Skip to main content

अनुभव

पार्करचे पेन

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 01/10/2025 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
 पार्करचे पेन ====== -राजीव उपाध्ये (एप्रिल २०२४) मी दूसरीत असताना माझा सख्खा मामा अमेरीकेला शिक्षणासाठी गेला. तिकडे गेल्यावर त्याने आपले आईवडील आणि बहीणींसाठी १ली भेट म्हणून पार्कर-४५ ची ४ शाईची पेनं पाठवली होती. भावाने पाठवलेल्या या १ल्या भेटीचे माझ्या आईला भयानक अप्रूप होतं. आई त्या पेनला कुणाला हात लावू द्यायची नाही. मला तर नाहीच नाही. एकदा-दोनदा चोरून मी ते हाताळले होते. तेव्हा त्यांची चकाकी, नीबचा गुळगुळीतपणा, पेन हातात धरल्यावर वाटलेला भारीपणा या भावना माझ्या मनात खोलवर रूतून बसल्या.

दशावतार - आठवणींची साठवण

लेखक चिमी यांनी गुरुवार, 25/09/2025 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
||श्री कातळोबा प्रसन्न|| ढिशक्लेमर – हा दशावतारचा review नाही. फक्त काही आठवणींची साठवण. शनिवारी दुपारी घरातली सगळी कामं आवरली आणि बहिणीला call केला - ‘ए वैदू, उद्या दशावतार बघायला जायचं का?’ “हो चल ना, जाऊ की, मी येऊ शकते.” आमच्या बहिणाबाई काहीही आढेवेढे न घेता, अगदी पहिल्या झटक्यात सिनेमा बघायला यायला तयार झाल्या हा माझ्यासाठी अगदी सुखद धक्का होता. म्हणलं मॅडमचा मूड बदलण्याआधी पटकन तिकीट काढून घेऊ. तिकीट book केले आणि facebook उघडले. एव्हाना दशावतारचे reviews यायला लागले होते. एक-एक review वाचून मला अगदी तळ्यात – मळ्यात होत होतं.

गावाची ख्याती

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 19/09/2025 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
परवा इथे विले पार्ल्यात गाण्यातल्या मित्रासोबत एका रजवाडी चहाच्या दुकानात चहा प्यायलो. सोबत काही बिस्किटे ही खाल्ली.

छोटाच होता,काही कळायचं वय नव्हते.

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 15/09/2025 12:13 या दिवशी प्रकाशित केले.

छोटाच होता,काही कळायचं वय नव्हते. 

तो-आई,तांदळाची खीर कर ना! "हात मेल्या, दळभद्री कुठला!"

 वडील दुसर्‍या गावी नोकरीवर होते.सुट्टीवर येताना रातराणीचा अपघात झाला. मोठा मुलगा म्हणून जे काही सांगितलं ते करत गेला. "बाई,आज आमच्या घरी चौदावा आहे,मी शाळेत येवू शकणार नाही". न सांगता घरी राहीला असता तरी कुणी काही म्हणले नसते. 

तांदळाची खीर वाढताना आईचा बांध फुटला. भर पंक्तीत त्याला बदडला. 

लहान होता तरी मोठे व्हावे लागले. उद्ध्वस्त घडी बसवायला अर्धे आयुष्य गेले. 

अचानक,म्हातारी आई गेली. तेरावा झाला,कोपर्‍यात बसून होता. 

द्रष्टादृश्यदर्शन

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 11/09/2025 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
द्रष्टादृश्यदर्शन ________________________ #सनातनी मनुवादी लेखन अर्थात ज्या सनातन ज्ञानाच्या, आकलनाच्या रक्षणाकरिता , जतन करण्याकरिता वर्णाश्रम धर्माची व्यवस्था भगवंताने घडवली त्या विषयाशी संबंधित. # स्वान्तःसुखाय अर्थात इथे कोणालाही काहीही पटवुन देण्याचा उद्देश नाही. हे केवळ स्वतःच्या सुखाकरिता आहे , मजेकरिता आहे , आनंदाकरिता आहे. ________________________ साधारण संध्याकाळची सात साडेसातची वेळ असावी. सप्तर्षीगडावरुन खाली उतरत होतो . आज कसे कोण जाणे ध्यानाला बसलो ते इतके खोल गेलो कि स्थलकालाचे भानच राहिले नाही. आता मात्र अंधार पडायला लागला होता. काहीही स्पष्ट दिसेनासे झालेले होते.

हिंदुत्ववादी आणि उजवे

लेखक उपयोजक यांनी बुधवार, 10/09/2025 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच भारतीय हे हिंदुत्ववादी लोक आणि उजव्या विचारांचे लोक यामध्ये गल्लत करतात. आधी बघू की हिंदुत्ववादी म्हणजे काय? १) त्यांना हिंदू धर्मातले देव ही संकल्पना मान्य असते. ते राम , कृष्ण , शंकर , हनुमान असे जे जे हिंदू धर्मातले देव आहेत ते त्यांना मान्य असतात. ते त्यांच्या अस्तित्वाबद्दल चिकित्सा करत नाहीत. हे काहीसे आक्रमक असतात. २) ते हिंदू धर्माबद्दल चुकीच्या शब्दात केलेली टीका , निर्भत्सना यांना कडाडून विरोध करतात. ३) त्यांना हिंदू धर्मातल्या बऱ्याचशा परंपरा , हिंदू धार्मिक ग्रंथ हे मान्य असतात. ते त्यांची चिकित्सा करत बसत नाहीत.

चंद्रग्रहण अनुभूती: हा खेळ सावल्यांचा!

लेखक मार्गी यांनी सोमवार, 08/09/2025 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! काल रात्रीच्या चंद्रग्रहणाचा अनुभव अविस्मरणीय होता. सुरूवातीला ढग आणि पाऊस! त्यामुळे "संपेल ना कधी हा खेळ (ढगांच्या) सावल्यांचा" असं वाटत होतं. चंद्राला आधी ढगांचं ग्रहण लागलं होतं. दोन टेलिस्कोप व बायनॅक्युलरसह आम्ही मित्र तयार होतो. पण ढग होते. ढगात असतानाच चंद्र पृथ्वीच्या उपछायेत जाऊन ग्रहणाची सुरूवात झाली. पण सूर्य इतका तेजस्वी आहे की, तो अंशत: झाकला गेला तरी चंद्राच्या तेजात लक्षात येईल असा फरक पडत नाही. नंतर जेव्हा चंद्राने पृथ्वीच्या मुख्य सावलीत प्रवेश केला (सूर्य पूर्णपणे पृथ्वीच्या आड गेला) तेव्हा मात्र चंद्राची कडा काळी झालेली दिसली. पण सतत ढग होते.

ऋणत्रय आणि चातुर्वर्णाश्रम

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 14/08/2025 01:33 या दिवशी प्रकाशित केले.
# सनातनी मनुवादी लेखन # स्वान्तःसुखाय __________________________________________ "प्रसाद भाई , अरे भाई मैने अभी अभी पढा कि हर हिंदु जन्मसेही ३ कर्जे मे होता है , देव रिण, ऋषी रिण और पितृ रिण . क्या है भै ये ?" "भाई तु क्या पढ रहा है और कहां से पढ रहा है ? ती जिस स्पीडसे पढ रहा है, समझ रहा है , तु तो एक दिन मुझसेभी जादा सनातनी हो जायेगा !" "ख्या ख्या ख्या " "ख्या ख्या ख्या " गेल्या गुरुवारी एका अहिंदु मित्राशी झालेला हा संवाद ! १००% सत्य प्रसंग आहे हा ! तिथुन मनात विचार आला की ह्या विषयावर एकदा लिहुन काढायला हवं ! तस्मात् हा लेखनप्रपंच !

षड्रिपु - एक चिंतन

लेखक प्रसाद गोडबोले यांनी रविवार, 10/08/2025 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
# सनातनी मनुवादी लेखन # स्वान्तःसुखाय
षड्रिपु - एक चिंतन
रिपु शब्दाची व्युत्पत्ती - रपति इति रिपु अशी आहे. अनिष्ट बडबड करतो तो रिपु . अनिष्ट म्हणजे काय तर ज्याच्या योगे मनाला व्याकुळता उत्पन्न होईल असे बोलतो ते रिपु. आपल्या सनातन संस्कृतीत ६ रिपु मानलेले आहेत ते षड्रिपु ह्या प्रमाणे - काम क्रोध लोभ मद मोह मत्सर. १. काम काम हा सर्वात पहिला आणि सर्वात मोठ्ठा रिपु ! पण काम ह्या शब्दाचे बोली भाषेतील भाषांतर सेक्स अर्थात संभोगाची इच्छा असे केल्याने त्यातील मूळ अर्थ काहीसा अलभ्य होउन जातो.

ठकीशी संवाद : नाटकाचा अनुभव

लेखक मन यांनी बुधवार, 06/08/2025 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडेच (खरं तर काही महिन्यांपूर्वी) ठकीशी संवाद बघण्यात आलं. नाटक बघणे, कळणे ह्यामध्ये आपण पुष्कळच कमी पडत असल्याची जाणीव झाली. त्यास कारण पुढील गोष्टी: 1 नाटकातले सुटे सुटे शब्द कळले. वाक्ये कळली नाहीत. अर्थ नीटसा लागला नाही. 2 दोन चार वर्षे ललित कला केंद्र अन काही वर्षे NSD Delhi अन सोबतीला FTII मधले कोर्सेस केले तर कदाचित नाटक समजलं असतं 3 समांतर नाटकाची अशी एक धाटणी, शैली असते. त्यातली काही लक्षणे ह्यात होती. अगदी ठळक होती. (Luck by chance सिनेमात नायकाचा स्पर्धक, द्वेष्टा ज्या शैलीत वावरतो, ती. किंवा "तुघलक" , "अंधा युग" ही हिंदी नाटके ज्या प्रकारे सादर केली जाणं अपेक्षित आहे ती.