Skip to main content

अनुभव

'रमलप्रतिमा (भाग २) अर्थात नवीन काही AI चित्रे ( Prompt सह)

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 17/06/2024 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीच्या सांजशकुनाच्या रमलप्रतिमा: एक नवाच उद्योग (भाग-१) दिलेल्या चित्रांनंतर गेल्या काही दिवसात आणखी बरेच प्रयोग केले, त्यापैकी काही चित्रे: चित्र १. . चित्र २. . A cinematic view of a picturesque landscape featuring an ancient castle in greek architectural style.

परत एकदा हिमालयाच्या कुशीत - ५ संपुर्ण.

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 06/06/2024 01:15 या दिवशी प्रकाशित केले.
23 may 2024 : ध्यानाचा चौथा दिवस सकाळी नेहमीप्रमाणे योग आसने ध्यानाचा वर्ग झाला. आता हे सारं अंगवळणी पडत चाललं आहे. ध्यानातील अनुभव इतके वैयक्तिक आणि खोलवरचे आहेत की ते लिहुन ठेवणं मला गरजेचे वाटत नाही. बस्स माऊलींच्या ओव्या , समर्थांचे श्लोक , तुकोबांचे अभंग आठवत राहतात.

परत एकदा हिमालयाच्या कुशीत - ४

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 04/06/2024 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
२२ मे २०२४ आज ध्यानाचा तिसरा दिवस. आज इथं येऊन चार दिवस पुर्ण झाले. आता असं वाटतं की जणु आपण कित्तीतरी काळापासुन इथेच होतो. आयुष्याला एक रीतसर दिनचर्या प्राप्त झाली आहे, नित्यनेम प्राप्त झाला आहे. एखाद्या जागी तुम्ही फोटो घ्यायचे बंद केलेत की समजुन जावं की आता तुम्ही तिथं रुळला आहात! आता संपुर्ण वेळ ध्यान , योग आणि चिंतन बस इतकेच ! ध्यानगृहातुन दिसणारा नजारा : (इथे समोर जे छत दिसत आहे त्या इमारतीचे नाव होते रामकुटीर. सर्वात अफलातुन व्यु होता त्या तिथुन, पण मला तिथे रहायचा योग आला नाही.

तो

लेखक मार्गी यांनी सोमवार, 03/06/2024 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
दूरवरून दिसणारा अथांग तो! नेहमी ओढ लावणारा! राजापूरकडून देवगडला संध्याकाळी येत असताना पश्चिमेकडे दूरवर चमकताना दिसणारा तो! नीट बघितल्यावर दूरवर दिसणारी त्याची लांब पसरलेली निळी पट्टी! त्याची भव्यता आणि त्याचा विस्तार! कधी कधी अगदी जवळ येईपर्यंत न दिसणारा आणि ऐकूही न येणारा तो! इतका अजस्र असूनही त्याचं त्याच्या मर्यादेतलं असणं! सध्या कोकणात देवगडला एका निवांत जागी राहण्याचा व परिसरामध्ये फिरण्याचा योग आहे. इतका शांत आणि अप्रतिम निसर्ग. निसर्गाच्या जवळ येणं एक प्रकारे ध्यानाचा अनुभव देऊन जातं. आज देवगड- कुणकेश्वर किनारी रस्त्याने सायकल चालवण्याचा आनंद लुटला. अक्षरश: लुटला. स्वर्गसुख.

परत एकदा हिमालयाच्या कुशीत - ३

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 30/05/2024 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
२१ मे २०२४: ध्यानाचा दुसरा दिवस. पहाटे ५:३०ला कोणताही अलार्म न लावता आपोआप जाग आली. खरेतर थंडगार हवेच्या झुळुकेने , समोरून येणाऱ्या उगवत्या सूर्याच्या किरणांनी , पक्षांच्या किलबिलाटाने जाग आली. लगेच किचन मध्ये येऊन गरम पाणी पिले. इथे चहा नाही , साखरही नाही, तस्मात मला प्रातःआवेगाची चिंता लागुन होती. पोट रिकामे असणे ही ध्यानासाठीची मुलभुत आवश्यकता आहे ! अर्थात योग्य वेळेस जेवण , योग्य वेळेस झोप अन योग्य वेळेस जाग असे केल्यास सर्वच शरीर नियमीतपणे यंत्रवत चालु लागते ह्याचा पुढील काही दिवसात अनुभव आला. नित्यनेम आटोपले , त्यानंतर लगेच ध्यानाला पळालो.

परत एकदा हिमालयाच्या कुशीत - २

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 30/05/2024 01:14 या दिवशी प्रकाशित केले.
२० मे २०२४ - ध्यानाचा पाहिला दिवस काल इतका दमलो होतो त्यामुळे गाढ झोप लागली. पण इथे अतिषय कडक नियम असल्याने सकाळी सात वाजता ध्यानाला उपस्थित राहणे गरजेचे होते. त्यात मला यायला काल उशीर झाल्याने स्वामीजींनी ध्यानविषयक रीतसर मार्गदर्शन केलेले नव्हते. त्यांनी मला आधी त्यांच्या ऑफिस मध्ये बोलावले होते. ह्या सगळ्या विचारात खडबडुन पहाटे पहाटे जाग आली. हवेत नितांत सुंदर गारवा होता. अजुन सुर्योदय झाला नव्हता पण पुर्वेला ताम्बंड फुटलं होतं .

परत एकदा हिमालयाच्या कुशीत - १

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 30/05/2024 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : १. सदर लेखन हे वैयक्तिक अनुभवांवर आधारीत असुन इथे कोणताही अभिनिवेषयुक्त प्रचार प्रसार करण्याचा उद्देश नाही. लिहुन ठेवलेल्या गोष्टी जास्त चांगल्या स्मरणात राहतात हा आजवरचा अनुभव आहे. शिवाय "if you can't explain it simply, you don't understand it well enough." हे लहानपणी शिकल्याने किमान आपलं आपल्याला कळेल इतकं तरी सोप्प्या शब्दात वर्णन करुन सांगता येणे गरजेचे वाटते . म्हणुन हा लेखनप्रपंच . २. सदर लेखनात स्थानाचा उल्लेख जाणीवपुर्वक टाळण्यात आला आहे. एखादे सुंदर स्थान प्रसिध्द झाले की लोकं त्याची कशी वाट लावतात हे आम्ही आमच्या "कास पठाराच्या" उदाहरणाने चांगलेच शिकलो आहोत.

बाजारगप्पा-भाग-१

लेखक मारवा यांनी रविवार, 26/05/2024 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
खुलासा सर्वप्रथम मी सेबी अधिकृत सल्लागार नाही. दुसरे म्हणजे या लेखात व्यक्त झालेली ही सर्व माझी व्यक्तिगत मते व अनुभव आहेत. यावर आधारीत जर काही केले तर ते आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर आणि ट्रेडींग मध्ये असलेल्या धोक्याची जाणीव ठेउन करावेत. तुमच्या निर्णयांची जबाबदारी सर्वस्वी तुमचीच राहील.

कबूतरावरचं असंही एक पुस्तक

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 16/05/2024 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. माझ्या मुलीचं पाचवीचं हिंदी पुस्तक वाचताना एका पुस्तकाची माहिती मिळाली. उत्सुकता वाटली म्हणून हे पुस्तक विकत घेतलं आणि लवकरच वाचूनही झालं. अमेरिकन बाल साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार मिळालेलं आजवरचं एकमेव भारतीय लेखकाचं पुस्तक! धान गोपाल मुकर्जींनी लिहीलेलं 'गे-नेक: द स्टोरी ऑफ अ पिजन!' 'गे-नेक' पिजन म्हणजे रंगीत मानेचं कबूतर आणि हे पुस्तक म्हणजे ह्या कबुतराची कहाणी! १९२५ मध्ये प्रकाशित झालेलं हे पुस्तक म्हणजे लेखकाच्या समृद्ध भावविश्वामधील प्रत्यक्षातील अनुभवांचं वर्णन आहे. आज आपण "त्या काळापासून" खूप दूर आलो आहोत.

नात्यांचं भावस्पर्शी इंद्रधनुष्य- काहे दिया परदेस

लेखक मार्गी यांनी बुधवार, 08/05/2024 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
✪ दिग्गज व नवोदित कलाकारांची सुरेल मैफल ✪ गौरी अर्थात् सायली संजीव - कमालीच्या गुणी अभिनेत्रीचं पदार्पण ✪ वडील- मुलगी नात्यातले भावतरंग ✪ हँडसम शिवचं डोळ्यांनी फ्लर्ट करणं! ✪ छोटा "अहं" ते "सर्वसमावेशक हम" ही वाटचाल ✪ प्रेमळ आजीची‌ डॅशिंग बॅटींग- मी सांगतंय तुका ✪ सासू- जावयातलं जिव्हाळ्याचं शीतयुद्ध सर्वांना नमस्कार. सध्याच्या तापलेल्या वातावरणामध्ये थोडा आल्हाददायक थंडावा मिळावा, म्हणून हा वेगळ्याच विषयावर लिहीण्याचा प्रयत्न. गेल्या काही महिन्यांमध्ये काही दिवस आजारी असल्यामुळे व फ्रॅक्चरमुळे आराम करत असताना सहज म्हणून ह्या व्यक्तीरेखा आठवल्या.