Skip to main content

अनुभव

सैरभैर डायरी - २.१

लेखक कपिलमुनी यांनी सोमवार, 05/01/2026 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात काय काय गंमती जमती झाल्यात चाळीशी नंतर याच्या आठवणी लिहाव्यात आता असा विचार केला. यात सलगता काही नाही. सामान्य माणसाच्या आयुष्यातील सामान्य घटना ! पहिल्या भागाला प्रतिसाद देणार्यांचे आभार .

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग २: पिथौरागढ़ भ्रमंती

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 02/01/2026 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
३ डिसेंबरची‌ सकाळ! कालची रात्र उघड्या बस स्टॉपवर थंडीत काढल्यानंतरचा पहाटेचा अंधारातला घाटाचा प्रवास! ही रात्र संपणारच नाहीय असं वाटत होतं. पण चक्क रात्र लवकर गेली. डुलकी लागली आणि तास गेलेले कळालं नाही. टाईम लॅप्स फोटोग्राफीमध्ये जसे काही तासांचे काही सेकंद होतात, तशीच रात्र भरभर गेल्यासारखी वाटली! टनकपूरवरून तीनला निघालेली बस साडेपाचला चंपावतला चहासाठी थांबली तेव्हा पहाट झाल्याचं दिसलं! सर्वदूर उंच पर्वत! वळणा वळणांचा रस्ता! डोंगरात थोडी थोडी घरं आणि उतारावरची‌ शेती! "बीआरओ" च्या हिरक परियोजनेच्या अंतर्गत हा रस्ता येतो. नंतर लोहाघाट, गुरना मार्गे पिथौरागढ़!

खूप थंडी आहे यंदा

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 18/11/2025 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
खूप थंडी आहे यंदा. पांघरायला ब्लॅंकेट काढू का दुलई काढू? ब्लॅंकेट काढ. पण ब्लॅंकेट धुवायला लागते आधी. मग दुलई काढ. दुलई फार हलकी आहे वजनाला. मग ब्लॅकेट काढ. ब्लॅंकेटने काय थंडी थांबते का? मग दुलई काढ. दुलई थोडी आपरी आहे. मग ब्लॅंकेट काढ. ब्लॅंकेट अंगाला टोचते. मग दुलई काढ. दुलई कॉटनच्या कापडाची नाही नं. मग ब्लॅंकेट काढ. ब्लॅंकेट लई महागाचं आहे नं. मग दुलई काढ. जाऊद्या. आपली गोधडीच बरी आहे.

सफर दक्षिण कन्नडाची

लेखक केदार भिडे यांनी रविवार, 16/11/2025 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही नुकताच उडुपी पर्यंत प्रवास केला. आज पर्यंत विविध प्रकारे प्रवासलेखन करून झालेले आहे. हा माझा एक वेगळ्या प्रकारे प्रवासलेखन करण्याचा प्रयत्न आहे. कुठे कसे जावे काय पाहावे याचे हे वर्णन नाही. या लेखात दक्षिण कन्नडा प्रदेशातील दिसलेल्या आर्थिक घटना किंवा इतिहास यांचा आढावा घेतला आहे. त्याकरता या प्रदेशातील बँकिंगचा इतिहास, मंगलोरी कौलं उद्योग, आणि आधुनिक हार्वेस्टर यांची चर्चा केली आहे. दक्षिण कन्नडातील बँकिंग आज देशात ज्या शासकीय मालकीच्या ज्या बँका आहेत (ज्या पूर्वी खाजगी मालकीच्या होत्या) त्यातील ४ बँकांची सुरुवात दक्षिण कन्नडा प्रदेशात झालेली आहे.

गडद अंधार, धुमकेतू आणि तारेच तारे

लेखक मार्गी यांनी बुधवार, 12/11/2025 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
✪ लेमन धुमकेतूचं दर्शन- अविस्मरणीय अनुभव ✪ आकाशगंगेचं पिठुर चांदणं आणि देवयानी आकाशगंगेचा झगमगाट ✪ सौर डाग बघताना सूर्यावरून जाताना दिसलेलं विमान! ✪ डोंगराआडून वर येणारे तारे ✪ जणू विमानाने केलेला कृत्रिम उपग्रहाचा पाठलाग ✪ निबीड अंधारात जणू सावली पाडू शकेल इतकं चमकणारं तेजस्वी ISS ✪ विशेष धुमकेतू आणि उल्का वर्षाव सत्राचं १४- १५ नोव्हेंबरला आयोजन तुम्ही अशा ठिकाणी आहात जिथे कोणत्याच दिव्याचा प्रकाश येत नाही. आणि हळु हळु रात्र होते आहे. सूर्य मावळून गेला आहे. संधीप्रकाश कमी होतोय. दूरवर दिसणारा तिकोना आणि इतर डोंगर हळु हळु फिकट होत आहेत. अगदी डोंगराच्या मधोमध असलेली ही जागा.

मिताली राजला आउट करणारी नांदेडची मुलगी

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 04/11/2025 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. भारतीय मुलींच्या टीमबरोबर त्यांचं कौतुक करणार्‍यांचंही अभिनंदन! एक खूप वेगळी क्रांती घडते आहे. मुलींच्या खेळाबद्दल आणि एकूणच खेळाच्या जगताबद्दलसुद्धा. परवा मुलींचा सन्मान करणार्‍या मिताली राजला बघून तिला आउट करणारी नांदेडची मुलगी मात्र सारखी आठवते! मिताली राज १९९९ ते २०२२ ही २३ वर्षे भारतासाठी खेळत होती. सर्वांत कमी एकदिवसीय सामन्यांमध्ये एक हजार रन्स करणारा भारतीय खेळाडू हा विक्रम तिच्याच नावावर आहे. २००८ मध्ये ती कॅप्टन असताना अनेक ठिकाणी नवीन खेळाडू शोधायला जायची. तेव्हा ती नांदेडला आली होती. आणि ज्युनियर क्रिकेट खेळणार्‍या एका १६ वर्षांच्या मुलीने तिला आउट केलं होतं!

मुलांच्या निसर्ग शिबिराचा आनंद सोहळा!

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 31/10/2025 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
मुलांच्या निसर्ग शिबिराचा आनंद सोहळा! ओढा, स्विमिंग पूल, बेडकं, खेकडोंगर ट्रेक‌ आणि मस्ती की पाठशाला ✪ पानी‌ में शिरा और मस्त पोहा! ✪ अंजवेलमधलं भूताचं झाड… ✪ जोडसाखळी, विष- अमृत, नौकायुद्ध आणि रस्सीखेच ✪ "विराट कोळी" आणि झाडावरच्या लढाऊ मुंग्या! ✪ तोडलेल्या फेविकॉलच्या जोड्या आणि पाठलाग ✪ खजिन्याचा शोध आणि तुंग- तिकोना ✪ हेलिकॉप्टर उडवणारे काका आणि वेगळ्याच गप्पा ✪ अंजनवेलची आपुलकी आणि घरपण ✪ सारखी तीच ती‌ संख्या कशी येतेय? ✪ चंद्र- सूर्य आणि ग्रह- तारे ✪ मुलांचा स्वत: खेळण्याचा उत्साह आणि आनंद ✪ शिबिरातले खास टॉम अँड जेरी! ✪ मस्ती, खेळ, लढाई, टीम वर्क आणि

कारखान्याची गोष्ट

लेखक स्पा यांनी शनिवार, 18/10/2025 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
नव्याने स्किम मध्ये उभ्या राहिलेल्या त्या अनेक इमारती असलेल्या सोसायटीची ती पहिलीच दिवाळी होती. शहरे भरली, मग उपनगरे ,आता त्याच्याही आत आत जाऊन निसर्गाच्या सानिध्यातल्या जाहिराती करुन नागर वस्ती उभी राहायला लागली. मुळची जंगले, शेते, पाणठळ जागा, मसणवाट, नुसत्याच्या रिकाम्या ओसाड जागा सगळे साफ झाले, उत्तुंग टाॅवर उभे राहीले, दुकाने, हाॅटेल्स,माॅल्स सगळीकडे झगमगाट आला, मूळच्या बुऱ्या वाईट निर्यास करणाऱ्या शक्तीच्या वरची ही दुनिया.

विशेष व्यक्तींची लैंगिकता ह्यावर डॉ. सचिन नगरकर सरांचं व्याख्यान

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 10/10/2025 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
विशेष व्यक्तींची लैंगिकता ह्यावर डॉ. सचिन नगरकर सरांचं व्याख्यान अतिशय आवश्यक विषयावर मोलाचं मार्गदर्शन ✪ लैंगिकता- आईच्या पोटात असल्यापासून ते मृत्युपर्यंत ✪ वी.स. पा. गे. समूहाची गोष्ट ✪ "सा. सू. आणि सू. न.!” ✪ “हम कुत्ते के लिए इतना करते हैं, बच्चे के लिए नही?” ✪ कार्यशाळेत रडणारा बाबा ✪ गरज स्वीकाराची व अप्रोप्रिएशनची ✪ ६५% इंटरनेट पॉर्नसाठी वापरलं जातं ✪ पाळी अडचण नाही, ती आली नाही तर अडचण ✪ संवेदनशीलता, सोबत आणि सपोर्ट सिस्टीम हवी ✪ प्रश्नांवर उपायही आहेत! नमस्कार. आज १० ऑक्टोबर- मानसिक आरोग्य जागरूकता दिवस. नुकतंच डॉ.

धूमकेतू C/2025 A6 (Lemmon) बघण्याचा रोमांच

लेखक मार्गी यांनी बुधवार, 08/10/2025 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
अंजनवेलमधील निसर्गाचे नयनरम्य अविष्कार! ✪ दोन धूमकेतू सध्या छोट्या टेलिस्कोपने बघता येतात ✪ धूमकेतू C/2025 A6 (Lemmon)- १३९६ वर्षांनी भेटायला आलेला पाहुणा! ✪ सब्र का फल मिठा- अखेर झाले मोकळे आकाश! ✪ अंजनवेलमधला निसर्ग- ढग, पाऊस आणि दवाचा पाऊस ✪ निरव शांततेत ओढ्याची कोसळधार, नितळ आकाश आणि तारेच तारे ✪ सितारों की महफील में कर के इशारा ✪ धुक्याच्या दुलईत पहुडलेले पर्वत ✪ विविधरंगी फुलांचा बहर आणि सह्याद्रीची श्रीमंती ✪ अंजनवेलमध्ये धूमकेतू निरीक्षण सत्र आणि मुलांसाठी हिवाळी शिबिर नमस्कार.