मानवतात. आपण जागून शिनेमे बघतो, मुले आजारी असताना जागव्तात पण म्हणून नेहमी कोणत्याही वयात हेच कसे मानवेल? मला साधी शिंक आली तरी आजूबाजूचे व्यायाम न करणारे म्हणतात,"काय उपयोग तुझ्या व्यायामाचा? झालीच ना सर्दी?" या बोलण्याला खरेतर काही अर्थ नसतो. ते त्यांच्या व्यायाम न करण्याचं एकप्रकारे समर्थन करत असतात असे मला वाटते.

AC जिम मध्ये खरोखरच व्यायाम होतो का! अंगातून घामाच्या धारा वाहायला पाहिजेत. असेही दिवसातले आठ- दहा तास थंडावा घेताच ना, मग शरीराला थोडे कष्ट द्या ना. Diet च वेड लागल आहे. कष्ट करायला नकोत मग shortcut शोधायचे. मी आधी नियमित व्यायाम करायचो, जवळपास वर्षभर केला आणि शरीरही कमावले. कोणताही खुराक नाही, जे नेहमी जेवायचो तेच, त्याव्यतिरिक्त काहीही नाही. व्यायामशाळाही सामान्य, डम्बेल्स, डबल बार, चेस्ट प्रेस बेंच, काही प्लेट्स आणि भिंतीत आडवा टाकलेला एक पूलअप्स बार…बस्स! त्यावेळेस जो व्यायाम केला तो आता मला कित्येक वर्षे पुरतोय. आता घरच्याघरी रोज फक्त सूर्य नमस्कार आणि पोटासाठी दोन आसने. दारू आणि सिगरेट च व्यसन सुद्धा केलं. पण या व्यसनामुळे जी हानिकारक तत्व शरीरात साठायची ती व्यायामाद्वारे घामावाटे नक्कीच बाहेर निघत असणार. घाम काढा रे अंगातून!

पण या व्यसनामुळे जी हानिकारक तत्व शरीरात साठायची ती व्यायामाद्वारे घामावाटे नक्कीच बाहेर निघत असणार.
त्रिवार नमन या आत्मविश्वासाबद्दल.

मी सिगारेट चे व्यसन करूनसुद्धा मी गिर्यारोहण (तेही hardcore) करताना सुद्धा अगदी सामान्य असतो. आता हे अस का?? कदाचित मी अंगमेहनतिची कामं आधी केलेली असल्याने शरीराचे लाड कधी केले नाही, त्यामुळे माझे शरीर तस बनल असेल. तरीपण सिगारेट वाईटच, आता ती कधी सुटते ते पाहायचं. आता महिन्यातून एकदोन वेळा दोन-दोन घोट दारु घेतली तर असा काय मोठा फरक पडणार आहे शरीरावर.

माझ्या एका नियमितपणे व्यायाम करणार्‍या मित्राला अनेक वर्षे सिगारेटचे व्यसन होते. आता ते सोडल्यावर महिनाभरात त्याचे वजन १० किलोने वाढले, आणि शरीर बेढब दिसू लागले.. सिगारेटीतील निकोटीन हे वजन नियंत्रित ठेवते म्हणे. कुणाला आहे का याबद्दल काही माहिती ?

निकोटीन बाबत आपल म्हणण पटतेय. कारण, गेली कित्येक वर्ष माझ वजन ७५ किलो आहे. कधीच कमी झालेलं कि वाढलेलं नाही. अगदी एखाद्किलोनेही नाही. सिगारेट वाईटच, कळतंय पण सालं वळतच नाही.

तर मग आमच्या मित्राचे वजन महिनाभरात दहा किलोने वाढले, ते कसे म्हणता ? व्यायाम तर ते नियमितपणे नेहमी करतच असतात. धूम्रपान हानिकारक, ते करू नये हे योग्यच, पण त्याने वजन नियंत्रित होतच नाही, हे कसे ?

चित्रगुप्त साहेब सिगारेट सोडली कि दर काही वेळाने ती प्यावी अशी जबरदस्त तल्लफ येते. या वर उपाय किंवा चाळा म्हणून लोक काहीतरी खातात त्यामुळे वजन वाढते. आमच्या मनोविकार तज्ञ सरांनी यासाठी त्यांच्या वर्गमित्राला सुपारी खायचा सल्ला दिला होता. ( सुपारी ऐवजी च्युईंग गम चालेल) . सुपारी एक तर बराच वेळ चावावी लागते शिवाय पोटात काहीच जात नाही. काही दिवसांनी सुपारी सोडून द्यावी.

प्रामाणिकपणे, ती सुटावी अशी सदिच्छा. वैयक्तिक मत, अधून मधून चार घोट तितका घात करणार नाहीत, जितका सिगरेट करते. असो. वाचलेलं सांगतोय; घामाचं कार्य प्रामुख्याने शरीराला हायड्रेटेड ठेवण्याचं असतं. फॅट 'जळून' बिळून वितळून घामावाटे बाहेर पडते हा निव्वळ हास्यास्पद समज आहे. इति रुजुता दिवेकर.

मी सांगण्यात कमी पडलो. घाम काढा म्हणजे शरीराला व्यायाम द्या. मला विज्ञानाला आव्हान द्यायचं नाही. :-) बाकी सिगारेटच खरच मनावर घेतलं पाहिजे. आपली कळकळ कळली.

AC जिम मध्ये खरोखरच व्यायाम होतो का!
म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का, की AC gym मध्ये जाणारे सगळेच तो चालू ठेवायचा आग्रह धरतात? आणखी दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही वर्कआऊट कसा करता त्याला महत्त्व आहे. जास्त घाम आला म्हणजे चांगला वर्कआऊट झाला असं नव्हे. तो मुंबईच्या लोकल्समधून प्रवास करतानाही येतो.
त्यावेळेस जो व्यायाम केला तो आता मला कित्येक वर्षे पुरतोय.
I'm speechless on this sentence, असा व्यायाम 'पुरत' असता तर मग बघायला नको. तुम्हाला 'पुरत' असेल तर तुम्ही नशीबवान आहात एवढंच म्हणेन!!

सूड आता घरच्याघरी रोज फक्त सूर्य नमस्कार आणि पोटासाठी दोन आसने.>>>> मी पुढे असही लिहिलेलं आहे. अवांतर:- मी प्रस्तरारोहक असल्याने अंगाचा भरपूर व्यायाम होतोच.

मी प्रस्तरारोहक असल्याने अंगाचा भरपूर व्यायाम होतोच.
हे माहीत आहे आणि कदाचित हे तुम्ही फिट असण्यामागचं गमक असेल. वर्षभर केलेला व्यायाम पुरण्याचं गणित काही पटलं नाही.

घामाबाबत गैरसमज दूर करणारे अनेक दुवे सापडतील. त्यातला हा एक बघा सतीश भाऊ दुवा घाम हे केवळ शरीर हायड्रेट होण्याचं माध्यम आहे. बाकी काहीही नाही.

व्यसनामुळे जी हानिकारक तत्व शरीरात साठायची ती व्यायामाद्वारे घामावाटे नक्कीच बाहेर निघत असणार. हे सिद्ध करू शकल्यास सद्याच्या प्रचलीत असलेल्या शास्त्रिय ह्युमन फिजिऑलोजीमध्ये बरेच क्रांतीकारी बदल करावे लागतील ! ;) हघ्या. तुमचा समज चुकीचा आहे, तसा समज दुसर्‍यांचाही होऊ नये केवळ याकरिताच हा प्रतिसाद !

मला ठाऊक असलेले व्यायामाचे फायदे: १. र्‍हदयाचे स्नायु बळकट होऊन त्याची कार्यक्षमता वाढणे. २. शरिरातील चरबीचे ज्वलन होणे. ३. स्नायुंची शक्ती वाढणे ४. स्नायुंचा लवचिकपणा वाढणे ५. स्नायुंची कार्यक्षमता वाढणे ६. सांधे मोकळे होणे, सांध्यांभोवती आव जमण्यापासून बचाव, परिणामी सर्व शारीरिक हालचालीतील सुलभता. ७. शरीराला अतिरिक्त प्राणवायू लाभणे. ८. एकंदरित जास्त ऊर्जा, उत्साह, प्रसन्नता लाभणे. याखेरीज आणखी फायदे असतीलच, त्याविषयी कुणीतरी लिहावे. अलिकडे मी ताई-ची आणि ची-गाँग नामक चिनी व्यायाम अजमावत आहे. यात अतिशय सावकाश हालचाली करायच्या असल्याने स्नायुंना दुखापत होण्याची शक्यता नसते. उतारवयात करायला अतिशय उपयुक्त. आजकाल बहुतेकांना उगीचच प्रत्येक बाबतीत कारण नसता घाई करायची खोड जडलेली असते, सहनशीलतेची सवय मोडलेली असते, त्यावरही हे व्यायाम अतिशय परिणामकारक आहेत. . ...

ताई ची. वाचकांच्या मनात गोंधळ होऊ नये म्हणून मी जमेल तेवढे दुवे जोडत असतो :-) . चर्चा विषय अन प्रतिसाद खूप महत्वाचे आहेत. धागाकर्त्याचे विशेष आभार.

व्यायामाचे अनेक प्रकार असतात, ज्याने जसं झेपतंय तसा व्यायाम करावा. काही लोक हजारो रुपडे खर्च करून जिमा लावतात, काही हनुमान व्यायामशाळेत जातात (आमच्यासारखे), काही भरपूर धावतात, काही सायकल चालवतात, काही पोहायला जातात, काही योगासने करतात (मी करतो) मागे भरत दाभोळकर एक कार्येक्रमात म्हणालेले,ते गेली अनेक वर्षे न चुकता व्यायाम करतात,जसे आपण अंघोळ करायला काही कारणे देत नाही, तशीच व्यायामाला सुधा देऊ नयेत, रोजच्या जगण्याचा व्यायाम हा एक भाग झाला कि वेगळे efforts द्यावे लागत नाहीत. कुठलीही गोष्ट सतत ण चुकता २१ दिवस केली कि त्याची सवय लागते म्हणतात. ज्यांना व्यायाम करायचा कंटाळा येतो त्यांनी ण चुकता २१ दिवस तो करून पाहावा :)