Welcome to misalpav.com
लेखक: प्रकाश घाटपांडे | प्रसिद्ध:
मला आज सकाळी टाटास्काय कडून १४०९३४०४९४ या फोनवरुन माझ्या लँडलाईनवर फोन आला.टाटा स्काय व्यवस्थित चालू आहे ना असे चारले. मी काही अडचण नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने जावेद अख्तर ॲक्टीव या बद्दल माहिती दिली. १०२ नंबर वर दिसते असे संगितले. मी ठिक आहे असे सांगितले. त्यानंतर मला एसेमेस आल तुमची विनंती पुर्ण करण्यात आली आहे व जावेद अक्तर ॲक्टीव्ह ४९/- प्रतिमहिना. इथे मी त्यांना चालू करण्याबद्दल काहीही सांगितले नसताना स्वत:च फोन करुन तुमचीच विनंती असल्याची बतावणी करुन आपल्या लबाडीयुक्त मार्केटिंगचे दर्शन घडवले. त्यांच्या वेबसाईट वर तक्रार करण्याची सोयच नाही. एक हेल्पलाईन नंबर दिला आहे त्यावर सतराशे साठ सूचना असतात. शेवटी मी नोडल अधिकार्‍याला ईमेल केले आहे. आपल्याला असे काही अनुभव आहे का? आल्यास काय केले पाहिजे.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

कालच्याच पेप्रात बहुधा "लोकमत" इथे असाच काहीसा अनुभव आलेला दिला आहे मी छापील आव्रुत्तीत वाचले आहे. ग्राहकाने सांगीतले नसताना परस्पर पॅकेज बदलणे असा काही प्रकार आहे. एअरटेल्चीच हवा काढण्याचा अनुभव असलेला नाखु.

आता व्होडाफोन या मोबाईल नेटवर्क कंपनीची सेवा घेताना असा अनुभव मला वारंवार येतो आहे. पहिल्यांदा त्यांच्या कस्टमर केअरमधून मला फोन येतो. अमक्या रूपयाचे ४ जीबी थ्रीजी इंटरनेट स्पेशली तुमच्या नंबरसाठी पुढील तीन महिन्यांठी फुकटात दिले जात आहे, किंवा तेवढ्या रूपयाचे तुमच्या स्पेशल नंंबरसाठी फार कमी पैशात सुरू करून दिले जाईल. मग आपण जरी नाही सांगितले तरी ते "होय" असेच्च धरून स्वत:च्या मनाने अशी सेवा सुरूही करून टाकतात. ज्याचा काही दिवसांनी आपल्याला मॅसेज येतो आणि यथावकाश महिन्याच्या शेवटी त्याचा बिलावरही परिणाम दिसून येतो. यावर उपाय म्हणून अलिकडे मी मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डर टाकून घेतले आहे. फोन सुरू होतानाच त्या पलिकडच्या व्यक्तीला तुम्ही जे काही बोलणार आहात ते रेकॉर्ड होणार आहे असं सांगतो. तेव्हा योग्य तेवढी माहीती सांगा. हे मोबाईल कंपन्यांवाले लुटारू ग्राहकाच्या खिश्यातून पैशे काढण्यासाठी कुठल्या थराला जातील याचा नेम नाही.

मी माझे टास्का गु्ंडाळून दोन वर्षांपूर्वी माळ्यावर टाकले आणि डिशटिव्ही प्लस घेतले.त्यात वाटेल तेवढे रेकॅार्डींग करता येते.मला टासकाचा वाइट अनुभव नाहीआला अजुनही कॅालसेंटरला माझा रेजिस्टर्ड लँडलाइन अॅक्टिव आहे.

१८६० ५०० ६६३३, १८६० २०० ६६३३. या शिवाय तुम्ही टाटास्काय डॉट कॉम या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून घेतल्यास ऑनलाईन त्यांच्या प्रतिनिधींशी बोलू शकता. या वेबसाईटवर लॉग ईन करून आपण आपल्या पॅकेजची माहिती, अकाऊंट बॅलंन्स, तसेच नवीन चॅनल्स चालू करणे इ. गोष्टी करू शकता. फोन कॉलपेक्षा ही सुविधा चांगली आहे. आपला मेल आयडी रजिस्टर होत असल्याने नवीन चॅनल्स चालू झाल्यास त्वरीत मेल येतो. अपग्रेडेशनचे काम चालू असल्याने मधल्या काळात टाटास्काय्चे चॅनल्स दिसत नव्हते. नवीन चॅनल्स चालू करणे हा अनुभव माझ्या बहिणीलाही आला होता. माझ्याकडे टाटास्कायची डीलरशीप आहे, अजुन कोणत्या प्रकारची मदत हवी असल्यास सांगा. शक्य ती माहिती देईन.

प्रयत्नात नाही झाले, तर ट्वीटर आणि फेसबुकवर पकडा, उत्तर देतील..

भुलुन एअर्-टेल (तेल) घेतले सन २००९ आणि भुल भुलैयाला सुरुवात झाली. दर महिन्याला हे चॅनेल फ्री ते चॅनेल फ्री (विशेषतः मुलांचे ) आणि एका कालावधीनंतर त्याचे पैसे अ‍ॅडव्हान्स पॅक मधून कापून घ्यायला चालू केले. ग्राहक तक्रार ला फोन केला तर पहातो तक्रार नोंदवून ठेवतो तुम्हाला हे पॅकेज लागू नाही अशी उत्तरे मिळाली. आणि अगदी सटकल्यानंतर कस्टमर केअरला इ-मेल आणि मार्केटीग्लाही इमैल चालू केली. त्यात ठरावीक मुदतीत याची शहनिशा नाही केली तर मीच कनेक्शन बंद करीन्च शिवाय ग्राहक न्यायालयात जाईन अशी धमकी दिली (मी तुम्हाला कधीही माझे पॅकेज बदलायची/वा वाढवायची विनंती+सूचन केली नसताना तुम्ही मनानेच हा कारभार केला आहे अश्या आषयाच इमेल केला सन २०१०) नंतर थोडे दिवसांनी जी काही सारवासारव केली गेली, ती कंपनीकडून फक्त फोनवर लेखी काही नाही मग मी फक्त पॅकेजची मुदत संपण्याची वाट पाहिले आणि कनेकशन बंद केले. मन फोनवर फोन मी ही जोपर्यंत वरील मॅनेजर बोलणार नाही तो पर्यंत मला कनेक्शनच नको असा पवित्रा घेतला.सुदैवाने पत्नीनेही सांगीतले नसेल कनेक्शन तर काहीच फरक पडत नाही. एकून १० महिन्यापेक्षा जास्त दिवस बंद ठेवले. सन २०१३. बरीच फोनाफोनी, माझे एकच उत्तर कायम शेवटपर्यंत ठेवले आणि प्रश्नही कायम तेच.
  • नवीन ग्राहकांनी जितकी चॅनेल्ची यादी पॅकेज्मध्ये दिली जाते तीच जुन्या ग्राहकांच्या त्याच नावाच्या पॅकेजमध्ये तफावत का (चॅनेलची संख्या)
  • मागीतले नसताना एखादे चॅनेल का चालू केले आणि त्याची रक्कम प्रतीदिन या प्रमाणे मॅकेजमधून का वजा केली गेली.
  • जर नवीन ग्राहकांनाच फायदा द्यायचा असेल तर तसे वेब्साईटवर स्पष्ट लिहा की हा फायदा फक्त नव्या ग्राहकांना आहे आणि जुन्या ग्राहकांना ठरावीक्च चॅनेल फ्री/सवलतीच्या दरात आहेत
घरी अत्यंत दुखःद घटना घडल्यावर मुलांचे मन रमावे म्हणून जुलै २०१४ मध्ये पुन्हा कनेक्श्न घेतले पण जोडणी चार्ज वगळता एकही जादा पैसा न देता. शिवाय पॅकेजबद्दल्ची माहीती वेब्साईटवर पारदर्शक असावी म्हणून वारंवार (माझ्यासारख्या पीडीत ग्राहकांसाठी एक साईट आहे ज्यावर प्रत्येक जण आपले या एअर्टेल-डिश्-टाटा यांचे अनुभव मांडतात) तेथेही ही साईट लपवाछपवीची आहे असा वारंवार सूर अस्लयाने म्हणा की आणखी काही लोकांचे दडपण आल्यामुळे म्हणा कंपनीला उपरती झाली. अड्व्हान्स पॅकेज घेतले तर त्याची यादी तपशील्वार माहीती अस्लेली सुवीधा उपल्ब्ध केली गेली. शिवाय पुन्हा कनेक्शन जोडुन घेताना कुठलाही बदल माझे इमेलशिवाय होणार नाही हे सांगीतले. सध्या सुरळीत चालू आहे पण तरी किमान एक्-दोन वर्षे बंद ठेवण्याचा मानस आहेच कारण अजून्ही फुकटचे आपोआप येणारे संदेश येतच आहेत, तक्रार ही केली आहे.
सध्या पॅकेज मुदत संपण्याची वाट पहात आहे. (नव्याने अध्याय लिहायला)
हवा-शेपूट वाला नाखु

अजूनपर्यंत कधी प्रॉब्लेम नाही. कनेक्शन शिफ्टिंग वगैरे व्यवस्थित करून देतात. मात्र आता कोणाचाही टोल फ्री नंबरचा फोन आला तर रिसिव्ह न करणे आणि डीएनडी रजिस्टर्ड असताना तुम्ही फोन कसा करता म्हणून तासंपट्टी करणे हे दोन उपाय नक्कीच वापरेन.

आता कोणत्याही सर्व्हीस प्रोव्हायडर कडून असा कॉल आल्यास मी कधीही "ओके" म्हणत नाही. सर्वसामान्यतः माझी वाक्यं अशा क्रमानं असतात. १) काय आहे ते? २) यासाठी माझ्या बिलात काही वाढ होणार आहे का? समजा वरील प्रश्नाच्या उत्तरादाखल कॉल करणारा बर्याच वेळेस म्हणतो "Sir, first month (2/3 months) are free" त्यावेळेस मी विचारतो "त्या फ्री कालावधीनंतर बिलात वाढ होणार कां?" ३) त्याच्या मुळे बिलात वाढ होणार असेल तर I am not interested. Thank you आणी कॉल कट करतो. बर्याच वेळेस कॉल करणारा विचारतो "सर तुम्ही अमुक अमुक बोलत आहात कां?" त्यावेळेस मी बिनदिक्कतपणे उलट विचारतो "तुम्ही कॉल कोणाला करताय हे तुम्हाला माहीत नसेल तर बाय बाय " कारण वरील माहिती जरी सहजपणे विचारली जात आहे असं वाटलं तरी तसं नसू शकतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेलीमार्केटर्सचे कॉल रेकॉर्ड केले जातात. उद्या जर तुम्हाला काही कारणाने कायदेशीर लढाई लढावी लागली तर रेकॉर्डेड कॉल मध्ये कुठेही तुम्ही "OK" म्हटलेले नसल्याने तुम्ही ती वस्तू /सेवा विकत घेतली असं होत नाही.

होय. मला पण असाच अनुभव आला होता. कोणती तरी मला नको असलेली सेवा चालू केली. १ महिना फ्री आणि नंतर रोज १ रुपया की असेच काहीतरी रक्कम कापून घेणार होते. मी ती सेवा रद्द करण्यास सांगीतली तर म्हणाले की ही फ्री सर्विस आहे व आम्ही बंद करु शकत नाही. शेवटी कंटाळून पहिला महिना संपायच्या शेवटच्या दिवशी रात्री फोन केला व भांडलो तेव्हा ती सेवा बंद झाली. आता कधीही टाटा स्कायचा फोन आला की त्यांचे काहिही न ऐकता 'माझे कनेक्शन व्यवस्थित चालू आहे, मला अजून काही माहिती नकोय, माझ्याकडे कस्टमर केअरचा फोन क्र., इमेल आयडी सर्व काही आहे' असे म्हणून फोन बंद करतो. फोनवर ऐकण्यासारखी काही नवीन माहिती नसते हो. जी काही नवी माहिती येते ती टिव्हीवर एक पिवळा ठिपका येतो तेव्हा दिसतेच.

असाच अनुभव एअरटेल कडुन आला होता. ३०० एम.बी इंटरनेट पॅक बद्दल ऑफर आहे त्याची माहीती द्यायला. मी फक्त ऐकुन घेतले व नको असे सांगुन सुध्दा बिलामध्ये त्याचाही चार्ज लावला होता. कस्टमर केअर ला फोन करुन तक्रार केल्यावर ती रक्क्म रद्द केली गेली. माझ्यामते इथे कस्टमर केअर मध्ये काम करणार्यांकडुनच काहीतरी बनवाबनवी होत असावी. म्हणजे ठराविक टार्गेट पूर्ण करायचेच ह्या उद्देशाने अशी सटरफटर सर्विस ग्राहकाला जुजबी माहीती सांगुन व त्याच्या निर्णयाला फाट्यावर मारुन त्याच्याच गळ्यात मारली जात असावी. व रक्कम ही तशी कमी असल्यामुळे अगदी लक्षपूर्वक बिल पाहीले तरच लक्षात येऊ शकते. बर्याच जणांना कळतही नसावे कि अशी काही सर्विस आपल्या गळ्यात मारली गेली आहे ते.

असाच अनुभव एअरटेल कडुन आला होता. ३०० एम.बी इंटरनेट पॅक बद्दल ऑफर आहे त्याची माहीती द्यायला. मी फक्त ऐकुन घेतले व नको असे सांगुन सुध्दा बिलामध्ये त्याचाही चार्ज लावला होता. कस्टमर केअर ला फोन करुन तक्रार केल्यावर ती रक्क्म रद्द केली गेली. माझ्यामते इथे कस्टमर केअर मध्ये काम करणार्यांकडुनच काहीतरी बनवाबनवी होत असावी. म्हणजे ठराविक टार्गेट पूर्ण करायचेच ह्या उद्देशाने अशी सटरफटर सर्विस ग्राहकाला जुजबी माहीती सांगुन व त्याच्या निर्णयाला फाट्यावर मारुन त्याच्याच गळ्यात मारली जात असावी. व रक्कम ही तशी कमी असल्यामुळे अगदी लक्षपूर्वक बिल पाहीले तरच लक्षात येऊ शकते. बर्याच जणांना कळतही नसावे कि अशी काही सर्विस आपल्या गळ्यात मारली गेली आहे ते.

भविष्यात असे चिटिंग होईल. एखादी सेवा सुरु करण्यासाठी मिस कॊल द्या असा नवा फंडा आहे. त्यात एखाद्याला वाटेल की मिस कॊल दिला की ते आपल्याला फोन करुन विचारतील की तुम्हाला सेवा हवी आहे का? नंतर काहीच होणार नाहि व तुमची सेवा डायरेक्ट सुरु होईल. नंतर म्हणतील की सेवा सुरु करण्यासाठी मिस कॊल द्या अस आम्ही म्ह्टल होत. त्याप्रमाणे तुमचा मिस कॊल आल्याने सेवा सुरु केली आहे

help@tatasky.com या आयडीवर ईमेल पाठवून सविस्तर तक्रार नोंदवा.तक्रारीच्या शेवटी हेसुद्धा लिहा की जर लगेच तक्रारीचे निराकरण झाले नाही तर ग्राहक न्यायालयात तक्रार नोंदवून टाटा स्कायऐवजी डिशटिव्ही किंवा इतर केबल सप्लायर कडे स्विच होण्याचा पर्याय खुला आहे.

http://www.akosha.com/consumer-forum/# या लिंक वर जाऊन तक्रार नोंदवा. ते लगेच दखल घेतील,मला डिश टि व्ही ला हाच प्रोब्लेम आला होता.२४ तासाच्या आत सकारात्मक प्रतिक्रिया मिळाली.

टास्काच्या कॅाल सेंटरात काम करणारे लोक डेटा चोरून त्याचा गैरवापर करतात अशी दाट शंका येते.माझा वापराढ नसलेला सेट टाप बॅाक्स कंपनीला(??)परत करण्यासाठी डिसेंबरपासून एका नंबरवरून कॅाल आणि न केल्यास लीगल अॅकशनच्या धमक्या येत होत्या.त्यांना फुकट डबा मिळवायचा होता.वरील हेल्पलाइन नंबरवर कॅाल केल्यावर लगेच तुमचा बॅलन्स अमुक आहे ढाय सेवा करू विचारले आणि कंपनी बॅाक्स घेत नाही ,कॅाल खोटा आहे हे सांगितले.help at tatasky dot com ला हा मेल केला होता- To: help@tatasky.com tatasky sub id 1014159576 . I have been receiving phone calls from some 'TATASKY' office (phone no. 09227777287 )asking me to return the digicomp for free. Please inform me about this if such a call is really from your office. More > त्यांचेकडून लगेच रजिस्टर्ड फोन नं ला कॅाल आला असं काही परत घेत नाही।यानंतर "तिकडून"फोन आल्यावर सांगितले माणुस पाठवा मी इकडे पोलिसंना बोलावतो-लगेच फोन बंद झाला.

वरील पोस्ट विषयाला सोडून आहे परंतू हे सांगायचे आहे की कंपन्या आपले संपर्काचे काम बाहेरील कॅाल सेंटरसकडे देताहेत आणी तिथून डेटा (नाव,पत्ता,फोन नंबर) चोरला जाऊ शकतो. त्याचा {दुरु}पयोग होतो आणि ग्राहकाची समजूत होते की कंपनीतर्फेच कॅाल आला आहे आणि कंपनी लबाडी करते आहे.