Skip to main content

लेख

संस्कारनगरी वडोदरा

लेखक संतोषएकांडे यांनी रविवार, 16/03/2014 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी मोदक यांचा वडोदरा (बडोदा) प्रवासाचा लेख मिपावर आला होता. वडोदरा बद्दल ओढ असणारे बरेचशे मिपाकर त्या लेखाच्या प्रतिक्रीयेत दिसले. म्हणूनच वडोदराची जवळून ओळख करून देण्यासाठी हा लेख. संस्कारनगरी,विध्यानगरी,साहित्यनगरी किंवा कलानगरी अशी विश्वात कीर्ती मिळवून देण्याबद्दल वडोदरा संस्थान श्रीमंत सयाजीराव गायकवाड ३रे यांचं सदैव ऋणी आहे. स्वातंत्र्याआधी वडोदरा संस्थान निझामाच्या हैद्राबादा नंतर भारताचं दूसरं भव्य राज्य होतं. तरीही वडोदराला इंग्रजां कडून जास्तच महत्व मिळालं होतं. श्रीमंतांनी बरीचशी स्थापत्य व महालांचं राज्यात निर्माण केलं.

कारट्या ची शाळा एडमिशन . (ललित लेख )

लेखक राजघराणं यांनी सोमवार, 10/03/2014 01:16 या दिवशी प्रकाशित केले.
कारट्या ची शाळा एडमिशन . (ललित लेख ) आमचे चिरंजीव श्री राजवीर दिक्षित नुकतेच तीन वर्षाचे होतील. तवा साहेबांच्या शाळा प्रवेशासाठी गेला आठवडाभर मिशन हाती घेतले होते. आमचे शिक्षण सरकारी शाळेत झालेले - पाच रुपये फी वाल्या . पण पोराला इंटरनेशनल अभ्यासक्रमाच्या शाळेत टाकायचं असा निश्चय केला . बांद्रे सांताक्रूझ च्या शांळाची चौकशी सुरु केली . फार माहिती नेट वर नाही . मग सुजाण पालक या नात्याने मी , बायको आणि चिरंजीव असे तिघे शाळा शोधत फिरू लागलो . शेवटी बर्याच चौकशी अंती सान्ताक्रुझ पश्चिम येथील एका प्रथित यश शाळेकडे काल मोर्चा वळवला . पूर्ण रस्ता भर आमची पत्नी पढवत होती .

डोंबिवली कट्टा ०२ मार्च वृत्तांत

लेखक सुबोध खरे यांनी सोमवार, 03/03/2014 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
काल दि ०२ मार्च रोजी डोंबिवली ( मध्यवर्ती ठिकाण -मुवि ) येथे हॉटेल नंदी पैलेस या ठिकाणी मिपा कट्टा संपन्न झाला. मुळात मला घारापुरी कट्ट्याला येता न आल्याची खंत होतिच म्हणून हा कट्टा करायचाच हे मी ठरवले होते. माझ्या मुलाची बारावीची परीक्षा असल्याने मला थोडासा उशीर झाला.( मी त्याचा अजून अभ्यास घेतो हे मला आनंदाने नमूद करावेसे वाटते). मुवि आणि बाकी सर्व जण साडे सात वाजता तेथे पोहोचले आणि जागा राखून ठेवलेली होती. त्यामुळे मी पोहोचे पर्यंत समारंभाला सुरुवात झालेली होती. आजचे आपले पाहुणे श्री दीपक कुवेत ते पण पोहोचलेले होते. माझी कल्पना अशी होती के हे कोणीतरी मध्यम वयीन सद्गृहस्थ असावेत.

अजंठा ...........भाग-३

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 03/03/2014 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire अजंठा ...........भाग-१ अजंठा ...........भाग-२ या भागात आपण अजंठाची चित्रे कशी केली असतील व त्या चित्रांच्या संवर्धनासाठी आत्तापर्यंत काय काय प्रयत्न केले गेले, त्यात मूळ रंग कसे बरबाद झाले इत्यादि घटनांची माहिती घेऊ.... विष्णोधर्मोत्तरम् या ग्रंथाच्या चाळीसाव्या प्रकर

गणपत आणी कोंबड्या

लेखक मनोजकुमार यांनी शनिवार, 01/03/2014 03:12 या दिवशी प्रकाशित केले.
गणपत आणी कोंबड्या गणपत गावातील गरीब माणूस होता. त्याचे कोंबड्या वर प्रेम होते. त्याची स्वताची एकही कोंबडी नव्हती, परंतु त्याच्या आजू-बाजू ला बरयाच कोंबड्या होत्या. ह्या कोंबड्याना बघून तो खूप आनंदी होत असे. कधी कधी ह्या कोंबड्याना तो दाणे टाकीत असे. कोंबड्याना दाणे मिळाल्यामुळे त्या पण गणपत वर खूप खुश होत्या. त्याने टाकलेले दाणे कोंबड्या लगेचच फस्त करीत. ह्या सगळ्या कोंबड्या मध्ये काही कोंबड्या रोज एक अंडा देत. काही कोंबड्या फक्त दाणे खात पण अंडी देत नसत. अश्या कोंबड्याचा गणपतला खूप राग येइ. सगळ्या कोंबड्यानी दिलेल्या अंड्या मधून गणपत फक्त एक अंडा रोज उचलत असे.

अजंठा ...........भाग-२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 28/02/2014 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire अजंठा ...........भाग-१ वत्सगुल्म शाखा : वाकाटकांची अशी काही शाखा आहे हे १९३९ पर्यंत माहीतच नव्हते. तसे अजंठामधे यांचे बरेच शिलालेख आहेत पण वाईट अवस्थेमुळे त्याच्यातील नावे चुकीची वाचली गेली. अकोला जिल्ह्यात वाशीम येथे एक ताम्रपट सापडल्यावर बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला.