Skip to main content

अनर्थ शास्त्र

गेम चेंजर योजना : आर्थिक समावेशन आणि गरिबी निर्मूलनाची नवी क्रांती

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 17/08/2026 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या दशकात भारताने आर्थिक समावेशन (Financial Inclusion) आणि गरिबी निर्मूलनाच्या क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली आहे. पूर्वी देशातील एक खूप मोठा वर्ग बँकिंग आणि औपचारिक वित्तीय व्यवस्थेपासून पूर्णपणे दूर होता. गरीब, मजूर, छोटे शेतकरी, रस्त्यावरील विक्रेते (फेरीवाले) आणि ऑटो चालक आपल्या दैनंदिन आर्थिक गरजांसाठी सावकार, अनौपचारिक भिशी किंवा कमिट्यांवर अवलंबून असत. सावकारांच्या चक्रवाढ व्याजाच्या जाळ्यात अडकल्यामुळे गरिबीचे हे दुष्टचक्र पिढ्यानपिढ्या चालत राहायचे.

अमेरिका: युद्धाचा चतुर व्यापारी

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 30/04/2026 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
दुसऱ्या महायुद्धानंतरचा काही शांततेचा काळ वगळता, अमेरिका कोणत्या ना कोणत्या देशावर हल्ले करतच आली आहे. या युद्धांमध्ये अमेरिका अब्जावधी डॉलर्स खर्च करते, तरीही ती दिवाळखोर होत नाही; उलट तिची अर्थव्यवस्था अधिकच मजबूत होते. सध्या सुरू असलेले युद्धही अमेरिकन अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठीच असल्याचे दिसून येते.

आयुष्मान भारत – सध्या तरी स्वप्नवत्

लेखक अभिजित - १ यांनी सोमवार, 10/09/2018 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
हि स्कीम म्हणजे इतर काही नसून वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपनीची तुंबडी भरण्या चा प्रकार आहे. शेतकरी पीक विमा काढतो. पैसे भरतो. बहुतेक वेळा त्याला भरपाई मागितल्या वर काही मिळत नाही. तो अडाणी असतो. काही करू शकत नाही. त्याची तितकी ताकद नसते. तेच इथे होणार आहे. फक्त त्याचे इन्शुरन्स चे पैसे देशातील जनता भरत राहणार. आत्ता चा हप्ता अंदाजे दहा हजार कोटी रु. तो हि पुढे वाढतच जाईल. आहे ते सुधारू शकत नाही. मग मोट्ठी नावे देऊन नवीन काहीतरी करायचं. जनतेचा खिसा कापायचा. हेच आहे मोदींचे अर्थ शास्त्र !!

काय होणार मिपाचे??

लेखक नीलमोहर यांनी शनिवार, 21/11/2015 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: काय होणार आपले?? मिपावर नुकत्याच घडलेल्या काही घटनांमुळे मिसळपाव हे एक वादग्रस्त संस्थळ झाले होते. त्यात काही मिपा-कंटक लोकांनी निर्माण केलेल्या विध्वंसक डू-आयडींबाबत माहिती वाचून प्रश्न असा पडतो, की भविष्यात नेमके काय होईल?