पुस्तक पान
काही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे
Primary tabs
प्र.१ ) अर्धवट राहिलेले लेखन कसे आणि कुठे दिसेल?
उ. - अर्धवट राहिलेले लेखन मिपावर साठवता येत नाही. यासाठी कृपया जीमेल किंवा अन्य सोईंचा वापर करावा.
प्र.२) त्रास देणार्या सदस्यांची तक्रार कुठे करावी?
उ. - मिपावर सदस्यांना तक्रार करायची असल्यास सरपंच किंवा संपादक मंडळ या आयडीला किंवा नीलकांत यांना व्यक्तिगत निरोप पाठवावा.
प्र.३) प्रवेश करण्यासाठी जशी जागा आहे तसे आपल्या खात्यातुन बाहेर (logout)जाण्यासाठी काय करावे ?
उ. - खात्यातून बाहेर जाण्यासाठी गमन नावाचा दूवा आपल्या उजव्या समासात दिलेला आहे त्याचा वापर करावा.
प्र.४) काही पानांवर "प्रवेश प्रतिबंधीत " असा संदेश दिसतो.
उ.- बरेचदा काही वादग्रस्त किंवा त्रासदायक लेखन उडवायच्या आधी मिसळपावचे संपादक ते लेखन अप्रकाशित करतात व त्यानंतर एकत्रीत चर्चा करून तो उडवावा किंवा काय असा निर्णय होतो. तोपर्यंत तुम्ही त्या पानावर गेलात तर असा संदेश दिसतो.
प्र.५)खरडफळा आणि खरडवही - या दोन्हींत फरक काय?
उ. - खरडफळा हा सार्वजनीक आहे. तेथे सर्वांशी गप्पा मारता येतील. येथील खरडी तुम्ही काढून टाकू शकत नाही.
खरडवही ही तुमची आहे. तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी त्याचा उपयोग लोक करतील. तुम्ही तुमच्या खरडवहीतील खरडी तुम्ही काढून टाकू शकता.
>>>>तुम्ही तुमच्या खरडवहीतील खरडी तुम्ही काढून टाकू शकता.
एक एक खरड उडवणे त्रासदायक असते. एकदम कशा उडवता येतील?
यासाठी मला आवडलेली सोय - 'फायरफॉक्स'मध्ये Lazarus: Form Recovery म्हणून अॅड-ऑन आहे. तुम्ही मिपावर टंकत राहता ते आपोआप साठवलं जातं. संकेतस्थळ तात्पुरतं खपलं किंवा इतर काही कारणांनी लेखन अपुरं राहिलं तर फायरफॉक्समध्ये जाऊन ते मिळवता येतं.
आम्ही या करता सेशन मॅनेजर अॅडॉन(फायरफॉक्स) वापरतो.
लिंक द्याल का प्लिज ?
वापरुन बघेन
हे घ्या.
https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/session-manager/
How to change existing User name?
नीलकांत या आयडी ला व्यनि करा
माझे नाव अरुण जायकर असे display व्हावे
सदस्य नावात (User name ) बदलायचं आहे ध्वनि कुठल्या क्रमांकावर करायचा ? कृपया क्रमांक दया.
प्रशांत यांना व्यक्तिगत निरोप अथवा खरड़ करून किंवा इथे लिहिले तरी ते जेव्हा वेळ असेल तेव्हा ते करून देतील.
-दिलीप बिरुटे
आयडी पुढे /authored लाउन एखाद्याचं लिखाण दिसायचं. आता दिसत नाही. ही सोय परत आणता येइल का? का याच्या जागी दुसरा काही मार्ग आहे?
+१
खूप उपयोग व्हायचा याचा
काही दुसरा मार्ग आहे का?
'अमुक यांचे लेखन misalpav.com' असं गूगलवर शोधलं तर (सध्यातरी) असं लिखाण सापडतं.
उदाहरणार्थ, पैसा यांचे लेखन misalpav.com असं शोधलं तर जो पहिलाच दुवा मिळतो त्यात पैसाताईंचं लिखाण दिसतं.
सोय पुन्हा सुरु झाली आहे!
धन्यवाद!
जर प्रतिसाद खुप असतील (एका पेक्षा जास्त पानावर) आणि नंतर काही नविन प्रतिसाद आले जे वेगवेगळ्या पानावर आहेत तर , पहील्या पानावरचे नविन प्रतिसाद "नविन" असे लाल अक्षरात दिसतात पण मग पुढल्या पानवरचे मात्र असे टॅग केलेले नसतात. मग त्या पानावरचे नविन कुठले आणि जुने कुठले ते कळत नाहीत.
सेम प्रोब्लेम
सद्यस्थितीत यात सुधारणा होइल अशी चिन्हे नाहीत.
मला येथे माझ्या कविता, चारोळ्या द्यावयाच्या आहे.
कृपया प्रत्येक पायरी समजावून सांगावी.
आपला नम्र,
यलप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
कोण शिकवले रे ह्यांना?
दंडवत रे भौ
ज्याने कोणी शिकवलं त्याने पायऱ्या न शिकवता डायरेक हाय स्पीड लिफ्ट शिकवलेली दिस्तीय.
प्रत्येक मजल्यावर ह्यांचाच पो(च)
औघड़ आहे.
@प्रति नीलकांत/ प्रशांत/ सं.मं.
यल्लापाचे सर्व धागे एक करुन एक धागा त्यांच्या नावावर टाकता येईल का? चांगली प्रवासवर्णन ह्या स्पॅमिंगमुळे खाली जात आहेत. :/
आणि लेखनमर्यादा पण टाकता येईल का नव्या आयडींना? जसं की नव्या आयडीला एका दिवशी दोनपेक्षा जास्तं लेख टाकता येउ नयेत.
काही जण मिपा साइट कार्यालयातून वाचतात/पाहतात परंतू लॅागिन करून लगेच प्रतिसाद देऊ शकत नाहीत. इमेलवरून प्रतिसाद पाठवता येईल का?{ फोटोबकेट साइटवर इमेल करून फोटो योग्य त्या अॅल्बममध्ये पाठवता येतो तसा }
माझे अकौंट कृपया डिलीट करावे … किंवा कसे करावे ते सांगा
मिपावरील सदस्याचे लेखन कसे शोधावे? उदा. मला विसोबा खेचर (तात्या) यांचे लेखन शोधायचं आहे.
फोटो कसा टाकावा
वाचनखुणा कशा साठवणार ?
कोणी मला सांगता का माझं नाव मराठीत कसं लिहु?
कोणी मला सांगता का माझं नाव मराठीत कसं लिहु?
dattAbhAu goMdikar
नमस्कार,
एखाद्या लेखकाचे/ लेखिकेचे सर्व लेखन कसे शोधावे?
प्रिया
http://misalpav.com/user/लेखकाचा वा लेखिकेचा सभासद क्रमांक/authored
उदाहरणार्थ, तुमचा क्रमांक आहे ११४९५, म्हणून तुमचं लेखन असं शोधू शकालः
http://misalpav.com/user/11495/authored
(Mouse चा cursor लेखकाच्या/लेखिकेच्या नावावर hover केला असता क्रमांक खाली डाव्या कोपर्यात दिसतो.)
खरडवहीतील खरडी सदस्याला डिलीट करता येतात का?
मिसळपाव वर एखादा धागा, किंवा शब्द शोधायचा असेल (search facility) तर तशी शोय कुठे आहे , स्वगृह पेज वर सापडत नाही
मिसळपाव वर एखादा धागा, किंवा शब्द शोधायचा असेल (search facility) तर तशी शोय कुठे आहे , स्वगृह पेज वर सापडत नाही... मला पण दिसत नाही
मिसळ्पाव
वर
पाकक्रूती शोधायचि असल्यस कशी शोधायचि? सर्च कुठे आहे?
मिसळपाव वर एखादी पाककृती कशी शोधायची?
मला माझे नाव, जे mandarbsnl असे दिसत आहे की जे माझ्या ई-मेल आयडी mandarbsnl@gmail.com ची पहिली सहा अक्षरे आहेत... ते मी कसे बदलू?? कृपया मदत करावी..लिंक द्याल का??..
misalpav var navin dhaga kasa kadhava ? Krupaya margdarshan karave...
आपला लेख एडीट वा डिलिट कसा करायचा?
आपला लेख एडीट वा डिलिट कसा करायचा?
सदस्यनाव कसा बदलावा?
नीलकांत किंवा प्रशांत या आय डींना विनंती करा.
राष्ट्रवादी च्या नेत्या सारखे नका वागू हो , उत्तरे न भेटल्या मुळे आमचा लै बॅक लॉग राहतो हो .
मिपावर लेख कसे शोधवेत? मला एखादी पाकॄ अथवा भटकंती अथवा अन्य कुठल्याही विषयावर कुठले धागे अस्तित्वात आहेत हे कसे शोधायचे? 'सर्च विंडो' दिसली नाही मिपावर.
मला PMP वरिल धागा शोधायाचा आहे. क्रुपया मार्गदर्शन करावे.
वाचनखुण कशी साठवायची ?
मला प्रत्येक लॉग इन च्या वेळेस पासवर्ड चुकला असा संदेश दिसतो. मग नवीन लिंक मागवून पासवर्ड बदलावा लागतो.
माझा पासवर्ड ब्राउजर (फायरफॉक्स) मधे साठवला असूनही समस्या कायम आहे.
भाषा बदल करूनही समस्या कायम आहे.
कृपाया मिपा संबंधित अधिकारी व्यक्ती मदत करू शकेल काय?
नीलकांत किंवा प्रशांत या आयडींना विनंती करा. वरील बहुगुणीजींच्या एका प्रतिसादात त्यांच्या प्रोफाइलच्या लिंका आहेत.