अंताक्षरी मागे का बरे पडली? व वरून मीच गाणे देऊ ?
वादळवारं सुटलं ग,वार्यानं तुफान उठलं ग,
भिरभिर वार्यात,पावसाच्या तोर्यात्(की असेच कायसेसे)
सजणानं होडीला पाण्यात लोटलं ग..
ग वरून गाणं टाका रे कोणी तरी..
ग साजणी
कुण्या गावाची कुण्या नावाची
कुण्या राजाची तू ग राणी..ग....
आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी
खुळुखुळु घुंगराच्या तालावर झाली दंग तालावर झाली दंग
शालु बुट्टेदार लई लई झाला तंग लई लई झाला तंग
सोसणा भार घामाघूम झालं अंग
गोर्या रंगाची न्यार्या ढंगाची चोळी भिंगाची ऎन्यावानी
आली ठुमकत मान मुरडत
नार लचकत हिरव्या रानी
डाळिंबाच दाण तुझ्या पिळलं ग ओठावरी पिळलं ग ओठावरी
गुलाबाच फुल तुझ्या चुरडलं गालावरी चुरडलं गालावरी
कबुतर येडं खुळ फिरतयं भिरीभिरी फिरतयं भिरीभिरी
तुझ्या नादानं झालो बेभान जीव हैराण येड्यावानी...ग..
गीतकार: जगदीश खेबुडकर संगीत: राम कदम
आणि गायकः वाघ्या आणि कोरस..या वाघ्या बद्दल कोणाला काही माहिती आहे का?
अवांतरः पिंजरा करता अरुण सरनाईक आणि जयश्री गडकर यांची नावे प्रमोट केली गेली होती पण शांतारामबापू संध्याबाईंशिवाय दुसर्या कोणालाही लिड रोल द्यायला तयार नव्हते, असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते आहे.
न वरून-
नको नको रे पावसा,
अस्सा धिंगाणा अवेळी,
घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली..
(इंदिराबाई संत)
हे भलते अवघड असते...कोणी प्रचंड आवडणारे....दुर दुर जाताना...
डोळ्यातील अडवुन पाणी..... हुंदका रोखुनी कंठी.... तुम्ही केविलवाणे हसता...आणि तुम्हांस नियती हसते..... हे भलते अवघड असते....
शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी ...
चंद्र आहे ...गंध वाहे... धुंद या गाण्यातुनी..
आज तु डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा.........
तु अशी जवळी रहा......
If u can't be a pencil to write anyone's happiness, then try atleast to be a nice rubber to erase everyone's sorrows!
नाही कशी म्हणू तुला येते जरा थांब
पण हिरव्या वाटांनी जायचे रे लांब
नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत
एकांती पण अपुल्या आड येते रीत
नाही कशी?
तुमच्यावर "श"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
लहान माझी
लहान माझी बाहुली
मोठी तिची सावली
नकट नाक उडविते
घारे डोळे फिरविते
त घ्या
प्रकाश घाटपांडे
तुला पाहते रे
तुला पाहते रे, तुला पाहते
तुझी मूर्त माझ्या उरी राहते
जरी आंधळी मी तुला पाहते
त घ्या
त्या तरु तळी विसरले
त्या तरू तळी विसरले गीत
ह्रदय रिकामे घेउन फिरतो इथे तिथे टेकीत
त घ्या
प्रकाश घाटपांडे
तुझे रुप चित्ती राहो
तुझे रुप चित्ती राहो, मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम
'म' घ्या
मालवून टाक
मालवून टाक दीप
चेतउन अंग अंग
राजसा किती दिसात
लाभला निवांत संग
ग घ्या
प्रकाश घाटपांडे
गणराज..
गणराज रंगी नाचतो,नाचतो
पायी घागर्या करिती रुणझुण,
नाद स्वर्गी पोचतो...
ती गेली तेव्हा रिमझिम
ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता
ती आई होती म्हणूनी, घनव्याकूळ मी ही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता
अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता
(कवी ग्रेस)
'त' घ्या
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
त
तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे
र
रानात
रानात सांग कानात
आपुले नाते,
मी भल्या पहाटे येते..
तुझ्या डोळ्यांमधे गहिर्या
तुझ्या डोळ्यांमध्ये गहीऱ्या असा मी हिंडतो आहे
जणू त्या सागराचे मी किनारे शोधतो आहे.
तुला सोडुनी जाण्याची मला चिंता आता नाही
तुझा आभास सोनेरी मला सांभाळतो आहे.
तिथे बोलायला जाऊ जिथे ना एकटे राहू
इथे एकांत एकाकी नको ते मागतो आहे.
तुझ्या कैफात आता मी तुलाही लागलो विसरू
असे समजू नको तू की तुला मी टाळतो आहे.
चंद्रकांत सानेकरांची अप्रतिम गझल पद्मजा फेणाणी-जोगळेकरांच्या आवाजघ्या.
ह घ्या. (हलकेच नव्हे ह वरून गाणे म्हणा)
हले डुले
हले डुले हले डुले
पाण्यावरी नाव,
पैलतीरी असेल
माझ्या राजसाचा गाव..
वारा गाई गाणे !
वारा गाई गाणे, प्रीतीचे तराणे
धुंद आज वेली, धुंद फुल पाने
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नको ताई रूसू..
कोप-यात बसू..
येऊ दे ग गालांत
खुदकन हसू....
नको ताई रूसू...
'स' घ्या.
- प्राजु.
स्वागत
स्वागत करुया सकल जनांचे
सुदिन आजी हाची पाहिला
पु ल देशपांडे अध्यक्ष लाभला...
'ल'
ल
ल ल ल ला
ल ल ल ला
ल ला ल ला
ला ला
कशी झोकात चालली
कोळ्याची पोर
जशी चवथीच्या चंद्राची कोर.
;)
राजा ललकारी
राजा ललकारी अशी दे
हाक दिले साद मला दे
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
देणार्याने
देणार्याने देत जावे,
घेणार्याने घेत जावे...
घेता घेता एक दिवस
घेणार्याचे हात घ्यावे.
-विंदांची घेता ही अप्रतिम कविता.
स्वाती
व घ्या..
अरे काय हे..
अंताक्षरी मागे का बरे पडली? व वरून मीच गाणे देऊ ?
वादळवारं सुटलं ग,वार्यानं तुफान उठलं ग,
भिरभिर वार्यात,पावसाच्या तोर्यात्(की असेच कायसेसे)
सजणानं होडीला पाण्यात लोटलं ग..
ग वरून गाणं टाका रे कोणी तरी..
ग साजणी
ग साजणी
कुण्या गावाची कुण्या नावाची
कुण्या राजाची तू ग राणी..ग....
आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी
खुळुखुळु घुंगराच्या तालावर झाली दंग तालावर झाली दंग
शालु बुट्टेदार लई लई झाला तंग लई लई झाला तंग
सोसणा भार घामाघूम झालं अंग
गोर्या रंगाची न्यार्या ढंगाची चोळी भिंगाची ऎन्यावानी
आली ठुमकत मान मुरडत
नार लचकत हिरव्या रानी
डाळिंबाच दाण तुझ्या पिळलं ग ओठावरी पिळलं ग ओठावरी
गुलाबाच फुल तुझ्या चुरडलं गालावरी चुरडलं गालावरी
कबुतर येडं खुळ फिरतयं भिरीभिरी फिरतयं भिरीभिरी
तुझ्या नादानं झालो बेभान जीव हैराण येड्यावानी...ग..
आली ठुमकत मान मुरडत
नार लचकत हिरव्या रानी
कवळ्यात घेऊनिया अलगद उचलावं अलगद उचलावं
मऊ मऊ हिरवाळीच्या दैवरात भिजवावं दैवरात भिजवावं
पिरतीच बेणं तुझ्या काळजात रुजवावं काळजात रुजवावं
लाडेगोडीनं खुळ्या ओढीनं राहू जोडीनं राजाराणी..ग
आली ठुमकत मान मुरडत
नार लचकत हिरव्या रानी
तुफान लोकप्रिय गीत निळू फुले बैलगाडीत उभं राहून म्हणत आहेत. वर्णन संध्याचं आहे. चित्रपट सांगायची गरज नाही. पिंजरा.
गीतकार: जगदीश खेबुडकर संगीत: राम कदम
न घ्या.
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
पिंजरा..
गीतकार: जगदीश खेबुडकर संगीत: राम कदम
आणि गायकः वाघ्या आणि कोरस..या वाघ्या बद्दल कोणाला काही माहिती आहे का?
अवांतरः पिंजरा करता अरुण सरनाईक आणि जयश्री गडकर यांची नावे प्रमोट केली गेली होती पण शांतारामबापू संध्याबाईंशिवाय दुसर्या कोणालाही लिड रोल द्यायला तयार नव्हते, असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते आहे.
न वरून-
नको नको रे पावसा,
अस्सा धिंगाणा अवेळी,
घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली..
(इंदिराबाई संत)
लवलव करी पात
लवलव करी पात, डोळं नाही थार्याला
एकटक पहावं कसं, लुकलूक तार्याला
चवचव गेली सारी, जोर नाही वार्याला
सुटं सूटं झालं मन, धरु कसं पार्याला
अवांतर ;) आता आम्हाला ( गुगल शोधाशोध करुन) एक मराठी गाण्याचा अड्डा सापडला आहे,आता आमच्याकडे भरपूर गाणी आणि कविता आहेत चालेल का अस्स कॉपी करुन ! :)
घ्या 'ल'
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लाजली..
सीता स्वयंवराला
पाहुनी रघुनंदन सावळा..!
'ल' घ्या.
- प्राजु.
लखलख..
लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती मोती ज्योतीया.. आ आ आ..
आज..
आज गोकुळात रंग खेळतो हरी
राधिके जरा जपून जा तुझ्या घरी..
- प्राजु.
राजसा
राजसा,जवळी जरा बसा,
जीव हा पिसा,
तुम्हावर बाई..
इ/ई घ्या..
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी, देवाची आळंदी
लागली समाधी, ज्ञानेशाची
'च' घ्या :)
च
चल उठ रे मुकुंदा, झाली पहाट झाली
बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली |
चल उठ रे मुकुंदा ..
" द /दा"
ती गेली तेव्हां
ती गेली तेव्हां रिमझिम
पाउस निनादत होता.
मेघात मिसळली किरने
हा सूर्य सोडवीत होता.
" द /दा"
" द /दा" आले होते "त" नाही....
दे टाळी मला...घे टाळी तुला..
तुझि अन माझी प्रित दोघांची सांगू या जगाला...
लागते ओढ
लागते अनाम ओढ श्वासांना
येत असे उगाच कंप ओठांना
होई का असे तुलाच स्मरतांना....
नसतेस
नसतेस घरी तु जेंव्हा, जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे , संसार फाटका होतो
तोच चंद्रमा
तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी
एकांती मजसमीप तीच तूहि कामिनी !
नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे
जाईचा कुंज तोच तीच गंधमोहिनी
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
निंबोणीच्या झाडामागे
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही
'ह' घ्या
हरिनाम ..
हरिनाम मुखी रंगते
एकतारी करी वाजते
विनविते, मी तुला, भाववेडी मीरा
गोड नामी तुझ्या दंगते
"त/ते"
त्या तिथे, पलिकडे, तिकडे
त्या तिथे, पलिकडे, तिकडे
माझिया प्रियेचे झोपडे !
गवत उंच दाट दाट
वळत जाइ पायवाट
वळणावर अंब्याचे
झाड एक वाकडे
:)
ड
डोळे हे ...
डोळे हे जुलमि गडे
रोखुनि मज पाहु नका
जादुगिरी त्यात पुरी
येथ उभे राहु नका
"क"
केशवा.....
केशवा..... माधवा......... तुझ्या नामात रे गोडवा...तुझ्या नामात रे गोडवा....||धृ.||
तुझ्यासारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा...
वेळोवेळी, संकटातुनि...तारिसी मानवा.......||१||
केशवा.... माधवा.... तुझ्या नामात रे गोडवा......
------"व"
:)
"व".... (मी हे
"व"....
(मी हे "जानकी" चित्रप्टातलं...गाणं टंकण्याचा मोह नाही टाळु शकले... कृपया.... समजून घ्याव्यात माझ्या भावना....)
विसरू नको.... श्रीरामा मला......
विसरू नको.... श्रीरामा मला...........
मी तुझ्या ... पाउली जीव वाहिला.....आ$$$आ.....
विसरू नको.... श्रीरामा मला......
:)
लाजून हासणे ..
लाजून हासणे अन
हासून ते पहाणे ..
मी ओळखून आहे
सारे तुझे बहाणे ...
" ण = न "
" ण = न " नको
" ण = न "
नको देवराया अंत आता पाहु...प्राण हा सर्वथा जाऊ पाहे......
______"ह"
"ह" हिची चाल
"ह"
हिची चाल तुरुतुरु..
उडती केस भुरुभुरु...
डाव्या डोळ्यावर बट ढळली...
जशी मावळत्या उन्हात... केवड्याच्या बनात... नागीण सळसळली....
--ल...
"ल"
लाज वाटे आज बाई वाटतो आल्हादही
व्हावयाची भेट त्यांची व्हावयाचा संवादही
जवळ येते ती घडी अन् दूर जातो का धीर
भरुनी येती उगी डोळे कंप देही सारखा
भास होतो पावलांचा कानी येतो सादही
लाज वाटे आज बाई वाटतो आल्हादही
दोन भुवया या कमानी पापण्यांची तोरणे
प्रियकराच्या स्वागतासी सिध्द झाली लोचने
जीव थांबे लोचनी त्या ना तनूची दादही
लाज वाटे आज बाई वाटतो आल्हादही
हे भलते
हे भलते अवघड असते...कोणी प्रचंड आवडणारे....दुर दुर जाताना...
डोळ्यातील अडवुन पाणी..... हुंदका रोखुनी कंठी.... तुम्ही केविलवाणे हसता...आणि तुम्हांस नियती हसते..... हे भलते अवघड असते....
कवी : संदिप खरे
अल्बम : आयुष्यावर बोलु काही
तु तेव्हा
तु तेव्हा तशी तु तेव्हा अशी
तु बहरांच्या बाहुंची .....
चित्रपट : निवडुंग
चांदोबा
चांदोबा चांदोबा भागलास का?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का?
निंबोणीचं झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी
मामाच्या वाड्यात येऊन जा
तूप रोटी खाऊन जा
तूपात पडली माशी
चांदोबा राहिला उपाशी
'श' घ्या
शुक्रतारा
शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी ...
चंद्र आहे ...गंध वाहे... धुंद या गाण्यातुनी..
आज तु डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा.........
तु अशी जवळी रहा......
If u can't be a pencil to write anyone's happiness, then try atleast to be a nice rubber to erase everyone's sorrows!
हळूवार
हळूवार तुझी चाहुल..
का धडधडते हे ऊर.....
चित्रपट कुठला आहे ते माहित नाही पण सुकन्या कुलकर्णी वर चित्रीत झालेलं हे गीत ...
""ह"" हृदयी
""ह""
हृदयी वसन्त फुलताना... प्रेमास रंग यावे....
प्रेमास रंग चढताना... दुनियेस का डरावे.....
---व.....
प्रशांत दामलेच्या एका नाटकातील गीत
विरह वणवा पेटला...
सोडुनी जाता प्रिया....
मै अकेला रह गया बस...मै अकेला रह गया....
विलोपले
विलोपले मधुमिलनात या........
...य.....
या
या रावजी.....तुम्ही बसा भाऊजी...
कशी मी राखु तुमची महरजी......
तुम्ही बसा भाऊजी....
सुरेखा पुणेकर यांची एक गाजलेली लावणी....
ज
ज :
जीवनगाणे..... गातच रहावे.. जीवन गाणे....
--न :
जिवलगा....
जिवलगा.... राहीले रे.. दुर घर माझे....
पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे.....
जिवलगा....
...ग....
""ज"" जो
""ज""
जो आवडतो सर्वाला
तोची आवडे देवाला
दीन भूकेला दिसता कोणी
घास मुखीचा मुखी घालूनी
""न""
अगं सोनम,
अगं सोनम, हा "ज" कुठून आणलास मध्येच?
:-?
अरे
अग ज वरुन गाण लिहित होते तोपर्यत अ॑ताक्षरी पुढे गेली होती. त्यामुळे माझा "ज" मध्येच आला
असो...
असो...
नंदाच्या नंदना...
मनाच्या मोहना....
नंदाच्या नंदना...मनाच्या मोहना....
भेट सख्या.. देइना... येईना... जिवलगा.. येईना...
:)
परत "न"..
केव्हा तरि
केव्हा तरि पहाटे उलटुन रात्र गेलि... मिटले चुकुन डोळे परतुन रात्र गेलि....
लेक लाडकी
लेक लाडकी या घरची
होणार सून मी त्या घरची
"च" वरुन
माझ्या आईचे आवडते गाणे :)
(मराठी संगीतप्रेमी)सागर
चाफा
चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना
गेले आंब्याच्या वनी
म्हटली मैनेसवे गाणी
आम्ही गळ्यात गळे मिळवून
चाफा बोलेना...
नवीन आज चंद्रमा
नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी
मनी नवीन भावना, नवेच स्वप्न लोचनी !
दूर बाल्य राहिले, दूर राहिल्या सखी
बोलण्या कुणासवे सूर दाटले मुखी
अननुभूत माधुरी आज गीत गायने...
Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.
"न"...
"न"...
नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा....
सत्यम शिवम सुन्दरा......||धृ.||
शब्दरुप शक्ती दे... भावरुप भक्ती दे....
प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा.... ||१||
विद्याधन दे आम्हास... एक छंद एक ध्यास....
नाव नेई पैलतीरी दयासागरा..... ||२||
होऊ आम्ही नीतिमंत... कलागुणी बुद्धीमंत...
कीर्तिचा कळस जाई उंच अंबरा.... ||३||
-- "र"....
"र"
राजसा जवळी जरा बसा जीव हा पिसा तुम्हा वीण बाई
कोणता करू शृंगार सांगा तरी काही
ही वाट दूर जाते ...
ही वाट दूर जाते
स्वप्ना मधील गावा
माझ्या मनातला का
तेथे असेल रावा ||
" व "
वारा गाई गाणे
वारा गाई गाणे
प्रितिचे तराणे
धुन्द आज वेली
धुन्द फुल पाने
'न'
"न"
नाव माझे फुलांनी विचारू नये
नांव सांगेन तेव्हा शहारू नये
य
या कातरवेळी , पाहिजेस तु जवळी
ल
लळा जिव्हाळा शब्दच खोटे मासा माशा खाई
कुणी कुणाचे नाही वेड्या कुणी कुणाचे नाही..
"ह"
ही पोरगी कसली अरे ही मनात ठसली
हिला पाहून काळीज करतय हो धकधक धकधक
"क" वरुन...
कशी सांगू मी सांगू कुणाला
आज आनंदी आनंद झाला...आज आनंदी आनंद झाला...
"ल" वरुन
"ल"
लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
यमूनाजलि खेल खेलुया ... krshinna कन्हेय्या या
माफ करा krishinna टाईप करता आला नाहि..
कॄष्णा असे टाईप करतात kRuShnaa
कॄष्णा असे टाईप करतात kRuShnaa
- सागर
"य"
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
वार्यावर
वार्यावरती गंध पसरला नाते मनाचे
मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे
जल्लोष आहे आता उधाणलेला
कुणीतरी पूर्ण करारे ही विनंती
- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
"ल"
लव लव करी पातं, डोळं नाही थार्याला
एक टक पाहू कसं, लुकलुक तार्याला
"ई" वरुन
लाखांत लाभले भाग्य तुला ग बाई
विटेवरच्या विट्ठलाची झालीस रखुमाई
श्रेयः सुमन कल्याणपुर , शांताबाई जोशी आणि दशरथ पुजारी
"ई" वरुन
"ई" वरुन
ईल्लु ईल्लु पिल्लु गं....अजुन भलतच टिल्लु गं.....
नाक छोटं तोरा मोठ्ठा....गाल रुसुन फुल्लु गं.....
गायकः सलिल कुलकर्णी
अल्बम : - अग्गो बाई ढग्गो बाई
कवी : संदिप खरे
गंध
गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नि माझे व्हावे मिलन...
"श" आलं
नाही कशी म्हणू तुला येते जरा थांब
पण हिरव्या वाटांनी जायचे रे लांब
नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत
एकांती पण अपुल्या आड येते रीत
नाही कशी?
तुमच्यावर "श"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
'क' आलं
शम्भो शन्करा ...................
करुणाकरा जगपालका........
क घ्या क
"राजे!"
कोणास ठावूक कसा ...
कोणास ठावूक कसा
पण शाळेत गेला ससा ...
सशाने म्हटले पाढे
आणि घडघड वाचले धडे
गुरुजी म्हणाले शाब्बास
ससा म्हणाला करा पास ...
"स" घ्या ...
(हे असे चांगले धागे वर आणल्याबद्दल धन्यवाद बरं का !)
स...
सखी, मंद झाल्या तारका..
आता तरी येशील का.. येशील का..
======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..
काय बाई सांगू
काय बाई सांगू
कस्सं ग सांगू
मलाच माझी वाटे लाज
काहीतरी होऊन गेलंय आज
"ज" घ्या ...
जय शारदे!
जय शारदे वागीश्वरी,
विधिकन्यके विद्याधरी..
ज्योत्स्नेपरी कांती तुझी
मुख रम्य शारद चंद्रमा
उजळे तुझ्या हास्यातुनि
चारी युगांची पौर्णिमा
तुझिया कृपेचे चांदणे नित वर्षू दे अमुच्या शिरी.. वागीश्वरी..
वीणेवरी फिरता तुझी
चतुरा कलामय अंगुळी
संगीत जन्मा ये नवे
जडता मतीची भंगली
उन्मेष कल्पतरूवरी बहरून आल्या मंजिरी.. वागीश्वरी..
'र' घ्या..
(इतकं सुंदर गाणं आहे.. पूर्ण लिहावंच असं वाटलं..)
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
रामा रघुनंदना
रामा रघुनंदना, रामा रघुनंदना
आश्रमात या कधी रे येशिल ?
मी न अहिल्या शापित नारी
मी न जानकी राजकुमारी
दीन रानटी वेडी शबरी
तुझ्या पदांचे अखंड चिंतन, ही माझी साधना
"न" ....
नच सुंदरी करू कोपा!
नच सुंदरी करू कोपा मजवरि धरि अनुकंपा
रागाने तव तनु ही पावत कशि कंपा
करपाशी या तनुला बांधुनि करि शिक्षेला
धरुनिया केशाला दंतव्रण करि गाला
कुचभल्ली वक्षाला टोचुनि दुखवी मजला
हाचि दंड योग्य असे सखये मत्पापा..
'प' घ्या!!
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
पहाटे पहाटे
पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली
ल
लाजून हासणे अन् हासून ते पहांणे..
मी ओळखून आहे.. सारे तुझे बहाणे..
======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..
ने मजसी
ने मजसी ने , परत मातॄभुमीला ,
सागरा प्राण तळमळला .