Skip to main content

अनुभव

सूर्य पाहिलेला माणूस

लेखक प्रसाद गोडबोले यांनी सोमवार, 30/09/2024 02:03 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळचे साधारण सात वाजले असावेत. श्रावण संपून गेला होता नुकताच तरी अजून आकाशामध्ये ढगांची दाटीवाटी होती. पश्चिमेकडे दूरवर दिसणाऱ्या यवतेश्वरचा डोंगर मात्र अजूनही ढगांच्या दाट धुक्याआड होता, दक्षिणेकडे मात्र अजिंक्यतार्‍याने हिरवीगार दुलई पांघरली होती, पांढरेशुभ्र धबधबे फिसाळत वहात त्या हिरवाईतुन वाट काढत होते. पुर्वेकडे सुर्योदय होऊन गेला होता मात्र सुर्याचा अजुनही ढगांआड लपंडाव चालु होता. हवेत एक आल्हाददायक गारवा होता.

African Love Bird

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 26/09/2024 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
lm2 चित्रकार कसरत - ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा संत चोखामोळा यांच्या अभंगा प्रमाणे शिर्षक बघून काही मनचले...... पण तसे काही नाही.

साक्षरता, बेरोजगारी आणि आरक्षण

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 19/09/2024 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण साक्षरतेचा बेरोजगारी आणि आरक्षणाची सरळ संबंध आहे. मेकॉले पूर्वीच्या शिक्षण व्यवस्थेत बेरोजगारी नावाचा प्रकार नव्हता. "द ब्युटीफुल ट्री" या पुस्तकात ईस्ट इंडिया कंपनीने १८३० ते १८५० मध्ये भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत केलेले सर्व्हे उपलब्ध आहे. त्याकाळी देशात सहा लाखांच्या वर गुरुकुल होते. प्रत्येक गावात एक गुरुकुल निश्चित होते. वयाच्या 13 वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांना स्थानिक भाषा गणित इत्यादीचे ज्ञान दिले जात होते. सामान्य व्यक्तीसाठी एवढे ज्ञान पुरेसे आहे. त्यानंतर अधिकांश विद्यार्थी त्यांच्या परंपरागत व्यवसायांचे ज्ञान गुरुं कडून प्राप्त करायचे.

संयमित आहारातून शरीरशुद्धी/वजन घटवण्याचा यशस्वी प्रयोग - भाग १ (पहिले १२ दिवस)

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 08/09/2024 08:08 या दिवशी प्रकाशित केले.
दि. २७ ऑगस्टला सुरुवात करून गेल्या १२ दिवसात मुख्यतः भाज्या आणि फळांद्वारे शरीरशुद्धीचा प्रयोग करून माझे बिघडलेले स्वास्थ्य मी परत कसे मिळवत आहे याबद्दल हा लेख आहे. महर्षी पतंजली यांनी सांगितले आहे : योगश्चित्तवृत्तिनिरोध: ('योग' म्हणजे (मोकाट सुटलेल्या) चित्तवृत्तीवर ताबा मिळवणे). अभ्यासवैराग्याभ्यांतन्निरोध: ( हा ताबा मिळवण्याचा उपाय म्हणजे वैराग्य, अर्थात 'अयोग्य' (अनिष्ट, हानिकारक) गोष्टींचा त्याग आणि त्याबरोबरच 'योग्य' गोष्टींचा अभ्यास (सराव, सवय) आपले आरोग्य आणि आहार, या विषयीसुद्धा हे लागू होत असते.

चतुर्थी, षष्ठी आणि प्रथमा.

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 15/08/2024 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : मला व्याकरण हा विषय , त्यातही विशेष करुन संस्कृत व्याकरण फार आवडते ! संस्कृत तर साक्षात देववाणी देवाची वाणी षष्ठी तत्पुरुष समास ! प्रत्येक शब्दाला , अक्षराला अर्थ आहे , व्युतप्त्ती आहे . अभ्यास केला पाहिजे . कळलं पाहिजे ... कळलं पाहिजे .

परभणीतील भरतनाट्यम अरंगेत्रम- नृत्य योग सोहळा!

लेखक मार्गी यांनी रविवार, 28/07/2024 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
✪ अरंगेत्रम- शिष्याची परीक्षा व जगामध्ये प्रवेश करण्यापूर्वीचा 'अंतिम पग' ✪ अनुभवावेत असे शब्दम्, वर्णम्, किर्तनम्, तिल्लाना आणि मंगळम् ✪ सुंदर ते ध्यान आणि ओंकार स्वरूपा! ✪ वर्षानुवर्षाच्या मेहनतीचं- दृढसंकल्पाचं प्रेरणादायी उदाहरण ✪ परभणीच्या वैष्णवीची मोठी स्वप्ने आणि झेप ✪ कडक गुरू- वरी घालतो धपाटा आत आधाराचा हात ✪ नृत्य आणि संगीत- विचार थांबवणारा अनुभव ✪ स्नेहीजन व गुरूजनांचा मेळा When a disciple is ready, Guru appears. When the disciple is really ready, the Guru disappears! नुकतीच गुरूपूर्णिमा होऊन गेली आहे.

डोन्ट टच द मनी

लेखक प्रसाद गोडबोले यांनी रविवार, 21/07/2024 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
Before Satori, you chop wood and carry water. After Satori, you chop wood and carry water. समाधीच्या आधी तुम्ही तुमच्या प्रापंचिक जीवनातील दैनंदिन कामे करत असता , समाधी साधल्यानंतर तुम्ही प्रापंचिक जीवनातील दैनंदिन कामेच करत असता ! __________________________ बाबा म्हणाले - डोन्ट टच द मनी . डोन्ट टच द मनी. मी म्हणालो - पण महाराज , पैशाशिवाय माझे दैनंदिन व्यवहार कसे होणार , माझी पुस्तके , माझा प्रवास , माझें जेवण , खाणेपिणे , ? बाबा म्हणाले - हां तेवढ्यापुरतं ठीक आहे , पण त्या व्यतिरिक्त, डोन्ट टच द मनी. मी म्हणालो - ठीक आहे , प्रयत्न करतो . :) __________________________ संध्याकाळाची वेळ .

गजेन्द्रमोक्ष

लेखक प्रसाद गोडबोले यांनी सोमवार, 15/07/2024 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
१. श्रीमद महाभागवतांतील आठव्या स्कंदांतील हे गजेन्द्रमोक्ष नावाचे स्तोत्र आहे. लहानपणी ऐकले होते ह्या विषयी. पंचरत्न गीता की काय असे गीताप्रेस गोरखपुरचे पुस्तक होते. आजी वाचायची एकादशीला. मी कधी डिटेल मध्ये वाचलं नाही पण साधारण स्टोरीलाईन अशी आहे की - हत्ती जलामध्ये विहार करत असताना, एक मगर त्याला पकडतो, मग हत्ती श्रीविष्णुंची करुणा भाकतो.

अज्ञाताचे लेख

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 19/06/2024 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
मन कशात लागत नाही, अदमास कशाचा घ्यावा । अज्ञात झऱ्यावर रात्री, मज ऐकू येतो पावा ॥ -ग्रेस मित्रहो अशाच मनस्थितीत गेले काही दिवस चालले होते,चिडचिड होत होती.गदिमांच्या गीतरामायणा मधील प्रभू श्रीरामाच्या तोंडून वदवलेल्या प्रसिद्ध ओळी सांत्वन करण्यास कमी पडत होत्या. "खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा". 'मला भेटलेला कार्व्हर,'प्रभाते चारियासी जाये', 'पावगढ-चंपानेर 'असे तीन लेख अर्धवट लिहीले आहेत पण याच कारणास्तव पुर्ण होत नव्हते. काहीही करावेसे वाटत नव्हते.गाडी जवळ जवळ थांबल्यासारखीच म्हणायचे.