मित्रांनो काल तनू वेड्स मनू रिटर्न पाहिला, पहिला असा चित्रपट जो मला अगदी पहिल्या फ्रेम पासून शेवटच्या फ्रेम पर्यंत आवडला. साधी आणि सुंदर कथा, मोजक्याच व्यक्तिरेखा, चांगले कलाकार, नैसर्गिक अभिनय, साधे संवाद, साधी लोकेशन्स, प्रसंगानुरूप गाणी आणि योग्य सादरीकरण. चित्रपटाची कथा सांगावी अशी नाही ती प्रत्यक्ष चित्रपटगृहात जाऊन अनुभवावी अशी आहे. चित्रपटात कुठेही ओढून ताडून केलेले विनोद नाहीत किवा प्रेक्षकांच्या भावना पिळवटून रडवाणूक नाही. शेवटचा प्रसंग तर अतिशय उत्कृष्ट रित्या हाताळला आहे. संपूर्ण चित्रपट एक नितांत सुंदर अनुभव देऊन जतो.
लागे राहो मुन्ना भाई नंतर पहिला चित्रपट असेल ज्याचा दुसरा भाग हा पहिल्या भागाइतकाच प्रभावी बनवला आहे. कथा अगदी तिथूनच चालू होते जिथे पहिला भाग संपला होता. तनू आणि मनू च्या लग्ना नंतर त्याचं वेगळ होण आणि मनू च्या आयुष्यात तनू सारखी दिसणारी मुलगी येण, मनू तिच्या प्रेमात पडण असा आजकालच्या कुठल्याही मराठी हिंदी मालिके मध्ये शोभेल असा विषय घेऊन दिग्दर्शक आनंद राय यांनी चित्रपट बनवलाय. चित्रपटाचा शेवट हि आपल्या सर्वांना अपेक्षित असा मराठी हिंदी मालिकांमध्ये शोभेल असाच आहे परंतु चित्रपटाचे सादरीकरण हा या चित्रपटाची जमेची बाजू आहे.
सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका प्रामाणिकपणे जिवंत केल्या आहेत, विशेष कौतुक करावे लागेल ते कंगना राणावत चे संपूर्ण चित्रपट मध्ये तिने तिच्या वाट्याला आलेल्या दोन्ही व्यक्तिरेखा उत्कृष्टपणे वठवल्या आहेत. माझ्या आवडत्या नायिकांमध्ये काजोल नंतर कंगनाचा नंबर लागेल असे वाटते. दोन व्यक्तिरेखा आणि त्याही परस्परांपासून अगदी वेगवेगळ्या, केवळ किंचितसे चेहऱ्यामध्ये साम्य. या चित्रपटाने डबल रोल चा एक वेगळा पायंडा घालून दिला आहे.
एकूणच काय तर चित्रपट नक्की पाहण्यासारखा आहे, पूर्वीच्या जामन्या सारखे दोन दोन वेळा थेटरात तिकीट काढून बघण्याचा मोह आवारत नाही.
- पुणेकर
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
चित्रपट आवडला. धमाल आहे.
सिनेमा चांगला आहे.
अरे वा
छान चित्रपट...
:)
आवड ज्याची त्याची. :)
बघणार.
खरंच..
फ़क्त आणि फ़क्त कंगणाच
हम थोडे बेवफा क्या हो गये, आप तो बदचलन हो गये...
काय डायलॉग आहे!!!!!!!!
डायलॉग म्हणून ठिक आहे हो, पण
डायलॉग म्हणून ठिक आहे हो, पण
अस्साच शिनुमा
+१
चित्रपटाचा शेवट बिलकुल पटलेला नाही
..... आणि बन्नो तेरा स्वेटर
हा हा हा!!!! =))
अरे बापरे..
+१ ..पाहिला चित्रपट
मस्त आहे चित्रपट..
जेवढी हवा झाली आहे तेवढा rocking वाटला नाही
कंगनासाठी पहायला हवा असं
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- खुदा भी जब तुम्हे.... :- Ek Paheli Leelaमला आवडला..
मला 'पिकू' जास्त हवाबाजीवाला
मलाही 'पिकू' जास्त हवाबाजीवाला वाटला.
+१
मला तर आवडला ब्वॉ चित्रपट.
आम्हालाही खूप आवडला हा
चित्रपट चांगला आहे. कंगना
बेसलेस बद्दल सहमत..
दत्तो तनूसारखी दिसते हा त्या
पहीला भाग आवडला
+१
अतिशय सहमत. सुरेख सिनेमा आहे
हा हिंदी सिनेमा आहे का?
तनु वेडा मनु
तुम्ही उलट लिहिले आहे...तो
ती जर दिसायला बरयापैकी असेल
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Blank Space... :- Taylor Swift+११११११११११११११११
अरारा...
+१११११११११११११११११११११११११११११११११११११
असेल असेल
तनु वेड्स मनु चा दुसरा भाग
चित्रपट पाहणे
शेवट वेगळा हवा होता असं राहून
मला चित्रपट आवडला पप्पी आणि
अरे काय के एल पी डी पिच्चर
कलियुग बॅट्मॅन कलियुग...
अगदी अगदी.. कंगनाचं वागणं
Pagination