Skip to main content

अनुभव

प्रवास एक अनुभव

लेखक शब्दांगी यांनी शनिवार, 11/01/2020 07:57 या दिवशी प्रकाशित केले.
निशा , उषा , आसिफा आणि जया चार बाल मैत्रिणींचा ग्रुप सगळ्या जवळ- जवळ पंचेचाळीशीच्या आसपास असतील . सगळ्या आपल्या आयुष्यात बऱ्यापैकी स्थिर झाल्या होत्या . सगळ्यांची मूल मोठी झालेली त्यातल्या काही तर चक्क आज्या सुध्दा झालेल्या . आता संसाराच्या जबाबदारीतून जरा मोकळ्या झाल्या होत्या .मग दर वर्षी ठरवून कुठ तरी फिरायला जात असत .या वेळेस ही असाच बेत ठरला होता . चौघी रेल्वे हायस्कूलमध्ये शिकलेल्या त्या काळाच्या म्हणजेच 1983 -84 च्या प्रथेप्रमाणे कोणाचं सातवीत तर कोणाचं आठवीत , तर कोणाचं नववी तर दहावीत लग्न झालेले .

सुडंबन: (आंघोळ: एक उत्साहवर्धक क्रिया)

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 11/01/2020 05:41 या दिवशी प्रकाशित केले.
सुडंबन: (आंघोळ: एक उत्साहवर्धक क्रिया) मला आंघोळ फार आवडते. अगदी आवडच आहे म्हणा ना! फार म्हणजे फारच. लहाणपणी मी बळजबरी पाण्याच्या लहान टबात बसत असे असे घरचे सांगतात. ते माझ्या अगदीच लहाणपणी असावे. शालेय वयातदेखील मी अगदी थंडीतही सकाळी आंघोळ करूनच शाळेत जात असे. आंघोळीच्या बाबतीतला चटपटीतपणा माझ्या अंगाअंगात मुरलेला आहे. गरम असू दे किंवा गार असू दे, कोणतेही पाणी मला आंघोळीसाठी अन शरीराला मानवते. गरम पाण्यासाठी आता अनेक सोई झालेल्या आहेत.

भाग १ अंधारछाया धारावाहिक कादंबरी - प्रस्तावना

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 10/01/2020 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
 प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या छायेत अंधार लपलेला असतो. त्याचा शोध घेणारी सत्यघटनांवर आधारित कादंबरी  एक अभिप्राय... आत्मनिवेदनातून फुलत जाणारी कथा वस्तू, बोली भाषेतील वाक्य रचना, सर्व पात्रे रोजच्या घसटीतील असल्या सारखी आहेत. लेखन ‘जसे घडले तसे’ या स्वरूपात आहे. त्यात अतिशयोक्ती वा वातावरण निर्मितीसाठी रंगवून केलेले वर्णन नाही. योग्य गुरूच्या मार्गदर्शनामुळे चिकाटी, दृढ श्रद्धेच्या जोरावर आसुरी शक्तींशी समर्थपणे लढा देता येतो व विजय मिळवता येतो.

माझं हॉटेलिंग..

लेखक आजी यांनी मंगळवार, 07/01/2020 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
माझं लहानपण सांगलीत गेलं. बापटबाल आणि पटवर्धन हायस्कूल ह्या माझ्या शाळा. माझं कुटुंब साधं, बाळबोध. अशा घरात बाहेरचं खाणं ही अशक्यप्राय गोष्ट होती.तरीही मी हॉटेलात जाण्याचा पराक्रम केला. मी मॅट्रिकला असतानाची गोष्ट! त्यावेळी सांगली गाव आजच्याइतकं विस्तारलेलं आणि पुढारलेलं नव्हतं. गजानन मिल, काळी खण, प्रताप टॉकीज हे गावाच्या बाहेर आहेत असे वाटे. हरभट रोड, कापडपेठ किंवा मेन रोड, गणपती पेठ आणि गाव भाग हेच मुख्य गाव. राममंदिर,ओव्हरसिअर कॉलनी हे भाग आजच्याइतके गजबजलेले नव्हते.

पंखा

लेखक मायमराठी यांनी शुक्रवार, 03/01/2020 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
।। पंखा ।। एप्रिल- मे मधील दहावीचे सुट्टीतले वर्ग सुरू होते. गरागरा फिरणाऱ्या पंख्याखाली बसूनही घामाच्या धारा लागलेले विद्यार्थी , त्या धारांशी रुमालांनी लढत होते. मधेच वहीच्या पुठ्ठ्यांनी वारा घ्यायचा फुका प्रयत्न. आजकालचे पुठ्ठेही तसे तकलादूच. मुलंमुली भिजलेल्या चोळामोळा झालेल्या रुमालाने कसेबसे स्वतःला गोळा करत करत अभ्यासाकडे नेत होते. एरवी तसाही गणिताने घाम फुटतोच त्यात उन्हाळ्याच्या नवीन समीकरणांची भर पडली होती! अचानक न जाणे कुठून एक बुलबुल पक्षी खिडकीतून पंख्याकडे झेपावला.

रायगड भ्रमंती

लेखक मालविका यांनी रविवार, 29/12/2019 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
रायगड भ्रमंती दिनांक १५ डिसेंबर २०१९ रोजी आम्ही रायगड किल्ल्यावर जायचे ठरवले. मी, नवरा श्रीनिवास, मुलगा ईशान (इयत्ता ३री ) आणि भाची जुई (इयत्ता ५वि ). मुलांनी छत्रपती संभाजी मालिकेत अनेकदा ऐकलेला रायगड प्रत्यक्षात कसा आहे बघितला नव्हता. आता जरा मोठी झाल्याने त्यांना किल्ला, आणि त्याची माहिती कळेल अशी आशा होती. त्याप्रमाणे आम्ही प्लॅन केला. जाताना आम्ही चढून जायचं ठरवलं आणि येताना रोप वे ने. जेणेकरून मुलांना दोन्हीची ओळख होईल. रायगड चढायला १६०० पायऱ्या आहेत असं ऐकलं होतं. मुलं कितपत जमवतील जरा शंका होती. पण मुलांचा उत्साह होता. जमेल जमेल म्हणून उड्या मारत होती.

प्रवासात लागणार्‍या वस्तूंची यादी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 21/12/2019 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
मागे मिपावर प्रथमोपचार पेटी - First Aid Box असा धागा काढला होता. त्याचा कितपत अन कुणाला उपयोग झाला ते माहीत नाही पण मराठीत असा शब्द शोधतांना किंवा मराठीत चर्चा करतांना याचा उपयोग झाला असावा. होते काय की कायप्पावर लिहीलेले कायमचे राहत नाही. म्हणून कुठेतरी कायमस्वरूपी असण्यासाठी मिपावर लेखन असावे असे वाटते. कायप्पावर झालेल्या चर्चेचा धागा व्हावा असे वाटत असल्याने येथे लिहीतो आहे. तर आपण नेहमी किंवा अधेमधे, सतत किंवा कधीकधी प्रवास करतो. तो प्रवास अगदी काही तासांपासून काही दिवसांपर्यंतचा असू शकतो.

द फॉगी माउंट्न बॉईज उर्फ (जाने कैसे सपनों में खो गई अखियाँ...)

लेखक पहाटवारा यांनी शुक्रवार, 20/12/2019 04:18 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला मेलं त्या संगीतातलं काही कळत नाही. एक सरगम सोडली तर रागांच्या सुरावटी कळत नाहीत, आरोह-अवरोह कळत नाही, आॅर्केस्ट्रेशनच्या ज्ञानाचीही बोंबच पण आपल्याला गाणी ऐकायला आवडतात.

Use Dipper at Night: हाय बीम लो बीम, अप्पर- डिप्पर बीम बाबत चर्चा

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 12/12/2019 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
Use Dipper at Night: हाय बीम लो बीम, अप्पर- डिप्पर बीम बाबत चर्चा मिसळपाव.कॉम म्हणा किंवा शेजारचे मराठी सोशल फोरम म्हणा, त्यात महत्वाचे चर्चेचे विषय लिहीले जातात की जे समाजाला उपयोगी पडू शकतात. मागे वाहनांसंदर्भात हेल्मेटचा विषय आला असता, त्यातील विचार बरेच इतर ठिकाणी कॉपी केले होते. इतर ठिकाणी ज्यांनी वाचले ते त्यांच्या उपयोगी आले असेल तर आपल्या या सोशलीझमचा फायदाच म्हणायचा.

आठवणीतील घरं -- नानी का घर -- भाग २

लेखक अहम्_लिखामि यांनी गुरुवार, 12/12/2019 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भाग प्रकाशित केलेला आहे तर हे माझ्या आजीचं घर नेहमी गजबजलेले असायच, मामा, मामी, २ मामे भाऊ असा सतत वावर असायचा. मी आणि धाकटा भाऊ citizens नसलो तरी permanent residency visa वर असायचो. मामी आणि आई दोघीही नोकरी करत असल्यामुळे, दिवसभर आमचा पसारा उचलायला आजीच असायची. आम्ही चौघेही वेगवेगळ्या कारणांमुळे आजी च्या fav लिस्ट मध्ये होतो. मोठा मामे भाऊ पहिला "नातू" म्हणून कौतुकाचा, मग मी काळी बेंद्री असली तरी शांत आणि खूप पुस्तकं वाचते म्हणून, धाकटा मामे भाऊ मृदू स्वभावाचा म्हणून (मोठ्यानि नाकात नऊ आणले कि हा भाऊ देव वाटायचा मला पण) आणि माझा भाऊ शेंडेफळ नातू, म्हणून भाव खाऊन जायचा.