Skip to main content

अनुभव

एका आगीची छोटीशी गोष्ट

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 31/01/2025 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
(काल्पनिक कथा) दिल्लीच्या रायसिना भागात केंद्र सरकारच्या सचिवलयांच्या इमारती आहेत. अधिकान्श इमारती पाच ते सात माल्यांच्या आहेत. अग्नि शामक नियमांच्या अनुसार कर्मचार्‍यांना इमारतीत चढण्या उतरण्यासाठी किमान दोन वेगवेगळ्या पायर्‍या असल्या पाहिजे. पण जागेची कमतरता असल्याने इमारतीच्या कोपर्‍यांवर जी मोकळी जागा असते तिथे ही निर्माण झाले असल्याने कर्मचार्‍यांना उतरण्यासाठी एकच पायरी उपलब्ध असते. इमारतींत अवैध निर्माण असल्याने अधिकान्श इमारतींना अग्नि शामक विभागाचे प्रमाण पत्र नाही. तरीही अग्निपासून असुरक्षित इमारतींत मंत्री ते संत्री हजारो कर्मचारी काम करतात. मी ज्या इमारतीत कामाला जात होतो.

सिंग्युलॅरिटी ऑफ वर्ड्स

लेखक प्रसाद गोडबोले यांनी सोमवार, 20/01/2025 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : १. सर्वच लोकांची बुध्दीमत्ता समान नसते. हे अगदी वैश्विक सत्य आहे. आणि आपल्याला हे अगदी लहानपणापासुन माहीती आहे. त्यामुळे सगळ्यांना सगळं कळलंच पाहिजे , अनुभवाला आलेच पाहिजे असा आपला हट्ट किंवा दुराग्रह नाही. २. मुळात कोणाला काही तरी कळावं ह्यासाठी काहीही खटाटोप करणे ह्यात आपला काय फायदा ? आपण आपल्या स्वानंदासाठी लिहावं . आपलं आपल्याला कळाल्याशी मतलब. आपल्याला जे कळलं अनुभवाला आलं त्याचेच निरनिराळे पैलु आपणच उपभोगावेत ह्यासाठी लिहावे हे उत्तम ! ३.

सामान्यांमधले असामान्य: कर्नल समीर गुजर

लेखक मार्गी यांनी शनिवार, 04/01/2025 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. भारतीय सेनेमध्ये महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल नावाजले गेलेले मूळचे परभणीचे असलेले कर्नल समीर गुजर हे माझे मित्र! हे सांगताना अतिशय अभिमान वाटतो! नुकताच त्यांच्या सहवासाचा योग आला. सेनेमध्ये इतक्या उच्च पदावर व दायित्वावर असूनही जनतेसोबतचं त्यांचं आत्मीयतेचं वागणं- बोलणं, गावच्या लोकांसोबत व समाजासोबत असलेली त्यांची बांधिलकी, इतक्या उंचीवर पोहचूनही त्यांचं डाउन टू अर्थ वागणं हे खूप जवळून बघता आलं. त्यांच्याकडून त्यांच्या वाटचालीतले काही किस्से ऐकायला मिळाले. माझे गावचे मित्र म्हणून हे लिहावसं वाटलं.

​आणि... हॉस्टलर मुलांकरिता सुपरफास्ट गाडी स्टाॅपेज नसलेल्या स्टेशनावर थांबली...

लेखक महामाया यांनी गुरुवार, 26/12/2024 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
रेलवेच्या आठवणी असाच एका कामानिमित्त बहिणीकडे भोपाळला गेलो होतो... भोपाल- बिलासपुर अमरकंटक एक्सप्रेसनी परत येत होतो... (वाटेत लागणारया जबलपुरला थांबलेली माझी आई तिथूनच आमच्या सोबत पुढे येणार होती.) गाडीत पाय ठेवायला जागा नव्हती... दोन दिवसानंतर दिवाळी होती. म्हणून गाडीत सगळी हॉस्टलर मुला-मुलींची ही गर्दी होती... भोपाळला शिकायला आलेली ही मंडळी सणावारासाठी आपापल्या घरी परत जात होती... आमच्या जवळपास बसलेल्या मुलं-मुलींच्या बोलण्या वरुन समजलं की ते या गाडीने जबलपुरपर्यंत जातील. तिथून दुसरी गाडी ‘इस्पात नगरी...’ पकडून पुढे जातील... ती गाडी रात्री साढे दहाला होती...

रामानुजनचे वारस: गणिताचा आनंद घेणार्‍या मुलांना भेटण्याचा सुखद धक्का!

लेखक मार्गी यांनी रविवार, 22/12/2024 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
✪ मुलांचं गणित शिकणं व शिकवणं! ✪ शिकण्याची अशी "प्रक्रिया, "स्पेस" आणि "मिती" ✪ गणित अवघड असतं ह्या भ्रमाला "पूर्ण छेद" ✪ कठिण गोष्टी सोपं करणं इतकं सोपं! ✪ पालकांसाठी व मुलांसाठी सोपं गणिती कोडं ✪ तुमच्या वाढदिवसाला तुम्हांला किती चॉकलेटस मिळायला हवेत? नमस्कार. आज २२ डिसेंबर म्हणजे जगातला विलक्षण गणितज्ज्ञ असलेल्या श्रीनिवास रामानुजन ह्यांची जयंती व त्यामुळे आज राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. ह्या दिवसानिमित्त मुग्धाताई नलावडेंच्या "प्रक्रिया को-लर्निंग स्पेसद्वारे" आयोजित एका सुंदर उपक्रमाचा अनुभव घेता आला.

अपघात टळला तो प्रवास

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 21/12/2024 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
फोटो एका लग्नाच्या निमित्तानं अलीकडेच नागपूरला जाणं झालं होतं. 32 वर्षांनी नागपूरला जाणं होत असल्यामुळं उत्साह वाढलेला होताच. मग बऱ्याच आधी मी पुणे-अजनी एक्सप्रेसच्या विनावातानुकुलित श्रेणीचं आरक्षण करून ठेवलं.

पुष्पा २: द रूल् - संक्षिप्त ओळख वगैरे

लेखक वामन देशमुख यांनी शुक्रवार, 20/12/2024 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
एकाच आठवड्यात हा सिनेमा मी दोनदा पाहीला. पहिल्यांदा कुटुंबीयांसमवेत हिंदीत एका थेटरात; चार दिवसांनी मित्रांसमवेत तेलुगूत दुसऱ्या एका थेटरात. पुष्पा १: द राइज् आवडलेला होताच. पुष्पा २: द रूल् अधिकच आवडला. इतर कोणत्याही लोकप्रिय तेलुगु सिनेमातल्यासारखाच या सिनेमातही प्रचंड मसाला आहे.

सहज सुचलं म्हणून

लेखक कंजूस यांनी शुक्रवार, 20/12/2024 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.

श्रीगणेशदर्शन

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 19/12/2024 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
||मोरया || काल संकष्टीचतुर्थी होती, श्रीगणेशाचे दर्शन "झालं" का ? नाही झालं ? लक्षात नाही राहिलं ? विसरुन गेलास ? हरकत नाही , आत्ता करू दर्शन. ____________________________ मुळात शिवशक्ती द्वैत च नाही. जो शिव आहे तीच शक्ती आहे, जी शक्ती आहे तोच शिव आहे ! हे दोघे भिन्न आहेत असे वाटणे , हे द्वैत आहे , असे वाटणे हा "तुझा" विचार आहे . आणि हा विचार मायेचा आहे, एकट्या शक्तीचा आहे, फक्त एकट्या शक्तीने घडवलेला आहे. कारण मुळात शुध्द शिवस्वरुपाच्याठायी विचार वगैरे काहीच नाही.

अघमर्षण

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 19/12/2024 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
अघमर्षण : संध्येमधील एक महत्वाचा विधी. अघमर्षण म्हणजे पापाचा नाश करणे , त्याग करणे ! पण मुळात पाप म्हणजे काय ? पाप, शिक्षा आणि प्रायश्चित्त म्हणजे नक्की काय ? शिवशक्ती हे द्वैत आहे असं वाटणं हेच एक पाप. त्या पापाची शिक्षा म्हणजेच द्वैत. शिवशक्ती अद्वैत आहे असं वाटणं हेही एक पापच. त्या पापाची शिक्षा म्हणजे असं "वाटणं". अरे पण मग ह्याचे प्रायश्चित्त काय ?