लेखकटायबेरीअसयांनी गुरुवार, 16/04/2009 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
१६ एप्रिल . चार्ली चाप्लिन यांची जयंती.
पु. लं. चे दैवत याहून काही अधिक लिहिणे आहे काय?
परंतु यानिमित्ताने चार्ली च्या कलाकृतींचा रसास्वाद मिपा वर व्हावा ही इच्छा!
लेखकभाग्यश्रीयांनी बुधवार, 15/04/2009 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
आज खूप दिवसांनी निवांत वेळ मिळाला.. म्हटलं आज काहीतरी छान , वेळ काढून, नीट लिहावे.. आता ते छान झालं की नाही माहीत नाही..! पण मन लावून लिहीतीय.. नेहेमी लिहीताना इतका विचार, इतकी तयारी मी एरवी नक्कीच करत नाही!
तर मी आज सुरवात करतीय "माझी भटकंती" लिहायला.. जसं जमेल तसे इथे पाहीलेल्या गोष्टी, ठीकाणं इत्यादींवर लिहायचे ठरवत आहे.. ते प्रवास वर्णन असेल की अजुन काय ते माहीत नाही..
लेखकविंजिनेरयांनी मंगळवार, 14/04/2009 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
वसंत ऋतू हा कुणालाही वेड लावणारा असतो.
कोरिया आणि जपानात साकूरा अर्थात चेरी ब्लॉसम जेव्हा फुलतो तेव्हा लोक वसंताच्या आगमनाला सज्ज होतात. ही रंगाची मुक्त उधळण साधारण दर ८-१० दिवसांच्या अंतराने बदलत जाते.
लेखकशाल्मलीयांनी सोमवार, 13/04/2009 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
गेले ४-५ महिने घराच्या बाहेर झाडांचे खराटे, थंड वारे, एकतर बर्फ तरी नाहीतर नुसतीच भयानक थंडी, सगळे पक्षी उष्ण देशात पळून गेलेले असं चित्र बघून नुसता कंटाळा आला होता. अशातच एक दिवस म्हणजे साधारण २०-२२ मार्चच्या आसपास एक पक्षी चोचीत काडी घेऊन उडत चाललेला दिसला. आम्हाला चाहूल लागायच्या आधी पक्ष्यांना चाहूल लागली होती वसंतऋतूच्या आगमनाची! आता ३-४ दिवसातच अजून काही पक्ष्यांची घरटं बांधण्यासाठीची लगबग दिसू लागली.
लेखकप्राजुयांनी सोमवार, 13/04/2009 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
हृदयांत रंगलेल्या खेळात येशील का?
हा डाव प्रीतिचा गं तू पूर्ण करशील का?
बघ मागतो तुला मी आकाश चांदण्याचे
मज आस पौर्णिमेची तू चंद्र होशील का?
पाऊस घेत हाती मल्हार छेडतो मी,
होऊन धार मजला, तू चिंब करशील का?
दिवसांत कैकवेळा घेतो मिठीत तुजला
होऊन रातराणी श्वासात उरशील का?
भिजल्या अनेक रात्री बघ आठवांत तुझिया
ओलावल्या मनाने मज तू स्मरशील का?
दिधले मला सखे तू उद्दिष्ट जीवनाचे
ते ध्येय पूर्ण करण्या तू हात धरशील का?
हे पाहिले तुझ्या मी, डोळ्यांत स्वप्न माझे
घेऊन ते उराशी साकार करशील का?
- प्राजु
लेखकनरेंद्र गोळेयांनी शनिवार, 11/04/2009 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तक परिचयः कालगणना, लेखकः मोहन आपटे, राजहंस प्रकाशन, आवृत्ती पहिलीः जुलै २००८, किंमतः रू.२००/- फक्त.
पंचांग आणि खगोलशास्त्र यांचा अतिशय घनिष्ट संबंध आहे. सूर्यनिर्मित ऋतुचक्र किंवा चंद्राचे कलाचक्र यांच्या संयोगानेच पंचांगांची रचना केली जाते. भारतीय पंचांगाचे नाते, आकाशाशी निरंतर जडलेले आहे. म्हणूनच त्यासारखे माहितीदायक पंचांग दुसरे नाही.
लेखकलिखाळयांनी गुरुवार, 09/04/2009 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
गोठलेले शब्द या जालिंदरांच्या कविता संग्रहातील एक कविता येथे लिहिण्याचा मोह आवरत नाही. वास्तविक हा संग्रह माझ्याकडे नाही. पण ती कविता कधीकाळी त्यांच्या 'भाषणाच्या बदल्यात भाकरी' या भाषणादरम्यान त्यांनी म्हटली आणि मी लिहून घेतली होती असे फिकट आठवते आहे. एखादेवेळी ही कविता त्या संग्रहात संग्राहित केली नसण्याची शक्यताही आहेच. पण आस्वाद घ्यायला काय हरकत? माझ्याकडील कविता एका जीर्ण पिवळ्या कागदावर हिरव्या शाईने लिहिली होती. कवितेतील काही शब्द वृत्त-मात्रांत बसत नसतील तर दोष त्या कागदाच्या प्रतिचा अथवा शाईच्या टिकून न राहण्याच्या गुणधर्माचा आहे.
लेखकविकासयांनी गुरुवार, 09/04/2009 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
काही आठवड्यांपुर्वी 21 नावाचा एक २००८ साली काढलेला चित्रपट अचानक पहाण्यात आला. त्या कथेचे मूळ असलेली सत्य घटना बॉस्टनशी म्हणजे एम आय टी शी संबंधीत असल्याने कधीतरी ऐकली होती. केवीन स्पेसी हा आवडता नट असल्याने बघुया तरी म्हणत आम्ही बघायला बसलो आणि बर्याच दिवसांनी मनोरंजनासाठी काहीतरी नवीन पहायला मिळाले असे वाटले.