मराठी अंताक्षरी

चला मराठी अंताक्षरी खेळूया!

आजी सोनियाचा दिनु.. वर्षे अमृताचा घनु
हरी पाहिला रे हरी पाहिला रे

र.

रति रंगी रंगे ध्यान रंगवी तरंगा
वांच्छिला प्रेमसंग परि होय मनोभंग

विकचदल सुमनांग भ्रमरीस सुखसंग
विपरीत परि दैव तरी होई रसभंग

पुढचे अक्षर "ग "

पैजारबुवा,

रुपानं देखणी, सुपारी चिकणी, सोळावं सरलं
दुनिया फिरते माझ्या मागं पर तुलाच मी हेरलं
तुझं पाऊल कुठे फसलं?

हे हे हे हे हे, मला भुतानं पछाडलं, मला भुतानं पछाडलं....

याला भुतानं पछाडलं, याला भुतानं पछाडलं....

इवले इवले सुख चिमुकले जर निसटले मिळेल का पुन्हा
हलके फूलके ढगाच्या सारखे व्हावे कधीतरी वाटते का मला
उंच उंच झूला भासते गरगर
धुंद मौज किती वाटते वरवर
नाद लाव तू मनाला

तुझ्या माझ्या संसाराला आनि काय हवं तुझ्या माझ्या लेकराला, घरकुल नवं.
नव्या घरामंदी काय नविन घडंल घरकुलासंग समदं येगळं होईल..
दिस जातील, दिस येतील भोग सरंल
सुख येइल..

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती
हिरवेहिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघुन कुणाचे हळवे ओठ स्मरावे

हि दोन शेपरेट गाणी आहेत.

दैवजात दुखे भरता दोष ना कुणाचा
पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा

आणि

एक धागा सुखाचा अन शंभर धागे दु:खाचे
जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे

पैजारबुवा,

या बाबतीत त्यांचे बरोबर आहे

माझ्या
येथोनी आनंदू रे आनंदू ।
कृपासागर तो गोविंदू रे
कृपासागर तो गोविंदू रे
येथोनी आनंदू रे आनंदू

या गाण्यावरची त्यांची ती प्रतिक्रीया होती.

(जस्टिस) पैजारबुवा,

धन्यवाद आजोबा.
मी असच म्हणत आलिये हे गाणं.
कुणीच नाही करेक्ट केलं.
हर एक दोस्त कमीना होता है.

धन्यवाद आजोबा.
मी असच म्हणत आलिये हे गाणं.
कुणीच नाही करेक्ट केलं.
हर एक दोस्त कमीना होता है.

नकोस नौके परत फिरू ग नकोस गंगे उर भरू
श्री रामाचे नाव घेत या श्रीरामाला पार करू
ज्या गंगे ज्या भागीरथी ज्या ज्या राम दाशरथी

पैजारबुवा,

क्या बात है... बर्याचा दिवसांनी आठवल हे गाणं

मी आपला थुई थुई नाच माझ्या अंगणात मोरा पकडुन बसलो होतो.

लिहितो "र" वरुन

पैजारबुवा,

ठेउन हिम्मत मर्दा वाणी
लाव सगळ्यांची वाट अरे तू लाव सगळ्यांची वाट
हिम्मत कसली जिवात माझ्या झालीय ग घबराट
घामही फुटला अंगालाया सुटलाय ग थरथराट,

(थरथराट मधले लक्ष्याचे गाणे)

पैजारबुवा,

टिम्क्याची चोळी बाई रंगान फुलायली.
तुझी माझी जमली जोरी ....... बाय गो

ग घ्या

(अरे ते टिंब टिंब कोणीतरी सांगा रे)

टिमक्याची चोली बाय रंगान्‌ फुलयली
तुझीमाझी जमली जोरी माझे वसयकरीन बाय गो

पैजारबुवा,

गोरी गोरी पान, फुलासारखी छान
दादा मला एक वहिनी आण

गोर्‍या गोर्‍या वहीनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी
चांदण्यांच्या पदराला बिजलीचा बाण

वहिनीला आणायला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणाची जोडी
हरणाची गाडी तुडवी गुलाबाचे रान

वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा
तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्या परी होऊ, दोघी आम्ही सान
दादा मला एक वहिनी आण

निर्गुणाचा संग धरिला जो आवडी
तेणें केलें देशोधडी आपणियासी मायबापा

पैजारबुवा

पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती रत्‍नकीळ फांकती प्रभा,
अगणित लावण्य तेजःपुंजाळले न वर्णवे तेथींची शोभा,
कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू,
येणे मज लावियेला वेधू.

ध घ्या

मी मज हरपून बसले गं, सखी मी मज हरपून बसले गं

आज पहाटे श्रीरंगाने, मजला पूरते लूटले गं
साखर झोपेमधेच अलगद प्राजक्तासम टिपले गं

गे मायभू तुझे मी, फेडीन पांग सारे
आणीन आरतीला हे चंद्रसूर्यतारे

बादवे, गाण्याच्या भेंड्या म्हणायचं सोडून अंताक्षरी हा हिंदी शब्द का वापरला जातोय?

विकल मन आज झुरत असहाय
हि चांदरात नीज नच त्यात
विरह सखी मी कुठवर साहू
नाही मज चैन
क्षण क्षण झुरती नैन कोणा सांगू

हटातटाने पटा रंगवुनि जटा धरिशि कां शिरी, मठाची उठाठेव कां तरी
वनांत अथवा जनांत हो कां मनांत व्हावे परि, हरीचें नांव भवांनुज तरी

पैजारबुवा,

रंगात रंग तो शामरंग पाहण्या नजर भिरभिरते
कून तान विसरन भान ही वाट कुणाची बघते
तया सपतसूराचया लाटेवरूनी साद ऐ!कूनी होई
राधा ही बावरी, हरी ची,राधा ही बावरी

झिणिझिणि वाजे बीन, सख्या रे, अनुदिन चीज नवीन

कधि अर्थाविण सुभग तराणा , कधी मंत्रांचा भास दिवाणा
सूर सुना कधि केविलवाणा शरणागत अति लीन
सख्या रे, अनुदिन चीज नवीन,

पैजारबुवा

नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच

ढगांशी वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच

तव नयनांचे दल हलले ग,
पानावरच्या दंवबिंदूपरी
त्रिभुवन हे डळमळले ग

तारे गळले, वारे ढळले
दिग्गज पंचाननसे वळले
गिरि ढासळले, सूर कोसळले
ऋषि-मुनि-योगी चळले ग,

पैजारबुवा