पुस्तक पान

वारंवार विचारले जाणारे प्रश्न.

Primary tabs

नमस्कार, मिसळपाव वर नव्याने दाखल झालेल्या लोकांना काही गोष्टी
करण्यासाठी जरा अडचण जाणवते तसेच नवीन सुविधा देऊ केल्यास त्याची ओळख
सुद्धा करून देता यावी या हेतूने हे सदर सुरू करीत आहोत. संकेतस्थळावर
कुठलीही गोष्ट कशी करावी या विषयी चर्चा सुरू करण्या आधी कृपया येथे बघूनघ्यावे की तो प्रश्न आधीच कुणी विचारलेला तर नाहीये ना  ?

काही प्रश्नांचे दुवे.

१) सदस्य होण्यापूर्वी वाचलेच पाहिजे असे काही.
२) टंकलेखन साहाय्य
३) मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?
४) मिपावर मोबाईलवरून फोटो कसा चढवावा
५) आपले संकेताक्षर (पासवर्ड) कसे बदलावे?
६) काही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे
७) वाचनखुणा कशा साठवाव्या?
८) दुवा (लिंक) कसा द्यावा.

शेर भाई

मूळ नाव आणि मि पा नाव वेगवेगळे ठेवता येते का ??
उदा. माझ्या मूळ नावा ऐवजी मला "शेर भाई" नाव ठेवायचे आहे, करता येईल का??

हॉटेलात आलेली माणसं
सध्या 6 सदस्य हजर आहेत.

पैलवान
संजय क्षीरसागर
साखरेचा दाणा
सेरू०९२७
गवि
स्वलेकर

पैलवान, गवि, साखरेचा दाणा ही खरी नावे नसावित असा अंदाज आहे. तस्मात तुम्हालाही नाव बदलून घेता यायला अडचण नसावी असा अंदाज आहे.
करायचे असेल तर प्रशांत यांना व्यनि करा.

रमेश आठवले

माझ्या लॅपटॉप वर मिसळपाव उघडले की सर्वात वर एक काळी पट्टी येते आणि लेखाचे नाव व त्याची लिंक हे तीच्या खाली झाकले जातात. हे कितीही आकाराचा फॉन्ट वापरला तरी जात नाही. तरी ही पट्टी दुर करता येईल का ?

चौथा कोनाडा

मलाही ही समस्या येत आहे, सध्या या त्रुटीशी तडजोड करताना तारांबळ होतेय हे खरं !
ही पट्टी दुर करता आली तर बरं होईल !

मराठी_माणूस

मलाही ही समस्या येते. त्यावर तात्पुरता उपाय म्हणजे ब्राउजरच्या सगळ्यात वर ट्यॅब मधे धाग्याचे शिर्षक दिसते, तिकडे पहाणे

मराठी_माणूस

ताज्या घडामोडी - ऑगस्ट सप्टे. २०२०

हा धागा का दिसत नाही ?

दशानन

मी काही लिहू शकत नाही आहे, लिहले तर प्रकाशित होत नाही आहे.

गोरगावलेकर

आज सकाळी माझ्या तळ कोंकण या धाग्यावर प्रतिसाद देतांना मला खालीलप्रमाणे मेसेज आला व माझा एकच प्रतिसाद अर्धवट तीन वेळा प्रकाशित झाला. .

पाच मिनिट थांबून प्रतिसाद दिला तरी तसेच झाले.
हीच विनंती समजून सं.मं माझे शेवटचे चार प्रतिसाद उडवतील का? विनाकारण प्रतिसादांची संख्या जास्त दिसते

कंजूस

मिपाचं टेम्प्लेट drupal 7 वर आधारित आहे म्हणजे त्याय ही सोय आहे. राजकीय किंवा चालू घटना इत्यादी धागे अशा पद्धतीत असावेत असं मला वाटतं. नवीन प्रतिसाद वरती असे. आणि पंचवीस /- पन्नास प्रतिसादानंतरचे आपोआप रद्द अशी रचना.

मॅन्युली अशी वेगवेगळ्या धाग्यांना मोड्युलमधे अशी सुविधा असते, अशी सेटींग करता येईल. पण पहिल्या धाग्यावर अडकलेले बोळे अन्य धाग्यावर येतच राहतील असे वाटते. अर्थात.मालक चालक नीलकांत आणि प्रशांतलाच त्यातले तपशील माहिती.

-दिलीप बिरुटे

गॉडजिला

खरडवहीत आपण लिखाण कसे करावे ? तसेच ते लिखाण पुर्ण झाल्यावर ते नवे लेखन मधे येण्यासाठी कुथे क्लिक करावे ?

चौथा कोनाडा

खरडवहीतील लेखन ही त्या त्या सभासदासाठी मर्यादित असते. आपण ज्याला खरड लिहितो त्याला आणि इतर सभसदांना वाचता येते, मिपाच्या कोणत्यही साहित्य प्रकारात हे प्रकाशित होत नसते. डाव्या बाजूस खरडवही असा हिरव्या आयतातला पर्याय दिसतो तो टिचकून खरड लिहून खाली दिलेल्या "पाठवा" या आयतावर टिचकी मारावी लागेल.

मी नुकतीच तुम्हाला खरड पाठवलेली आहे. ती तुमच्या सभासदनाम पानावर "खरडवही" (माझी खरडवही ) या आयतावर टिचकवल्यावर दिसेल.

गॉडजिला

मला वाटले होते लेख इथे टाकण्यापुर्वी कच्चे लिखाण करायची काही सोय आहे की काय. आणी खरडवही वर टिचकी मारल्यावर कुठल्यातरी धाग्यावरचे प्रतिसाद मला दिसत आहेत असे वाटत होते. आता आलं लक्शात खरडवही ही एक आंतरमिपासदस्य मेसेजिंग सिस्टम आहे.

आपल्या वेळ आणी मार्गदर्शनासाठी अत्यंत धन्यवाद. _/\_

तर ती कुठल्या विभागात देऊ? कथा pdf स्वरूपात माझ्याकडे आहे. ती इथे नुसती चिकटवता येते की वेगळी टंकलिखित करावी लागेल?

कंजूस

Pdf pages continuously copy होत नाहीत.
म्हणून
eBook converter site
https://ebook.online-convert.com/convert-to-pdf
किंवा apps वापरून epub format तयार करणे.
हे सलग कॉपी होतं.

(इंग्रजी सहज होतं. पण देवनागरीचं नेहमी होतंच असं नाही. युनिकोड वगैरे गडबड होते. तेव्हा zamzar site वापरणे. )

( 20,50 mb file size limit free देतात. )

पीडीएफ खू प मोठी असेल तर ती ब्रेक करण्यासाठी

PDF utils app वापरा.(( https://play.google.com/store/apps/details?id=pdf.shash.com.pdfutility ))

हे conversion झाले तर पुढचे काम सोपे आहे. ते लेखन कॉपी पेस्ट करणे.

सुजित जाधव

मिपावर अनुक्रमणिका कशी तयार करायची? मार्गदर्शन करा...

कंजूस

मोठा लेख असेल तर वेगवेगळ्या परिच्छेदांकडे उडी मारून जाण्यासाठी ( jump, scroll न करता) आणि परत अनुक्रमणिकेकडे परतण्यासाठी करता येते.

Vivek Phatak

किती दिवस प्रयत्न करतोय माझा लेख upload होत नाही. सारखी Error येतेय. Please guide करा.

टर्मीनेटर

कृपया तुमची समस्या शब्दांत मांडावी.
काय Error येतेय ते कळवलेत तर मार्गदर्शन करता येईल.

गवि

लेखात टोकेरी कंस (जे चुकीने एच टी एम एल tags समजले जातात) अथवा स्माईली असल्यास त्या काढून टाका आणि पुन्हा सबमिट बटण (प्रकाशन) दाबा.

Vivek Phatak

धन्यवाद!! आपल्या सहकार्यामुळे, मी माझ्या लेखातील अनावश्यक चिन्हे दूर केली. त्यामुळे लेख लगेच प्रकाशित करू शकलो.

कंजूस

२) लेखाच्या शीर्षकात किंवा लेखात कुठे उगाचच ( , :, < चिन्ह आली असतील तर ती काढा.

३) खरडफळ्यावर अगोदर काही लिहिले असेल तर ते कॉपी पेस्ट न करता पुन्हा लिहा.

Vivek Phatak

धन्यवाद!! आपल्या सहकार्यामुळे, मी माझ्या लेखातील अनावश्यक चिन्हे दूर केली. त्यामुळे लेख लगेच प्रकाशित करू शकलो.

किरण कुमार

एखादा लेखन अर्धवट असताना प्रकाशीत झाले असेल तर तो धागा डीलीट कसा करावा

पटलं नाही तर फिरकायचं(log in) नाही या व्यतिरिक्त सदस्यत्व कायमचे रद्द करायचे असेल तर काय उपाय आहे.

ना रहेगा बांस ना बजेगी बासुरी.

कर्नल साहेब, मी फक्त माहिती सांगितली. आपण मात्र लिहिते राहावे. आपण चांगले लिहिता. आपलं लेखन वाचत असतो. मिपावर वेगवेगळ्या स्वभावाची माणसं इथे लिहितात प्रत्येक वेळी सर्वांशी सूर जमेल असे नसते, तेव्हा नेट डिसकनेक्ट केले की विसरुन जायचं. लिहायचं मजा करायची. मिपा इंजॉय करायचं.

व्यक्तीगत टीका कोणी केली असेल तर अशावेळी नीलकांत, प्रशांत किंवा साहित्य संपादक यांना कळवून टाकायचं. इतकेच. बाकी, काही विशेष असेल तर खरडवहीत कळवा.

-दिलीप बिरुटे

कंजूस

पटलं नाही तर सोडायचं/फिरकायचं नाही. पण का बरं?

टर्मीनेटर

एक गोली एक दुश्मन असे ट्रेनिंग झालेलं असूनही कर्नलसाहेब एकंदरीत तुम्ही फारच मनावर घेतलं आहे असे दिसतंय!
होत असतात हो अनेक गोष्टी! माझ्या कोकण, तळ कोकण गोवा मालिकेचा पुढचा भाग लिहायला घेतलाय आणि त्यात अनेक सन्माननीय/पवित्र समजल्या जाणाऱ्या अशा आम्हाला शाळेपासून शिकवल्या गेलेल्या प्रोफेशन्स बद्दलचे माझे गैरसमज कसे दूर झाले ह्या बद्दलही माहिती देण्याचा विचार होता आणि त्यात सैनिकी पेशा पण समाविष्ट होता, पण तुमचा हा प्रतिसाद वाचल्या नंतर लिहिलेला तो भाग एडिट करू की काय हा प्रश्न पडलाय!

कंजूस

त्या दोन संतांना काय त्रास झाला हे पाहिले तर . . . .

सुजित जाधव

काही प्रश्न होते.. मी ४-५ वर्षांपासून मिपावर सक्रिय आहे. पण मला खरडवही हा नेमका काय प्रकार आहे ते माहीत नव्हतं.. मदातापान वर वाचलं काल मी थोडंस पण तरीही काही शंका आहेत.
...त्याबद्दल थोडं मार्गदर्शन कराल का?
१. खरडवही मध्ये एखाद्या व्यक्तीला टॅग कसं करायचं..

२. एका व्यक्तीने माझ्या खरडवही मध्ये खरड लिहली आहे त्यांना मला रिप्लाय करायचा आहे पण तो रिप्लाय माझ्या खरडवही मध्ये करू की त्यांच्या ते कळत नाहीये..

>>>>> एका व्यक्तीने माझ्या खरडवही मध्ये खरड लिहली आहे त्यांना मला रिप्लाय करायचा आहे पण तो रिप्लाय माझ्या खरडवही मध्ये करू की त्यांच्या ते कळत नाहीये..

त्या व्यक्तीच्या नावाला क्लिक करुन त्यांच्या खरडवहीत जावून त्यांना खरड करावी. सराव करायचा असल्यास मला खरड करु शकता. :)

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा

@सुजित जाधव,

२. मिपा लॉगिन केलेले असताना त्या सभासदाच्या नावावर टिचकले असता, सभासद माहिती दिसते

तिथे डाव्या बाजूला "हिरवी आडवी पट्टी " मध्ये "खरडवही" असे लिहिले आहे त्यावर टिचकले असता त्या सभासदाला खरड लिहिता येते.

मी नुकतीच आपणास या संबंधात खरड लिहिली आहे आणि व्यनि सुद्धा केला आहे

स्वधर्म

एरर येत आहे. प्रकाशित केल्यावर प्लेन टेक्स्ट पान दिसते तसेच संपादक व संपादक मंडळ यांना संदेशही जात नाही. काही मदत होईल का? धन्यवाद.

प्रशांत

लेखनात Emoji असल्यास एरर येते. कृपया Emoji काढुन लेख पुन्हा प्रकाशित करा

गवि

इमोजी आणि टोकेरी कंस देखील html tags समजले जाऊन टेक्स्ट पब्लिश होत नाही.

चौथा कोनाडा

या मुळे आजकाल मला इमोजी वापरता येत नाहीत त्यामुळे कुचंबणा होते.

या वर उपाय काय ?

चौथा कोनाडा

यांची मापे (साईझ) वाढवता येत नाही हे दु:ख राहतेच !
मग विराम चिन्हाचा पर्याय आहेच की :-) : ) :‑D :‑c :‑O इत्यादि

कंजूस

साईज वाढवण्याचा कोड टर्मिनेटर यांनी टाकला आहे.

चौथा कोनाडा

येस ... आठवला घागा !
इथे प्रयत्न केला आहे :
👍

यात ही साईझ वाढत नाहीय ! मी 128px दिली होती ( < span style = "font-size : 128p x"> &#128077 ; < /span >
पण चिन्ह बारकेच दिसत आहे !

कंजूस

लेखाच्या शीर्षकात कंस आणि विरामचिन्हे आजुबाजुला आल्यास अल्लादिनचा दिवा आपोआप घासला जातो आणि राक्षस बाहेर येतो.

स्वधर्म

तुमच्या टिप्सबद्दल. आता लेख प्रसिध्द झालाय.

कंजूस

१) जुने प्रतिसाद पाहा.
2 Aug 2022 चे.

२) संपादक मंडळ यांना संदेशही जात नाही.
तो जातो/गेलेला असतो. परंतू एरर दाखवते.