Skip to main content

अनुभव

भाग ९ अंधारछाया प्रकरण ८. समजा मीच या फुल्या काढायचे ठरवले, घरात कोणी नसताना! तर मी काय करेन? ठीक आहे, काजळाची डबी घेतली. कशाने काढेन मी अशा फुल्या? काहीतरी काडी बिडी हवी! येस काड्यांची पेटी हवी!

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 21/01/2020 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारछाया भाग ९ - प्रकरण ८

अंधारछाया

आठ मंगला कॅलेंडरचा नोव्हेंबर महिना फाडला. बेबीला येऊन आता दोन आठवडे झाले. डिसेंबरचे एकतीस दिवस. डिसेबर महिन्याचे पान फाडून नवे कॅलेंडर लावीन तेंव्हा काय झाले असेल? करायला घेतलंय हे आपण, पण निभेल ना असे मनात सारखे वाटे! मग ह्यांनी सांगितल्याचे आठवे. ‘मंगला, एक लक्षांत ठेव आपण तिच्या चांगल्यासाठीच करायला जातोय ना मग होऊ दे काहीही. तू सर्व भार स्वामींच्यावर सोपव. जपावर विश्वास ठेव.

भाग ८ अंधारछाया प्रकरण ७. नकळत हात जोडले गेले. ‘स्वामी मार्ग सुचवा आम्हाला.

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 20/01/2020 23:38 या दिवशी प्रकाशित केले.

अंधार छाया

सात शशी आज शुक्रवार म्हणजे एच व्ही सर दाढी करून येणार आणि चिडणार! मग स्पेलिंग चुकलं की बसणार पट्ट्या हातावर! विचार करत मी एकनॉलेजमेंट म्हणजे पोच असे पाठ करत होतो. मनात येई दाढी करणं आणि रागावणं याचा काही संबंध असेल तर मी दाढी करणार नाही मोठेपणी! आत आई, बेबी बोलत होत्या. लती काहीतरी दौत पेनाशी चाळे करत होती. आजी दुर्वा तोडायला फिरत होत्या बाहेर फुलझाडांपाशी. दादा सायकलवरून गेलेले पाहिले ऑफिसला, मग मी सकाळ घेतला हातात. ‘क्रीडा विषयक बातम्या हे पुढच्या पानावर का देत नाहीत?

भाग ७ अंधारछाया प्रकरण ६ कुटून कुटून मारीन पन सोडनार न्हाई.

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 19/01/2020 21:46 या दिवशी प्रकाशित केले.

अंधार छाया

सहा बेबी गुरूजींनी जे सांगितलं त्याच्यावर माझा विश्वासच बसेना! काय मला कोणी झपाटलय? कस शक्य आहे? मी तर माझी मीच आहे. खातेय पितेय, आणखी कोण असणार माझ्या शरीरात? गुरूजी म्हणाले, ‘हिचा पत्रिका जरा विचित्र आहे. अनिष्ट ग्रहयोग मान आहे. शिवाय सध्या साडेसातीही चालू आहे. तिच्या राशीला. तेंव्हा त्रास हा होणारच.’ ते ठीकच होत. माझी तब्बेत ही अशी लुकडी सुकडी. शिक्षणाचे असे तीन तेरा वाजलेले. तेंव्हा कुंडलीच्या भविष्यावर माझा विश्वास बसला. पण पुढे लागिराबद्दल म्हणताना मला काही खरंच वाटेना.

भाग ६ अंधारछाया प्रकरण ५ - पोलक्यावर काळ्या फुल्या! काळ्या कुळकुळीत! डिजाईन सारख्या फुल्या! मी पटकन तिचा पदर पाठीवरून ओढून घेतला.

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 17/01/2020 21:05 या दिवशी प्रकाशित केले.

अंधारछाया

पाच मंगला सदासुखला तीनचा शो पाहिला. तिथेच कॅफे रॉयलमधे आंबोळ्या, टॉमॅटो आम्लेट खाल्ले. परत टांग्यातून येता येता साडे आठ झाले. काकू वाट पहातच होत्या आमची. अंथरुणे घालून पडलो. मुलं झोपल्यावर हे दारांना कड्या कुलुपं लावून आले. उशी खाली किल्ल्या ठेवून झोपलो. पण कालचा प्रकार आठवून झोप थोडीच येत्येय? रात्र अस्वस्थेतच गेली. हे ऑफिसातून संध्याकाळीच एकदम येणार असा निरोप तातोबा घेऊन आला. मग आम्ही तिघींनी जेवणं उरकून घेतली. पडलो मधल्या खोलीत मासिकं वाचत. इतक्यात दारावरची बेल वाजली. जरा त्रासातच दार उघडले, तर दोन अनोळखी बायका दारात. म्हणाल्या, ‘आम्ही सांगलीहून आलोय.

भाग ५ अंधारछाया प्रकरण ४ - मी हिला धरतो. आता हित मटनाचं जेवान बिवान देतो म्हनत्यात. तू फक्त सोड तिला. मी बघतो तिच्याकडं. बघ कसा बकाबका खातो ते.’

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 16/01/2020 20:17 या दिवशी प्रकाशित केले.

अंधारछाया

चार मंगला गेले चार रात्री काही माझा डोळ्याला डोळा नाही. ह्यांनी सांगितलं, ही बेबी अशी कड्याकाढून बाहेर जाते म्हणून. मी हबकलेच. हे रात्री जागे झाले म्हणून बरं. गेली असती पुढे चालत एकटी तर शोधायची कुठे तिला ? आधीच ही नवीन गावात. रस्ते माहित नाहीत. काही म्हणता काही होऊन बसलं असतं बरं. मी यांना सांगितलं, ‘आधी सगळ्या दारांना कुलुपं घाला रात्रीची. मगच मला झोप येईल.’ हे म्हणाले मला, ‘विचार तिला काय होतय झोपल्यावर म्हणून. पण ती म्हणते, ’काही नाही मी झोपते छान. इथे आल्यापासून झोप छान लागतेय ’. मला पुढे काही सुचेना विचाराव कसं ते.

फेंगशुई,कासव आणि चिरंजीव

लेखक Cuty यांनी गुरुवार, 16/01/2020 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
D mart मध्ये खरेदी करत असताना चिरंजीवांची भुणभुण सुरू होती. त्याला एक काचेचे पारदर्शक रंगाचे कासव आवडले होते. ते त्याला खेळायला हवे होते. मी पाहिले, त्या ठिकाणी फेंगशुईच्या अनेक वस्तू ठेवल्या होत्या. त्यातच ते कासवपण होते. मी नाक मुरडूनच तिथून पुढे निघून गेले. माझा अश्या गोष्टींवर विश्वास नाही मात्र नवरोबांचा आहे. घरी आल्यावर सामान भरून ठेवताना पाहते तो काय! चक्क ते कासव सामानाच्या पिशवीत दिसले. मग लक्षात आले,हा उद्योग चिरंजीव आणि त्याच्या पप्पांचा आहे. दोघांनी मला नकळत खरेदी करून ते घरी आणले होते. मग दोन दिवस ते कासव कुठे ठेवायचे यावर बापलेकांत वाद सुरू होता.

भाग ४ अंधारछाया प्रकरण ३ - ‘बेबी, बेबी’, कुठे निघालीस रात्रीची? ती हात वर करून म्हणाली, ‘ते काय, ते बोलावतायत मला. मी जाऊन येते!’

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 14/01/2020 11:18 या दिवशी प्रकाशित केले.

अंधारछाया

तीन बेबी स्वारगेटवर सुभाष, श्रीकांता आले होते पोहोचवायला. सुभाषच्या ऑफिसातले होते कोणी. त्यांच्या सोबतीने बसले मी सातच्या मिरज गाडीत. सुभाषला काळजी फार, ‘बेबी, पुस्तक घेतलीस का? काल आणलेली साडी ब्लाऊझ घेतलास का? दुपारच्या जेवणाचा डबा घेतलास ना? श्रीकांताला गाडी सुटायला निघता निघता केळी आणायला पिटाळलंन! ऑफिसच्या माणसाला सारखं सांगत होता, ‘प्रथमच जातेय एकटी. नीट लक्ष असू दे.’ मला तर हसूच येत होतं त्याच्या काळजीचं. जरा घाबरट आहे आमचा सुभा. एसटी चालता चालता केळी हातात पडली. हात हालवत दोघे दिसेनासे झाले. गाडी मेन रोडवर आली.

मुंगूसाची गोष्ट

लेखक मायमराठी यांनी मंगळवार, 14/01/2020 09:01 या दिवशी प्रकाशित केले.
।। मुंगूसाची गोष्ट ।। ' गोष्ट ' हा शब्द ऐकल्यावर कान टवकारले जात नाहीत; नीट सरसावून बसत नाही; भुवया आभाळापर्यंत उंचावून उत्सुकता चेहऱ्यावरून सांडत नाही; आपण ज्यांच्याशी गप्पा छाटत होतो त्यांनाच गप्प करत "जरा ऐकू दे रे." असं म्हणत नाही, आहे का असं कोणी? दुसऱ्याही प्रकारचे मनुष्य असतातंच. म्हणजे " हा मला काय अक्कल शिकवणार? ", " हा कुठली गोष्ट सांगणार ते मला माहितेय.", "मला माहीत नाहीत अशा गोष्टीच नाहीत." अर्थात ही वाक्ताडनं मनातल्या मनातंच हो.

अंधारछाया भाग ३ प्रकरण २ - अहो थर्डक्लासातच पाहून ठरवलत होय मी नापास म्हणून? फर्स्टात नंबर असणार माझा.’

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 13/01/2020 12:07 या दिवशी प्रकाशित केले.

अंधार छाया

दोन दादा स्वामींची मात्र कमाल आहे. माझ्यासाठी स्वामींनी नातू शेठना शब्द टाकला! म्हणाले , ‘ शेठ, या जनार्दनला चांगलासा धंदा द्या बरं. सचोटीचा व चार पैसे मिळवणारा हवा. इथे इस्लामपुरात आल्यापासून माझ्या माहितीचा आहे हा. विश्वासू आणि सरळ मनाचा आहे. सध्या त्याला काही धंदा हवा आहे. मी त्याला ओळखतो. माझी दीक्षा घेतलीयाय त्याने. त्याला धंदा देणे तुमचे काम.’ शेठ काही बोलले नाहीत. पण नाही ही म्हणाले नाहीत. नंतर खाली डॉक्टरांच्याकडे चौकशी केली. दुसऱ्या दिवशी मला भेटायला सांगितले. पुढे मी भेटलो. त्यांच्या सोबत माधवनगरला आलो.

भाग २ - अंधारछाया धारावाहिक कादंबरी - प्रकरण १

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 11/01/2020 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
कथानकात पुढे येणाऱ्या व्यक्तींचा परिचय शशी – लेखक. दादा – शशी चे वडील, जनार्दन. त्यांचा माधवनगरला होलसेल कापडाचा व्यापार होता. मंगला – शशीची आई, आजोळकडूनची शांता, ती वडिलांना काका व तिच्या सावत्र आईला काकू म्हणे. बेबी - शशीची मावशी, मंगलाची सावत्र बहीण, सुभाष - एसटीत क्लार्क होता व श्रीकांत – शिकत होता. हे शशीचे सावत्र मामा. मधू – शशीच्या आईचे आजोळचे आडनाव - पर्वते, मामेभाऊ, काका – बाळकोबा गोखले, शशीच्या आईचे वडील, काकू – शशीच्या आईची सावत्र आई, आजी – शशीच्या वडिलांची काकू, लता - शशीची धाकटी बहीण, स्वामी – प्रज्ञानानंद सरस्वती – शशीच्या वडिलांचे, दादांचे अध्यात्मिक गुरू, डॉ.