Welcome to misalpav.com
लेखक: जेपी | प्रसिद्ध:
वाचता वाचता वाढे भाग १ सध्या ऑफलाईन वाचन चालु आहे.बरीचशी पुस्तके वाचली, त्यातील काही निवडक पुस्तकाबद्दल थोडक्यात ओळख. १) द्रोहपर्व- लेखक- अजेय झणेकर. एक पेशवाईकालावर आधारीत कादंबरी. कादंबरी सुरु होते नारायणराव पेशवे यांच्या खुना पासुन आणी संपते मराठा-इंग्रज यांच्यातील पहिल्या लढाईतची सांगता झाल्यावर.. कादंबरी पहिल्या पानापासुनच मनाची पकड घेते..नारायरावांचा खुन,रघुनाथ पेशवे यांची महत्वकांक्षा,बारभाईच कारस्थान्,मराठी सरदारांचे हेवेदावे,इंग्रजाचीं सत्ता मिळवण्यासाठी चालणारी धडपड.. या सगळ्यात लक्षात राहते "इष्टुर फाकडा" ऊर्फ कॅप्टन जेम्स स्टुअर्ट ची संमातर कथा,त्या सोबत "तुळजा" नावाचे पात्र. २) आम्ही भगीरथाचे पुत्र - लेखक - गोनिदा. भाक्रा नांगल धरणाभोवती फिरणारी कादंबरी. १०० वर्षाचा कालखंड व्यापणारी. यातल कुठलच पात्र मुख्य नाही तरीही सर्वच पात्र लक्षात राहतात.. क्रांतीकारी विचारांचा जोगेन्,विधायक मार्गाने जाणारा जिवन,आपल्या गुरुंच स्वप्न पुर्ण करण्यासाठी धडपडणारे महंत. या सगळ्याचे मार्ग वेगवेगळे तरीही ध्येय एकच.. प्रत्येक पात्र स्वतः चा ठसा उमटवत राहते.. ३) मनात - लेखक - अच्युत गोडबोले- मानसशास्त्राची सफर घडवणार पुस्तक. ४) चंद्रमुखी - लेखक- विश्वास पाटिल- एका वाक्यात ' वेळ वाया गेला' संकल्पना बहुतेक एका मराठवाड्यातील स्व. नेत्याच्या चोफुला प्रकरणावरुन ढापलीय. *************************************************************************************** धागा सध्या काय वाचतात या प्रकारे पुढे जाईल अशी अपेक्षा ... कुठल्याही प्रकारच्या पुस्तकाची ओळख चालेल.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

पहिली दिडशे पान बोर झाल 15 दिवस लागले वाचायल नंतर 50 पानात कलाटणी.आवडली. सुधाकर यातला शिकलेला,नैतीकतेनै वागणारा पण धाडस नसलेला नायक त्यामुळे अपयशी, शेवट यशस्वी. खटकलेल-इंग्रजी वाक्याच मराठी टाईप

धन्यवाद! नंदा खर्‍यांचं "नांगरल्याविण भुई" तुमच्याकडे आहे का? अनेक दिवस शोधतो आहे.

जर बाईक वेडे असाल, तर नक्की वाचण्याजोगे पुस्तक.. नील ब्रॅडफोर्डने तमाम बाईक विश्वातील लेखकांच्या पुस्तकांमधून निवडक उतारे एकत्र केलेत.. मजा येते सर्व अनुभव वाचायला.. बाकी चे गवेराचे मेटारसायकल डायरीज, आणि त्याचा साथीदार अल्बर्टो ग्रनाडो याचं ट्रॅव्हलिंग विथ चे गव्हेरा, ही दोन्ही फेवरेट आहेत.

काल गीताधर्म मंडळ (पुणे), येथे भगवद्गीतेचा जगप्रवास (विश्वसंचार) या वा. ल. मंजूळ (निवृत्त ग्रंथपाल, भांडारकर) यांनी लिहिलेल्या छोट्या पुस्तिकेचा प्रकाशन समारंभ श्रीपाद भट (टि. म. वि. पुणे ) यांच्या हस्ते झाला. घरी आल्यावर लगेच ती वाचून काढली. जगातील पंच्याहत्तर मुख्य भाषांमध्ये आणि सुमारे दोन हजारांहून अधिक भाषांतरे झालेला गीता हा तत्वज्ञान विषयक ग्रंथ बायबलच्या खालोखाल लोकप्रिय असलेला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा धार्मिक ग्रंथ आहे. गीतेची इंग्रजी भाषांतरे (२८८), अन्य विदेशी भाषांतील विविध रुपांतरे (३६ भाषांतून), गीतेचे देशी भाषांतील भाष्यकार (२८५), मराठी भाषांतरे (१४२), इत्यादी सूच्या श्री मंजूळ यांनी दिल्या आहेत. ही लहानशी पुस्तिका वामनाच्या पावलासारखी व्यापक आहे असे ग. वा. करंदीकर यांनी त्यांच्या अभिप्रायात लिहिले आहे, ते सार्थ वाटते.

जेप्या... अलेक्सेई मारेस्येवः एका अस्सल माणसाची कहाणी आणि शांत इथे पहाटवेळा या दोन रशियन कादंबर्या वाचल्यास? अप्रतिम रे अप्रतिम...