Skip to main content

आस्वाद

'कबीर बानी'

लेखक संजीव ओक यांनी मंगळवार, 21/04/2009 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
पंडित कुमार गंधर्व यांच्या विलक्षण प्रतिभेतून साकारलेल्या निर्गुणी भजनांचा एक नवा अल्बम घेऊन नव्या दमाचे गायक राहूल देशपांडे रसिकांच्या भेटीला येत आहेत. सानिया मिडिया या संस्थेचा हा संगीताच्या विश्वातील पहिला प्रकल्प आहे. 'कबीर बानी - म्युझिक फॉर सोल' असे या अल्बमचे नाव असून अल्बमचे रेकॉर्डिंग पूर्ण झाले असून, मे महिन्याच्या उत्तरार्धात त्याचे प्रकाशन पुण्यात केले जाणार आहे. या अल्बमविषयी राहूल देशपांडे यांनी सांगितले की, निर्गुणी भजने ही खास भारतीय परंपरा. कबीर आणि त्यांच्या समकालीन संतांनी केलेल्या रचना त्यात मोडतात.

आमचंबी कॉकटेल!!!

लेखक पिवळा डांबिस यांनी मंगळवार, 21/04/2009 06:25 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसांपासून आपल्या सर्वांचे लाडके मिपाकर श्री. नाटक्या हे इथे विविध कॉकटेल्सची (अगदी मनमोहक फोटोंसकट!!) माहिती देत आहेत.... आणि थोड्याच दिवसांपूर्वी एक नाटक्या बेसनलाडूनी (गरज वाटल्यास स्वल्पविराम घालावेत!:)) उत्तर कॅलिफोर्नियात केलेल्या कॉकटेल पार्टीचा सविस्तर वृत्तांतही आपण वाचला..... तो वृत्तांत वाचून डांबिसकाका अस्वस्थ झाले आणि त्यांनी गर्जना केली, "अरे सदर्न कॅलिफोर्नियावाल्यांनो! बघा ती उत्तरेची भय्या (म्हणजे भाऊ हो!) मंडळी किती धमाल करून र्‍हायली!!

कृष्णस्वामिनी..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 20/04/2009 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
राजपुताना जन्म तिचा, मेवाडची महाराणी होती भातुकलीच्या खेळामध्ये श्रीकृष्णाची रमणी होती.. दिन सरले ऋतू सरले, खेळ ना तो संपला कधी गोविंदाच्या लीला मध्ये रमलेली ती तरूणी होती.. गीत तयाचे, नाव तयाचे, तन-मन अन रूप तयाचे संसाराच्या वेशीवरती, कृष्णमयी ती गृहिणी होती.. कुणी म्हणे तिज व्यभिचारी, कुणी म्हणे तिज बेताला कृष्णभक्तीचा नाद ल्यायली, ती वेडी तपस्विनी होती मधु म्हणूनी विष प्यायली, सर्पमाला ती ल्यायली कृष्णप्रेमा चिंब नाहली, ती अभिसारिणी होती.. सभोवताली अत्याचारी, मोह-माया पाश सारे अंध:कारी जगतामध्ये, लखलखती दामिनी होती 'पौरूष एकच, तो मुरलीधर, अन्य गोपिका....' ती सांगे रायदासी शिष्योत्तमा
Taxonomy upgrade extras

बळ दे !

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 20/04/2009 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
बळ दे.....! दोन हात जोडून माझं एकंच मागणं देवा , दु:ख दूर करू नकोस , ते सोसायचं बळ दे ! कोण तसा जीवनांत सुखासीन असतो? स्व दु:खात आणि पर सुखात हसायचं बळ दे ! जीवनाच्या जुगारांत हार्-जीत असणारच ! एकदा तरी सुंदरशी खेळी फसायचं बळ दे ! दिवसा ढवळ्या भले कितीही पापं लपू देत ! पण अंधारातही स्वत:च्या चुका दिसायचं बळ दे ! कुणीतरी जीव लावलंच ना या वेड्याला? थकून कधी ते अश्रू ढाळील , तर ते पुसायचं बळ दे ! स्वप्नं ऊरी कवटाळून रमी खेळत रहाणारा मी ! सरते शेवटी "प
Taxonomy upgrade extras

धम्माल पिक्चर बोक्या सातबंडे

लेखक यन्ना _रास्कला यांनी रविवार, 19/04/2009 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
कालच मस्त पिक्चर पाह्यल. बोक्या सातबंडे. घरच्या सर्व लोकान्ला घेउन मुद्दाम होउन पाहन्यासारखा पिक्चर आहे तो. बच्चे कंपनीला तर फारच आवडेल पण मोठ्या माणसान्ला पन आवडेल.

पौर्णिमा

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 17/04/2009 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
काव्य विभागातल्या पौर्णिमा पाहून {वाचून} मला माझी पौर्णिमा खुणावू लागली. थोडी वेगळी पौर्णिमा. हाकारले फुलांनी अंगार शोधताना मज पौर्णिमा गवसली अंधार शोधताना एकेक पाकळीचा एकेक सूर झाला हरपून भान गेले गंधार शोधताना माझ्यापुढे खुली ही झाली कुबेरनगरी, माझ्याच अंतरीचे भांडार शोधताना डोळ्यांत दाटलेले ते भाव मूर्त झाले नाकारण्यात दडला स्वीकार शोधताना खुलली अजाणता ती विश्वातली रहस्ये, सगुणात निर्गुणाचा आकार शोधताना मी, सावळ्या अरूपाची ब्रम्हलीन छाया झाले तपस्विनी का संसार शोधताना?

वादळवारा

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 17/04/2009 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
काल संध्याकाळी फोटो काढत होतो तोच अचानक वादळवारा आला व त्यावेळी खेचलेले हे फोटो अंदाजे तासी ६०-७० च्या ही पेक्षा वेगाने वारा वाहत होता, स्थळ : फार्म हाऊस, मानेसर, गुडगांव.