Skip to main content

अनुभव

२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - पुर्वार्ध

लेखक वेदांग यांनी गुरुवार, 30/04/2020 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
||नर्मदे हर || "ठरलं...२६ जानेवारी २०१४ ला आपण परिक्रमेला सुरुवात करायची..." नंदू काका (आनंद घाटपांडे), बाबा आणि मी नवीन सायकल घ्यायला आलो असतानाचा बाबांनी बॉम्ब टाकला. मनात विचार आला, अजून १ वर्षापेक्षा जास्त वेळ आहे, आरामात सराव होईल पण त्या वेळी म्हणजेच डिसेंबर २०१२ ला लक्षात नव्हतं आलं कि वर्षभराची प्रक्टिस सुद्धा पुरेशी होणार नाहीये. जे भोग भोगायचे आहेत ते भोगावे लागणार आहेतच. २ नव्या कोऱ्या Montra जाझ्झा घेऊन ऐटीत दुकानाच्या बाहेर पडलो. सध्या बाबा आणि माझ्यात मिळून १च सायकल घेतली होती आणि दुसरी सायकल चंद्रशेखर काकांसाठी होती.

माधवनगरच्या आठवणीतून... गोगटे काकांच्या घरचे फिस्टचे निमंत्रण

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 14/04/2020 00:17 या दिवशी प्रकाशित केले.

माधवनगरच्या आठवणीतून...

गोगटे काकांच्या घरचे फिस्टचे निमंत्रण

गुरुवार पेठेतील आमच्या घराच्या अंगणात सायंकालीन रिंग खेळणे हे इतके सहजपणे होत असे कि तो पायंडाच पडला होता. मे महिन्यात पाण्याचा सडा घालून, नेट बांधायचे डांब वेळोवेळी पहारीने ठोकून ठाकून घट्ट तयार केले की जितके टाईट बांधता येईल तितका नेटचा दोर खेचायला गठ्ठ्या सारखा गबदुल तातडीने कामाला येई. त्या आधी आम्ही खेडकरांच्या बंगल्यासमोर कोर्टावर जात असू. चाळीतील कोकणी चेहर्‍याच्या मधु नाईकला त्या काळात हरवणे अशक्य बाब होती. तुफान वेगाच्या सर्विसवर तो अर्धे पॉईंट वसूल करे.

मठ

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 11/04/2020 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
ना गुणी गुणीनं वेत्ति गुणी गुणिषु मत्सरी । गुणीच गुणरागीच विरलः सरलो जन: ॥ अर्थ- गुण नसलेल्याला गुणी माणसाची परिक्षा होत नाही, जो स्वत: गुणी आहे तो दुसर्‍या गुणी माणसाचा मत्सर करतो. स्वत: गुणी असुनही दुसर्‍याच्या गुणावर प्रेम करणारा सरळ मनाचा माणूस विरळाच असतो. एकदा सामाजिक, मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्तीस भेटायला गेलो. बोलता बोलता स्त्रीवादाचा विषय निघाला. मी मिळून सार्‍या जणींच कौतुक केल. विद्या बाळ, गीताली व इतर अशा या क्षेत्रात काम करणार्‍या लोकांविषयी आदर व्यक्त केला. बाई मनातून खवळल्या पण मोठ्या संयमाने पण तुच्छतेने मी त्यांच्यापैकी नाही असे निक्षून सांगितले.

काळ आला होता पण वेळ नाही...

लेखक महामाया यांनी सोमवार, 06/04/2020 01:55 या दिवशी प्रकाशित केले.
रवींद्र दत्तात्रय तेलंग रात्रपाळीवर असतांना एकेदिवशी झोपेतच सुट्‌टी झाली असती...डायरेक्ट तिकीट जवळ-जवळ कापलंच गेलं हाेतं...कुणास ठाऊक एकाएकी कशी काय जाग आली... ती सीमेंट फॅक्ट्री होती...

सोवळे ..तेव्हाचे आणि आजचे करोना सोवळे.

लेखक Jayant Naik यांनी रविवार, 05/04/2020 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
सोवळे ..तेव्हाचे आणि आजचे करोना सोवळे. करोना विषाणूच्या दहशतीने आम्ही शांतपणे घरी बसलो आहे. आमची सदनिका सहाव्या मजल्यावर. संध्याकाळी थोडावेळ सोसायटीच्या आवारात थोड्या फेऱ्या मारणे आणि औषधे किवा भाजीपाला आणण्यासाठी जवळच्या दुकानात जाणे एवढेच काय तो बाहेरचा संपर्क. सगळे सुरळीत चालले आहे असे वाटते आहे तेवढ्यात आमच्या water purifier ने लाल दिवा दाखवला. त्याचा फिल्टर राम म्हणण्याच्या बेतात आहे अशी त्याने आम्हाला समज दिली. आम्ही रीतसर तक्रार नोंदवली पण आता सर्व बंद आहे १४ एप्रिल नन्तर पाहू असा निरोप आला.

(ऐकाव्या + पहाव्या) च अशा मुलाखती

लेखक मायमराठी यांनी रविवार, 05/04/2020 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
(ऐकाव्या + पहाव्या) च अशा मुलाखती. सध्या विरंगुळा एके विरंगुळा अणि विरंगुळा दुणे चौपट विरंगुळा हे पाढे जोरात सुरू आहेत. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी, शरीरधर्म व देवपूजा इ. कार्यक्रम संपन्न झाल्यावर निवांत बसून जीव रमवायच्या नानाविध प्रयत्नांत थोडी भर घालेन म्हणतो. २००६ च्या ' वो लम्हे ' मधील ' क्या मुझे प्यार है..' किंवा 'दिल तो बच्चा है जी' मधील ' अभी कुछ दिनों से...' ऐकलंय का? तू नळीवर slow interview शोधून बघा. मुलाखत आवडणाऱ्यांना मेजवानी आहे. आपणा पैंकी अनेकांनी बघितलंही असेल. तरीही इतरांकरता निलेश मिश्राबद्दल सांगायचा मोह आवरत नाही.

कथा: निर्णय

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 27/03/2020 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
मी अभिजित. आमच्या कंपनीचा न्यूयॉर्कमधील प्रोग्राम डायरेक्टर! आमची मल्टीनॅशनल कंपनी ट्रीरुट्स सर्व्हीसेस ही बँकिंग सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रातील मोठी कंपनी! न्यूयॉर्कमधील एका उंच व्यापारी इमारतीतल्या छत्तीसाव्या मजल्यावरच्या आमच्या ऑफिसमध्ये खुर्चीवर मी बसलो होतो आणि समोर लॅपटॉपवर एक ईमेल आलेला होता. त्याकडे बघत विचारांत गढलो होतो. त्यातील सत्तावीस नावे मी पुन्हा पुन्हा वाचत होतो आणि त्यातील नऊ नंबरचे नाव बघून अस्वस्थ होत होतो. खुर्चीवरून उठून मी उभा राहिलो आणि काचेच्या खिडक्यांतून बाहेर पाहू लागलो. आज मला कसलीच कमतरता नव्हती. माझी एक मुलगी विशाखा अमेरिकेतच प्रोफेसर आणि दुसरी अजून शिकत होती!

कृतघ्न -5

लेखक बाप्पू यांनी रविवार, 22/03/2020 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचे भाग भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154 भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159 भाग 3: https://www.misalpav.com/node/46183 भाग 4: https://www.misalpav.com/node/46203 आता पुढे माऊली विचारात पडला कि या बाबतीत स्वतः हस्तक्षेप करावा कि नाही, रामदास ला तुकाराम च्या भरोश्यावर सोडून द्यावे कि आपण मदत करावी.

कृतघ्न -2

लेखक बाप्पू यांनी शुक्रवार, 28/02/2020 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भाग - https://www.misalpav.com/node/46154 आता पुढे. - रामदास ने मागे वळून पहिले. साडेपाच फूट उंच, अंगात खाकी वर्दी, खांद्यावर 2 स्टार आणि शिट्टी, हातात एक फाईल घेऊन कोणातरी अधिकारी उभा होता. प्रत्येक खाकी वर्दीतला माणूस म्हणजे पोलीसच अशी त्याची समजूत होती. घाबरलेल्या नजरेने त्याने त्याच्या हाकेला ओ दिली. जनाबाई आणि दोन्ही पोरे देखील घाबरली. एकतर दोन तीन दिवस सर्वजण अर्धपोटी, खिशात पुरेसे पैसे नाहीत आणि आता हे पोलिसांचे लफडे मागे लागले म्हणून त्याला घाम फुटला.

मतदार हुशार झालेत का ?

लेखक विवेक9420 यांनी शुक्रवार, 28/02/2020 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
मतदार हुशार झालेत ? दिल्ली मध्ये नुकत्याच झालेले राज्याचे ईलेक्शन व त्यानंतर आलेले निकाल पाहता आम आदमी पार्टी ने दणदणीत विजय मिळवला व तोही स्वबळावर. आप पक्षाने हा मिळवलेला विजय नक्कीच कौतुकास्पद आहे. असो, पन काही जन मात्र ह्या निकालाचे वृत्त करताना जणु हा निकाल आता भाजप संपवत आहे किंवा भाजप साठी फार मोठी धोक्याची घंटा आहे असा काही बोलत आहेत किंवा बोवत होते . आता असे वृत्तकथन करणारे लोकांवर हसावे कि त्यांचा बुद्धी वर किव करावी हा मोठा प्रश्न आहे. कारण वृत्त कथन करणारेंना मतदार किती कळाला? ह्याचे फार मोठे रहस्य आहे.