Skip to main content

लेख

मेन्स टॉक

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 26/02/2014 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
(शुक्रवारी संध्याकाळी जुन्या मित्रांची ओली-सुकी पार्टी करायचा बेत एका गार्डन रेस्टारंन्ट मध्ये ठरला. सगळ्यांना कधीनव्हे ते बायकांकडुन परमिशन पण मिळाली) कारे जानव्या! उरफाट्या न्हाई आला अजुन? … बन्ट्या (ठुश्या वैतगलेल्या सुरात) तुले लै आठोन येउन र्‍हायली त्याची? असन भहिनमाय कुठ्तरी फकाल्या तानत! ...ठुश्या तु काहुन अंगार मुतुन र्‍हायला बे? ...बन्ट्या अंगार? भाडखाव परवा घरी आला अन भांड्न लाउन गेला आम्च्यात. हीले सायचा हा वहीनी नाय म्हन्नार तं, काय, " ताई! कश्या आहात? बरं चाल्लये ना? आजकाल काम जरा वाढलयं वाटतं साहेबांच? फीरायला नाही गेले एव्हाना कुठं?

उभारी देणारे असे काही

लेखक पिंपातला उंदीर यांनी रविवार, 23/02/2014 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
struggle शब्दाचा एक लोचा आहे . आपल्याकडे हा शब्द आर्टस ला admission घेणाऱ्या , नाटक -चित्रपट क्षेत्रात career करू इच्छिणार्यां आणि दहा ते पाच ची चाकोरी सोडून वेगळी वाट चोखाळणार्या लोकाना उद्देशुन वापरला जातो . मुळात मला अस वाटत की प्रत्येकजण हा त्याच्या / तिच्या पातळीवर एक struggle करतच असतो. म्हणजे बापाशी बिघडलेले संबंध पुर्ववत करण्यासाठी धडपडणारा पोरगा हा एक struggle च करत असतो . नौकरी मध्ये बॉस आपली ठासत आहे हे कळत असून पण नौकरी टिकवण्यासाठी धडपड करणारा मध्यमवर्गीय माणूस पण रोज संघर्ष करीतच असतो.

अजंठा ...........भाग-१

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 23/02/2014 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire हे चित्र प्रत्येक भागावर असेल........ अजंठा : ‘त्या काळ्याकुळकुळीत कातळावर पडलेली उन्हं हळुहळु लालसर होऊ लागली आणि त्या अर्धवर्तुळाकार घोड्याच्या नालेचा आकार असलेल्या घळीच्या दुसऱ्या टोकाला सुर्यबिंब मावळू लागले. त्या सुर्याच्या रेंगाळणाऱ्या किरणांनी प्रथम बुद्धाच्या चरणकमलांचे दर्शन घेतले.

कल्की

लेखक निलरंजन यांनी शनिवार, 22/02/2014 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
कल्की अवतार हा विष्णूचा अंतिम अवतार आहे असे म्हटले जाते की कलियुगा मध्ये अशी वेळ येईल की लोक खूप वाईट वागतील. जगाला हया संकटातून मुक्त करण्यासाठी कल्की अवतार पृथ्वीवर येतील, आणि जगातून वाईट गोष्टी नष्ट करेल तो जे वाईट वागेल त्याला ठार मारेल. लोक नंतर बदलतील, आणि चांगले लोक तयार होतील.

सल्ला – एक अगत्याचे घेणेदेणे

लेखक सस्नेह यांनी शनिवार, 22/02/2014 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
मला याची जाणीव नव्हती, पण माझ्या आसपासचा आसमंत अतिशय कनवाळू, विद्वत्तापूर्ण, अभ्यासपूर्ण अन सदैव पर-मदतीस तत्पर अशा सज्जन सल्लागारांनी प्रथमपासून परिपूर्ण असत आला आहे. ‘पर-मदत’ अशासाठी, की यांना स्वत:ला अनादी अनंत काळापासून कोणत्याच मदतीची कधी गरज पडली नसावी, अशी शंका येण्याइतपत स्वयंसिद्ध स्वयंपूर्ण असे हे महाभाग होत. पुन्हा, हे विद्वान लोक सर्वव्यापी होत. याचा पुरावा म्हणजे वर्तमानपत्रे अन मासिके यातून झालेला ‘ताईचा सल्ला ’, ‘माईचा सल्ला’, ‘काकांचा सल्ला’, इत्यादिंचा झालेला बोलबाला ! तसे तर आयुष्यात असंख्य प्रसंगी या सल्लावंतांनी मला तारून नेले आहे.

"घर गृहस्थी"

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 21/02/2014 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
घर गृहस्थी हि मी मुंबईच्या अश्विनी या नौदलाच्या रुग्णालयात काम करत असतानाची गोष्ट आहे. मी तेथे नौसैनिकांच्या कुटुंबियांच्या वार्ड चा प्रमुख होतो. एक दिवस एक १०४ ए डी( एयर डिफेन्स) रेजिमेंट या कालिन्याला असलेल्या लष्कराच्या रेजिमेंट मधून एक शिपाई आपल्या बायकोला भरती करण्यासाठी घेऊन आला.( या रेजिमेंट मध्ये विमानविरोधी तोफा आहेत आणि मुंबई विमानतळाचे हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्या कडे असते. त्याचे नाव राजबीर सिंह आणि बायकोचे नाव (बहुधा) राजकुंवर (वय २२-२३ असावे) होते. हे राजस्थानातील झुनझुनू गावचे होते.

लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या; श्री. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या गौरवपर अग्रलेखाचा इंग्रजीते मराठी अनुवाद

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 18/02/2014 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
१९ फेब्रुवारी हि आपणा सर्वांना प्रीय लोकोत्तर श्री छत्रपती शिवरायांची जयंती आहे. या निमीत्ताने मराठी विकिस्रोताच्या माध्यमातून आणि मिपा. धाग्याच्या साहाय्यातून साकार झालेल्या अनुवाद प्रयास (अनुवाद (पर्याय १ला)) आपणा समोर सादर करत आहे. *मूळ इंग्रजी लेख : IS SHIVAJI NOT A NATIONAL HERO ??

तंत्रज्ञानाची 'उपयोगशील' रचना: आधुनिक जगाची गरज

लेखक कल्पक यांनी मंगळवार, 18/02/2014 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला एखाद्या वेबसाईटवर हवी ती माहिती पटकन मिळत नाही आहे का? मोबाईल फोनमध्ये विविध गोष्टी वापरताना गोंधळ होतो आहे का? एखादी कार्यप्रणाली (Software) वापरणं कठीण वाटतंय का? इंटरनेटद्वारे बँकेचे व्यवहार करताना अडचणी येत आहेत का? एटीएम मशीन वापरताना अडचणी येत आहेत का? या प्रश्नांचे उत्तर हो असे असेल तर तुम्ही वापरत असलेल्या उत्पादनांची "उपयोगशीलता" (Usability) वापरणाऱ्यांसाठी (Users) योग्य नाही किवा ह्या उत्पादनांची रचना (Design) व्यवस्थित नाही. कोणतेही उत्पादन केवळ आधुनिक आणि सुंदर असून चालत नाही तर ते लोकांना वापरण्यासाठी सोयीचे, उपयुक्त असावे लागते.

उत्साहानं भारलेली डेनवरची सोळावी गल्ली

लेखक कल्पक यांनी सोमवार, 17/02/2014 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
डेनवर हे अमेरिकेतील कोलोरॅडो राज्याच्या राजधानीचे शहर. कोलोरॅडो हे भौगोलिकदृष्ट्या बव्हंशी पर्वतीय राज्य. कोलोरॅडो या नदीवरून राज्याला नाव देण्यात आलं. डेनवर हे शहर समुद्रसपाटीपासून 5,280 फूट किंवा 1 मैल (1.6 कि.मी.) उंचीवर आहे. त्यामुळे या शहराला Mile High City (1 मैल उंच शहर), असं टोपण नावसुद्धा आहे. 1858 साली डेनवर शहर वसवण्यात आलं. या भागातील 500 चौरस मैलांच्या प्रदेशात डेनवर हे एकमेव शहर असल्यामुळे उद्योग, व्यापार, रोजगार, वाहतूक आणि शिक्षण या सर्व गोष्टी डेनवर येथेच केंद्रित आहेत.